Devendra Fadnavis : शक्तीपीठ महामार्गाने मुख्यमंत्री मराठवाड्याचा दुष्काळ कसा संपवणार? असा आहे डिटेल प्लान
Devendra Fadnavis : महाराष्ट्र सरकारने शक्तीपीठ महामार्ग उभारण्याच्या योजनेवर काम सुरु केलय. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून हा महामार्ग जाणार आहे. हा महामार्ग उभारण्यासाठी सरकारला मोठं कर्ज काढावं लागणार आहे. हा महामार्ग राज्यासाठी कसा आवश्य आहे, त्यातून मराठवाड्याचा दुष्काळ कसा संपवता येईल? त्याचा डिटेल प्लान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितला.

शक्तीपीठ महामार्गासंदर्भात वित्त विभागाने काही शेरे मारले आहेत, असं बोललं जातय. त्यावर मुख्यमंत्री बोलले. “पहिली गोष्ट म्हणजे वित्त विभाग कधी घेत नाही, असा कुठलाही आक्षेप घेतलेला नाही. अशा गोष्टी पॉइंट आऊट करणं हे वित्त विभागाच कामच असतं. त्या त्यांनी पॉइंट आऊट केल्या” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. “त्याला वित्त विभागाचा आक्षेप वैगेरे म्हणता येत नाही. एक महामार्ग जेव्हा बनतो, तेव्हा तो अर्थव्यवस्थेची दालनं उघडतो. 12 हजार कोटींची तुन्ही इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये गुंतवणूक करत असाल, तर तो परतावा 12 हजार कोटीपेक्षा कितीतरी जास्त असेल” असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
“म्हणूनच जगातले सगळे देश कर्जातून इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण करतात. अर्थव्यवस्थेचा नियम आहे. इन्फ्रास्ट्रक्चरसाठी कर्ज घेतलं तर उत्तम कर्ज मानलं जातं. अर्थव्यवस्थेचा विस्तार होतो. रोजगार निर्माण होतात” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. “काही लोक प्रत्येक गोष्टीला विरोध करतात. आज समृद्धी महामार्गाने अनेक जिल्ह्याचं चित्र बदललं आहे. विशेष करुन मराठवाडा आणि दुष्काळी भागाच चित्र बदलायच असेल, तर शक्तीपीठ महामार्ग हे त्याच उत्तर आहे” असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
दुष्काळी भागाचं चित्र बदलणार महामार्ग
“शक्तीपीठ महामार्गाच्या प्रत्येक 100 किमीच्या स्ट्रेचमध्ये 500 ते 1000 शेततळी उभारणार आहोत. शक्तीपीठ महामार्गावर जे नाले क्रॉस होतात, तिथे ब्रिजकम बंधारे बांधणार आहोत. पाणी अडवणार आहोत. दुष्काळी भागात जलसंवर्धनाकरीता याचा मोठा उपयोग देखील होईल. यातून मोठ्या प्रमाणात ग्रीन एनर्जी निर्माण होईल. मराठवाडा दुष्काळी भागाच चित्र बदलणारा हा महामार्ग आहे” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
