केंद्रानं जाहीर केलेली मदत 2020 सालची, पूरामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई लवकर मिळण्याची अपेक्षा – कृषीमंत्री

आता महापुरामुळे झालेल्या नुकसानाचा घोषवारा केंद्र सरकारला कळवला जाईल. ती मदतही केंद्र सरकार लवकर करेल अशी अपेक्षा आहे. केंद्र सरकारने जाही केलेली मदत ही आताच्या नुकसानासाठी नाही, असं दादा भुसे म्हणाले.

केंद्रानं जाहीर केलेली मदत 2020 सालची, पूरामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई लवकर मिळण्याची अपेक्षा - कृषीमंत्री
दादाजी भुसे
Follow us
| Updated on: Jul 28, 2021 | 2:18 PM

मुंबई : केंद्र सरकारकडून राज्य सरकारला 701 कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. ही मदत 2020 सालची आहे. जूनते ऑक्टोबर 2020 मध्ये अवकाळी पावसाने शेतीचं मोठं नुकसान झालं होतं. त्यावेळी आम्ही 3 हजार 701 कोटी रुपयांची मागणी केंद्र सरकारकडे केली होती. केंद्राने काल त्यातील 701 कोटी रुपये आता दिले आहेत, अशी प्रतिक्रिया कृषीमंत्री दादा भुसे यांनी दिलीय. 2020 चे उरलेले 3 हजार कोरी लवकर मिळतील अशी अपेक्षाही दादा भुसे यांनी व्यक्त केली आहे. (Dada Bhuse expects early help from the central government for flood victims)

आता महापुरामुळे झालेल्या नुकसानाचा घोषवारा केंद्र सरकारला कळवला जाईल. ती मदतही केंद्र सरकार लवकर करेल अशी अपेक्षा आहे. केंद्र सरकारने जाही केलेली मदत ही आताच्या नुकसानासाठी नाही, असं दादा भुसे म्हणाले. या महापुरामुळे राज्यातील 4 लाख हेक्टर शेतीचं नुकसान झालं आहे. काही ठिकाणी अजूनही पुराचं पाणी आहे किंवा तिथे जाण्यात अडचणी येत आहे. तिथले पंचनामे होणं बाकी आहे. त्यामुळे हा आकडा वाढणार आहे. यात भात, ऊस, कापूस, सोयाबीन, तूर आदी पिकांचं नुकसान झालं आहे, असं दादा भुसे म्हणाले.

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना 701 कोटी रुपये मंजूर

लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी ही मदत जाहीर केली आहे. नरेंद्र सिंह तोमर यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पीक विमा योजनेअंतर्गत 701 कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आल्याची माहिती दिली आहे. शेतकऱ्यांना ही मदत पीक विमा योजनेअंतर्गत ही मदत दिली जाईल, असं नरेंद्रसिंह तोमर म्हणाले.

महाराष्ट्र सरकारच्या माहितीच्या आधारे अहवाल, शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर

महाराष्ट्र सरकारनं नैसर्गिक आपत्ती आल्यानंतर जी माहिती केंद्राला दिली गेली. केंद्रानं आतंर मंत्रालयीन समिती बनवली, समितीनं राज्यातील अधिकाऱ्यासोबत दौरा केला. तो दौरा केल्यानंतर अहवाल गृहमंत्र्यांना देण्यात आला. तो अहवाल मंजूर केल्यानंतर महाराष्ट्रासाठी 701 कोटी रुपये देण्याचा निर्णय झाल्याचं नरेंद्र तोमर म्हणाले आहेत.

संबंधित बातम्या :

पूरपरिस्थिती पाहून दु:ख होतंय, राजकारण केलं जाणार नाही, केंद्राकडून मदत नक्की केली जाईल : राज्यपाल

तळीयेमध्ये 25 वर्षांच्या आतील 27 जणांचा मृत्यू, 11 मुलींचा समावेश, नातेवाईक हळहळले

Dada Bhuse expects early help from the central government for flood victims

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.