Maharashtra Corona Update : जम्बो कोविड सेंटर्स दत्तक घ्या, मुख्यमंत्र्यांचं खासगी रुग्णालय आणि डॉक्टरांना आवाहन

Maharashtra Corona Update : जम्बो कोविड सेंटर्स दत्तक घ्या, मुख्यमंत्र्यांचं खासगी रुग्णालय आणि डॉक्टरांना आवाहन
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांची संख्याही अपुरी पडत असल्याचं दिसून येत आहे. अशावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खासगी डॉक्टरांना महत्वाचं आवाहन केलं आहे.

सागर जोशी

|

Apr 09, 2021 | 8:30 PM

मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढतोय. कोरोना रुग्णांच्या संख्येतही दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे विविध शहरातील आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण निर्माण झालाय. कोरोना लस, बेड्स, ऑक्सिजनचा तुटवडा आणि रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा काळाबाजार असा समस्या राज्यासमोर उभ्या आहेत. त्यातच डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांची संख्याही अपुरी पडत असल्याचं दिसून येत आहे. अशावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खासगी डॉक्टरांना महत्वाचं आवाहन केलं आहे. (CM Uddhav Thackeray Important appeal to private hospitals and private doctors)

जम्बो कोविड सेंटर्स खासगी रुग्णालयांनी दत्तक घ्यावे

कोरोनाच्या या कठीण काळात खासगी रुग्णालयांनी आपल्या सुविधा वाढवून रुग्णांना दिलासा द्यावा. शासनाने जम्बो कोविड सेंटर्स उभारले आहेत त्यातील काही खासगी रुग्णालयांनी दत्तक घ्यावे, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलंय. तसंच या सेंटरमध्ये खासगी रुग्णालयातील डॉक्टरांचा राऊंड झाल्यास उपचारात मदत होईल आणि लोकांच्या मनात या सेंटर्संविषयी असलेली भावना दूर करण्यासाठी त्याचा उपयोग होईल, असही मुख्यमंत्री म्हणाले.

‘महाराष्ट्र एकवटतो तेव्हा विजय निश्चित’

कोरोना चाचण्यांमध्ये, लसीकरणात, सुविधा उभारणीमध्ये आणि दर्जेदार रुग्णसेवा देण्यामध्ये महाराष्ट्र राज्य क्रमांक एक वर आहे. महाराष्ट्र एकवटतो तेव्हा तो जिंकतो. कोरोना विरुद्ध अशाचप्रकारे एकवटून त्याला हरवू या, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील सर्व खासगी रुग्णालयांचे संचालक, तज्ञ डॉक्टर्स यांना केले. महाराष्ट्र एकवटल्यावर तो जिंकतो. ही एकजूट सर्व थरांमध्ये आणतानाच कोरोनाला हरवायचं आहे. या लढाईतील तुम्ही महत्वाचा दुवा आहात, असं मुख्यमत्र्यांनी खासगी रुग्णालयाच्या प्रतिनिधींना म्हटलंय.

कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सर्व नामांकीत खासगी रुग्णालयांच्या संचालकांशी आणि तज्ञांनी दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्याचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते. तसंच विविध शहरातील खासगी रुग्णालयांचे प्रतिनिधी आणि सुप्रिसद्ध डॉक्टरही या बैठकीत सहभागी झाले होते.

प्रत्येक जिल्ह्यात डॅशबोर्ड झाला पाहिजे

कोरोनाच्या उपचारात खासगी रुग्णालयांचं योगदान मोठे आहे. आताच्या परिस्थितीत मिशन मोडवर काम करण्याची गरज आहे. राज्य शासनाने खासगी रुग्णालयातील 80 टक्के खाटा ताब्यात घेतल्या आहेत. त्याचप्रमाणे अतिरिक्त बेडची सुविधाही निर्माण करावी. जिल्हा रुग्णालयात खाटांची संख्या वाढवितानाच प्रत्येक जिल्ह्यात डॅशबोर्ड झाला पाहिजे आणि त्यामाध्यमातून बेडची उपलब्धता दिसली पाहिजे, असं मत यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मांडलं. खासगी रुग्णालयांनी रेमडीसीवीरचा वापर जपून करावा. लक्षणे नसलेल्या रुग्णांना ते देऊ नये, असं आवाहनही आरोग्यमंत्र्यांनी केले.

सेवानिवृत्त डॉक्टर्स, नर्सना पुन्हा सेवेत घ्यावे

वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनीही या बैठकीत महत्वाचा मुद्दा उपस्थित केला. उपचाराच्या सुविधा वाढविताना मनुष्यबळाची कमतरता भरून काढण्यासाठी जे डॉक्टर्स, नर्स निवृत्त झाले आहेत, त्यांना पुढील 3 किंवा 6 महिन्यांसाठी सेवेत सामावून घेण्याविषयी प्रयत्न करावेत. त्यामुळे अनुभवी मनुष्यबळ उपलब्ध होईल. खासगी रुग्णालयांनी याकाळात आयसीयू बेड, ऑक्सिजन बेड यांचा विस्तार कराव. राज्यात २० ते २५ वैद्यकीय महाविदयालयांची रुग्णालये आहेत जेथे शक्य असेल तेथे तातडीने व्हेंटीलेटर्स, ऑक्सिजन बेड विस्ताराचे काम हाती घेण्याच्या सूचनाही देशमुख यांनी यावेळी केल्या.

संबंधित बातम्या :

Maharashtra Weekend Lockdown | वीकेंड लॉकडाऊनची नवीन नियमावली जाहीर; वाचा, संपूर्ण नियमावली, काय सुरु, काय बंद?

महाराष्ट्रात कडक Lockdown ची शक्यता, रेल्वे सेवा बंद होणार? Indian Railway म्हणते…

CM Uddhav Thackeray Important appeal to private hospitals and private doctors

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें