Maharashtra MLC Election Results 2026 LIVE : मतदारांचा कौल कुणाला? थोड्यावेळात फैसला, महायुती की महाविकास आघाडी..
Maharashtra MLC Election Results 2026 LIVE Counting News Updates in Marathi : आज विधान परिषदेच्या 3 पदवीधर आणि 2 शिक्षक मतदारसंघाचा निकाल हाती येणार आहे. या निकालाकडे राज्याच्या नजरा आहेत. अगदी काही वेळातच निकाल हाती येतील.

LIVE NEWS & UPDATES
-
शिक्षकांचा कौल कुणाला? थोड्यावेळात फैसला…
अमरावतीच्या लोकशाही भवनात मतमोजणीला सुरूवात झाली. सकाळी 8 वाजता पासून प्रत्यक्ष मतमोजणी प्रक्रिया प्रारंभ झाल. मतमोजणीसाठी १७५ अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती. 14 टेबलांवर मतमोजणी, टपाली मतपत्रिकांसाठी स्वतंत्र टेबल
-
विधान परिषदेच्या मतमोजणीला सुरूवात..
विधान परिषदेच्या मतमोजणीला सुरूवात. काही वेळातच येणार निकाल. निकालाकडे राज्याच्या नजरा.
-
-
आज खरंतर लोकशाहीचा विजय होईल- धगेंकर
विचारांची देवाण-घेवाण करणारे नागरिक आहेत विचारपूर्वकच मतदान केलं असेल…कोटी रुपये लाखो रुपये खर्च केल्याची चर्चा आपण ऐकतोय…आजचा निकाल हा शिक्षक आणि पदवीधरांच्या बाजूने लागेल…पुढारीने लाखो रुपये भ्रष्टाचाराच्या माध्यमातून उभे केले आहेत…समाजाचं आणि या कुटुंबाचं काही देणंघेणं नाही…
-
विधान परिषदेच्या 5 जागांचे आज निकाल, थोड्यावेळात कल येणार पुढे..
विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांसाठी शुक्रवारी पार पडलेल्या मतदानानंतर आज मतमोजणी होणार आहे… महायुतीला धक्का बसणार की महाविकास आघाडीला हे पाहण्यासारखे ठरणार आहे.
-
Maharashtra Vidhan Parishad Result 2026 : विधान परिषदेच्या पदवीधर शिक्षण मतदारसंघाचा निकाल..
विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांसाठी शुक्रवारी पार पडलेल्या मतदानानंतर आज मतमोजणी होणार आहे… मोठी उत्सुकता या मतमोजणीची बघायला मिळतंय..
-
-
निकालाची सुरूवात कधी होणार? जाणून घ्या वेळ…
विधान परिषदेच्या 3 पदवीधर आणि 2 शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा निकाल आज लागणार आहे. सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरूवात होईल.
-
विधान परिषदेच्या 3 पदवीधर आणि 2 शिक्षक मतदारसंघाचा निकाल..
विधान परिषदेच्या 3 पदवीधर आणि 2 शिक्षक मतदारसंघाचा निकाल काही वेळातच हाती येईल. या निकालाकडे राज्याच्या नजराआहेत.
Maharashtra Teacher and Graduate Constituency Election Result 2026 : आज विधान परिषदेच्या 3 पदवीधर आणि 2 शिक्षक मतदारसंघाचा निकाल आहे. मतदानानंतर या निकालाची उत्सुकता मोठ्या प्रमाणात होती. त्यातच आज काैल पुढे येतील. सर्व राजकीय पक्षांनी आपली प्रतिष्ठापणाला लावली. हेच नाही तर काही ठिकाणी महायुतीत मोठे मतभेद दिसले. शेवटपर्यंत कार्यकर्त्यांमध्येही संभ्रम बघायला मिळाला. महाविकास आघाडी की महायुती कोण बाजी मारणार याचे चित्र अगदी थोड्याच वेळात स्पष्ट होईल. 182 उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतपेटीत बंद झाले. पुणे, नागपूर, अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर या मतदारसंघात कोण कोणाला धोबीपछाड देणार हे पुढे येईल. 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरूवात झाली. या निकाल सर्वात महाफास्ट आपल्याला टीव्ही9 मराठीवर बघायला मिळेल.