AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पवारांच्या राष्ट्रवादीची आज मुंबईत बैठक, दोन्ही पक्षांच्या विलीनीकरणाबाबत चर्चा ? त्या नेत्याने स्पष्टच सांगितलं..

राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाची चर्चा पुन्हा जोर धरत आहे. अजित पवार गटाने हे वृत्त फेटाळले असले तरी, शरद पवार गटाच्या पुण्यातील गुप्त बैठक आणि मुंबईतील आजच्या बैठकीने या चर्चांना बळ दिले आहे. शशिकांत शिंदे यांनी विलीनीकरणाच्या बातम्या फेटाळल्या, पण भविष्यातील राजकीय घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

पवारांच्या राष्ट्रवादीची आज मुंबईत बैठक, दोन्ही पक्षांच्या विलीनीकरणाबाबत चर्चा ? त्या नेत्याने स्पष्टच सांगितलं..
राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार की नाही ?
| Updated on: May 20, 2026 | 11:46 AM
Share

गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलीनीकरणाबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची सूत्र स्वीकारली तसेच उपमुख्यमंत्री म्हणूनही शपथ घेतली. अजित पवार गेल्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या विलीनीकरणाच्या चर्चांना जोर चढला, रोहित पवारही याबाबत अनेकदा बोलताना दिसले. मात्र, अशी कोणतीही चर्चा नव्हती असे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्यांकडून स्पष्ट करण्यात आले. त्यानंतर हा विषय काहीसा बाजूला पडला होता.

मात्र आता दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांना पुन्हा उधाण आलं आहे. काही दिवसांपूर्वीच पुण्यात शरद पवार गटाच्या नेत्यांची गुप्त बैठक झाली. तर आजही मुंबईत यशवंतराव चव्हाण सभागृहात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची बैठक पार पडणार आहे. याच पार्श्वभूमीवर पक्षाचे अनक नेते मुंबईत उपस्थित होते. राष्ट्रवादीचे नेते असलेले शशिकांत शिंदे तसेच जितेंद्र आव्हाड यांनी बैठकीपूर्वी माध्यमांशी संवाद साधव विविध विषायंवर प्रतिक्रिया दिल्या.

काय म्हणाले शशिकांत शिंदे ?

त्यावेळी शशिकांत शिंदे यांना विलीनीकरणाबाबत प्रश्न विचारण्यात आला असता, त्यांनी थेट उत्तर दिलं. आज पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक बोलावली आहे. भविष्याच्या दृष्टीने काय करता येईल याबाबत ही बैठक आहे असं ते म्हणाले. रोहित पवार हे नाराज असून ते या बैठकीला उपस्थित राहणार नसल्याची चर्चा असून त्याबद्दलही शिंदे यांना विचारण्यात आलं होतं. ” मला माहिती नाही. ते काही नाराज नाही. पक्षात नाराज कोणीच नाही. अश्या बातम्या काढून चालवू नका..” असं त्यांनी थेट उत्तर दिलं.

काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सुनील तटकरे आणि प्रफुल पटेलयांनी शरद पवारांची भेट घेतली. तेव्हापासून विलीनीकरणाच्या चर्चा पुन्हा रंगू लागल्या. याच पार्श्वभूमीवर शशिकांत शिंदे यांना प्रश्न विचारण्यात आला . ” मी मगाशीच सांगितलं पवार साहेबांची अनेकांनी भेट घेतली. अनेक जण त्यांना भेटत असतात. त्यांचा काही वेगळा अर्थ काढू नये ” असं त्यांनी सांगितलं. दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरनाबाबत कोणतीही चर्चा नाही. कोणताही प्रयत्न नाही, असंही शशिकांत शिंदे यांनी स्पष्ट करत विलीनीकरणाच्या चर्चांवर थेट पडदा टाकल्याचं दिसून आलं.

आव्हाडांची मोदींवर टीका

यावेळी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी नरेंद्र मोदींवर सडकून टीका केली. ” 2014 साली नरेंद्र मोदी हे सत्तेत आले, तेव्हा देशाला सांगितलं अच्छे दिन आने वाले है. 12 वर्षांच्या वनवासानंतर या देशात न बोलतना नेदरलँडला जाऊन बोलले की अब बुरे दिन आनेवाले है, तयार रहो. प्रश्न हा आहे की बुरे दिन येणारच आहेत तर ते भारतात सांगा ना , ते नेदरलंडला जाऊन सांगायची गरज नव्हती. आणि नेदरलँडला जाऊन बुरे दिन येणारेत तर ते कोणावर येणार, पेट्रोल पुढच्या 1 महिन्यात 20 रुपयांनी महागणार आहे, मरणार आहे तो गरीब माणूस, त्याचं जगणं मुश्किल होणार आहे. आजच ग्रामीण भारतामध्ये कुठेही पेट्रोल-डिझेल मिळत नाहीये. पेट्रोल-डिझेवर पाण्याचे पंप चालतात, अख्खा शेती व्यवसाय डिझेलवरती आहे.जगवणार कसं माणसांना ? बोलायला खूप ठीका ाहे तुम्ही एक गाडी वापरा, सायकलवर चला.. असा देश चालत नाही ना ” असं टीकास्त्र आव्हाड यांनी सोडलं.

Follow Us
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...