महाराष्ट्राच्या जीवावर कोण उठलंय? अतिरेकी की सडक? वाचा सविस्तर

महाराष्ट्राच्या जीवावर कोण उठलंय? अतिरेकी की सडक? वाचा सविस्तर

गेल्यावर्षी महाराष्ट्रात 11,542 जणांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला होता. ही राज्याच्यादृष्टीने धोक्याची घंटा मानली जात आहे. | Road accidents

Rohit Dhamnaskar

|

Jan 20, 2021 | 10:41 AM

मुंबई: राज्यातील रस्ते अपघातांच्या (Road accidents) वाढत्या संख्येमुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सर्वाधिक रस्ते अपघात होणाऱ्या देशातील तीन राज्यांमध्ये महाराष्ट्राचा समावेश आहे. गेल्यावर्षी महाराष्ट्रात 11,542 जणांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला होता. ही राज्याच्यादृष्टीने धोक्याची घंटा मानली जात आहे. (highest road accidents states in India)

मला अपघातमुक्त महाराष्ट्र हवा आहे : उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रस्ते सुरक्षा अभियनाच्या उद्घाटनप्रसंगी महाराष्ट्रातील वाढत्या अपघातांविषयी चिंता व्यक्त केली. सध्या महाराष्ट्र रस्ते अपघातात देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे. मला अपघाताची आकडेवारी कमी नाही करायची, तर मला या यादीत महाराष्ट्राचे नाव नकोच आहे. मला अपघातमुक्त महाराष्ट्र हवा आहे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते.

रस्ते सुरक्षा हा सप्ताह, महिना यापुरता मर्यादित न राहता ही जीवनशैली व्हावी. नियम आणि संयम या दोन्ही शब्दात यम आहे. जर तुम्ही वाहन चालवताना नियम आणि संयम नाही पाळला तर यम भेटीला येतो जो आपला जीव घेऊन जातो. त्यामुळे यमाला टाळायचे असेल तर नियम आणि संयम या दोन्ही गोष्टी महत्वाच्या असल्याचेही त्यांनी सांगितले.

‘अपघात झाला तर जीव वाचवण्यासाठी प्रयत्न व्हावेत’

अपघात होऊच नयेत म्हणून प्रयत्न व्हावेत. धोक्याचे वळण, अपघाताच्या जागा लक्षात घेऊन ट्रॉमा केअर उभारण्यात यावेत. दुर्दैवाने अपघात झाला तर जीव वाचवण्यासाठी प्रयत्न आणि सुविधा उपलब्ध हव्यात. वाहन चालवण्याच्या प्रशिक्षण संस्थांमधील कर्मचाऱ्यांना सगळे नियम आणि शिस्त याची माहिती हवी. तरच ते प्रशिक्षण देऊ शकतील, असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करणार

रस्ते अपघात ही भारतातील एक गंभीर समस्या आहे. यामुळे दरवर्षी हजारो लोकांचा मृत्यू होतो. सध्याच्या आकडेवारीनुसार देशात प्रत्येक दिवशी रस्ते अपघातात 415 लोकांचा मृत्यू होतो. 2030 पर्यंत अशीच परिस्थिती राहिली तर भारतात रस्ते अपघातांमुळे 6.7 लाख लोकांचा मृत्यू झालेला असेल, असा इशारा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिला.

त्यामुळे आगामी काळात रस्ते अपघात रोखण्यासाठी केंद्र सरकारने एक धोरण आखले आहे. त्यानुसार 2025 पर्यंत रस्ते अपघातांचे प्रमाण 50 टक्क्यांनी कमी करण्याचे उद्दिष्ट असल्याचे गडकरी यांनी सांगितले.

संंबंधित बातम्या:

दोन दिवस तीन अपघात, गुजरात-महाराष्ट्र-बंगाल, 28 मृत्यू, थंडी ठरतेय काळरात्र?

दुचाकी आणि कारमध्ये लावा सिम कार्ड; एखाद्याने स्पर्श करताच येणार मेसेज

गाडीत बसलेल्यांनाही सीट बेल्ट आवश्यक, अन्यथा दंड, दंडाची रक्कम…

(highest road accidents states in India)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें