पूरपरिस्थिती पाहून दु:ख होतंय, राजकारण केलं जाणार नाही, केंद्राकडून मदत नक्की केली जाईल : राज्यपाल

गेल्या आठवड्यात अतिवृष्टीमुळे चिपळूण शहर जलमय झालं होतं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोनच दिवसांपूर्वी चिपळूण दौरा केला. त्यानंतर आज राज्यपालांनीही चिपळूणचा दौरा केला.

पूरपरिस्थिती पाहून दु:ख होतंय, राजकारण केलं जाणार नाही, केंद्राकडून मदत नक्की केली जाईल : राज्यपाल
भगतसिंह कोश्यारी यांनी चिपळूणमध्ये जाऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली...

चिपळूण (रत्नागिरी) : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी आज रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील पूरग्रस्त भागांना भेटी दिल्या. पावसाचा तडाखा बसलेल्या चिपळूण आणि महाडमधील दरडग्रस्त तळीये गावाचा त्यांनी दौरा केला. पावसामुळे झालेल्या नुकसानीची कोश्यारी यांनी पाहणी केली. यावेळी कोकणातील चित्र विदारक असल्याचं सांगत या परिस्थितीत कोणतंही राजकारण केलं जाणार नाही. केंद्राकडून नक्की मदत मिळेल, असं राज्यपाल कोश्यारी म्हणाले.

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यापाठोपाठ राज्यपालही कोकण दौऱ्यावर

गेल्या आठवड्यात अतिवृष्टीमुळे चिपळूण शहर जलमय झालं होतं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोनच दिवसांपूर्वी चिपळूण दौरा केला. त्यानंतर आज राज्यपालांनीही चिपळूणचा दौरा केला. त्यांच्यासोबत या दौऱ्यात भाजप नेते आशिष शेलार देखील उपस्थित होते.

राजकारण केलं जाणार नाही, केंद्राकडून मदत नक्की केली जाईल

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आज चिपळूणमध्ये पूरग्रस्त भागांना भेटी दिल्या. यावेळी त्यांनी दोन ठिकाणी आपला ताफा थांबवून नागरिकांशी चर्चा केली. त्यांना या परिस्थितीतून सावरण्यासाठी आधार दिला. चिपळूणमधील पूरग्रस्तांना केंद्र शासनाकडून संपूर्ण मदत केली जाईल. कोणतंही राजकारण केले जाणार नाही तसेच येथील परिस्थिती पाहून मला दुःख होतंय, असं ते म्हणाले.

अतिवृष्टीमुळे कोकणमधील जनजीवन विस्कळीत, पर्यटन भूमीला मदतीच्या हातांची गरज

अतिवृष्टीमुळे कोकणमधील जनजीवन विस्कळीत झाले आहे. तळीये गावात आतापर्यंत  53 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तर अनेकांचे संसार पाण्यात वाहून गेल्याने त्यांना दैनंदिन गरजेच्या वस्तूंची नितांत गरज निर्माण झाली आहे. कोकणाला आता मदतीच्या हातांची गरज आहे.

मुख्यमंत्र्यांचा कोकण दौरा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रविवारी चिपळूणच्या दौऱ्यावर होते. गेल्या आठवड्यात चिपळूणला मुसळधार पावसाने झोपडलं. घराघरांमध्ये पाणी शिरलं. संपूर्ण शहर ठप्प झालं. पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री रविवारी चिपळूणला गेले होते. त्यांनी तिथे स्थानिकांनी संवाद साधला. हताश झालेल्या स्थानिकांनी मुख्यमंत्र्यांपुढे व्यथा मांडल्या. चिपळूणची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मदतीचं आश्वासन दिलं. तसेच लोकप्रियतेसाठी कोणत्याही पॅकेजची घोषणा करणार नाही. मात्र कुणालाही वाऱ्यावर सोडणार नाही, असं मुख्यमंत्र्यांनी आश्वस्त केलं.

(It is sad to see the konkan flood situationhelp from the center Govt will definitely be given Governor BhagatSinh Koshyari)

हे ही वाचा :

Governor at Taliye | राज्यपाल कोश्यारी चिपळूण आणि दरडग्रस्त तळीयेच्या दौऱ्यावर

पूरग्रस्तांसाठी पॅकेजची घोषणा कधी करणार?; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणतात….

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI