महाराष्ट्रात म्युकरमायकोसीसचा धोका वाढला, एका दिवसात दोघांचा मृत्यू

म्युकरमायकोसीसमुळे कल्याण डोंबिवलीत दोन जणांचा मृत्यू झाला आहे. Mucormycosis Kalyan Dombivli two death recorded

महाराष्ट्रात म्युकरमायकोसीसचा धोका वाढला, एका दिवसात दोघांचा मृत्यू
म्युकरमायकोसिस
Follow us
| Updated on: May 11, 2021 | 7:54 PM

ठाणे: म्युकरमायकोसीसमुळे कल्याण डोंबिवलीत दोन जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात डोंबिवलीत राहणारे बाजीराव काटकर आणि कल्याण ग्रामीण येथील महारण परिसरात राहणारे तुकाराम भोईर यांचा समावेश आहे. या दोघांचा उपचार डोंबिवलीतील एम्स या खाजगी रुग्णालयात सुरु  होते. या रुग्णालयात या व्यतिरिक्त सहा रुग्णांवर म्युकरमायकोसीसचे उपचार सुरु आहे, अशी माहिती केडीएमसी आरोग्य विभागाच्या अधिकारी अश्विनी पाटील यांनी दिली आहे. (Maharashtra mucormycosis infection increased two patients died in Kalyan Dombivli)

महाराष्ट्राची चिंता वाढवणारा प्रकार

म्युकरमायकोसीसमुळे दोन रुग्णांचे मृत्यू ही घटना राज्यासाठी धोक्याची घंटा मानली जात आहे. आतापर्यंत केवळ ग्रामीण महाराष्ट्रातील लोकांना म्युकोरमायकोसिसची लागण होताना दिसत होती. मात्र, आता हा रोग शहरी भागांमध्येही हातपाय पसरायला लागला आहे. नुकतीच ठाण्यातही एका महिलेला या रोगाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.

म्युकोरमायकोसिसचा हा आजार इतका गंभीर आहे की, रुग्णाच्या जगण्याची शक्यता केवळ 50 टक्के इतकी असते. तसेच यामुळे अंधत्त्व आणि इतर गंभीर व्याधी उद्धवू शकतात. रुग्णांची झपाट्याने वाढणारी संख्या पाहता म्युकोरमायकोसिस साथीच्या आजाराप्रमाणेही फैलावू शकतो, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. रुग्णांची संख्या वाढत असल्याने आतापासूनच म्युकोरमायकोसिसच्या औषधांचा तुटवडा जाणवू लागला आहे. ही औषधेही प्रचंड महाग आहेत. त्यामुळे म्युकोरमायकोसिसचा वाढता संसर्ग राज्यासाठी नव्या संकटाची चाहुल मानली जात आहे.

म्युकोरमायकोसिस म्हणजे काय?

म्युकोरमायकोसिस एक दुर्मीळ फंगल इंफेक्शन आहे, याला झिगॉमायकोसिसदेखील म्हणतात. यात रोग आणि जंतूंचा सामना करण्याची क्षमता कमी होते. कोरोनामुक्त झाल्यानंतर मधुमेह असलेल्या नागरिकांना हा आजार होत आहे. वेळेत उपचार घेतल्यास हा आजार लवकर बरा होऊ शकतो. यामुळे तोंडाच्या एका बाजूला सूज येणे, डोकेदुखी, सायनस रक्तसंचय, तोंडाच्या वरच्या भागात ताप येणे ही लक्षणे आहेत

म्युकरमाक्रोसिस हा नवीन आजार नाही. मात्र कोरोना नसताना वर्षा-दोन वर्षातून एखादी केस पाहायला मिळायची. याचं प्रमाण देशभरात पाहायला मिळत होतं. दोन लाटांमध्ये हा फरक दिसत आहे. पहिल्या कोरोना लाटेत फार रुग्ण नव्हते, पण दुसऱ्या लाटेत चकित करणारे प्रमाण दिसत आहे.

या आजाराचे सायनसमधून संक्रमण सुरू होते. पुढे ते तोंडाच्या आतून वरचा जबडा, डोळा आणि मेंदूपर्यंत पोहोचते. डोळा कायमचा निकामी होतो. पॅरालिसिस आणि मृत्यूही यात ओढावण्याची शक्यता असते.

संबंधित बातम्या:

कोरोनापेक्षा जास्त प्राणघातक असलेल्या म्युकोरमायकोसिसचा राज्यात पहिला बळी; डोंबिवलीत वृद्धाचा मृत्यू

म्युकोरमायकोसिसचा धोका वाढला, ठाकरे सरकार सावध; हाफकिनला दिली 1 लाख इंजेक्शन्सची ऑर्डर

What is Mucormycosis? | म्युकरमायोसिस आहे तरी काय? नेत्रतज्ज्ञ तात्याराव लहाने म्हणतात…

Maharashtra mucormycosis infection increased two patients died in Kalyan Dombivli

Non Stop LIVE Update
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा.
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन.
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही.
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा.
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन.
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार.
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?.
पत्रकार परिषदेत डुलकी,गोऱ्हेंनी जरा उठा...म्हणताच प्रवक्ते खजबडून जागे
पत्रकार परिषदेत डुलकी,गोऱ्हेंनी जरा उठा...म्हणताच प्रवक्ते खजबडून जागे.