AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tamil Nadu election results 2026 : तंबूच उखाडला… पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’

तामिळनाडू विधानसभा निवडणुकीचे सुरुवातीचे कल धक्कादायक आहेत. सुपरस्टार विजयच्या टीव्हीके पक्षाने अनपेक्षितपणे आघाडी घेतली आहे, तर विद्यमान मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या डीएमकेला मोठा धक्का बसला आहे. एक्झिट पोलचे अंदाज फोल ठरवत विजयने पहिल्याच निवडणुकीत बंपर जागा मिळवल्या. डीएमकेच्या विजयाचा तंबू उखडला गेला, तर टीव्हीके कार्यालयात जल्लोष सुरू आहे. ही तामिळनाडूच्या राजकारणातील मोठी उलथापालथ आहे.

Tamil Nadu election results 2026 :  तंबूच उखाडला... पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड 'विजय'
विजय यांच्या टीव्हीके पक्षाला बंपर जागा मिळताना दिसत आहे
| Updated on: May 05, 2026 | 1:12 PM
Share

तामिळनाडू विधानसभा निवडणुकांचे सुरुवातीचे कल हाती आले आहेत. या कलानुसार राज्यात मोठी उलथापालथ होताना दिसत आहे. राज्यात विद्यमान मुख्यमंत्री स्टॅलिन यांना खुर्ची गमवावी लागताना दिसत आहे. राज्यात सुपरस्टार विजय यांच्या टीव्हीके पक्षाला बंपर जागा मिळताना दिसत आहे. विजय यांची ही पहिलीच निवडणूक आहे. तरीही जनतेने त्यांच्यावर विश्वास टाकला आहे. सुरुवातीच्या कलात विजय यांच्या पक्षाला 102 जागा मिळताना दिसत आहे. ही फार मोठी जमेची बाजू असल्याचं सांगितलं जात आहे. एक्झिट पोलमध्ये विजय यांना झटका बसणार असल्याचं सांगितलं जात होतं. पण मतदारांनी एक्झिट पोलचा अंदाजच उडवून लावला आहे. सुरुवातीच्या कलात टीव्हीके सत्तेत जाताना दिसत असल्याने डीएमकेच्या कार्यालयाबाहेरचा तंबू काढण्यात आला आहे.

सुरुवातीच्या कलानुसार राज्यात टीव्हीके हा सर्वा मोठा पक्ष ठरताना दिसत आहे. टीव्हीकेला सुरुवातीच्या कलात 102 जागा मिळताना दिसत आहेत. तर एआयडीएमकेला 54 आणि सत्ताधारी डीएमकेला 70 जागा मिळताना दिसत आहे. म्हणजे सत्ताधारी डीएमके अजूनही 32 जागांनी पिछाडीवर आहे. हा स्टॅलिन यांच्यासाठी सर्वात मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे.

तंबूच उखाडला…

एक्झिट पोलमध्ये राज्यात डीएमकेची सत्ता येणार असल्याचं सांगितलं जात होतं. त्यामुळे डीएमकेला दिलासा मिळाला होता. त्या पार्श्वभूमीवर डीएमकेने आपल्या मुख्यालया बाहेर तंबू टाकला होता. तसेच कार्यकर्ते आणि नागरिकांना निकाल लाइव्ह पाहता यावा म्हणून एलईडीही लावल्या होत्या. याशिवाय कार्यकर्त्यांना बसण्यासाठी खुर्च्या आणि रेड कार्पेटही अंथरले होते. मत मोजणी सुरू झाल्यावर सुरुवातीच्या कलांमध्ये डीएमकेची सत्ता येईल असं चित्र होतं. डीएमकेचे आकडेही वाढत होते. त्यामुळे एकच जल्लोष सुरू झाला होता. पोस्टल मतांमध्ये डीएमकेने बाजी मारल्याचं दिसत होतं. नंतर ईव्हीएम मशीन उघडल्या आणि 10 वाजल्यानंतर मोठा उलट फेर झाला.

10 वाजल्यानंतर आकडे बदलले आणि डीएमकेच्या कार्यालयात चिंतेचं वातावरण पसरलं. तामिळनाडूत विजय यांच्या टीव्हीकेला सुरुवातीच्या कलात 102 जागा मिळाल्या. तर एआयडीएमकेला 54 आणि डीएमकेला 70 जागा मिळाल्या. डीएमकेला कमी जागा मिळाल्याने वातावरण सुन्न झालं. सत्ता येणार नाही, हे लक्षात आल्यानंतर पक्षाच्या मुख्यालयाबाहेरचा तंबू काढण्यास सुरुवात झाली. एलईडी टीव्हीही काढण्यास सुरुवात झाली. खुर्च्या आणि रेड कार्पेटही उचललं गेलं. कार्यकर्त्यांनीही मुख्यालयातून काढता पाय घेत घराकडे जाणं पसंत केलं. तर दुसरीकडे टीव्हीकेच्या कार्यालयाबाहेर जल्लोषाचं वातावरण होतं.

Follow Us
हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101 अमेरिकन डॉलरचा..
Mumbai Cha Raja | हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101 अमेरिकन डॉलरचा हार, व्हिडीओ होतोय व्हायरल
दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, म्हणाले...
Sanjay Raut | मातोश्रीवर येऊन प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न घाणेरडा; दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, पुढे म्हणाले...
भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण
BMW Car Accident | भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण सुटलं अन् BMW थेट खाली कोसळली
शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग
Drone In Farm | शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग, व्हिडिओ बघाच
पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम
Rohit Pawar | पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम; शेतकऱ्यांसाठी 50 हजारांची मदत अन्...
महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
Sanjay Raut | महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... संजय राऊतांचा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल
मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या...
Radhakrishna Vikhe Patil | मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या संसदेत मिळवलं स्थान
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल