
नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचे आज मतदान आहे. मतदानाला सुरूवात झाली असून काल प्रचार शिगेला पोहोचला होता. सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी या निवडणुकीची करण्यात आली. आरोप प्रत्यारोपाचे सत्र रंगताना दिसले. सर्व मतदान केंद्रांवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे. राज्य निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या कार्यक्रमानुसार, पुणे जिल्ह्यातील 12 नगरपरिषद आणि 3 नगरपंचायतींसाठी आज मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी जिल्ह्यातील सुमारे 6.3 लाख नोंदणीकृत मतदार आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सज्ज झाले आहेत. राज्यात सर्वच ठिकाणी मतदानाची प्रक्रिया शांततेत आणि सुरक्षित पार पडावी, यासाठी आवश्यक ते सर्व नियोजन करण्यात आले आहे. या निवडणुकीचा निकाल बुधवारी मतमोजणीनंतर जाहीर होणार आहे. राज्यभरातील एकूण 264 नगरपरिषदा आणि नगर पंचायतींसाठी मतदान होणार आहे.
राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या निवडणुकींचा निकाल हा आधी बुधवारी 3 डिसेंबरला लागणार होता. मात्र मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयामुळे 21 डिसेंबरला मतमोजणी केली जाणार आहे. त्यानंतर विजयी उमेदवार निश्चित होणार आहेत.
जालन्यात जिल्ह्यातील तिन्ही नगरपरिषदेमध्ये नगराध्यक्ष पदाच्या 18 तर नगरसेवक पदाच्या 232 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झालं आहे.भाजप नेते रावसाहेब दानवे,बबनराव लोणीकर, राजेश टोपे यांच्यासह नारायण कुचे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
मनसेप्रमुख राज ठाकरे बुधवारी शिवसेना उबाठा गटाचे राज्यसभा खासदार संजय राउत यांची भेट घेणार असल्याचं समोर आलं आहे. राज ठाकरे संजय राऊत यांच्या भांडूपमधील राहत्या घरी भेट घेणार आहेत. राज ठाकरे राउतांच्या प्रकृतीची विचारपूस करणार असल्याचं म्हटलं जात आहे.
पालघर नगरपरिषदमध्ये संध्याकाळी साडे पाचनंतरही मतदान सुरू असल्याचं समोर आलं आहे. टेंबोडे जिल्हा परिषद शाळेतील वॉर्ड क्रमांक 8 आणि खोली क्रमांक 4 मध्ये हे मतदान सुरू आहे. मतदानाची वेळ संपल्यानंतरही मतदार रांगेत उभे आहेत.
चंद्रपुरातील गडचांदूर येथे मतदानादरम्यान एका मतदाराने ईव्हीएम फोडल्याची घटना समोर आली आहे. प्रभाग क्रमांक 9 मधील आदर्श हिंदी सेमी इंग्लिश प्राथमिक विद्यालय येथील मतदान केंद्रावरील ही घटना आहे. राम दुर्गे असं ईव्हीएम फोडणाऱ्या मतदाराचे नाव आहे. ‘नगारा’ चिन्हा समोरील बटन दाबल्यावर कमळ या चिन्हासमोरील लाईट पेटत असल्याचा आरोप या मतदाराकडून करण्यात आला आहे. पोलिसांनी राम दुर्गे याला ताब्यात घेतलं आहे. त्यानंतर नवीन ईव्हीएम लावून मतदानाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये दुपारी 3 वाजेपर्यंत 70 टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झालं. तसेच संध्याकाळी 6 नंतरही त्र्यंबकेश्वरमधील एका मतदान केंद्रावर मतदारांची गर्दी पाहायला मिळाली. मतदान केंद्रावर
सकाळपासून मतदारांची रांग पाहायला मिळाली.
आनंद आखाडा येथील मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा असून याच ठिकाणी 3 वेळा मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता. अनेक उमेदवारांच्या प्रतिनिधींकडून मशीनमध्ये बिघड झाल्यामुळे मतदान थांबल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यामुळे केंद्रावर साडेपाचआधी आलेल्यांना मतदान करण्याची मुभा देण्यात आली आहे.
गोंदिया जिल्ह्यात 2 नगरपरिषद आणि 2 नगरपंचायतीच्या निवडणुकीची मतदान प्रक्रिया पार पडत आहे. गोंदिया शहरातील रामनगर मुन्सिपल शाळेच्या मतदान केंद्रावर 5.30 वाजता मुख्य दरवाजा बंद करण्यात आला आहे. त्यानंतर मतदान केंद्राच्या आत मोठी गर्दी झाल्याचे बघायला मिळालं.
नाशिकमधील सिन्नरमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारावर स्प्रेने हल्ला करण्यात आला आहे. अजित दादांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार किरण गोजरे यांच्यावर स्प्रेने हल्ला करण्यात आला.मतदानादरम्यान वाद झाल्यानंतर दोन गटात हाणामारी झाली. या हल्ल्याचा व्हीडिओ व्हायरल झाला आहे. या प्रकरणात पोलिसांकडून तपास केला जात आहे.
त्र्यंबकेश्वर येथील मतदान केंद्रावर पुन्हा गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. तीन वेळा मशीन बंद पडल्याचा उमेदवाराच्या प्रतिनिधींचा आरोप आहे. मतदान केंद्रावर उमेदवारांसह भेट देण्यासाठी आले असताना मशीनमध्ये तांत्रिक अडचणी आल्याची उमेदवार प्रतिनिधींकडून माहिती दिली गेली. मशीन बंद पडल्यामुळे नागरिकांना दीड ते दोन तास ताटकळत उभं राहावं लागले, असा उमेदवार प्रतिनिधींचा आरोप आहे. मशीन बदलल्यानंतर मात्र मतदान सुरळीत झालं.
नाशिक जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, असं मंत्री दादा भुसे यांनी सांगितलं. देश पातळीवर आणि राज्य पातळीवर भाजपची संख्या जास्त आहे. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत भाजपला जास्त जागा दिल्या त्यामुळे त्यांची संख्या जास्त आहे. शिवसेनेच्या वाटेला लढण्यासाठी जागा कमी आल्या. 80 पैकी 60 जागेवर आम्ही विधानसभेत विजयी झालो.
वाशिमच्या रिसोड नगर परिषदेच्या प्रभाग 4 मधील खडसे महाविद्यालयाच्या खोली 1 मधील EVM बंद पडल्यानं मागील 30 मिनिटांपासून मतदान थांबलं आहे. मतदान केंद्राबाहेर मतदारांची गर्दी झाली आहे.
वर्धा जिल्ह्यात दुपारी 3.30 पर्यंत 44.40 टक्के मतदान झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. पुढच्या काही तासात यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. पण इतकी कमी टक्के मतदान झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
Nashik Local Body Election LIVE Updates : एकीकडे लग्न लागले असताना वेळात वेळ काढून नवरी आपल्या नवरदेवाला घेऊन मतदान केंद्रावर मतदानाचा कर्तव्य बजावण्यास आल्याची घटना घडली आहे. त्र्यंबकेश्वर येथील आनंद पंचायती मतदान केंद्रावर या नवरीने मतदानाचा अधिकार बजावला. लोकशाहीसाठी त्र्यंबकेश्वरच्या विकासासाठी मतदानाला केल्याची प्रतिक्रिया नवरीने दिली आहे.
Sangli Local Body Election LIVE Updates: सांगलीच्या तासगावनगर परिषदेच्या मतदानावेळी बोगस मतदानाचा आरोप करत आमदार रोहित पाटील आणि माजी खासदार संजय काका पाटील यांच्या दोन गटात जोरदार वादावादीचा प्रकार घडला.तासगाव येथील एका बुथवर बोगस मतदान होत असल्याचा आक्षेप रोहित पाटील यांच्या गटाच्या बूथ प्रतिनिधींनी घेतला.तसेच विरोधकांनी हातातील मतदार याद्याही हिसकावल्याचा त्यांनी आरोप केला. यानंतर तातडीने आमदार रोहित पाटील ही संबंधित मतदान केंद्रावर दाखल झाले आणि दोन्ही गटात वादावादी झाली आहे.
Nandurbar Local Body Election LIVE Updates:-
– शहादा : 58,972 मतदारांपैकी 28,671 मतदारांनी मतदान केले → 48.62%
– तळोदा : 26,851 मतदारांपैकी 14,420 मतदारांनी मतदान केले → 53.70%
– नवापुर : 27,114 मतदारांपैकी 11,621 मतदारांनी मतदान केले → 41.34%
– नंदुरबार : 1,11,101 मतदारांपैकी 50,767 मतदारांनी मतदान केले → 45.69%
– एकूण जिल्हा : 2,25,038 मतदारांपैकी 1,05,579 मतदारांनी मतदान केले → 46.92%
Nashik Local Body Election LIVE Updates : नाशिक जिल्ह्यात दुपारी 3.30 वाजेपर्यंत सरासरी 46.71 टक्के मतदान झाले आहे. सर्वाधिक 69.75 टक्के मतदान त्रंबकेश्वरमध्ये झाले असून सर्वात कमी 37.2 टक्के मतदान येवल्यात झाले आहे.
Jalgoan Local Body Election LIVE Updates: भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथील प्रभाग क्रमांक दहा मधील क्रमांक पाच सहा वर राडा झाला आहे. येथील अधिकारी हा मतदारांना बटन दाबण्यासाठी सांगत असल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे त्यामुळे काही काळ या ठिकाणी गोंधळ निर्माण झाला होता. निवडणूक अधिकारी आणि उमेदवार यांच्यामध्ये काही वेळ बाचाबाची झाली आहे
Jalgoan Local Body Election LIVE Updates: भाजप बनावट ओळखपत्राच्या आधारावर बोगस मतदान करून लोकशाहीची हत्या करत आहे. प्रशासन आणि लोकप्रतिनिधी मिळून लोकशाहीची हत्या करत आहे.पोलीस उघड्या डोळ्यांनी बघतायत हे दुर्दैव आहे, पोलीस प्रशासनाच्या हातचे बाहुले बनले आहे असा आरोप ठाकरे गटाचे नेते माजी खासदार उन्मेष पाटील यांनी केला आहे.
मतदानाचा हक्क बजावण्यासाठी चक्क सात समुद्र पार करत एक तरुण सांगलीच्या शिराळामध्ये दाखल झाला. मतदान हे श्रेष्ठ दान असल्याचं सांगत मतदानाचा हक्क बजावला आहे. मतदान करण्यासाठी थेट ऑस्ट्रेलिया मधून हजारो किलोमीटरचा प्रवास करत दाखल होऊन शिराळा नगरपंचायतीसाठी मतदान केलं आहे. अन्सार कासिम मुल्ला असे या तरुणाचं नाव असून तो ऑस्ट्रेलियातील मेलबॉर्न मध्ये नोकरीला असून दोन डिसेंबर रोजी शिराळा नगरपंचायतीसाठी मतदान होणार असल्याचं कळतच अन्सार याने थेट विमानाने प्रवास करत शिराळामध्ये दाखल झाला होता.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मतदान सुरु असताना बीड शहरातील शाहूनगर भागात दगडफेक झाली आहे. यावेळी अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा झाला. ही घटना कुठल्या कारणावरून घडली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
राज्यातल्या नगरपालिका खरेदी करण्याचा उद्योग सत्ताधाऱ्यांचा असून निवडणुकांमध्ये नंगा नाच सुरू असल्याची घणाघाती टीका राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांनी निवडणुकांमधील पैसे वाटपावरून केली आहे. राज्यातल्या नगरपालिका निवडणुकांमधील चित्र हे भयावह असून रिक्षा, ऑफिस, बुथवर पैसे वाटप सुरू असून नंगा नाच चालू आहे, पण पोलीस आणि निवडणूक आयोग याकडे दुर्लक्ष करते. हे लोकशाहीच दुर्दैव आहे.
निवडणूक आयोग आहे की अडवणूक आयोग. निवडणूक आयोगाने निवडणुकीचा बट्ट्या भोळ लावला. निवडणुका मतमोजणी पुढे ढकलणे लोकशाहीसाठी दुर्दैवी. निवडणूक आयोगावर धाराशिवचे उबाटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांची सडकून टीका.
शहादा शहरातील मतदान केंद्रांवर दोन गटात राडा झाला आहे. शहरातील प्रभाग क्रमांक 11 मुनिसिपल हायस्कूलचा मतदान केंद्राबाहेर तुफान हाणामारी आणि शिवीगाळ करण्यात आले. भाजप आणि जनता विकास आघाडीचे कार्यकर्ते आपसात भिडले.
शिर्डी नगरपरिषद निवडणुकीत गंभीर प्रकार उघडला आहे. एका महिलेच्या नावाने आधीच कुणीतरी मतदान केल्याचे आढळले आहे. शोभा शिंदे मतदानासाठी आल्या असता त्यांचे मतदान अगोदर झाल्याचे आले असल्याचे समोर आले आहे.
जळगावच्या जामनेरमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी बोगस मतदाराला पकडले. प्रभाग क्रमांक दहा मधील एकलव्य शाळेतील मतदान केंद्रावर या बोगस मतदार तरुणाला राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी पकडले आहे. बोगस मतदाराला पकडल्यानंतर कार्यकर्त्यांनी त्याला पोलिसांच्या स्वाधीन करत कारवाईची मागणी केली आहे.
परभणीच्या जिंतूर नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी आणि भाजप पदाधिकारी किरकोळ कारणामुळे आपसात भिडल्याचा प्रकार घडला, दरम्यान, पोलिसांनी सारवासारव करत दोन्ही कार्यकर्त्यांना काढून दिले .
रायगडमध्ये गोगावले समर्थक विरुद्ध जगताप समर्थकांमध्ये राडा झाल्याचं समोर आलं आहे. विकास गोगावले-सुशांत जाबरेंच्या समर्थकांमध्ये वाद निर्माण झाला आहे. सुशांत जाबरेंच्या वाहनाची तोडफोडही करण्यात आली. तसेच सुशांत जाबरेंच्या सुरक्षा रक्षकाला गोगावले समर्थकांकडून चोप देण्यात आल्याचीही घटना समोर आली आहे.
पैशांचे वाटप सुरु आहे, मग कसली गस्त वाढवताय असा प्रश्न निलेश राणे यांनी उपस्थित केला आहे. एवढंच नाही तर ‘आता मी केस करणार आहे.’ असं देखील निलेश राणे यांनी म्हटलं आहे.
हवेसारखं राजकारणातही प्रदुषण झाल्याचं म्हणत उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा भाजपावर निशाणा साधल आहे. दगाबाज भाजपाला धडा शिकवण्यासाठी मविआची स्थापना केल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलं. सत्तेसाठी सगळी लाचारी चाललीये असं म्हणत त्यांनी शिंदेंवरही तोफ डागली आहे.
‘मातोश्री’ वर पक्षप्रवेश कार्यक्रम सुरु असून अनेक कार्यकर्त्यांनी उबाठामध्ये प्रवेश केला आहे. उद्धव ठाकरेंच्या हस्ते शिवबंधन बांधून या कार्यकर्त्यांच्या पक्षप्रवेशाचे स्वागत करण्यात आलं. यावेळेस उद्धव ठाकरे यांनी यावेळी म्हटलं की, ” पक्षात परत येणाऱ्यांचे स्वागतच आहे” असं म्हणत उद्धव ठाकरेंनी त्या सर्व कार्यकर्त्यांच्या परतीबद्दल समाधान व्यक्त केलं आहे.
निलेश राणे यांनी निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेतली. “मी चोरी पकडून दिली तरी माझ्यावर कारवाई का केली? आम्हाला यातून काय मिळणार आहे? ज्याची रोकड जप्त केली त्याच्यावर काय कारवाई झाली?” असे अनेक प्रश्न निलेश राणे यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना विचारत संताप व्यक्त केला आहे.
सांगलीच्या जत नगर परिषदेच्या मतदाना दरम्यान गोंधळ झाल्याचा प्रकार घडला आहे.मतदान केंद्रावर भाजप कार्यकर्ते व पोलीस कर्मचाऱ्यां मध्ये जोरदार वादावादीचा प्रकार घडला आहे.जत मधल्या शिवाजी पेठेतील शाळा क्रमांक एक येथील मतदान केंद्रावर हा प्रकार घडला आहे. भाजपाच्या प्रभाग 5 मधील महिला उमेदवार प्रणिता यादव यांना मतदान केंद्रा बाहेर काढण्यावरून महिला पोलीस कर्मचारी आणि यादव यांच्यामध्ये पहिल्यांदा वादावादी घडली.त्यानंतर यादव समर्थकांनी मतदान केंद्रामध्ये घुसत पोलिसांची हुज्जत घातली,त्यामुळे पोलीस कर्मचारी आणि भाजप कार्यकर्त्यांच्या मध्ये यावेळी जोरदार वादावादीचा प्रकार घडला, दरम्यान पोलीस उपाधीक्षक सचिन थोरबोले यांनी घटनास्थळी धाव घेत भाजपाच्या कार्यकर्त्यांची समजूत काढली,त्यामुळे या ठिकाणी काही काळ निर्माण झालेला तणाव निवळला.
नगरपरिषद च्या निवडणुकीच्या संदर्भाने जो निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला. निवडणूक कार्यक्रम झाल्यापासूनच निवडणूक आयोगाचा जो अक्षम्य गोंधळ आहे. तो कार्यकर्ते नेत्यांना आणि सर्वच पक्षांना गोंधळात टाकणारा होता. त्यातही अचानक 24 ठिकाणच्या नगर परिषदेच्या निवडणुका रद्द झाल्या. 24 ठिकाणच्या नगरपरिषदेचा निवडणुका पुढे ढकलल्या म्हणून आज होणाऱ्या नगरपरिषदेच्या निवडणुकीचा निकाल उद्या अपेक्षित होता मात्र तोही आता पुढे ढकलण्यात आला आहे हेही त्याहूनही जास्त त्रासदायक आहे. आज मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर इतक्या दिवस मतदान पेट्याची सुरक्षेचा भार पोलीस यंत्रणेवर राहणार आहे, असे शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी आरोप केला.
भोकरदन मधील जवळपास 3 हजार 25 नावे सिल्लोड शहरात नोंदवल्याची माहिती रावसाहेब दानवे यांची दिली. तालुक्यातील सर्व नातेगोत्यातील नाव सिल्लोड मध्ये नोंदवलेले आहेत, त्यामुळे त्याची पुनरावृत्ती आता नगर परिषदेच्या निवडणुकीत होईल, असे दानवे म्हणाले.
भाजपा जिल्हा सचिव कमलेश कटारिया यांनी अब्दुल सत्तार यांनी शहराचा विकास नाही तर केवळ परिवाराचा विकास केला. त्यांनी मोजक्याच वस्त्यांमध्ये रस्ते केले. ज्या ठिकाणी वस्ती नाही त्या ठिकाणी रस्ते केले. विधानसभेला एक लाखांनी निवडून येणार असे दावा करणारे अब्दुल सत्तार दोन हजार चारशे मताने निवडून आले होते. सिल्लोड मध्ये यावेळेस परिवर्तन होणार आणि नगरपरिषद मध्ये भाजपची सत्ता येणार असा दावा केला.
पंढरपुरातील उर्दू शाळेच्या मतदान केंद्रावर आज वेगळाच गोंधळ पाहायला मिळाला. मतदान केंद्रावरील बॅलेट पेपर वरच कमळ चिन्हासमोर खुणा केल्या असल्याचा आक्षेप तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे उमेदवार प्रणिता भालके यांनी घेतला. तसेच मतदान केंद्रावर कमळ चिन्हाच्या मतदार स्लीपही आढळून आल्या. महत्त्वाची बाब म्हणजे पोलीसच अशा स्लिप मतदारांना देत असल्याचा आरोपही भालके यांनी केलाय. त्यानंतर मतदान केंद्राध्यक्ष , पोलीस आणि भालके यांच्या समक्ष EVM मशीनवरील बॅलेटपेपरवर व मतदार केंद्रांची तपासणी करण्यात आली आहे. याबाबत मशीन बदलून मागितली द्यावी. अशीही मागणी भालके यांच्याकडून करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राज्य निवडणूक आयोगावरील नाराजी समोर आली आहे. घोषित केलेल्या निवडणुका पुढे ढकलल्या जात आहेत. त्याचा निकाल पुढे जातोय. हे पहिल्यांदाच असं होतंय. हे यंत्रणांचं अपयश आहे. निवडणूक आयोगाने प्रक्रियेत सुधारणा करावी. मी पहिल्यांदाच अशी निवडणूक पाहतोय. मतमोजणी पुढे ढकलणे हे मला तरी पटत नाही. हे यंत्रणांचं फेल्यूअर असल्याचे फडणवीस म्हणाले.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी आपल्या कुटुंबासह ब्रम्हपुरीत मतदानाचा हक्क बजावला. ब्रम्हपुरी हा वडेट्टीवार यांचा मतदारसंघ आहे. त्यामुळे इथे त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. उद्याचा दिवस हा आपला असेल आणि काँग्रेसच गुलाल उधळेल, अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.
वर्धा जिल्ह्यात पाच नगर परिषदेत सकाळी साडेनऊपर्यंत 7.43 टक्के मतदान झालं. वर्धा येथे 8.23 टक्के, हिंगणघाट येथे 7.15 टक्के, आर्वी मध्ये 7.80लटक्के, पुलगाव 5.19 टक्के, सिंदी (रेल्वे) येथे 7.97 टक्के मतदान झालंय. सकाळी साडेनऊपर्यंत 19 हजार 291 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला .
ही सर्व पद्धत योग्य वाटत नाही असे म्हणत मुख्यमंत्री फडणवीस यांनी नागपूर खंडपीठाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. सर्व नगरपालिका, नगर परिषदांचा निकाल 3 डिसेंबर नव्हे 21 तारखेला लागेल असा निर्णय नागपूर खंडपीठाने दिला, त्यावर फडणवीस यांनी ही प्रतिक्रिया दिली.
खंडपीठाचा निर्णय मान्य करावा लागेल मात्र, निवडणूक आयोगाने प्रक्रियेमध्ये सुधारणा करावी असं ते म्हणाले. पहिल्यांदाच मी अशा निवडणुका पाहतोय, असंही त्यांनी नमूद केलं.
Maharashtra Elections 2025 : सर्व निवडणुकांची एकत्रित मतमोजणी 21 डिसेंबरला होणार, नागपूर खंडपीठाने दिला निर्णय. यासंदर्भात याचिका दाखल करण्यात आली होती, अखेर न्यायालयाचा निर्णय समोर आला आहे. आज (2 डिसेंबर) मतदान आणि उद्या (3 डिसेंबरला) मतमोजणी होणार होती, मात्र आता नागपूर खंडपीठाच्या निर्णयानंतर उद्या मतमोजणी न होता 21 तारखेलाच सर्व मतमोजणी पार पडेल.
बुलढाणा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीत आत्तापर्यंत सिंदखेड राजा येथे सर्वाधिक म्हणजे 10.62 % मतदान झालं आहे. तर चिखलीमध्ये 5.81 टक्के, लोणार येथे 9.67 टक्के मतदान झालं आहे.
इंदापुरातील मतदान केंद्रावर 2 गटांत गोंधळ झाला. मतदान केंद्रावरच कार्यकर्ते आपापसांत भिडले. पोलिसांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करत गोंधळ शांत केला.
बदलापुरात भरारी पथकाने 2 लाखांची रोकड पकडली. बदलापूरच्या सुरवळ चौकातील प्रकार समोर आला असून बदलापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. 2 लाखांच्या रोख रकमेसह एका इसमाला पोलिसांनी ताब्यात घेतलं .
Pune Election 2025 LIVE Updates : पुणे – सकाळी 7.30 ते 9.30 या दोन तासात जिल्ह्यातील 12 नगरपरिषद तसेच 3 नगरपंचायत मध्ये 8.37 टक्के मतदान झाले.
Nashik Election 2025 LIVE Updates : त्र्यंबकेश्वर येथील मतदान केंद्रांवर मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळत असून मतदानासाठी सकाळपासून मतदारांच्या रांगा लागल्या आहेत. पुरुषांपेक्षा महिलांची अधिक गर्दी दिसत आहे. गिरीश महाजन यांच्यासाठी त्रंबकेश्वर ही प्रतिष्ठेची लढाई आहे.
Nashik Election 2025 LIVE Updates : नाशिक जिल्ह्यात सकाळी 9.30 वाजेपर्यंतची आकडेवारी समोर आली आहे. यात त्र्यंबकेश्वरमध्ये 13.35 टक्के मतदान झाले आहे.
Chhatrapati Sambhajinagar Election 2025 LIVE Updates : छत्रपती संभाजीनगरमधील सकाळी 7.30 ते 9.30 ची मतदानाची टक्केवारी समोर आली आहे. यात सिल्लोडमध्ये सर्वाधिक 12.96 टक्के मतदान झाले आहे.
जिल्ह्याची सरासरी 9.05 टक्के
Jalgaon Election 2025 LIVE Updates : जळगावातील मुक्ताईनगरमध्ये 5 टक्के मतदान आतापर्यंत झाल्याचे समोर आले आहे. भुसावळ 6 टक्के मतदान, यावल , फैजपूर वरणगाव 5 टक्के मतदान झाले आहे. तर रावेरमध्ये आतापर्यंत सर्वाधिक 8 टक्के मतदान झाले आहे.
Jalgaon Election 2025 LIVE Updates : जळगावच्या चाळीसगाव शहरात मतदान यंत्रात तांत्रिक बिघाड झाला आहे. प्रभाग क्रमांक 14 मधील बॅलेट युनिटमध्ये बिघाड पाहायला मिळत आहे. निवडणूक अधिकाऱ्यांनी तात्काळ बॅलेट युनिट बदललं. त्यामुळे मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू आहे.
Dhule Election 2025 LIVE Updates : धुळ्यात सकाळी 7:30 वाजता मतदानाला सुरुवात झाली आहे. आता 9.30 पर्यंत मतदान टक्केवारी समोर आली आहे.
Satara Election 2025 LIVE Updates : सातारा जिल्ह्यातील नगरपरिषद/ नगरपंचायतींमध्ये सकाळी 7.30 ते 9.30 या कालावधीत झालेले मतदान टक्केवारी समोर आली आहे.
Nanded Election 2025 LIVE Updates : नांदेड जिल्ह्यातील 11 नगरपालिकेसाठी दोन तासात सरासरी ७.६९ टक्के सरासरी मतदान झाले आहे.
सरासरी मतदान: 7.69 टक्के
Nanded Election 2025 LIVE Updates : नांदेडच्या मुदखेड नगरपालिका मतदान प्रक्रिया दरम्यान बॅलेट युनिटमध्ये बिघाड झाला आहे. बटन दाबल्यानंतर पुन्हा वर येत नसल्याने बॅलेट युनिट बदलण्यात आले. प्रभाग क्रमांक एक आणि सहा मध्ये मतदान प्रक्रियेला 15 ते 20 मिनिटे अडथळा आल्याचे पाहायला मिळत आहे. आता मुदखेड मधील मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडत आहे. नांदेड जिल्ह्यातील इतर 10 नगरपालिकेसाठी सकाळपासूनच मतदान प्रक्रिया सुरळीत सुरु आहे.
Badlapur Election 2025 LIVE Updates : बदलापुरातील शिरगाव आपटेवाडी मतदान केंद्रातील ईव्हीएम मशीन बंद पडले आहे. त्यामुळे मतदारांना तब्बल पाऊण तास ताटकळत बसावे लागले. यामुळे मतदारांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
Solapur Election 2025 LIVE Updates : सोलापूर जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी समोर आली आहे. सकाळी 9.30 वाजेपर्यंतचे 7.24 टक्के मतदानाची नोंद करण्यात आली.
1) अक्कलकोट – 8.16 टक्के
2) दूधनी – 13.13 टक्के
3)मैंदर्गी – 11.27 टक्के
4) बार्शी – 7.34 टक्के
5) मोहोळ – 9.32 टक्के
6) अकलूज – 8.43 टक्के
7) कुर्डुवाडी – 5.37 टक्के
8) पंढरपूर – 5.25 टक्के
9) करमाळा – 8.47 टक्के
10 सांगोला – 5.79 टक्के
एकूण = 7.24 टक्के मतदान
Jalgaon Election 2025 LIVE Updates : जळगाव जिल्ह्यात 16 नगरपरिषदा व 2 नगरपंचायतींसाठी मतदान सुरू आहे. सकाळी ७.३० ते ९.३० या वेळेत जिल्ह्यात एकूण 6.1 टक्के एवढे मतदान पार पडले. एकूण 8 लाख 81 हजार 510 मतदारांपैकी आतापर्यंत 52 हजार 977 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यात 30 हजार 479 पुरुष तर 22 हजार 495 महिलांनी आतापर्यंत मतदानाचा हक्क बजावला.
Lonavala Election 2025 LIVE Updates : लोणावळा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान सुरु आहे. यात 7.30 ते 9.30 दरम्यान मतदानाची टक्केवारी समोर आली आहे. यात 2779 पुरुष आणि 1905 स्त्रियांनी मतदान केले आहे. आतापर्यंत एकूण 4684 म्हणजेच 9.68 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला
Sangli Election 2025 LIVE Updates : सांगली जिल्ह्यातील 6 नगरपरिषद व 2 नगरपंचायतीसाठी सकाळपासूनच चुरशीने मतदानाला सुरुवात झाली आहे. सकाळी 9.30 वाजेपर्यंत 9.48 टक्के मतदान झाले आहे. सांगली जिल्ह्यात उरुण ईश्वरपूर, विटा, तासगाव, आष्टा, पलूस, जत तर आटपाडी आणि शिराळा या ठिकाणी नगरपंचायतीसाठी निवडणूक पार पडत आहे.
Jalgaon Election 2025 LIVE Updates : जळगाव चोपडा नगरपरिषद निवडणुकीच्या भाजपाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार साधना चौधरी यांनी कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला. चोपडा नगर परिषदेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार साधना चौधरी यांनी कुटुंबासह महात्मा गांधी विद्यालयात मतदानाचा हक्क बजावला. जनता मला आशीर्वाद देईल असा विश्वास उमेदवार साधना चौधरी यांनी बोलताना व्यक्त केला आहे. तसेच मतदारांनी जास्तीत जास्त मतदानाचा हक्क बजावा असे आवाहन केले.
Amravati Election 2025 LIVE Updates : अमरावती जिल्ह्यातील दर्यापूरमध्ये एका मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीन एक तासापासून बंद आहे. नगरपालिका हद्दीमधील शहीद अब्दुल हमीद उर्दू उच्च प्राथमिक शाळा बाबळी या ठिकाणी मतदान होत असून खोली क्रमांक १ मधील गेल्या एक तासांपासून मतदान मशीन बंद असल्याने मतदान मध्ये मोठ्या प्रमाणात आक्रोश पाहायला मिळत आहे. निवडणूक विभागाच्या वतीने मशीन दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
Solapur Election 2025 LIVE Updates : सोलापूर जिल्ह्यातील मतदानाची आतापर्यंतची टक्केवारी समोर आली. ही मतदानाची टक्केवारी सकाळी 7.30 ते 9.30 या दरम्यानची आहे.
Karmala Local Body Election LIVE Updates : करमाळा नगरपरिषद मतदान आकडेवारी समोर आली आहे. सकाळी 7.30-9.30 यावेळेत एकूण 8.46% मतदान झालं. पुरुष मतदान 1129 तर 744 महिलांनी मतदान केलं आहे.
Beed Election 2025 LIVE Updates : संपूर्ण जिल्ह्याच्या निवडणुकीकडे लक्ष ठेवून आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आमचाच विजय होईल, मंत्री पंकजा मुंडे यांनी असा विश्वास व्यक्त केला आहे.
Amravati Election 2025 LIVE Updates : अमरावतीच्या धामणगाव रेल्वे नगरपरिषद निवडणुकीत भाजपा आमदार प्रताप अडसड यांची बहीण अर्चना अडसड रोठे निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. भाजपचे जेष्ठ नेते माजी आमदार अरुण अडसड, त्यांचे पुत्र आमदार प्रताप अडसड आणि नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार अर्चना अडसड रोठे यांनी धामणगाव रेल्वे मतदानाचा हक्क बजावला. अडसड कुटुंबाने सहपरिवार मतदान केले. धामणगाव नगरपरिषद मध्ये भाजपाच्या अर्चना अडसड विरुद्ध वर्षा देशमुख असा थेट सामना रंगणार आहे.
Dhule Election 2025 LIVE Updates : धुळे जिल्ह्यातील दोन नगरपरिषद आणि एक नगरपंचायत निवडणुकी साठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी मतदान केंद्रावर पाहणी केली. सुमारे 550 महिला पुरुष पोलीस, 400 होमगार्ड एक एस आर पी एफ कंपनी बंदोबस्त… नगरपरिषदेच्या निवडणुका निर्विघ्न पार पाडण्यासाठी पोलिसांचा मोठा फौज फाटा तैनात करण्यात आला आहे.
Nashik Election 2025 LIVE Updates : नाशिकच्या ओझर येथील पार्वताबाई कारभारी चौधरी यांनी मतदानाचा हक्क बजावला. वयाच्या 100 व्या वर्षी त्यांनी मतदानाचा हक्क बजावला.
Badlapur Election 2025 LIVE Updates : बुलढाण्यात बोगस मतदान करताना युवकाला पकडलं… मतदान प्रतिनिधींनी युवकाला चोप दिला. मतदान केंद्रावर मोठ्या प्रमाणात गोंधळ उडाला आहे. बोगस मतदान करणाऱ्या युवकाला इतरांनी पळवून लावले. मोठ्या प्रमाणात शासकीय तांत्रिक विद्यालय मतदान केंद्रावर गोंधळ उडाला आहे.
Solapur Election 2025 LIVE Updates : अक्कलकोट मधील नगर परिषदेत उर्दू शाळेतील मतदान केंद्रावरील evm मशीन बंद पडली. मतदान केंद्र क्रमांक 9 वरील 2 नंबर खोली मधील मशीन तब्बल अर्ध्या तासापासून बंद आहे. सकाळच्या सत्रात मतदान करायला आलेल्या मतदारांची तारांबळ उडाली. निवडणूक कर्मचाऱ्यांनाकडून मशीन पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.
Pandharpur Election 2025 LIVE Updates : शोले चित्रपटाचे चाहते आजही देशभरात पाहायला मिळतात. अशाच शोले चित्रपटातील गब्बर सिंगचा अकलूज मधील एक चाहता असणाऱ्या मतदाराने गब्बरसिंगच्या पेहरावात येऊन मतदानाचा हक्क बजावला. विशेष म्हणजे शोले चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून दत्तात्रय सूर्यवंशी हे गब्बरसिंग सारखा पोशाख परिधान करत आले आहेत…
Badlapur Election 2025 LIVE Updates : बदलापुरात मंत्री आशिष दामले आणि पोलिसांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली आहे. मतदान केंद्राबाहेर उभं राहण्यावरून बाचाबाची झाली. बेलवलीतल्या माजी कार्यालय परिसरात 100 मीटर बाहेर उभं राहण्यावरून वाद झाला.
Nandurbar Election 2025 LIVE Updates : नंदुरबार नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १९ मधील पहिला क्रमांक चार मशीन बिघडले आहे. गेल्या काही तासांपासून मशीन बंद असल्याने मतदारांच्या रांगा लागल्यात. मशिनांची तपासणी केल्यानंतरच मशीन केंद्रावर पाठवले जात असतात मात्र तरी देखील मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने मशीन दुरुस्त करण्याचे काम केले जात आहे… मशीनचे बटन दाबले जात नसल्याची तक्रार प्रभाग क्रमांक १९ च्या उमेदवारांनी केली आहे….
Badlapur Election 2025 LIVE Updates : मतदानाच्या दिवशी भाजपा शिवसेनेचे कार्यकर्ते एकमेकांसोबत भिडले… बदलापूर पश्चिम गांधी नगर टेकडी एसटी बसस्टँड जवळ भाजपा-शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला. बदलापूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून गर्दी पांगवली आहे.
Buldhana Election 2025 LIVE Updates : बुलढाण्यात अनेक मतदान केंद्रावर ग्रामीण भागातून बोगस मतदार आणून त्यांच्या करवी मतदार करून घेत असल्याचा आरोप काँग्रेसच्या उमेदवार पती दत्ता काकास यांनी केला आहे. याला पुष्टी करणारे अनेक व्हिडिओही समाज माध्यमात व्हायरल होत आहेत. तर काही मतदारांना बोगस मतदान करताना पकडण्याची ही माहिती आरोप करते उमेदवारांच्या पतीने दिली आहे.
Jalna Election 2025 LIVE Updates : माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, आमदार संतोष दानवे आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाने मतदानाचा हक्क बजावला. भोकरदन नगरपालिका निवडणुकीसाठी भोकरदन शहरातील मतदान केंद्रावर हक्क बजावला. राज्यात आणि जिल्ह्यात भाजप एक नंबरचा पक्ष ठरेल अशी रावसाहेब दानवे यांनी प्रतिक्रिया दिली.
Solapur Election 2025 LIVE Updates : सोलापुरातील मोहोळमध्ये आणखी एका मतदान केंद्रावरील मशीन बंद पडली. मोहोळ शहरातील आठवडा बाजार मतदान केंद्रावरील मशीन बंद पडली. मशीन बंद पडल्यावरुन माजी आमदार रमेश कदम यांचा भाजपवर आरोप. मतदान केंद्रावरील वोटिंग मशीन वर केवळ भाजप चिन्हाचे बटन दाबले जात असल्याचा आरोप रमेश कदम यांनी केला. तर विरोधकांना पराभव दिसत असल्याने ते फेक नरेटीव्ह करत असल्याचा भाजप उमेदवार सुशील क्षीरसागर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
Buldhana Election 2025 LIVE Updates : प्रभाग क्रमांक 15 मधील गांधी प्राथमिक शाळा येथे बोगस मतदान करताना दोन बोगस मतदार पकडले गेले. ग्रामीण भागतील मतदार असल्याचे समोर आले आहे. दुसऱ्याचे नावावर मतदान कारणासाठी आले होते.
चंद्रपूरच्या काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर यांनी सकाळीच मतदान केले. वरोरा नगरपालिका निवडणुकीत त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. वरोरा हे त्यांचे गाव असून, इथे काँग्रेसला विजयी करण्याचे मोठे आव्हान त्यांच्यापुढे आहे. आज शहरातील लोकमान्य विद्यालय केंद्रात जाऊन त्यांनी मतदानाचा हक्क बजावला.
Chhatrapati Sambhajinagar Local Body Election LIVE Updates : माजी मंत्री तसेच शिवसेना शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार हे मतदान करण्यासाठी सिल्लोड मधील नॅशनल उर्दू प्राथमिक शाळेमध्ये आले आहेत, अब्दुल सत्तार यांचे चिरंजीव समीर अब्दुल सत्तार हे सिल्लोड नगर परिषद मध्ये नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक लढवत आहेत
Jamkhed Local Body Election LIVE Updates : जामखेडमध्ये भाजपने गुंडाच्या घरात उमेदवारी दिली… जामखेडमध्येद दहशतीचं वातावरण असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला आहे. एवढंच नाही तर, भाजप, शिवसेनेकडून पैसे वाटल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे.
Igatpuri Election 2025 LIVE Updates: इगतपुरीमधील मतदान केंद्रावर मतदान करण्यास सुरुवात झाली आहे. इगतपुरी येथील प्रभाग क्रमांक सहामध्ये संभ्रमाची परिस्थिती पहायला मिळतेय. मतदान केंद्र आणि वोटिंग स्लिपचे नंबर मॅच न झाल्याने संभ्रम निर्माण झाला. वोटिंग स्लीपवर जो खोली क्रमांक आहे त्या खोलीत यादीत नाव नसल्याने मतदार विविध केंद्रांवर फिरतोय.
Akluj Election 2025 LIVE Updates: अकलूज मतदान केंद्रावर गेल्या 50 मिनिटांपासून ईव्हीएम बंद पडले आहेत. ईव्हीएम बंद पडल्याने मतदारांच्या रांगाच रांगा थांबल्या आहेत. आयोगाच्या वतीने तंत्रज्ञ आणि तज्ञांकडून ईव्हीएमची तपासणी केली जात आहे.
Beed Election 2025 LIVE Updates: बीड शहरातील वार्ड क्रमांक 15 यशवंतराव नाट्यगृह इथलं ईव्हीएम मशीन बंद पडलं होतं. मशीनमध्ये एरर येत असल्याने मतदान प्रक्रियेत अडथळा निर्माण झाला होता. 45 मिनिटं मशिन बंद होते. त्यानंतर दुसरे मशीन बसवण्याची उमेदवारांकडून मागणी करण्यात आली. सगळ्या मशिन तात्काळ बदलल्या असून आता मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू झाली आहे.
Alandi Election 2025 LIVE Updates: आळंदीमध्ये मतदानाला सुरुवात झाली असून पहिल्या तासात मतदानावर थंडीचा परिणाम जाणवत आहे. मतदान केंद्रावर तुरळक मतदार मतदानासाठी येत असून दुपारनंतर मतदान वाढेल अशी अपेक्षा आहे. आळंदीमध्ये नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि भाजप यांच्यात सरळ लढत असून दोन्ही पक्षांनी या ठिकाणी विजयासाठी जोर लावला आहे. मात्र थंडीमुळे सुरुवातीला मतदानाचा अल्प प्रतिसाद पाहायला मिळत आहे.
Badlapur Election 2025 LIVE Updates: बदलापूर नगरपालिका निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. मतदानासाठी मतदारांमध्ये उत्साह पहायला मिळतेय. नगराध्यक्षांसह 43 नगरसेवकांसाठी मतदान होत आहे. तर उर्वरित 6 जागांसाठी 20 डिसेंबरला मतदान होणार आहे.
Solapur Election 2025 LIVE Updates: सोलापुरातील मोहोळमध्ये मतदान केंद्रावरील मशीन बंद पडली आहे. मोहोळ शहरातील नेताजी प्रशाला मतदान केंद्रावरील मशीन बंद पडली आहे. प्रभाग क्रमांक चार मधील दोन नंबर बुथवरील मशीन 1 तासापासून बंद आहे. भाजपा उमेदवार प्रतिनिधी सोमेश क्षीरसागर आणि माजी आमदार रमेश कदम मतदान केंद्रावर दाखल झाले आहेत.
Hingoli Election 2025 LIVE Updates: हिंगोलीत आमदार संतोष बांगर यांच्याकडून मतदानाच्या गोपनीयतेचा भंग करण्यात आला. सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो, एकनाथ भाई शिंदे तुम आगे बढो.. अशी घोषणा आमदार बांगर यांनी मतदान केंद्रात केली. मतदान केंद्रात ईव्हीएमचे बटण दाबताना महिलेला आमदार बांगर यांनी सूचना केल्या.
नांदगाव (नाशिक) : नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. नाशिक जिल्ह्यातील सटाणा, नांदगाव, मनमाड, येवला, चांदवड आदी ठिकाणी मतदानाला सुरुवात झाली. मतदानाला सकाळपासूनच उत्साह पहायला मिळतोय.
प्रचाराच्या रणधुमाळीनंतर आज येवला नगरपालिकेच्या मतदानाला सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी- भाजप युतीचे राजेंद्र लोणारी तर शिवसेना शिंदे गटाचे रुपेश दराडे यांच्यात सरळ लढत आहे. एकूण 42 हजार 400 अधिक मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मंत्री छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ आणि शिक्षक आमदार किशोर दराडे यांची या नगरपालिका निवडणुकीच्या माध्यमातून प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
वाशिम जिल्ह्यातील रिसोड, कारंजा, मंगरुळपीर या तीन नगरपरिषद आणि मालेगाव नगरपंचायतीसाठी आज मतदान होत आहे. या चारही स्थानिक स्वराज संस्थांसाठीची सर्व तयारी जिल्हा प्रशासनाने पूर्ण केली असून यंत्रणा सज्ज आहे. सकाळी 7.30 वाजता मतदानाला सुरुवात झाली आहे.
गोंदिया, तिरोडा नगरपरिषद आणि सालेकसा, गोरेगाव नगरपंचायतच्या एकूण 98 जागांसाठी आज एकूण 209 मतदान केंद्रांवरून मतदान पार पडणार आहे. या चारही ठिकाणाचे एकूण 1 लाख 65 हजार 881 मतदार मतदानाचा हक्क बजावून निवडणूक रिंगणात असलेल्या 4 नगराध्यक्ष आणि 94 नगरसेवकांच्या भाग्याचा फैसला मतदानाचा हक्क बजावून करणार आहेत. सकाळच्या सुमारास थंडीचा जोर असल्याने मतदान केंद्रावर सध्या तरी शांतता दिसून येत आहे.
नांदेड जिल्ह्यातील दहा नगरपालिका आणि एका नगरपंचायतसाठी आज मतदान होत आहे. 2 लाख 45 हजार 494 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. 11 नगरपालिकेसाठी 291 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. नगराध्यक्षपदासाठी 71 उमेदवार तर नगरसेवक 873 उमेदवार रिंगणात आहेत. उमरी, हदगाव, मुदखेड, देगलूर, किनवट, बिलोली, भोकर, कुंडलवाडी, लोहा, कंधार हिमायतनगर या नगरपालिकेसाठी आज मतदान होतंय.
सातारा जिल्ह्यात 7 नगरपालिका आणि 1 नगरपंचायतीसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील सातारा, म्हसवड, पाचगणी, रहिमतपूर, कराड, मलकापूर या नगरपालिकेमध्ये तर मेढा नगरपंचायतीसाठी ही मतदान प्रक्रिया पार पडत आहे. जिल्ह्यातून 3 लाखांहून अधिक मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. जिल्ह्यातील 374 मतदान केंद्रावर 2352 कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. सर्वच ठिकाणी महत्त्वपूर्ण लढत यावेळी नगरपालिकेसाठी पाहायला मिळत आहेत.
जालन्यातील भोकरदन नगरपालिकेत मतदान केंद्र 8 वर EVM मशीनमध्ये बिघाड झाला आहे. त्यामुळे अद्याप मतदान सुरुच झालं नाही. 15 मिनिटांपासून दुरुस्तीचं काम सुरू असून मतदार संतप्त झाले आहेत.
यवतमाळच्या आर्णी इथल्या मतदान केंद्रावर मशीनमध्ये बिघाड झाल्याची माहिती समोर येत आहे. मतदान केंद्र क्रमांक 9 वर वरील खोली क्रमांक 3 मधील कंट्रोल युनिटमध्ये प्रेस एरर असल्याने बिघाड झाला आहे. त्यामुळे मतदान 20 मिनिटं उशिराने सुरू झालं.
मतदान केंद्रावर औक्षण करत नारळ फोडत केले मतदान. भाजप नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शितल क्षीरसागर यांनी मतदान केंद्राची पूजा करत केले मतदान/ मोहोळ मध्ये पंचरंगी निवडणूक पाहायला मिळत आहे. सोलापूर जिल्ह्यात एकूण 12 पैकी 10 जागांवर मतदान प्रक्रिया पार पडत आहे
मतदान केंद्र क्रमांक 9 वर वरील खोली क्रमांक 3 मधील कँट्रोल युनिट मध्ये प्रेस एरर असल्याने बिघाड. मतदान 20 मिनिटं उशिराने सुरू
अहिल्यानगर जिल्ह्यात 12 पैकी आठ नगरपरिषदेसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडणार तर जिल्ह्यातील चार ठिकाणी नगरपरिषद स्थगित. जामखेडमध्ये विधान परिषद सभापती राम शिंदे आणि आमदार रोहित पवार यांची प्रतिष्ठा पणाला
मतदान प्रक्रियेला सुरूवात झाली असून मतदान केंद्रांबाहेर नागरिकांची मोठी गर्दी बघायला मिळत आहे.
आठ नगरपालिकेच्या 93 प्रभागासाठी 287 मतदान केंद्रावर पार पडणार मतदान प्रक्रिया. जिल्ह्यात दोन लाख 43 हजार मतदार बजावणार मतदानाचा हक्कय धाराशिवानी उमरगा येथील प्रत्येकी तीन जागेवर मतदान प्रक्रियेला स्थगिती