“शाब्बास.. दिल्लीत महाराष्ट्राचा झेंडा फडकवलात” महाराष्ट्र एनसीसीने पटकावला पंतप्रधान ध्वजाचा सर्वोच्च सन्मान

“शाब्बास.. दिल्लीत महाराष्ट्राचा झेंडा फडकवलात” महाराष्ट्र एनसीसीने पटकावला पंतप्रधान ध्वजाचा सर्वोच्च सन्मान
cm uddhav thackeray

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav thackeray) यांनी प्रजासत्ताक दिन (Republic Day 2022) संचलनात सर्वोत्कृष्टतेचा पंतप्रधान ध्वज (प्राईम मिनीस्टर्स बँनर) (Prime minister banner) पटकावणाऱ्या महाराष्ट्राच्या राष्ट्रीय छात्रसेनेच्या चमुचे अभिनंदन केले आहे.

हेमंत बिर्जे

| Edited By: दादासाहेब कारंडे

Jan 28, 2022 | 3:28 PM

मुंबई : ‘महाराष्ट्राच्या जिद्द आणि चिकाटीचा झेंडा दिल्लीत फडकवलात..छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्याचा वारसा सांगणारी कामगिरी बजावलीत…शाब्बास..भले बहाद्दर…’ अशी शाबासकी देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav thackeray) यांनी प्रजासत्ताक दिन (Republic Day 2022) संचलनात सर्वोत्कृष्टतेचा पंतप्रधान ध्वज (प्राईम मिनीस्टर्स बँनर) (Prime minister banner) पटकावणाऱ्या महाराष्ट्राच्या राष्ट्रीय छात्रसेनेच्या चमुचे अभिनंदन केले आहे. राष्ट्रीय छात्रसेनेच्या महाराष्ट्र संचालनालयाने देशातील सर्वोत्कृष्ट संचालनालयाचे पारितोषिक पटकावले आहे, त्यासाठीही मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र संचालनालयाचे अभिनंदन केले आहे. त्यांनी पटकावलेल्या या बहुमानाने महाराष्ट्राची मान आणखी उचावली आहे, महाराष्ट्राला गर्व वाटावा असा हा क्षण आहे. हा बहुमान पटकावने प्रत्येक राज्याचे स्वप्न असते, ते महाराष्ट्रातील या ग्रुपने करून दाखवलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्लीत महाराष्ट्र छात्रसेनेच्या चमुला हा ध्वज प्रदान करण्यात आला. तसेच महाराष्ट्र संचालनालय आणि कॅडेट ऑफिसर पृथ्वी पाटील यांचा पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला. महाराष्ट्र एनसीसीची कॅडेट ऑफिसर पृथ्वी पाटील ही देशातील सर्वोत्तम छात्रसैनिक ठरली आहे. या यशासाठी पृथ्वी हिचेही मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले आहे. तसेच तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. महाराष्ट्र ही वीरांची भूमि म्हणून ओळखली जाते. महाराष्ट्रातील अनेक योद्ध्ये स्वातंत्र्य संग्रामातही मोठ्या जिद्दीने लढली आहे. महाराष्ट्र ही छत्रपती शिवाजी महाराजांंच्या पावलांनी पावन झालेली भूमि आहे. हाच वारसा पुढे नेण्याचे काम या पथकाने केले आहे. त्यामुळे महाराष्ट्रासाठी हा मोठा क्षण आहे. यामुळे देशपातळीवर महाराष्ट्राचा मान आणखी वाढला आहे. अशीच कामगिरी भविष्यातही होत राहवी अशीच अपेक्षा असणार आहे.

पंतप्रधान ध्वज (प्राईम मिनीस्टर बँनर)चा वाहक सिनिअर अंडर ऑफिसर सिद्धेश जाधव, सर्वोत्कृष्ट संचालनालयासाठीचा पारितोषिक स्वीकारण्याचा मान मिळालेले महाराष्ट्र संचालनालयाचे अतिरिक्त महासंचालक मेजर जनरल वाय. पी. खंडुरी, कॅप्टन निकिता खोत यांचेही मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले आहे. देशभरातील सर्व राज्यातील ग्रुपचा यात समावेश असतो, त्यामुळे स्पर्धाही जास्त असते त्यातूनही महाराष्ट्राला मिळालेला हा बहुमान प्रत्येक मराठी माणसाची छाती गर्वाने फुलवणारा आहे.

मिस्टर अॅण्ड मिसेस चांदकरांची वाईल्ड लाईफ फोटोग्राफी, कलाकारांच्या नजरेतून करूयात जंगल सफारी

‘रणजी’च्या आयोजनावरुन शास्त्री गुरुजींचे बीसीसीआयला खडे बोल, म्हणाले, दुर्लक्ष केल्यास…

सुवर्ण नगरीत सोने घसरले, सोन्याचे भाव प्रति तोळा 900 रुपयांनी कमी, चांदी 2200 रुपयांनी गडगडली

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें