AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Election Exit Poll: महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता येणार? ‘tv9 रिपोर्टर पोल’चा अंदाज काय सांगतो?

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीनंतर टीव्ही 9 रिपोर्टरच्या एक्झिट पोलमध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये काँटे की टक्कर असल्याचे दिसून आले आहे. पोलनुसार, महाविकास आघाडीला १३६ ते १४५ जागा, तर महायुतीला १२९ ते १३९ जागा मिळण्याची शक्यता आहे.

Maharashtra Election Exit Poll: महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता येणार? 'tv9 रिपोर्टर पोल'चा अंदाज काय सांगतो?
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Nov 20, 2024 | 8:13 PM
Share

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान पार पडल्यानंतर आता विविध संस्थांचे एक्झिट पोलची आकडेवारी समोर येत आहे. या आकडेवारीनुसार, महायुती आणि महाविकास आघाडीत काँटे की टक्कर आहे. विविध संस्थांचे वेगवेगळी आकडेवारी समोर आली आहे. काही संस्थांच्या अंदाजानुसार, राज्यात महायुतीचं पुन्हा सरकार स्थापन होऊ शकतं. तर काही संस्थांच्या अंदाजानुसार, राज्यात सत्ता स्थापनेसाठी महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात काँटे की टक्कर असण्याची शक्यता आहे. या सगळ्या घडामोडींदरम्यान आता ‘tv9 रिपोर्टर पोल’चा अंदाज समोर आला आहे. या एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार, राज्यात कदाचित महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होण्याची शक्यता आहे. पण तरीही महाविकास आघाडीला अपक्षांची मदत घ्यावी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे सत्तेच्या चाव्या कदाचित अपक्षांच्या हाती असण्याची शक्यता आहे. tv9 रिपोर्टर पोलनुसार, महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात काँटे कीट टक्कर आहे. टीव्ही 9 रिपोर्टरनुसार, महायुतीला 129 ते 139 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. तर महाविकास आघाडीला 136 ते 145 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. तर इतरांना 13 ते 23 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे.

टीव्ही 9 रिपोर्टर पोलनुसार, कोणत्या पक्षाला किती जागा?

टीव्ही 9 रिपोर्टर पोलनुसार, राज्यात भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरण्याची शक्यता आहे. पोलनुसार, भाजपला 81 पेक्षा जास्त जागा मिळण्याची शक्यता आहे. शिवसेना शिंदे गटाला 25 पेक्षा जास्त जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर राष्ट्रवादी अजित पवार गटाला 23 पेक्षा जास्त जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे.

टीव्ही 9 रिपोर्टर पोलनुसार, महाराष्ट्रात महाविकास आघाडी कदाचित बहुमताचा आकडा गाठण्यात यशस्वी होऊ शकतात. अंदाजानुसार, महाविकास आघाडीला 136 ते 145 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. अंदाजानुसार, काँग्रेसला 50 पेक्षा जास्त जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. शिवसेना ठाकरे गटाला 44 तर राष्ट्रवादी शरद पवार गटाला 42 पेक्षा जास्त जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे.

शिंदे आणि अजित पवारांना फटका बसणार?

टीव्ही 9 रिपोर्टर पोलनुसार, महाराष्ट्रात सत्ताधारी पक्षांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. गेल्या निवडणुकीत भाजपला 105 जागांवर यश मिळालं होतं. पण टीव्ही 9 रिपोर्टर पोलनुसार, महाराष्ट्रात भाजपला कदाचित 81 जागांवर समाधान मानावं लागण्याची शक्यता आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनाला केवळ 25 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. याचाच अर्थ शिंदे गटाच्या 15 पेक्षा कमी जागा होण्याची शक्यता आहे. तसेच अजित पवार गटाला 23 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे, याचाच अर्थ अजित पवार गटाला तब्बल 17 जागा कमी होण्याचा अंदाज आहे.

विविध पोलचे अंदाज काय सांगतात?

पोल डायरीचा अंदाज काय?

  • महायुती – 122-186 जागा
  • भाजप – 77 ते 108
  • शिवसेना शिंदे गट – 27 ते 50
  • अजित पवार गट 18 ते 28
  • महाविकास आघाडी 69-121
  • काँग्रेस 28-47
  • ठाकरे गट 16 ते 35
  • शरद पवार गट 25 ते 39

पी-मार्क अंदाज काय?

  • महायुती – 137-157 जागा
  • महाविकास आघाडी – 126-146
  • इतर – 2 – 8

झी AI

  • महायुती – 114-139
  • महाविकास आघाडी 105-134
  • इतर – 0 – 8

झी न्यूज

  • महायुती – 129-159
  • महाविकास आघाडी 124-154
  • इतर – 0 – 10

लोकशाही रूद्र

  • महायुती – 128-142
  • महाविकास आघाडी 125-140
  • इतर – 18-23

Follow Us
ऐन सणासुदीला महागाईचा झटका! कमर्शियल LPG तब्बल एवढ्या रुपयांनी महाग
LPG Price : ऐन सणासुदीला महागाईचा झटका! कमर्शियल LPG तब्बल एवढ्या रुपयांनी महाग; ऑक्टोबरमधील हे मोठे बदल जाणून घ्या
मुंबईत येणं महागलं! पाचही टोलनाक्यांवर टोलवाढ; तब्बल एवढ्या टक्क्यांनी
Mumbai Toll Tax : मुंबईत येणं महागलं! पाचही टोलनाक्यांवर टोलवाढ; तब्बल एवढ्या टक्क्यांनी टोल महागले....
ठाकरे बंधू एकवटले! 4 ऑक्टोबरच्या मोर्चाची टॅगलाईन ठरली; लोकशाही आणि...
Raj Thackeray : Uddhav Thackeray : ठाकरे बंधू एकवटले! 4 ऑक्टोबरच्या मोर्चाची टॅगलाईन ठरली; लोकशाही आणि संविधान.....
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?