Baramati By-Election Results 2026 : बारामतीत सुनेत्रा पवार आघाडीवर, राहुरीत अक्षय कर्डिलेंचं काय झालं ?

आज पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूक निकालासोबतच महाराष्ट्राचे लक्ष बारामती आणि राहुरीच्या पोटनिवडणुकीकडे लागले आहे. बारामतीमध्ये सुनेत्रा पवार आघाडीवर असून, राहुरीत अक्षय कर्डिले विजयी पताका फडकवण्यासाठी सज्ज आहेत. मतमोजणी सुरू असून, दोन्ही महत्त्वाच्या जागांवर कोण बाजी मारणार हे लवकरच स्पष्ट होईल.

Baramati By-Election  Results 2026 : बारामतीत सुनेत्रा पवार आघाडीवर, राहुरीत अक्षय कर्डिलेंचं काय झालं ?
सुनेत्रा पवार
| Updated on: May 04, 2026 | 10:13 AM

सोमवारची सकाळ उजाडताच संपूर्ण देशाचं लक्ष पाच राज्यांच्या निवडणुकीच्या निकालाकडे लागलं असून पश्चिम बंगाल, केरळ, आसाम , तामिळनाडू आणि पुद्दुचेरी विधानसभेच्या निवडणुकीच्या मतमोजणीला सुरूवात झाली आहे. इथे विजयी पताका कोण फडकावतं याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. पण आजचा दिवस महाराष्ट्रासाठी देखील तितकाच महत्वाचा असून बारामती आणि राहुरी येथील पोटनिवडणुकीचा निकाला आज लागणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर बारामती विधानसभेची जागा रिक्त झाली, त्यानंतर सुनेत्रा पवार यांनी ही निवडणूक लढवली. राहुरीचे आमदार शिवाजी कर्डिले यांचं निधन झाल्यानंतर राहुरीची डागा रिक्त झाली, त्याची पोटनिवडणूक कर्डिले यांचे सुपुत्र ्7य कर्डिले यांनी लढवली असून आज या दोन्ही पोटनिवडणुकांचाही निकाल लागणार आहे.

सुनेत्रा पवार आघाडीवर

28 जानेवारी रोजी बारामती येथे झालेल्या विमान अपघातात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह 5 जणांचा मृत्यू झाला. अजित दादांच्या जाण्याने संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली. त्यानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रपदाची शपथ घेतली. त्यानंतर एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात (23 एप्रिल) बारामती विधानसभेची झालेली पोटनिवडणूक सुनेत्रा पवार यांनी लढवली. आज 5 राज्यांसह बारामतीच्या निवडणुकीचाही निकाल असून मतमोजणीला सुरूवात झाली आहे.ही निववडणूक बिनविरोध व्हावा यासाठी महायुतीचा भर होता, राज्यातील इतर विरोधी पक्ष, मोठ्या पक्षांनी उमेदवार दिले नसले तरीही काही अपक्षांनीही ही निवडणूक लढवली. आज सकाळी बारामती पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला सुरूवात झाली असून सुनेत्रा पवार या 36591 मतांनी आघाडीवर आहेत. या ठिकाणी सुनेत्रा पवार किती लाख मतांनी जिंकतात याकडे सगळ्याचं लक्ष लागलं आहे.

अक्षय कर्डिलेंची स्थिती काय ?

तर बारामतीप्रमाणेच राहुरी विधानसभा पोटनिवडणूकही झाली. राहुरीचे आमदार शिवाजी कर्डिले यांचं निधन झाल्यावर बाजपतर्फे त्यांचे पुत्र अक्षय कर्डिले यांना उमेदवारी देण्यात आली आणि त्यांनी निवडणूक लढवली. त्यांना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून गोविंद मोकाटे तसेच वंचित बहुजन आघाडीकडून संतोष चोळके यांनी कडवं आव्हान दिलं होतं. आ सकाळी मतमोजणीला सुरूवात झाली असून मतमोजणीत भाजपचे अक्षय कर्डीले जवळपास आघाडीवर आहेत.

पहिल्या फेरीत 4266 मतांनी आघडीवर असलेल्या कर्डिले यांनी दुसऱ्या फेरीअखेरीसही मोठी आघाडी कायम ठेवली. दुसऱ्या फेरीअखेरीस भाजपच्या अक्षय कर्डिले यांना 11071मतं तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे गोविंद मोकाटे यांना – 1434मत मिळाली असून सध्या अक्षय कर्डिले हे 9637  मतांनी आघाडीवर आहेत. दुस-या फेरीअखेर एकुण 20476 मतांची मोजणी झाली.

Follow Us