AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘ओयो’ हॉटेलमध्ये जाताय? नियमात केला महत्त्वाचा बदल, मंत्री बावनकुळेंनी सांगितलं कारण

ओयो हॉटेलच्या नियमबात बदल करण्यात आला आहे. यावर मंत्री बावनकुळे यांनी नियम बदल्यामागचं कारण सांगितलं आहे.

'ओयो' हॉटेलमध्ये जाताय? नियमात केला महत्त्वाचा बदल, मंत्री बावनकुळेंनी सांगितलं कारण
oyo hotel rules change Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Sep 12, 2026 | 5:58 PM
Share

नागपुरात ‘ओयो’ हॉटेलच्या नियमात मोठा बदल केला आहे. ओयो हॉटेल चालकांना ग्राहकांची नोंद ठेवण्यासह सीसीटीव्ही फुटेज 90 दिवस जतन करावे लागणार आहे. नागपूर पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी याबाबत कडक आदेश दिले आहेत. यावर आता मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. लोकांच्या तक्रारीनंतर नियम लागू केल्याचे त्यांनी सांगितलं.

ओयो हॉटलेच्या नियमात महत्वाचा बदल

मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरात मुख्यमंत्री फडणवस यांची भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये बराच वेळ बैठक झाली. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, ‘नागपुरातही ‘ओयो’ हॉटेलचे बोर्ड लागत आहे. त्यामुळे लोक तक्रार करत आहेत, त्यासाठी कडक नियम लागू केले आहेत. आता हॉटेल चालकांना संपूर्ण रेकॉर्ड ठेवावे लागणार आहे. त्याचबरोबर 90 दिवसांचे सीसीटीव्ही फुटेज ठेवावे लागे. त्यांच्यावर पोलीस आणि प्रशासनाचंही कडक लक्ष असणार आहे’.

मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले? 

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावरही बावनकुळेंनी भाष्य केलं. मुंबईत गणेशोत्सवात आंदोलन करणे हे कायदा सुव्यवस्था दृष्टीने अवघड आहे. परंतु कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. मुंबईतील आंदोलन राज्याच्या दृष्टीने अयोग्य आहे. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न केलाय. या दोन्ही नेतेमंडळीवर टीकाटीप्पणी केली जात आहे. हे महाराष्ट्राला पटणारं नाही. दोन्ही नेते मराठा समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करताहेत. गणेशोत्सव हा सर्वात मोठा सण आहे. दुष्काळसदृश्य परिस्थितीवर बावनकुळे म्हणाले, ‘राज्याच्या दुष्काळाकडे लक्ष घालण्याच्या सूचना मुख्यमंत्र्‍यांनी दिल्यात. दुष्काळावर उपाययोजना करण्याच्याही सूचना दिल्यात. पालकमंत्री दौरे करून संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेणार आहे’. तसेच या पार्श्वभूमीवर मंत्री बावनकुळे यांची आज जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक देखील होणार आहे.  तर दुसरीकडे शेतकऱ्यांकडून महाराष्ट्रात कोरडा दुष्काळाची घोषणा करा, अशीही मागणी जोर धरू लागली आहे. आता यावर मुख्यमंत्री फडणवीस काय निर्णय घेतात, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.

Follow Us
राष्ट्रवादीत मोठी खदखद, शाहांच्या भेटीत राष्ट्रवादीतील अंतर्गत वादाची
NCP Leader Meet Amit Shah : राष्ट्रवादीत मोठी खदखद, अमित शाहांच्या भेटीत राष्ट्रवादीतील अंतर्गत वादाची तक्रार? पार्थ आणि सुनेत्रा पवारांच्या भूमिकेवर नाराजी
बाबासाहेबांचं संविधान पायाखाली तुडवलं; फडणवीसांचा काँग्रेसवर निशाणा
Devendra Fadnavis : काँग्रेसने बाबासाहेबांचं संविधान पायाखाली तुडवलं; फडणवीसांचा काँग्रेसवर निशाणा
उद्धव ठाकरेंना रेजीम चेंजचा अर्थ माहिती आहे की नाही? ठाकरेंना टोला....
Devendra Fadnavis on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंना रेजीम चेंजचा अर्थ माहिती आहे की नाही? ठाकरेंना टोला लगावत नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस?
शरद पवारांची प्रकृती बिघडली, रुबी रुग्णालयात दाखल; पुढील दोन दिवस....
Sharad Pawar : शरद पवारांची प्रकृती बिघडली, रुबी रुग्णालयात दाखल; पुढील दोन दिवस पूर्ण विश्रांतीचा सल्ला
तेलंगाणातून काँग्रेसला उखडून फेकणार; हैदराबादच्या रॅलीत अमित शाह...
Amit Shah : तेलंगाणातून काँग्रेसला उखडून फेकणार; हैदराबादच्या रॅलीत अमित शाहांचा निर्धार
सांगलीत सुनेच्या त्रासाला कंटाळून सासऱ्यानं जीवन संपवल
Sangali : सांगलीत सुनेच्या त्रासाला कंटाळून सासऱ्यानं जीवन संपवलं
दिया मिर्झाच्या दिवाळी व्हिडीओवरून मुंबई महापालिकेत भाजप-शिवसेनेत.....
Sanjay Ghadi On BJP : दिया मिर्झाच्या दिवाळी व्हिडीओवरून मुंबई महापालिकेत भाजप-शिवसेनेत मतभेद
दिया मिर्झाने हिंदूंना दिवाळी कशी साजरी करावी हे शिकवू नये...
Ritu Tawde on Dia Mirza : दिया मिर्झाने हिंदूंना दिवाळी कशी साजरी करावी हे शिकवू नये; दिया मिर्झाच्या त्या व्हिडीओवरून महापौर आक्रमक
माझ्याकडे सर्वांचा सातबारा आहे...; रवींद्र धंगेकरांचा रोख कोणाकडे?
Ravindra Dhangekar : माझ्याकडे सर्वांचा सातबारा आहे...; रवींद्र धंगेकरांचा रोख नेमका कोणाकडे?
गोकुळ अध्यक्ष निवडीचा मार्ग मोकळा! कोर्टाचे आदेश काय? 25 संचालकांची...
गोकुळ अध्यक्ष निवडीचा मार्ग मोकळा! कोर्टाचे आदेश काय? 25 संचालकांची महत्त्वपूर्ण सभा अन्...