पारदर्शक जमीन व्यवहारांसाठी सरकारचा कडक कायदा! महसूल मंत्र्यांचे थेट आदेश; आता 2 लाखांवरील व्यवहार…
जमीन व्यवहारांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी महाराष्ट्र सरकारने एक मोठा अन् महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यापुढे दोन लाखांवरील रोख व्यवहारांची माहिती थेट आयकर विभागाला जाणार आहे. याबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना सूचना केली होती.

Maharashtra Revenue Department News: जमीन व्यवहारात पारदर्शकता आणण्यासाठी फडणवीस सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. दोन लाखांवरील रोख व्यवहारांची माहिती थेट आयकर विभागाला जाणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुद्रांक नोंदणी महानिरीक्षकांना यासंबंधींचे आदेश देण्यात आले आहेत.
महाराष्ट्र सरकारचा सर्वात मोठा निर्णय
याबाबत सविस्तर माहिती अशी की, जमीन व्यवहारांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी महाराष्ट्र सरकारने एक मोठा अन् महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यापुढे दोन लाखांवरील रोख व्यवहारांची माहिती थेट आयकर विभागाला जाणार आहे. याबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना सूचना केली होती. मुख्यमंत्र्यांच्या सुचनेनुसार महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुद्रांक नोंदणी महानिरीक्षकांना याबाबतचे आदेश देण्यात आले आहेत.
महसूलमंत्र्यांचे आदेश!
आता कोणत्याही जमीन खरेदी- विक्रीच्या दस्त नोंदणीच्या वेळीच रोख आणि चेकच्या रकमेची स्वतंत्र नोंद होणार आहे. एकापेक्षा जास्त खरेदीदार-विक्रेते असल्यास प्रत्येकाचा स्वतंत्र हिशोब संकलित केला जाणार आहे. तसेच दुय्यम निबंधक कार्यालयांमार्फत दर महिन्याच्या पाच तारखेपर्यंत स्टेटमेंट ऑफ फाइनांशियल ट्रांजेक्शन्स (एसएफटी) अहवाल थेट आयकर विभागाला पाठवला जाणार असल्याची माहिती आता समोर आली आहे.