AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुख्यमंत्री कोणाचा? महायुतीत दोन फॉर्म्युला निश्चित, राज्याच्या राजकारणात काय घडणार?

राज्यात महायुतीची सत्ता येणार हे निश्चित झाले आहे. आता सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. त्यातच आता नुकतंच मुख्यमंत्रि‍पदाचा फॉर्म्युला समोर आला आहे.

मुख्यमंत्री कोणाचा? महायुतीत दोन फॉर्म्युला निश्चित, राज्याच्या राजकारणात काय घडणार?
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवारImage Credit source: Instagram
| Updated on: Nov 25, 2024 | 9:32 AM
Share

Maharashtra Election 2024 Result : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी लढत झाली होती. या लढतीत महायुतीला एकमत मिळाले तर महाविकासआघाडीचा सुपडासाफ केला आहे. महायुतीने 230 जागांवर विजय मिळवला. यात भाजप 132 जागा, शिवसेना शिंदे गट 57 आणि राष्ट्रवादी अजित पवार गट 41 जागांवर आघाडीवर आहेत. तर महाविकासआघाडीला फक्त 46 जागांवर समाधान मानावे लागले आहे. यात काँग्रेस 16 जागा, ठाकरे गट 20 जागा आणि राष्ट्रवादी शरद पवार गट 10 जागा मिळाल्या. तर अपक्ष-इतर यांना 12 जागा मिळाल्या आहेत. यामुळे राज्यात महायुतीची सत्ता येणार हे निश्चित झाले आहे. आता सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. त्यातच आता नुकतंच मुख्यमंत्रि‍पदाचा फॉर्म्युला समोर आला आहे.

राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीला निर्विवाद यश मिळाले आहे. यामुळे मुख्यमंत्रि‍पदी कोणाची निवड होणार याबद्दल सर्वांना उत्सुकता लागली आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण याबद्दल महायुतीकडून काहीही स्पष्ट करण्यात आले नव्हते. आता नुकतंच मुख्यमंत्रि‍पदाचा फॉर्म्युला समोर आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्रि‍पदासाठी दोन फॉर्म्युला निश्चित करण्यात आले आहेत.

मुख्यमंत्रिपदासाठी अडीच अडीच वर्षाचा फॉर्म्युला

मुख्यमंत्रिपदाच्या 2 फॉर्मुल्यावर महायुतीच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. या चर्चेत मुख्यमंत्रिपदासाठी अडीच अडीच वर्षाचा फॉर्म्युलासाठी शिंदे गट आग्रही असल्याचे पाहायला मिळत आहे. यातील पहिला फॉर्म्युलामध्ये अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद भाजपकडे असेल. तर त्यानंतरचे अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद हे शिंदे गटाकडे असेल.

मुख्यमंत्रि‍पदासाठी 2-2-1 फॉर्म्युलावरही चर्चा

तसेच मुख्यमंत्रि‍पदासाठी 2-2-1 अशा फॉर्म्युलावरही चर्चा सुरु आहे. या फॉर्म्युलानुसार भाजपकडे दोन वर्षे, शिंदे गटाकडे दोन वर्षे आणि अजित पवारांकडे एक वर्ष मुख्यमंत्रिपद दिले जाईल. या फॉर्म्युलासाठी अजित पवार गट हा प्रचंड आग्रही आहे. आता या फॉर्म्युलावर चर्चा करण्यासाठी महायुतीतील तिन्ही नेते दिल्लीला जाण्याची शक्यता आहे.

सुधीर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया

मुख्यमंत्रीपद हे अडीच-अडीच वर्षे किंवा 2-2-1 अशा फॉर्म्युल्यामध्ये वाटणार नाही. सध्या महाराष्ट्राला स्थिर सरकार हवे आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रि‍पदाचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह आणि पक्षाचे वरिष्ठ नेते घेतील, अशी प्रतिक्रिया भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले. त्यामुळे आता मुख्यमंत्री कोण होणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. तसेच मुख्यमंत्रिपदासाठी कोणता फॉर्म्युला निश्चित केला जातो, हे पाहणेही महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us
मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवर पुन्हा दरड कोसळली; वाहतूक एकाच लेनवर
Breaking! मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवर पुन्हा दरड कोसळली; वाहतूक एकाच लेनवर, प्रशासन अॅक्शन मोडमध्ये
'दादांच्या आठवणी कुठे नाहीत...' पंढरपूर वारीदरम्यान सुनेत्रा पवारांचं
Sunetra Pawar | 'दादांच्या आठवणी कुठे नाहीत...' पंढरपूर वारीदरम्यान सुनेत्रा पवारांचं भावनिक विधान
कल्याण-डोंबिवलीत पुन्हा पावसाचा कहर! मुसळधार सरींनी नागरिकांची धावपळ
Heavy Rain | कल्याण-डोंबिवलीत पुन्हा पावसाचा कहर! अचानक मुसळधार सरींनी नागरिकांची धावपळ
जयंत पाटील–विनोद तावडे भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ
NDAमध्ये शरद पवारांची एन्ट्री? जयंत पाटील–विनोद तावडे भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ
इतका भयंकर वेग की मोठमोठे कंटेनर फरफटले गेले, दोघांचा मृत्यू अन्...
इतका भयंकर वेग की मोठमोठे कंटेनर फरफटले गेले, दोघांचा मृत्यू अन्... भुस्खलनाचा थरारक व्हिडीओ समोर
मृत्यूवर हसलो नाही! अमित साटम यांचा सभागृहात मोठा खुलासा; म्हणाले...
Amit Satam | मृत्यूवर हसलो नाही! अमित साटम यांचा सभागृहात मोठा खुलासा; म्हणाले...
देवस्थानाच्या पाहणीला गेले अन् कार चिखलातच अडकली; गिरीश महाजन यांनाही
देवस्थानाच्या पाहणीला गेले अन् कार चिखलातच अडकली; गिरीश महाजन यांनाही पूरस्थितीचा फटका
खाली धावपट्टी आहे की नाही? हेच समजेना! अखेर वैमानिकाने... अंगावर काटा
Navi Mumbai | खाली धावपट्टी आहे की नाही? हेच समजेना! अखेर वैमानिकाने... अंगावर काटा आणणारा व्हिडीओ
स्थानिकांना दिलासा! वाऱ्यांची दिशा बदलेली अन् मोठं संकट टळलं, आता...
स्थानिकांना दिलासा! वाऱ्यांची दिशा बदलेली अन् मोठं संकट टळलं, आता या शहरावर ओढावलं ढगफुटीचं संकट
संत एकनाथ महाराजांची पालखी पंढरपूरकडे रवाना! 427 वर्षांची परंपरा...
Ashadhi Wari 2026 | संत एकनाथ महाराजांची पालखी पंढरपूरकडे रवाना! 427 वर्षांची परंपरा, विठ्ठल... विठ्ठलच्या गजरात दुमदुमलं पैठण