AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! पुण्यात रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी, काँग्रेसच्या उमेदवारांची यादी Tv9 मराठीच्या हाती

काँग्रेसच्या लोकसभा उमेदवारांची यादी 'टीव्ही 9 मराठी'च्या हाती लागली आहे. या यादीतून अतिशय महत्त्वाची माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे पुण्यात महाविकास आघाडीकडून कोण उमेदवार राहील? याबाबत वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात होते. मनसेला सोडचिठ्ठी देणारे नेते वसंत मोरे यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी दिली जाईल, अशी चर्चा होती. पण आता धंगेकरांचं नाव निश्चित करण्यात आलंय.

मोठी बातमी! पुण्यात रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी, काँग्रेसच्या उमेदवारांची यादी Tv9 मराठीच्या हाती
Reporter Sandeep Rajgolkar
Reporter Sandeep Rajgolkar | Edited By: Chetan Patil | Updated on: Mar 20, 2024 | 9:36 PM
Share

नवी दिल्ली | 20 मार्च 2024 : काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची आज दिल्लीत महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत महाराष्ट्रातील लोकसभेच्या जागांबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. काँग्रेस महाराष्ट्रात तब्बल 18 जागांवर निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे. विशेष म्हणजे आजच्या बैठकीत या 18 उमेदवारांच्या नावावर चर्चा झाली. यापैकी काही उमेदवार निश्चित झाले आहेत. काँग्रेसच्या या लोकसभा उमेदवारांची यादी ‘टीव्ही 9 मराठी’च्या हाती लागली आहे. या यादीतून अतिशय महत्त्वाची माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे पुण्यात महाविकास आघाडीकडून कोण उमेदवार राहील? याबाबत वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात होते. मनसेला सोडचिठ्ठी देणारे नेते वसंत मोरे यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी दिली जाईल, अशी चर्चा होती. पण आता काँग्रेसच्या यादीत पुण्याच्या उमेदवाराचं नाव निश्चित करण्यात आलं आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत ही जागा काँग्रेसला सुटणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. विशेष म्हणजे काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांचं नाव पुणे लोकसभा मतदारसंघासाठी निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोलापुरातून प्रणिती शिंदे, पुण्यातून रविंद्र धंगेकर यांना उमेदवारी दिली आहे. तर अमरावतीतून बळवंत वानखेडे, नंदुरबारमधून के. सी. पाडवी यांचे चिरंजीव, गडचिरोलीतून नामदेव उसेंडी यांना उमेदवारी दिल्याचं निश्चित झालं आहे. कोल्हापुरात शाहू छत्रपती महाराजांना उमेदवारी दिल्याची माहिती समोर येत आहे. काँग्रेसच्या उमेदवारांची अधिकृत यादी उद्या किंवा परवा जाहीर करण्यात येणार आहे. या यादीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. पण त्याआधी काही निश्चित झालेल्या उमेदवारांची नावे ‘टीव्ही 9 मराठी’च्या हाती लागली आहेत.

काँग्रेसकडून ‘या’ उमेदवारांची नावे निश्चित

  • चंद्रपूर – विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार
  • अमरावती – आ.बळवंत वानखेडे
  • नागपूर – आ.विकास ठाकरे
  • सोलापूर – आ. प्रणिती शिंदे
  • कोल्हापूर – शाहू छत्रपती
  • पुणे – आ.रवींद्र धंगेकर
  • नंदुरबार – गोवाशा पाडवी (के. सी पाडवी यांचा मुलगा)
  • नागपूर – आ.विकास ठाकरे
  • गोंदिया- भंडारा – प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले
  • गडचिरोली – नामदेव किरसान
  • अकोला – अभय पाटील
  • नांदेड – वसंतराव चव्हाण
  • लातूर – डॉ. कलगे

दोन किंवा तीन जागांसाठी चर्चा सुरु, वडेट्टीवार यांची माहिती

महाविकास आघाडीची मुंबईत उद्या सकाळी दहा वाजता एक महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीत जागावाटपाचा तिढा सोडवण्यात येणार आहे. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी दिल्लीतील बैठकीनंतर ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली. “आता फार काही वाद राहिलेला नाही. दोन किंवा तीन जागांच्या संदर्भात चर्चा सुरु आहे. त्याबाबत अंतिम निर्णय बाकी आहे. याबाबत उद्या सकाळी महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत निर्णय घेतला जाणार आहे”, अशी प्रतिक्रिया विजय वडेट्टीवार यांनी दिली.

Follow Us
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा; थेट पोलिस...अहिल्यानगरच्या शेवगाव...
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा; थेट पोलिस... अहिल्यानगरच्या शेवगावात नेमकं काय घडलं?
दिल्लीत SIR नोटिसांचा धडाका; आडवाणी, जयशंकर, केजरीवालांसह...
दिल्लीत SIR नोटिसांचा धडाका; आडवाणी, जयशंकर, केजरीवालांसह दिग्गजांच्या नावांची पडताळणी, नेमकं प्रकरण काय?
आठ महिन्यांपूर्वीचं आश्वासन पुन्हा चर्चेत; राहुल नार्वेकरांची जैन...
आठ महिन्यांपूर्वीचं आश्वासन पुन्हा चर्चेत; राहुल नार्वेकरांची निलेशचंद्र मुनींशी भेट
गणपती विसर्जनावेळी दोन गटांमध्ये तुफान राडा; वादानंतर दगडफेक...
गणपती विसर्जनावेळी दोन गटांमध्ये तुफान राडा; वादानंतर दगडफेक... व्हिडीओ व्हयरल
राज ठाकरेंना मुख्यमंत्री होण्यासाठी...अमित ठाकरेंच्या इच्छेबाबत भरत...
राज ठाकरेंना मुख्यमंत्री होण्यासाठी... अमित ठाकरेंच्या इच्छेबाबत भरत गोगावलेंचा थेट पटवार
पाऊस सरासरीपेक्षा कमी; शेतकऱ्यांसाठी रोहित पवारांचा आक्रमक पवित्रा
पाऊस सरासरीपेक्षा कमी; शेतकऱ्यांसाठी रोहित पवारांचा आक्रमक पवित्रा, थेट...
हर्षवर्धन सपकाळांचे आणखी एक शिलेदार भाजपच्या वाटेवर,
मोठी बातमी! हर्षवर्धन सपकाळांचे आणखी एक शिलेदार भाजपच्या वाटेवर, पक्ष सोडण्याआधीच म्हणाले...
डीजेच्या तालावर अनिल बोंडेंनी धरला ठेका; अमरावतीत गणपती विसर्जन...
डीजेच्या तालावर आमदार अनिल बोंडेंनी धरला ठेका; अमरावतीत गणपती विसर्जन मिरवणुकीचा जल्लोष
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह