AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देवाभाऊंची जाहिरात कशासाठी, एका माणसासाठी कोट्यवधी…; उद्धव ठाकरेंनी सरकारला झापले

महाराष्ट्रात सध्याच्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. उद्धव ठाकरे यांनी यावरून राज्य सरकारवर तीव्र टीका केली आहे. त्यांनी शेतकऱ्यांना तात्काळ मदत करण्याची मागणी केली असून, देवा भाऊंच्या जाहिरातींसाठी खर्च झालेल्या कोट्यवधी रुपयांपैकी काही शेतकऱ्यांना मदत म्हणून देण्याचा सल्ला दिला आहे.

देवाभाऊंची जाहिरात कशासाठी, एका माणसासाठी कोट्यवधी...; उद्धव ठाकरेंनी सरकारला झापले
| Updated on: Sep 16, 2025 | 3:23 PM
Share

राज्यात सध्या परतीच्या पावसाचा धुमाकूळ पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अतिवृष्टी आणि ढगफुटीसदृश पाऊस कोसळत आहे. त्यामुळे शेतीचे मोठं नुकसान झालं आहे. अनेक जिल्ह्यात काढणीला आलेली पिकं पाण्याखाली गेली आहेत. यामुळे अनेक शेतकऱ्यांने तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. आता या नैसर्गिक आपत्तीबद्दल आणि राज्य सरकारच्या भूमिकेबद्दल ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तीव्र शब्दांत टीका केली आहे. देवा भाऊंच्या जाहिरातीसाठी कोट्यवधी रुपये उधळलात, तेच कोट्यवधी रुपये तुम्ही शेतकऱ्यांना तातडीने मदत म्हणून दिले असते, तर काय बिघडलं असतं? असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला आहे.

धाराशिवमधील विविध पक्षाती कार्यकर्त्यांनी ठाकरे गटात पक्षप्रवेश केला. यावेळी धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर, धाराशिवचे आमदार कैलास पाटील हे उपस्थित होते. ठाकरे गटाचे सर्वसर्वा उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या हाताला शिवबंधन बांधत पक्षप्रवेश झाल्याचे जाहीर केले. या पक्षप्रवेश सोहळ्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या नुकसानीबद्दल आणि पंचनाम्याबद्दल भाष्य केले.

अतिवृष्टी होतेय, ढगफुटी होतेय. पंचनामे करणार आणि त्यानंतर मोजके पैसे वाटून मोकळे होणार. शेतकऱ्यांचे नुकसान होतंय हे दिसतंय तरीही तुम्ही पंचनामे झाल्यानंतर त्यांना पैसे देणार. या सरकारने पंचनामे करुन नुकसान भरपाई ही द्यायला हवी. पण त्यासोबतच तातडीने सरसकट एक काहीतरी रक्कम द्यायला काय हरकत होती, असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला.

तर काय बिघडलं असतं?

देवा भाऊ या नावाने तुम्ही करोडो रुपयांची जाहिरात करताय, त्याचे पैसे आले कुठून हा पंचनामा कोण करणार? पैसे दिले कोणी? त्याची जाहिरात कशासाठी केली? छत्रपती शिवरायांच्या चरणी फुलं वाहताना किंवा हार घालताना जाहिरात करायची, ती करोडो रुपयांची जाहिरात होती. सर्व वृत्तपत्रात जाहिराती होत्या. हे करोडो रुपये तुम्ही एका दिवसासाठी आणि एका माणसासाठी उधळत असाल, ते करोडो रुपये तुम्ही शेतकऱ्यांना तातडीने मदत म्हणून दिली असतील, तर काय बिघडलं असतं? असा खोचक सवालही उद्धव ठाकरेंनी केला.

जाहिरातीची गरज काय?

तुमच्याकडे पैसे आहेत. पण कर्ज काढून तुम्ही दिवाळी साजरी करता हे जे मी म्हणतो ते याबद्दल असते. त्या जाहिरातीची गरज काय होती. त्याऐवजी सरकारने तातडीने मदत करायला हवी होती, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.