EXCLUSIVE : सर्वात मोठी बातमी, शिंदे-फडणवीस आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री समोरासमोर, गुजरातमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्यात अहमदाबादच्या विमानतळावर भेट झाल्याची माहिती समोर आलीय.

EXCLUSIVE : सर्वात मोठी बातमी, शिंदे-फडणवीस आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री समोरासमोर, गुजरातमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी
Follow us
| Updated on: Dec 12, 2022 | 11:04 PM

दिनेश दुखंडे, अहमदाबाद : गुजरातमधून एक मोठी बातमी समोर आलीय. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्यात अहमदाबादच्या विमानतळावर भेट झाल्याची माहिती समोर आलीय. विशेष म्हणजे या भेटीवेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील तिथे उपस्थित होते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्यात महत्त्वाच्या विषयावर चर्चा झालीय.

विशेष म्हणजे महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यात सध्या सुरू असलेल्या सीमावादादरम्यान आज पहिल्यांदाच शिंदे-फडणवीस आणि बोम्मई यांची भेट झालीय. त्यामुळे दोन्ही राज्याच्या पत्रकार आणि राजकीय विश्लेषकांचं या भेटीकडे लक्ष केंद्रीत झालंय.

गुजरातचे नवे मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल यांच्या शपथविधी सोहळ्याला महाराष्ट्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई उपस्थित होते.

हे सुद्धा वाचा

शपथविधीनंतर आपआपल्या राज्यात परत जात असताना शिंदे, फडणवीस आणि बोम्मई यांची विमानतळाच्या विशेष कक्षात भेट झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळालीय.

दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर गुजरातमध्ये महत्त्वाच्या घडामोडी घडल्याची चर्चा आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावादावरुन राज्यातील राजकीय वातावरण प्रचंड तापलंय.

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सोलापूर आणि सांगलीतील अनेक गावांवर दावा केलाय. विशेष म्हणजे काही गावं स्वत:हून कर्नाटकात जाण्यास इच्छूक आहेत. त्यामुळे राजकीय वातावरण तापलंय.

सीमावादाचा विषय सध्या न्यायप्रविष्ट आहे. सुप्रीम कोर्टात याबाबत सुनावणी सुरु आहे. असं असताना कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी हा वाद पुन्हा उरकून काढलाय. या सगळ्या घडामोडींदरम्यान दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची आज झालेली प्रत्यक्ष भेट ही महत्त्वाची मानली जातेय.

Non Stop LIVE Update
तर मी राजीनामा देऊन...., बीडमधील सभेत उदयनराजे भोसले भावूक
तर मी राजीनामा देऊन...., बीडमधील सभेत उदयनराजे भोसले भावूक.
...तर उद्धव ठाकरे लवकरच तुरुंगात दिसतील, अरविंद केजरीवाल यांचा दावा
...तर उद्धव ठाकरे लवकरच तुरुंगात दिसतील, अरविंद केजरीवाल यांचा दावा.
सरकार काय त्यांच्या..., अजित पवार यांचं बीडमधील भाषण चर्चेत
सरकार काय त्यांच्या..., अजित पवार यांचं बीडमधील भाषण चर्चेत.
छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुती आणि ठाकरे गट आमने-सामने
छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुती आणि ठाकरे गट आमने-सामने.
स्पेशल रिपोर्ट : अजितदादा आणि त्यांच्या नेत्यांची 'दादा'गिरी वादात
स्पेशल रिपोर्ट : अजितदादा आणि त्यांच्या नेत्यांची 'दादा'गिरी वादात.
केजरीवालांची अटक राजकीय, संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
केजरीवालांची अटक राजकीय, संजय राऊत नेमकं काय म्हणाले?.
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?.
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल.
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर.