Maharashtra Election News LIVE : चंद्रपूरमधील काँग्रेसमधील अंतर्गत वादावर पडदा

BMC Maharashtra Municipal Corporation Election 2026 News LIVE Updates : मुंबईचा महापौर कोण हे जाणून घेण्यासाठी आणखी काही काळ वाट पहावी लागू शकते, कारण ही निवड लांबणीवर पडली आहे.तर प्रजासत्ताक दिनानंतर नाशिकचा महापौर ठरू शकतो अशी माहिती सूत्रांनी दिल आहे. स्वतः मुख्यमंत्रीच नाशिकच्या महापौरांबाबतचा निर्णय घेणार असल्याची चर्चा आहे. यासह देश, विदेश, महाराष्ट्रातील महत्वाच्या घडमोडी या ब्लॉगमध्ये दिसभर तुम्हाला वाचायला मिळतील.

Maharashtra Election News LIVE : चंद्रपूरमधील काँग्रेसमधील अंतर्गत वादावर पडदा
| Edited By: | Updated on: Jan 24, 2026 | 12:09 PM

LIVE NEWS & UPDATES

  • 24 Jan 2026 12:09 PM (IST)

    किरीट सोमय्या मुंब्रा पोलीस ठाण्यात

    Mim चे मुंब्रा भागातील निवडून आलेली नगरसेविका सहर शेख यांनी केलेल्या वक्तव्या बाबत भाजप नेते किरीट सोमय्या पुन्हा एकदा मुंब्रा पोलिस ठाण्यात भेट देणार आहेत. सहर शेख यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा यासाठी मुंब्रा वरिष्ठ पोलिस पोलिस निरीक्षक अनिल शिंदे यांना भेटणार आहेत. संपूर्ण मुंब्रा हिरवा करणार असे निवडून आल्यावर सहर शेख यांनी वक्तव्य केले होते.

  • 24 Jan 2026 12:01 PM (IST)

    नीलम गोऱ्हे यांनी घेतली जखमी शिंदे गटातील नगरसेवक मोहन चतुरे यांची भेट

    बदलापुरात डॉ.नीलम गोऱ्हे यांनी घेतली जखमी शिंदे गटातील नगरसेवक मोहन चतुरे यांची भेट. नीलम गोऱ्हेंकडून चतुरे यांच्या तब्येतीची विचारपूस. कॉम्प्रोमाइजसाठी भाजपकडून दबाव असं गोऱ्हे म्हणाल्या. भाजप युवा मोर्चा अध्यक्ष बंटी म्हसकर आणि त्यांच्या साथीदारांनी केली होती मारहाण.

  • 24 Jan 2026 12:00 PM (IST)

    केईएम हॉस्पिटलचे नाव बदलण्यावरून वाद

    मुंबईचे प्रसिद्ध केईएम हॉस्पिटलचे नाव बदलण्याच्या पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या वक्तव्यावरून राजकीय वाद पेटला आहे. खासदार अमोल कोल्हे, जे केईएमचे माजी विद्यार्थी आहेत, यांनी लोढा यांना हॉस्पिटलचा इतिहास अभ्यासावा आणि मगच असे वक्तव्य करावे, अशी टीका केली आहे.पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी नुकत्याच केईएमच्या शताबदी वर्षांच्या समारंभात ‘किंग एडवर्ड’ हे नाव ब्रिटिश राजवटीचे प्रतीक असल्याने बदलावे, असे सुचवले.

  • 24 Jan 2026 11:54 AM (IST)

    सहर तरुण असल्यामुळे आम्ही पण तिचा माफीनामा स्वीकारला – किरीट सोमय्या

    एमआयएमच्या सहर शेख यांनी आता माफी मागितली आहे. आम्ही मुंब्र्याला हिरवं बनवणार म्हणजे हिंदुंना भडकवणारी, चिथावणीखोर भाषण. आम्ही तक्रार केल्यानंतर पोलिसांनी दोनदा त्यांना बोलावलं होतं. लिखित स्वरूपात सहरने माफी मागितली आहे. सहर तरुण असल्यामुळे आम्ही पण तिचा माफीनामा स्वीकारला आहे असं किरीट सोमय्या म्हणाले.

  • 24 Jan 2026 11:33 AM (IST)

    वसई विरार महापालिकेत भाजपाचा गटनेता गुलदस्त्यात

    वसई विरार महापालिकेत भाजपाचा गटनेता अद्याप ही गुलदस्त्यात. निवडणुकीच्या निकाल लागून 8 दिवस संपले तरी भाजपाच्या गटनेता ठरेना. पक्ष आदेशावरून दोन दिवसात आमचा गटनेता ठरेल आमदार राजन नाईक यांची माहिती. वसई विरार महापालिका निवडणुकीत भाजपाचे 43 आणि शिंदे शिवसेनेचा 1 असे महायुतीचे 44 नगरसेवक निवडून आलेले आहेत.

  • 24 Jan 2026 11:14 AM (IST)

    चंद्रपुरात वाद नव्हताच त्यामुळे मिटण्याचा प्रश्नच नाही – हर्षवर्धन सपकाळ

    चंद्रपुरात वाद नव्हताच त्यामुळे मिटण्याचा प्रश्नच नाही. चंद्रपुरात कुठल्याही मुद्यावर वाद विकोपाला गेलेलेा नाही. आमचे 27 नगरसेवक एक संघ आहेत आणि काँग्रेसचाच महापौर चंद्रपूरला बसेल. मीटिंगमध्ये कुटुंबात ज्याप्रमाणे चर्चा होते, त्याप्रमाणे चर्चा झाली असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

  • 24 Jan 2026 10:50 AM (IST)

    छत्रपती संभाजीनगरमध्ये आज भाजपाची कोअर कमिटीची बैठक

    छत्रपती संभाजीनगरमध्ये आज भाजपाची कोअर कमिटी बैठक होत असून, महापालिकेतील गटनेत्याच्या निवडीवर चर्चा होणार आहे. गटनेत्याचे नाव आजच प्रदेश नेतृत्वाकडे पाठवले जाणार असून, मंगळवारपर्यंत निवड निश्चित होण्याची शक्यता आहे. दरम्यान, महापौर पदासाठी भाजपामध्ये उत्सुकता वाढली असून, ५७ पैकी १२ संभाव्य नावांमधून एक नाव अंतिम केले जाणार आहे. महापौर पद सर्वसाधारण प्रवर्गासाठी असल्याने, त्याच प्रवर्गाचा उमेदवार द्यावा, अशी मागणी पक्षाकडे करण्यात आली आहे, असे किशोर शितोळे, भाजपा जिल्हाध्यक्ष यांनी म्हटले

  • 24 Jan 2026 10:40 AM (IST)

    सांगलीतील नर्सरीला लागलेल्या आगीत महिलेचा संशयास्पद मृत्यू

    सांगली शहरातील धामणी चौक येथे असणाऱ्या मयूर नर्सरीमध्ये लागलेल्या आगीमध्ये होरपळून महिलेचा संशयास्पद मृत्यू झाला. निकिता शिव मनगुळे-लोंढे असे आगीत मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. निकिता मनगुळे-लोंढे व तिचा पती कर्नाटकातील कागवाड येथील असून ते सध्या सांगली शहरातील धामणी चौकातील मयूर नर्सरीमध्ये राहण्यास होते.

  • 24 Jan 2026 10:30 AM (IST)

    प्रजासत्ताक दिनानंतर ठरणार नाशिकचा महापौर ?

    स्वतः मुख्यमंत्रीच घेणार नाशिकच्या महापौरा बाबतचा निर्णय. प्रजासत्ताक दिनानंतर राजकीय हालचालींना येणार वेग. गिरीश महाजन आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेणार अंतिम निर्णय.  महापौर पदासाठी नेत्यांची लॉबिंग सुरू.  मुंबई ठाणे पुणे पिंपरी चिंचवड महापालिकेतील महापौर पदाच्या निवडी झाल्यानंतरच नाशिकचा नंबर लागण्याची शक्यता

  • 24 Jan 2026 10:20 AM (IST)

    त्याबाबत माझ्याकडे कोणतीही माहिती नाही- संजय राऊत

    सोलापूरमध्ये दोन्ही शिवसेना एकत्र लढत असल्याबाबतची माझ्याकडे कोणतीही माहिती नसल्याचे स्पष्ट सांगताना संजय राऊत दिसले आहेत.

  • 24 Jan 2026 10:10 AM (IST)

    सध्याच्या राजकारणात गुलामांचा बाजार भरला- संजय राऊत

    संजय राऊत यांनी नुकताच टीका करत म्हटले की, सध्याच्या राजकारणात गुलामांचा बाजार भरला आहे. सध्याच्या राजकीय स्थितीवर बोलताना त्यांनी हे भाष्य केले.

  • 24 Jan 2026 10:05 AM (IST)

    धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर इथेनॉल टँकरला अपघातानंतर आग

    धधुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर बीडच्या गेवराई शहराजवळ इथेनॉल टँकरला भीषण अपघातानंतर मोठी आग लागली. मध्यरात्री दोनच्या सुमारास हा अपघात घडला. या अपघातात टँकर पूर्णपणे जळून खाक झाले आहे. इथेनॉलने पेट घेतल्याने मोठी आग लागली.

  • 24 Jan 2026 09:54 AM (IST)

    पुण्याचा महापौर कोण ? कधी होणार निर्णय ?

    पुण्याचा महापौर कोण? हे पुढील काही दिवसांमध्ये ठरणार आहे. गेल्या 4 वर्षांपासून पुण्यातील महापौर बंगला वापरात नव्हता. आता सर्वसाधारण महिला आरक्षण पडले असून, महापौर निवडीनंतर या ठिकाणी नवीन महापौर राहण्यास येणार असल्याने डागडुजीचे, स्वच्छता काम सुरू करण्यात आले आहे.

  • 24 Jan 2026 09:45 AM (IST)

    विरारमध्ये मुलं चोरीच्या अफवातून संतप्त जमावाने चार महिलांना केली बेदम मारहाण

    विरारमध्ये मुलं चोरीच्या अफवातून संतप्त जमावाने चार महिलांना बेदम मारहाण केल्याची घटना उघड झाली आहे . विरार पूर्व सहकार नगर रिक्षा स्टॅण्ड जवळ गुरुवारी सकाळी आकाराच्या सुमारास ही घटना घडली.  या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला .  विरार पोलिसांनी तात्काळ मध्यस्थी करून, मारहाण झालेल्या महिलांना ताब्यात घेऊन त्यांची जमवातून सुटका केली .

  • 24 Jan 2026 09:35 AM (IST)

    माय – लेकीच्या आंघोळीचा चोरून व्हिडिओ काढणाऱ्या तरुणाविरोधात गुन्हा दाखल

    जळगावात माय-लेकीच्या आंघोळीचा चोरून व्हिडिओ रेकॉर्ड करणाऱ्या तरुणावर एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पुरुषोत्तम कुटे असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव असून पत्र्याला छिद्रे पाडून त्या छिद्रांमधून त्याने महिला व मुलीचे अंघोळ करतानाचे व्हिडिओ मोबाइलमध्ये चित्रीकरण केल्याचा आरोप आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर महिलेच्या तक्रारीवरून तरुणाविरुद्ध पोलिस ठाण्यात विनयभंग आणि पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

  • 24 Jan 2026 09:25 AM (IST)

    नाशिक – फर्निचरच्या दुकानाला भीषण आग

    नाशिकच्या सातपूरमध्ये केवल पार्क परिसरात फर्निचरच्या दुकानाला भीषण आग लागली आहे. या आगीत दुकानातील सर्व साहित्य जळून खाक झालं आहे. सुदैवाने आगीत कोणीतीही जीवितहानी नाही. दोन तासांच्या अथक प्रयत्नांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश.

  • 24 Jan 2026 09:12 AM (IST)

    डेटिंग ॲपच्या जाळ्यात अडकवून तरुणांना लुटणारी टोळी गजाआड

    डेटिंग अ‍ॅपवर ओळख वाढवून तरुणांना धमकावून लुटणाऱ्या टोळीचा कोंढवा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.  या प्रकरणी पाच जणांना अटक केली असून, त्यांच्याकडून मोबाइल, दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली वाहने जप्त करण्यात आली आहेत.

  • 24 Jan 2026 09:04 AM (IST)

    जालन्यात भर दिवसा आईस्क्रीम विक्रेत्याचे अपहरण

    जालन्यात आईस्क्रीम विक्री करणाऱ्या तरुणाचे अपहरण करून त्याला झाडाला बांधून अमानुष मारहाण करण्यात आली. तसेच  त्याच्याकडून 20 हजारांची खंडणी उकळल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी 3अज्ञातांविरोधात तालुका जालना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • 24 Jan 2026 09:03 AM (IST)

    सोलापुरात जिल्हा परिषद निवडणुकीसाठी दोन्ही शिवसेनेची महाआघाडी

    सोलापुरात जिल्हा परिषद निवडणुकीसाठी दोन्ही शिवसेना एकत्र आल्या आहेत. बार्शी तालुक्यात जिल्हा परिषद निवडणुकीत दोन्ही शिवसेनेची महाआघाडी केली आहे. विशेष म्हणजे भाजपविरोधात दोन्ही शिवसेना, दोन्ही राष्ट्रवादी मिळून महाआघाडी स्थापन करण्यात आली आहे. ठाकरे गटाचे आमदार दिलीप सोपल यांनी याबाबत सोशल मीडियावर पोस्ट करत मेळाव्याला येण्याचे आवाहन केलं आहे.  या महाआघाडीमुळे सोलापूरच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय.

सोलापुरात जिल्हा परिषद निवडणुकीसाठी दोन्ही शिवसेना एकत्र आल्या आहेत. बार्शी तालुक्यात जिल्हा परिषद निवडणुकीत दोन्ही शिवसेनेची महाआघाडी.  बीड मोक्क्यातील फरार आरोपी सनी उर्फ शनेश्वर आठवले याला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. सोलापूर महापालिकेसाठी आज भाजपच्या गटनेत्याची आज निवड केली जाणार आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत गटनेता निवडीबाबत बैठक होणार आहे. मुंबई महापौर पदाची निवड लांबणीनवर पडू शकते. मुंबई महापालिकेच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत जाहीर झाली. तर या पदासाठी 31 जानेवारी रोजी मतदानाची प्रक्रिया होणार होती. मात्र भाजप आणि शिंदेसेनेने अद्यापही कोकण आयुक्तांकडे गटाची नोंदणी केलेली नाही. त्यामुळे महापौर निवडीचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे. यासोबतच निवडणुकीसंदर्भातील इतर अपडेट्स, राज्याभरातील घडामोडी, राष्ट्रीय पातळीवरील बातम्या जाणून घेण्यासाठी हा ब्लॉग फॉलो करा..