Satara Gram Panchayat Election Results 2021: साताऱ्यात शंभूराज देसाई, बाळासाहेब पाटलांनी गड राखला तर अतुल भोसलेंची मुसंडी

Maharashtra gram panchayat election results 2021: सातारा जिल्ह्यात प्रस्थापित राजकीय नेत्यांना विचार करायला लावणारा कौल सातारकरांनी दिला आहे. Satara Gram Panchayat Election

Satara Gram Panchayat Election Results 2021: साताऱ्यात शंभूराज देसाई, बाळासाहेब पाटलांनी गड राखला तर अतुल भोसलेंची मुसंडी
Follow us
| Updated on: Jan 18, 2021 | 5:33 PM

सातारा: जिल्ह्यातील 652 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी मतमोजणीची प्रक्रिया पार पडली. जिल्हयात 223 ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या होत्या. साताऱ्यातील 4230 जागांसाठी 9093 उमेदवार रिंगणात होते.सातारा जिल्हयातील 2 हजार 38 मतदान केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया पार पडली. सातारा जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या निकालांमध्ये प्रस्थापित राजकीय नेत्यांना धक्का बसल्याचं पाहायला मिळालं. कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांच्या मतदारसंघात भाजपच्या अतुल भोसलेंच्या गटानं जोरदार मुसंडी मारली. तर, कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील प्रमुख ग्रामपंचायतीमध्ये शिवसेनेच्या महेश शिंदेंच्या गटानं सत्ता मिळवली. पाटणमध्ये शंभूराज देसाई यांच्या गटानं वर्चस्व कायम राखलं आहे. रामराजे नाईक निंबाळकर, खासदार उदयनराजे भोसले समर्थकांच्या ताब्यातील ग्रामपंचायतींमध्ये सत्तांतर झाल्याचं पाहायला मिळालं आहे.(Maharashtra gram panchayat election results 2021 Satara Gram Panchayat Election Result Updates)

पाटण तालुक्यात शंभूराज देसाईंच वर्चस्व

शिवसेना नेते आणि गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या गटानं पाटण तालुक्यात ग्रामपंचायतीवर वर्चस्व मिळवलं आहे. पाटण तालुक्यातील 63 पैकी 42 ग्रामपंचायतीत शिवसेना नेते शंभूराज देसाई गटाने मिळवल्या असून 18 ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादी पक्षाला विजय मिळाला आहे. पाटणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सत्यजीतसिंह पाटणकर यांच्या गटाला अवघ्या 18 ग्रामपंचायतीवर सत्ता मिळवण्यात यश आलं आहे.

खासदार उदयनराजे भोसलेंच्या दत्तक गावात समर्थकांचा पराभव

सातारा शहरा लगत असलेल्या कोंडवे हे गाव उदयनराजे भोसले यांनी दत्तक घेतले होते. कोंडवे ग्रामपंचायतीसाठी उदयनराजे गटाने जोरदार मोर्चेबांधणी केली होती. या निवडणुकीत विजयी होण्यासाठी उदयनराजे गटाने खास रणनीती आखली होती. मात्र, त्यात ते अपयशी ठरले आहेत. या निवडणुकीत कोंडवे ग्रामपंचायतीत उदयनराजे गटाला 13 पैकी केवळ 3 जागा मिळाल्या आहेत. तर आमदार शिवेंद्रसिंह राजे गटाला 10 जागांवर घवघवीत यश मिळालं आहे. त्यामुळे उदयनराजेंसाठी हा मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे.

कराड दक्षिणचा कौल अतुल भोसलेंना

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील प्रमुख ग्रामपंचायतीमध्ये भाजप नेते अतुल भोसलेंच्या गटानं मुसंडी मारली आहे. कराड दक्षिण मतदार संघातील 52 पैकी निम्म्या आणि त्यातही मोठ्या ग्रामपंचायतीमध्ये भाजपने निर्विवाद वर्चस्व मिळवले आहे. कराड दक्षिण मतदार संघातील ग्रामपंचायती निवडणुकीचा निकाल म्हणजे विधानसभा निवडणुकीत माजी मुख्यमंत्र्यांनी अनैतिक केलेली युती आणि चव्हाण उंडाळकर मनोमिलनाला मतदारांनी दिलेले उत्तर आहे, अशी प्रतिक्रिया भाजपाचे कार्यकारणी सदस्य डॉ अतुल भोसले यांनी दिली आहे.

कराड नांदगाव येथील ग्रामपंचायत निवडणुकीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण विलास काका पाटील-उंडाळकर गटाला धक्का बसला आहे. नांदगावात दहा वर्षानंतर सत्तांतर झाले असून भाजपच्या अतुल भोसले गटानं सत्ता मिळवली आहे. कराड दक्षिणमधील खुबी, कार्वे, शेणोली-शेरे ग्रामपंचायत देखील भोसले गटाच्या ताब्यात गेली आहे. तांबवे ग्रामपंचायतींत सत्तांतर काँग्रेसचे दिवंगत नेते विलास काका पाटील उंडाळकर विचारांचे  जिल्हा परिषद सदस्य प्रदीप पाटील यांच्या गटाला 8 जागा मिळाल्या आहेत तर विरोधी गटाला 5 जागा मिळाल्या आहेत.

बाळासाहेब पाटलांचा कराड उत्तरचा गड कायम

कराड उत्तरमधील मोठी ग्रामपंचायत असणारी उंब्रज व पेरले ग्रामपंचायतीमध्ये सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या गटानं राष्ट्रवादीचा झेंडा फडकावला आहे. राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये महाविकासआघाडी विजय होत असून हा यशवंतराव चव्हाण व शरद पवार यांच्या विचारांचा विजय आहे. अशी प्रतिक्रिया राज्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली. कराड उत्तर मधील (खंडोबा) पाल ग्रामपंचायत भाजपाकडे गेली असून राष्ट्रवादीला हा मोठा धक्का मानला जात आहे.

कोरेगाव तालुक्यात राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या गटामध्ये प्रमुख लढत

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे आणि कोरेगाव मतदारसंघाचे आमदार महेश शिंदे यांच्या गटामध्येच प्रमुख लढत पाहायाला मिळाली. कोरेगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या गटाला समिंश्र यश मिळालं आहे. भाकरवाडी येथील सत्ता राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात गेली आहे. तर वाठार स्टेशन येथे महाविकास आघाडी विजयी झाली आहे. कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या ताब्यातील 5 ग्रामपंचायतीवर शिवसेनेने झेंडा फडकावला आहे. मंगळापूर, किन्हई पेठ, कटापूर, ल्हासुर्णे, देऊर या ग्रामपंचायतीवर शिवसेने विजय मिळवला आहे.

माण तालुक्यात भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांची सरशी

साताऱ्यातील माण तालुक्यात पिंगळी खु.,हिंगणी मोगराळे, हिंगणे , शिरवली, कारखेल आणि राणंदमध्ये भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्या गटानं सत्ता मिळवली आहे.

सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर गटाला साखरवाडी गावात मोठा धक्का बसला आहे. 17 पैकी 10 जागांवर माजी सरपंचांच्या पॅनेलचा विजय झाला आहे. माजी सरपंच विक्रम भोसलें यांच्या वैयक्तिक पॅनलचा दोन्ही वार्डात विजय झाला आहे.

संबंधित बातम्या:

Gram Panchayat Election Results 2021 Maharashtra LIVE | सांगली जिल्ह्यात काँग्रेस अव्वल

सिंधुदुर्ग ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates: कोकणात कुणाची बाजी? भाजप आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांचे दावे-प्रतिदावे

‘आप’ने महाराष्ट्रात खातं खोललं, मराठवाड्यातील ग्रामपंचायत जिंकली, केजरीवाल म्हणाले, भारी!

(Maharashtra gram panchayat election results 2021 Satara Gram Panchayat Election Result)

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.