Maharashtra gram panchayat result: हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या ‘चेहऱ्या’चा विजय? काँग्रेस, राष्ट्रवादीसाठीच चिंता?

| Updated on: Jan 18, 2021 | 7:51 PM

Maharashtra gram panchayat election results 2021: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात ग्रामपंचायतीमध्ये शिवसेनेने जोरदार मुंसडी मारली आहे.

Maharashtra gram panchayat result: हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या चेहऱ्याचा विजय? काँग्रेस, राष्ट्रवादीसाठीच चिंता?
शरद पवार, उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात
Follow us on

मुंबई: भाजपला राज्यातील सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र आले. तिन्ही पक्षांमधील आमदारांना मान्य होईल असा चेहरा म्हणून शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात राज्यानं अतिवृष्टी, महापूर, कोरोना अशा संकटांची मालिका पाहिली. राज्यावर आलेल्या संकटांमध्ये उद्धव ठाकरेंनी राज्यातील जनतेशी सोशल मीडियावर साधलेला थेट संवादाचा परिणाम ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालातून दिसून येत आहे. आतापर्यंत शहरी पक्ष अशी ओळख असलेल्या शिवसेनेने राज्याच्या ग्रामीण भागात जोरदार मुसंडी मारली आहे. महाविकास आघाडीनं ग्रामपंचायत निवडणुकीत जोरदार मुसंडी मारली आहे. मात्र, ग्रामीण भागातील शिवसेनेची वाढलेली ताकद काँग्रेस राष्ट्रवादीची चिंता वाढवणारी ठरु शकते. (Maharashtra gram panchayat election results Shivsena victory and Uddhav Thackeray image will raised tension for Congress and NCP)

शिवसेनेच्या हाती 2 हजारांहून अधिक ग्रामपंचायंती

विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील निवडणूक शिवसेनेने महाविकासआघाडी म्हणून लढवली होती. या निवडणुकीत शिवसेनेने अमरावती शिक्षक मतदारसंघातून उमेदवार दिला होता. मात्र, अमरावतीची जागा शिवसेनेला गमवावी लागली. भाजपच्या नेत्यांनी अमरावतीच्या पराभवावरुन शिवसेनेला डिवचण्याची एकही संधी सोडली नव्हती. उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना ग्रामपंचायत निवडणुका ताकदीनं लढण्याचं आवाहन केले होते. शिवेसेनेचे मंत्री आणि आमदारांनी त्यांच्या त्यांच्या मतदारसंघात ताकद लावल्यानं शिवसेनेनं 2 हजारांहून अधिक ग्रामपंचायंतीवर सत्ता मिळवली आहे. शिवसेनेने आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार 2217 ग्रामपंचायतींवर विजय मिळवला आहे. राज्यातील 34 पैकी 19 जिल्ह्यांमध्ये शिवेसना पहिल्या क्रमांकावर आहे.

शिवसेनेची मुसंडी काँग्रेस राष्ट्रवादीची चिंता वाढवणारी?

शिवसेना हा प्रामुख्यानं शहरी भागातील पक्ष असल्याची ओळख होती. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागानं राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला साथ दिलेली आहे. मात्र, सेनेची ग्रामीण भागातील वाढती ताकद काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससाठी चिंता वाढवणारी ठरू शकते.

पश्चिम महाराष्ट्रात सेनेची ताकद वाढली

पश्चिम महाराष्ट्र हा नेहमी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला साथ देत आला आहे. मात्र, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदावर असल्याचा फायदा शिवसेनेचे नेते आणि कार्यकर्त्यांनी करुन घेतल्याचं पाहायला मिळालं आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या खानापूर गावात शिवसेनेला रोखण्यासाठी भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आले होते. पण शिवसेनेने तिथे विजय मिळवून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना खास गिफ्ट दिलं आहे.

पाटण तालुक्यात शंभूराज देसाईंच वर्चस्व

शिवसेना नेते आणि गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या गटानं पाटण तालुक्यात ग्रामपंचायतीवर वर्चस्व मिळवलं आहे. पाटण तालुक्यातील 63 पैकी 42 ग्रामपंचायतीत शंभूराज देसाई गटाने मिळवल्या असून 18 ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादी पक्षाला विजय मिळाला आहे. पाटणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सत्यजीतसिंह पाटणकर यांच्या गटाला अवघ्या 18 ग्रामपंचायतीवर सत्ता मिळवण्यात यश आलं आहे.

कोरेगाव तालुक्यात राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या गटामध्ये प्रमुख लढत

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे आणि कोरेगाव मतदारसंघाचे आमदार महेश शिंदे यांच्या गटामध्येच प्रमुख लढत पाहायाला मिळाली. कोरेगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या गटाला समिंश्र यश मिळालं आहे. भाकरवाडी येथील सत्ता राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात गेली आहे. कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या ताब्यातील 5 ग्रामपंचायतीवर शिवसेनेने झेंडा फडकावला आहे. मंगळापूर, किन्हई पेठ, कटापूर, ल्हासुर्णे, देऊर या ग्रामपंचायतीवर शिवसेनेने विजय मिळवला आहे.

चंद्रकांत पाटील यांच्या गावात सेनेची विजयी सलामी

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या गावातच काँग्रेस-राष्ट्रवादीशी भाजपने हातमिळवणी केल्याचं समोर आलं होत. मात्र, शिवसेनेनं चंद्रकांत पाटील यांच्या गावातील 6 जागांवर विजयी सलामी दिली आहे. शिवसेनेला शह देण्यासाठी तिन्ही पक्षाचे स्थानिक नेते एकत्र आले होते. कोल्हापुरातील खानापूर ग्रामपंचायतीसाठी झालेल्या या अनोख्या आघाडीची राज्यभर चर्चा सुरु झाली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील खानापूरच्या प्रकरणावर नाराजी व्यक्त केली होती. खानापूरमध्ये शिवेसना आमदार प्रकाश आबिटकरांच्या नेतृत्वात शिवसैनिकांनी चंद्रकांत पाटील यांच्या ताब्यातील खानापूर ग्रामपंचायत खेचून आणली आहे.

काँग्रेसच्या गडावर सेनेचा भगवा

शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला रामराम करत शिवसेनेत प्रवेश केला होता. ग्रामपंचायत निवडणुकीत अब्दुल सत्तारांच्या नेतृत्वात काँग्रेसच्या गडावर अब्दुल सत्तार यांनी धडक दिली आहे. पालोद ग्रामपंचायतवर शिवसेनेचा झेंडा फडकला आहे. काँग्रेसचे नेते प्रभाकर पालोदकर यांच्या पॅनेलचा दारुण पराभव करण्यात शिवसैनिकांना यश आलं आहे. आमदार अब्दुल सत्तार यांनी काँग्रेसला धूळ चारत ग्रामपंचायत ताब्यात घेतली.

संबंधित बातम्या:

Gram Panchayat Election Results 2021 Maharashtra LIVE | ‘भाजप सहा हजार पेक्षा जास्त ग्रामपंचायतींवर विजयी होईल’, चंद्रकांत पाटलांचा दावा

महाराष्ट्र ग्रामपंचायत निकाल 2021 : शिवसेनेचं बालेकिल्ल्यातील वर्चस्व अबाधित; अंबरनाथचा गड राखला

(Maharashtra gram panchayat election results 2021 Shivsena victory and Uddhav Thackeray image will raised tension for Congress and NCP)