Marathi News LIVE Update : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

| Updated on: Nov 30, 2022 | 11:08 AM

Marathi News Live Update महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यासह राज्यातील महत्त्वाच्या शहरांसह गावागावांतील बातम्यांचे अपडेट आणि ताज्या घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवर

Marathi News LIVE Update : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

मुंबई : आज शुक्रवार, 25 नोव्हेंबर, 2022. कर्नाटक आणि महाराष्ट्र यांच्यातील सीमावाद पुन्हा उफाळून आलाय. या वादाचे पडसाद आजही उमटण्याची शक्यता आहे. गेल्या 48 तासांत राज्याच्या वेगवेगळ्या भागात अपघातांची मालिका पाहायला मिळालीय. या पार्श्वभूमीवर राज्यातील अपघातांच्या घडामोडींचा आढावा घेणार आहोत. तसंच राज्यपाल पदावरुन भगतसिंग कोश्यारी यांना हटवण्याची भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी केलेल्या मागणीवर आज काय राजकीय घडामोडी घडतात, हे पाहणं महत्त्वाचंय. सोबतच राज्यातील थंडीचे अपडेटही जाणून घेणार आहोत. शिवाय श्रद्धा वालकर हत्याप्रकरणी आज नेमके काय खुलासे समोर येतात, याकडेही सगळ्यांचं लक्ष लागलंय. सोबतच ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या तब्बेतीविषयीचे प्रत्येक अपडेटचा आढावाही या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून घेणार आहोत.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 25 Nov 2022 04:52 PM (IST)

    आनंद तेलतुंबडेंना सुप्रीम दिलासा

    Marathi News LIVE Update

    आनंद तेलतुंबडेंना सुप्रीम दिलासा

    हायकोर्टाने दिलेला जामीन सर्वोच्च न्यायालयात कायम

    एल्गार परिषद प्रकरणात दाखल गुन्ह्यात जामीन

    हायकोर्टानंतर सर्वोच्च न्यायालयात ही दिलासा

  • 25 Nov 2022 02:47 PM (IST)

    कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांचा आणखी व्हिडीओ व्हायरल

    शिव्या नाही घालणार तर काय आरती करणार का?

    कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांचा नव्या व्हिडिओतून सवाल

    हर्षवर्धन जाधव यांनी राज्यपाल आणि त्रिवेदी यांना व्हिडिओतून केली होती शिवीगाळ

    शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ ट्रोल झाल्यानंतर हर्षवर्धन जाधव यांचा नवा व्हिडीओ व्हायरल

  • 25 Nov 2022 12:16 PM (IST)

    अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे येथे एसटी बसचा अपघात

    अमरावती शहरातून चांदूर रेल्वे स्टेशनकडे येत असताना मच्छी तलावाजवळ झाला अपघात

    अपघातात जिवीतहानी नाही, सर्व प्रवासी सुखरूप

    रस्त्याच्या खाली एसटी बस उतरली

    अमरावती-वर्धा जाणारी पूलगाव डेपोची होती बस

  • 25 Nov 2022 11:32 AM (IST)

    कोल्हापूर मार्केट यार्डमधील गूळ सौदे चौथ्या दिवशीही बंदच

    किमान 3700 रुपये भाव द्या, तर कर्नाटकच्या गुळावर बंदीच्या मागणीसाठी गूळ उत्पादक ठाम

    तीन दिवसापासून सौदे होत नसल्याने आज गूळ उत्पादकांसह व्यापाऱ्यांचीही मार्केटकडे पाठ

    मंगळवारी उद्यासाठी आलेली वाहन मार्केट यार्डमध्येच थांबून

    चार दिवसानंतरही तोडगा निघाला नसल्याने गूळ सौद्याचा वाद चिघळणार

  • 25 Nov 2022 11:22 AM (IST)

    विक्रम गोखले यांच्या तब्बेतीत आश्वासक सुधारणा

    पुणे : विक्रम गोखले यांच्या तब्बेतीत आश्वासक सुधारणा होत आहे, पुढील 48 तासात व्हेंटिलेटरवर काढले जाण्याची शक्यता, डॉक्टरांची माहिती

  • 25 Nov 2022 10:45 AM (IST)

    स्वतंत्र मराठवाडा राज्य मागणीसाठी शासकीय सभागृह दिल्यानंतर टीका, संवाद परिषद हॉलची परवानगी रद्द

    स्वतंत्र मराठवाडा राज्य मागणीच्या संवाद परिषद हॉलची परवानगी रद्द

    जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांचे तात्काळ आदेश

    जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात होणार होता कार्यक्रम मात्र जिल्हा परिषदेने परवानगी केली रद्द

    परिषदेसाठी शासकीय सभागृह दिल्यानंतर टीका झाली त्यानंतर परवानगी केली रद्द

    5 हजार रुपये भरून आयोजकांनी चव्हाण सभागृह केले होते बुक मात्र ते बुकिंग केले रद्द

    ॲड गुणरत्न सदावर्ते यांचे बॅनर फाडल्याने तणाव

  • 25 Nov 2022 10:45 AM (IST)

    नाशिकमध्ये ठाकरे गटाच्या नगरसेविकेच्या बॅनरवर शिंदे गटाचे खासदार 'उद्घाटक'

    ठाकरे गटाच्या नगरसेविका हर्षदा गायकर यांनी लावले खासदार हेमंत गोडसे यांचे बॅनर

    निधी खासदारांनी दिला म्हणून त्यांचे बॅनर

    दोन गटांमुळे नगरसेवकांची मात्र गोची

    ठाकरे गटाच्या नगरसेविका हर्षदा गायकर यांची खंत

    विकास कामांचा आणखीही निधी देणार असल्याचे खासदारांनी दिले आहे आश्वासन

  • 25 Nov 2022 10:14 AM (IST)

    पुणे मुंबई एक्स्प्रेस वे वर विचित्र अपघात

    पुणे मुंबई एक्स्प्रेस वे वर खोपोली जवळ 5 गाड्यांचा विचित्र अपघात वाहनांचे मोठे नुकसान, अनेकजण गंभीर जखमी

  • 25 Nov 2022 10:13 AM (IST)

    पुण्यातील टिळेकर नगरात महापालिकेची पाण्याची टाकी ओव्हरफ्लो

    लाखो लिटर पाणी गेलं वाया, अनेक घरांत शिरलं पाणी

    रस्त्यावर सगळीकडे झाला चिखल

    अनेक ठिकाणी साचले मातीचे ढिगारे

    पहाटे 3 वाजता टाकी झाली ओव्हरफ्लो

  • 25 Nov 2022 09:48 AM (IST)

    स्वतंत्र मराठवाड्याच्या मागणीवरून उस्मानाबादेत नाट्यमय घडामोडी

    आज दुपारी 4 वाजता संवाद परिषदेचं आयोजन

    मराठवाडा आणि विदर्भ स्वतंत्र व्हावा, या मागणीसाठी अॅड गुणरत्न सदावर्ते आग्रही

    संवाद परिषदेसाठी लावलेले गुणरत्न सदावर्ते यांचे बॅनर्स उस्मानाबादेत फाडण्यात आले

    अज्ञातांनी फाडले गुणरत्न सदावर्ते यांचे बॅनर्स

    उस्मानाबादमध्ये पोलीस बंदोबस्त वाढवला

  • 25 Nov 2022 09:25 AM (IST)

    गुजरात विधानसभा निवडणूक

    दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद अरविंद केजरीवाल तीन दिवस गुजरात दौऱ्यावर

    26 नोव्हेंबरला भावनगर, 27 नोव्हेंबरला जामनगर आणि 28 नोव्हेंबरला सुरतमध्ये सभा

    आम आदमी पक्षाच्या उमेदवारांसाठी केजरीवाल यांचा गुजरात दौरा

  • 25 Nov 2022 09:05 AM (IST)

    थंडीची लाट ओसरली

    थंडीची लाट ओसरली, पुणे वेधशाळेची माहिती, वाचा कुठे किती तापमान?

    • पुणे : कमाल 31.5, किमान 14.9
    • जळगाव : कमाल 31.3, किमान 9.5
    • कोल्हापूर : कमाल 30.1, किमान 20
    • सांगली : कमाल 30.6, किमान 18.5
    • नाशिक : कमाल 31.3, किमान 10.2
    • रत्नागिरी : कमाल 35, किमान 21.2
    • सातारा : कमाल 31.7, किमान 17.3
    • सोलापूर : कमाल 33.3, किमान 20
    • मुंबई : कमाल 32.8, किमान 22
    • औरंगाबाद : कमाल 30.5, किमान 12
  • 25 Nov 2022 09:00 AM (IST)

    एटीएम मशीन चोरट्यांनी पळवली

    नांदेड: पंचवीस लाखाहून अधिक रक्कम असलेली एटीएम मशीन चोरट्यांनी पळवली, नांदेडच्या गजबजलेल्या मालेगाव रोडवरच्या भावसार चौकातील घटना

  • 25 Nov 2022 08:38 AM (IST)

    नाशिक पाठोपाठ आता त्र्यंबकेश्वरला देखील दररोज होणार गंगा आरती ..

    त्रंबकेश्वरच्या पुरोहितांची ' 'नित्य गंगा आरती' सुरू करण्याची मागणी

    दादा भुसे यांची भेट घेऊन गंगा आरती साठी निधी देण्याची केली मागणी

  • 25 Nov 2022 08:05 AM (IST)

    त्र्यंबकेश्वर : आधारतीर्थ आश्रमातील हत्येचा अखेर उलगडा

    नाशिक : त्र्यंबकेश्वरच्या आधारतीर्थ आश्रमातील चार वर्षीय मुलाच्या खूनाचा अखेर उलगडा, आश्रमातीलच तेरा वर्षीय बालकाला पोलिसांनी ताब्यात घेतल्याने खळबळ, अलोक शिंगारे या मुलाचा मंगळवारी सकाळी आढळला होता संशयास्पद रित्या मृतदेह

  • 25 Nov 2022 07:36 AM (IST)

    कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत

    रत्नागिरी : कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत, दिवानखवटी ते विन्हेरे दरम्यान ओवर हेड वायर तुटल्याने परिणाम, अनेक गाड्या विविध स्टेशनवर खोळंबल्या

  • 25 Nov 2022 07:27 AM (IST)

    घशात मासा अडकून ६ महिन्यांच्या बाळाचा दुर्दैवी अंत

    अंबरनाथ : घशात मासा अडकून ६ महिन्यांच्या बाळाचा दुर्दैवी अंत, अंबरनाथमधील उलन चाळ परिसरातली हृदयद्रावक घटना, खेळता खेळता बाळाने तोंडात टाकला मासा, श्वास अडकल्याने बाळाचा तडफडून झाला मृत्यू

Published On - Nov 25,2022 7:25 AM

Follow us
सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारे आरोपी महिनाभर पनवेलमध्ये?
सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारे आरोपी महिनाभर पनवेलमध्ये?.
एका रात्रीत तुझं पार्सल बीडला माघारी पाठवणार, मोहितेंचा कुणावर निशाणा?
एका रात्रीत तुझं पार्सल बीडला माघारी पाठवणार, मोहितेंचा कुणावर निशाणा?.
माढ्यासाठी फडणवीस मैदानात, विशेष विमानाने 'या' 4 नेत्याची तडकाफडकी भेट
माढ्यासाठी फडणवीस मैदानात, विशेष विमानाने 'या' 4 नेत्याची तडकाफडकी भेट.
अजितदादा जर मला नटसम्राट म्हणून हिणवत असतील तर...अमोल कोल्हेंचा पलटवार
अजितदादा जर मला नटसम्राट म्हणून हिणवत असतील तर...अमोल कोल्हेंचा पलटवार.
सलमान खानच्या घरावरील हल्ल्याचा कट महिन्यापूर्वीच? इथं झालं प्लानिंग
सलमान खानच्या घरावरील हल्ल्याचा कट महिन्यापूर्वीच? इथं झालं प्लानिंग.
अभिषेक घोसाळकर हत्येच्या तपासावर तेजस्वी घोसाळकरांची नाराजी,
अभिषेक घोसाळकर हत्येच्या तपासावर तेजस्वी घोसाळकरांची नाराजी,.
रत्नागिरी-सिंधुदुर्गात तिढा वाढला; राणे-सामतांनी घेतले उमेदवारी अर्ज
रत्नागिरी-सिंधुदुर्गात तिढा वाढला; राणे-सामतांनी घेतले उमेदवारी अर्ज.
21 माजी न्यायाधीशांचं सरन्यायाधीशांना पत्र, काय केला आरोप?
21 माजी न्यायाधीशांचं सरन्यायाधीशांना पत्र, काय केला आरोप?.
प्रचारादरम्यान विरोधकांनी विरोधकांच्या प्रभागात मारला मिसळीवर ताव
प्रचारादरम्यान विरोधकांनी विरोधकांच्या प्रभागात मारला मिसळीवर ताव.
हंडाभर पाण्यासाठी वणवण, tv9च्या बातमीनंतर 'पाणीदूत' हाकेला धावला
हंडाभर पाण्यासाठी वणवण, tv9च्या बातमीनंतर 'पाणीदूत' हाकेला धावला.