AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मराठी-हिंदी वादात राज्यपाल राधाकृष्णन यांची उडी, त्या विधानामुळे नवा वाद पेटण्याची शक्यता!

महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी मराठी आणि हिंदी भाषेच्या वादात उडी घेतली आहे. त्यांच्या विधानाने आता नवा वाद पेटण्याची शक्यता आहे.

मराठी-हिंदी वादात राज्यपाल राधाकृष्णन यांची उडी, त्या विधानामुळे नवा वाद पेटण्याची शक्यता!
governor c p radhakrishnan
| Updated on: Jul 22, 2025 | 9:16 PM
Share

Governor C P Radhakrishnan ON Hindi Language : मराठी आणि हिंदी वादात राज्याचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी उडी घेतली आहे. त्यांच्या या विधानानंतर आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. कोणी मला मारलं तर मी लगेच मराठी बोलू शकणार आहे का, असं वक्तव्य राज्यपालांनी केलंय. भाषेवरून द्वेष पसरवला तर राज्याचंच नुकसान होईल, असंही राज्यपाल यांनी म्हटलंय.

…तर राज्यात कोणता गुंतवणूकदार येईल का?

तुम्ही मराठी भाषेत बोलले नाही तर तुम्हाला मारले जाईल, असे धोरण तामिळनाडूमध्येही राबवले जात आहे. तुम्ही येऊन मला मारले तर मी लगेच मराठी बोलू शकेन का? मारल्यानंतर मी लगेच मराठी बोलणे शक्य आहे का? असे विधान राज्यपाल राधाकृष्णन यांनी केलंय. तसेच आपण अशा प्रकारचा द्वेष पसवरला तर राज्यात कोणता गुंतवणूकदार येईल का? सवाल त्यांनी उपस्थित केलाय. तसेच छोट्याशा राजकीय लाभासाठी आपण असे करणे चुकीचं असल्याचं मतही त्यांनी व्यक्त केलंय.

आदित्य ठाकरे यांची टीका, नेमकं काय म्हणाले?

राज्यपालांनी राजकीय वक्तव्य करणं हे योग्य नाही. त्यांचं पद हे संविधानिक आहे. मी अगोदरच सांगितलेलं आहे की हिंदीला कोणाचाही विरोध नाही. पण पहिलीपासून हिंदी भाषेच्या सक्तीला आमचा विरोध आहे. मला वाटतं केंद्र सरकारनेही आमचीच भूमिका मांडली आहे. मग राज्यपालांनी जे विधान केलेय ते लक्षात घेतले तर राज्यपाल केंद्र सरकारच्या विरोधात आहेत का? असा सवालही आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केलाय.

वाद मागे पडला, आता पुन्हा एकदा विरोधक आक्रमक होणार?

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून त्रिभाषा सूत्रानुसार केलेल्या हिंदी सक्तीला राज्यभरातून विरोध करण्यात आला होता. विरोधकांनी काहीही झालं तरी हिंदी हा विषय इयत्ता पहिलीपासून सक्तीचा होऊ देणार नाही, असा पवित्रा घेतला होता. त्यानंतर वाढता विरोध पाहून आता सरकारने हिंदी भाषासक्तीचे सर्व शासन निर्णय रद्द केले आहेत. हा वाद अलिकडेच मागे पडला होता. मात्र आता राज्यपालांनी पुन्हा एकदा मराठी-हिंदी वादावर भाष्य केले आहे. त्यामुळे आता विरोधक काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

Follow Us
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड, पिकांची स्थिती काय?
ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात...
Shivsena | उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात नीरज किशन कौलांचा मोठा युक्तिवाद
मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
Manoj Jarange Patil | मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा
Amit Shah | अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा, राजकीय भेटीगाठींकडे लक्ष
मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती...
Manoj Jarange | मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती चिंताजनक
महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण!
CM Fadnavis | महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण! मंत्रिमंडळात अर्धा तास सविस्तर चर्चा
मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद!
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद! फडणवीसांसमोर मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी...
Manoj Jarange | मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी प्राणाची आहुती देण्याची तयारी
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना...
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना भरावे लागणार शुल्क, व्हिडिओ बघाच
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?