5

Governor at Taliye | राज्यपाल कोश्यारी चिपळूण आणि दरडग्रस्त तळीयेच्या दौऱ्यावर

अतिवृष्टीमुळे कोकणमधील जनजीवन विस्कळीत झाले आहे. तळीये गावात आतापर्यंत  53 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तर अनेकांचे संसार पाण्यात वाहून गेल्याने त्यांना दैनंदिन गरजेच्या वस्तूंची नितांत गरज निर्माण झाली आहे.

Governor at Taliye | राज्यपाल कोश्यारी चिपळूण आणि दरडग्रस्त तळीयेच्या दौऱ्यावर
Follow us
| Updated on: Jul 27, 2021 | 11:36 AM

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) आज रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील पूरग्रस्त भागांना  भेट देणार आहेत. पावसाचा तडाखा बसलेल्या चिपळूण आणि महाडमधील दरडग्रस्त तळीये गावाच्या एक दिवसीय दौऱ्यावर आहेत. पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी कोश्यारी करतील.

गेल्या आठवड्यात अतिवृष्टीमुळे चिपळूण शहर जलमय झालं होतं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोनच दिवसांपूर्वी चिपळूण दौरा केला. त्यानंतर आता राज्यपालही चिपळूणला जात आहेत. त्यासोबतच दरड कोसळून गिळंकृत झालेल्या तळीये गावाचीही पाहणी कोश्यारी करणार आहेत.

अतिवृष्टीमुळे कोकणमधील जनजीवन विस्कळीत झाले आहे. तळीये गावात आतापर्यंत  53 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तर अनेकांचे संसार पाण्यात वाहून गेल्याने त्यांना दैनंदिन गरजेच्या वस्तूंची नितांत गरज निर्माण झाली आहे.

तळीयेतील 32 नागरिक बेपत्ता

पाच दिवसापूर्वी तळीये येथे डोंगराचा कडा कोसळून झालेल्या दुर्घटनेत 35 घरे जमीनदोस्त झाली होती. या दरडीखाली दबलेले 32 मृतदेह काढण्यात बचाव पथकाला यश आलं होतं. मात्र, त्यानंतर एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि टीडीआरएफच्या टीमने रेस्क्यू ऑपरेशन हाती घेऊन कालपर्यंत 53 मृतदेह बाहेर काढले. मात्र, अजूनही 32 नागरिक बेपत्ता आहेत.

दरडग्रस्त गावांचे पुनर्वसन

दरम्यान, महाड येथील तळीये गावांचे पुनर्वसन करण्यासाठी योग्य जागा निश्चित करा, तेथील सोयी-सुविधांसाठी नियोजन करा, उद्योजकांची देखील मदत घ्या. गावकऱ्यांना त्यांच्या शेतीसाठी अडचण येणार नाही असे बघा, तसेच त्यांच्या घरांचा आराखडा लगेच तयार करून कार्यवाही करा. अशा प्रकारे डोंगर उतारांवरील वाड्या आणि वस्त्या ग्रामीण भागात तसेच शहरी भागात देखील आहेत. धोकादायक स्थितीतील या वाड्या-वस्त्यांचे कशा पद्धतीने पुनर्वसन करता येईल, यावर निश्चित असा आराखडा तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.

इतर बातम्या:

नारायण राणेंच्या अधिकाऱ्यांवरील संतापावर अजितदादांचा उतारा, मंत्र्यांच्या दौऱ्यासोबत ‘हा’ अधिकारी ठेवण्याचा निर्णय

(Maharashtra Governor Bhagatsingh Koshyari visit to Mahaad Taliye village in Raigad and Chiplun Live Update)

Non Stop LIVE Update
सरकार सकारात्मक, उपोषण सोडा, मुख्यमंत्री शिंदे यांची कुणाला विनंती?
सरकार सकारात्मक, उपोषण सोडा, मुख्यमंत्री शिंदे यांची कुणाला विनंती?
ते आमचे सहकारी; पण... स्वप्न पहात आहेत, अनिल देशमुख यांची टीका कुणावर?
ते आमचे सहकारी; पण... स्वप्न पहात आहेत, अनिल देशमुख यांची टीका कुणावर?
शरद पवार यांच्या फोटोवरून हा नेता म्हणाला, 'कुणाकडे नाराजी...?'
शरद पवार यांच्या फोटोवरून हा नेता म्हणाला, 'कुणाकडे नाराजी...?'
'त्या ५० आमदारांमध्ये माझं नाव नाही 'मी' भाग्यवान', आमदाराने सांगितलं
'त्या ५० आमदारांमध्ये माझं नाव नाही 'मी' भाग्यवान', आमदाराने सांगितलं
घरगुती देखाव्यातून उलगडली तंतुवाद्यांच्या माहेरघराची यशोगाथा
घरगुती देखाव्यातून उलगडली तंतुवाद्यांच्या माहेरघराची यशोगाथा
बावनकुळे यांच्या ‘त्या’ व्हायरल ऑडिओ क्लिपवर प्रवीण दरेकर म्हणाले...
बावनकुळे यांच्या ‘त्या’ व्हायरल ऑडिओ क्लिपवर प्रवीण दरेकर म्हणाले...
प्रकाश आंबेडकरांचं लोकसभेच्या ४८ जागांसंदर्भात मोठं वक्तव्य, म्हणाले..
प्रकाश आंबेडकरांचं लोकसभेच्या ४८ जागांसंदर्भात मोठं वक्तव्य, म्हणाले..
चंद्रशेखर बावनकुळेंच्या ‘त्या’ व्हायरल ऑडिओ क्लिपवर फडणवीस म्हणाले...
चंद्रशेखर बावनकुळेंच्या ‘त्या’ व्हायरल ऑडिओ क्लिपवर फडणवीस म्हणाले...
'... भाजपनं माफी मागावी', सुप्रिया सुळेंचा बावनकुळे यांच्यावर हल्लाबोल
'... भाजपनं माफी मागावी', सुप्रिया सुळेंचा बावनकुळे यांच्यावर हल्लाबोल
राज ठाकरे 'वर्षा'वर, मुख्यमंत्री शिंदेंच्या बाप्पाचं घेतलं दर्शन अन्..
राज ठाकरे 'वर्षा'वर, मुख्यमंत्री शिंदेंच्या बाप्पाचं घेतलं दर्शन अन्..