AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“मी विमानात होतो, हवेतच मला मेसेज आला…”, गिरीश महाजन मंत्रिपदाबाबत काय म्हणाले?

सध्या नागपुरात कडाक्याची थंडी असली तरी मंत्रि‍पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार यावरुन वातावरण तापलं आहे. त्यात आता हळूहळू मंत्र्‍यांची नावे समोर यायला सुरुवात झाली आहे. नुकतंच भाजप नेते गिरीश महाजन यांना मंत्रि‍पदासाठी फोन गेला होता.

मी विमानात होतो, हवेतच मला मेसेज आला..., गिरीश महाजन मंत्रिपदाबाबत काय म्हणाले?
girish mahajan
| Updated on: Dec 15, 2024 | 12:09 PM
Share

Girish Mahajan First Reaction On ministry : महाराष्ट्रातील फडणवीस सरकारचा आज पहिला मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. त्यामुळे सध्या सर्वांचेच लक्ष मंत्रिमंडळ विस्ताराकडे लागले आहे. राज्यातील महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी आज नागपुरात पार पडणार आहे. आज संध्याकाळी 4 वाजता नागपूरच्या राजभवनात मोठ्या दिमाखात मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. सध्या नागपुरात कडाक्याची थंडी असली तरी मंत्रि‍पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार यावरुन वातावरण तापलं आहे. त्यात आता हळूहळू मंत्र्‍यांची नावे समोर यायला सुरुवात झाली आहे. नुकतंच भाजप नेते गिरीश महाजन यांना मंत्रि‍पदासाठी फोन गेला होता.

महायुती सरकारमधील नवीन मंत्र्यांचा शपथविधी आज पार पडणार आहे. नागपुरात आज संध्याकाळी ४ वाजता हा शपथविधी सोहळा होईल. यावेळी शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजप या तिन्ही पक्षातील मंत्री शपथ घेतील. या शपथविधीदरम्यान भाजप नेते गिरीश महाजन हे देखील मंत्रि‍पदाची शपथ घेणार आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी गिरीश महाजन यांना फोन करुन याबद्दलची माहिती दिली आहे. यानंतर गिरीश महाजन यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी संवाद साधताना प्रतिक्रिया दिली.

तिसऱ्यांदा मंत्रिमंडळाची शपथ घेणार

“मी आताच नागपुराला विमानाने लँड झालो आणि हवेत असताना मा फोन आला. मी उतरत होतो, तेव्हा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा फोन आला. त्यांनी मला चार वाजता शपथ घ्यायची आहे, असे सांगितले. मी तिसऱ्यांदा मंत्रिमंडळाची शपथ घेणार आहे. माझ्यासाठी अतिशय आनंदाचा दिवस आहे”, असे गिरीश महाजन म्हणाले.

मंत्रिमंडळात नवीन चेहऱ्यांना संधी मिळाली पाहिजे

“मी मंत्रिमंडळाची शपथ घेणार आहे. जे.पी. नड्डा, अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे यांचे मी आभार मानतो. नवीन पिढी पुढे आली पाहिजे, असं सर्वांना वाटतं. मंत्रिमंडळात नवीन चेहऱ्यांना संधी मिळाली पाहिजे. अनेक ज्येष्ठ नेतेही आहेत. माझी सातवी टर्म आहे. देवेंद्र फडणवीसांसारखे नेतृत्व लाभलेले आहे. चांगलं बहुमत मिळालेलं आहे. आम्हाला चांगलं काम करायचं आहे. पंकजा ताईंना फोन आला हे तुमच्याच माध्यमातून समोर येत आहे”, असेही गिरीश महाजन यांनी म्हटले.

“तरुण आणि अनुभवी असे मंत्री पाहायला मिळतील”

“ज्यांचा पत्ता कट करण्यात आला त्यांची समजूत काढण्याचे काम भाजपचे वरिष्ठ नेते मंडळी निश्चित करतील. या मंत्रिमंडळात काही तरुण मंडळी काही ज्येष्ठ मंडळी असे संमिश्र नेते आहेत. काही अनुभवी लोकांनाही संधी मिळाली. त्यामुळे मंत्रिमंडळात तरुण आणि अनुभवी असे मंत्री पाहायला मिळतील”, असेही गिरीश महाजन यांनी सांगितले.

Follow Us
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या नातलगाने...
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या लांबच्या नातलगाने टप्प्यात केला कार्यक्रम, नाशिक कुंभमेळ्यात कसा झाला घोटाळा?
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं...
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं का म्हणाले? टर्निंग पॉइंट ठरणारा मुद्दा काय?
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर...
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर... अखेर कपिल सिब्बल यांची कोर्टाकडे मोठी मागणी
भर मंचावरून जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीर...
Manoj Jarange Video | भर मंचावरून मनोज जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीरावरून, चेहऱ्यावरून...
पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण...
Sukhbir Singh Badal | पंजाबच्या माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण काय? याआधीही... मोठी अपडेट समोर
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय...
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे...
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे आदेश आयोगाला देऊ शकत नाही, मग...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल यांनी नेमका युक्तिवाद काय लढवला?
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजून झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या...
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजूने झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या मुद्यावर युक्तिवाद, कोर्टाचं निदर्शन काय?
कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान
शिवसेना पक्षचिन्ह प्रकरण: कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान