AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अंधार पडताच मोठं कांड सुरू होतं… निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाची धाड पडताच… पिंपरी-चिंचवडमध्ये जे सापडलं…

महाराष्ट्रात महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानाला काहीच तास शिल्लक राहिले असताना अंधारात मोठं काडं सुरु असल्याची माहिती मिळत आहे... निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाची धाड पडकाच जे चित्र समोर आलं ते धक्कादायक होतं...

अंधार पडताच मोठं कांड सुरू होतं... निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाची धाड पडताच... पिंपरी-चिंचवडमध्ये जे सापडलं...
municipal election
| Updated on: Jan 14, 2026 | 2:21 PM
Share

महाराष्ट्रात महानगरपालिका निवडणुकीच्या पूर्वसंध्येला ठिकठिकाणी अनेक धक्कादायक घटना घडल्या आहे. मतदारांना फितवून काही ठिकाणी पैसे वाटप करण्याचं काम सुरु आहे तर, काही ठिकाणी महागड्या वस्तूंचं वाटप करण्यात येत आहे. प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर आता छुप्या पद्धतीने राजकीय पक्ष मतदारांना आपल्या पक्षाच्या बाजून वळवण्याचा प्रयत्न करत आहे. पिंपरी-चिंचवडमधून असं एक प्रकरण समोर आलं आहे. अंधार कांड सुरु असल्याचं कळताच भरारी पथकाची धाड पडली.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ड क्षेत्रात चक्क वॉशिंग मशीनचं वाटप सुरु होतं. निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली नियुक्त करण्यात आलेल्या भरारी पथकाने रहाटणी येथील गणराज कॉलनी येथे 19 वॉशिंग मशीन जप्त केल्या आहेत. 12 जानेवारी 2026 रोजी रात्री साडे दहाच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 12 जानेवारी रोजी रात्री साडे दहाच्या सुमारास आचारसंहिता कक्षाला रहाटणी येथील गणराज कॉलनी येथे मतदारांना वॉशिंग मशीन वाटप केले जात असल्याची तक्रार प्राप्त झाली होती. त्यानंतर तातडीने राहुल निकम यांच्या नेतृत्वाखालील एफ.एस.टी. भरारी पथकाने घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी तेथे एका गाडीमध्ये जवळपास १९ वॉशिंग मशीन असल्याचे आढळून आले आहे. गाडीचा क्रमांक MH14KA6330 असा होता..

निवडणुकीच्या अनुषंगाने आचारसंहितेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आचारसंहिता कक्ष स्थापन करण्यात आला असून या कक्षाची एसएसटी, एफएसटी, व्हीएसटी अशी विविध पथके महापालिका हद्दीत कार्यरत आहेत.

शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांचा संताप

शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी संताप व्यक्त केला आहे. म्हणाले, ‘हे अत्यंत चुकीचं आहे. जर विरोधी पक्षाच्या कुठल्या नेत्याने असं कलं असत तर तुम्ही कारवाई केली असती…कोणीही असो कारवाई झाली पाहिजे…’ असं अरविंद सावंत म्हणाले.

राज्यातील 29 महानगरपालिकांमधील 2869 जागांसाठी 15,931 उमेदवार रिंगणात आहेत. यासाठी गुरुवारी 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून शुक्रवारी 16 जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. त्यामुळे कोणता पक्षाचे अधिक उमेदवार निवडून येतात याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलं आहे.

ठाकरे बंधु सहकुटुंब मुंबादेवीच्या दर्शनाला | VIDEO
ठाकरे बंधु सहकुटुंब मुंबादेवीच्या दर्शनाला | VIDEO.
पाडू मशीन कधी आणि का वापरणार? भूषण गगराणींनी सर्व सांगितलं
पाडू मशीन कधी आणि का वापरणार? भूषण गगराणींनी सर्व सांगितलं.
BMC Election 2026 : EVM ला जोडणारं पाडू मशीन म्हणजे काय? जाणून घ्या
BMC Election 2026 : EVM ला जोडणारं पाडू मशीन म्हणजे काय? जाणून घ्या.
मतदानाच्या दिवशी ईव्हीएमसोबत नवीन मशीन... राज ठाकरे प्रचंड संतापले
मतदानाच्या दिवशी ईव्हीएमसोबत नवीन मशीन... राज ठाकरे प्रचंड संतापले.
पालिकेच्या मतदानाची तयारी अंतिम टप्प्यात; निवडणूक साहित्याच वाटप सुरू
पालिकेच्या मतदानाची तयारी अंतिम टप्प्यात; निवडणूक साहित्याच वाटप सुरू.
बिनविरोध निवडीवरची सुनावणी संपली, काय घडलं कोर्टात?; मोठा निर्णय काय?
बिनविरोध निवडीवरची सुनावणी संपली, काय घडलं कोर्टात?; मोठा निर्णय काय?.
संक्रातिनिमित्त नाशिकच्या गोदा घाट परिसरात पर्यटक, भाविकांची गर्दी
संक्रातिनिमित्त नाशिकच्या गोदा घाट परिसरात पर्यटक, भाविकांची गर्दी.
ठाकरे कुटुंबातला गोडवा वाढला! संक्रांतीसाठी दोन्ही कुटुंब शिवतीर्थवर
ठाकरे कुटुंबातला गोडवा वाढला! संक्रांतीसाठी दोन्ही कुटुंब शिवतीर्थवर.
अचानक येऊन तलवारीने हल्ला, उमेदवाराचा नवरा... काय घडलं?; नांदेड हादरलं
अचानक येऊन तलवारीने हल्ला, उमेदवाराचा नवरा... काय घडलं?; नांदेड हादरलं.
पाच-पाच हजार वाटले जातायत! राज ठाकरेंचा गंभीर आरोप
पाच-पाच हजार वाटले जातायत! राज ठाकरेंचा गंभीर आरोप.