AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना कोर्टाने ठोठावला दंड, काय आहे प्रकरण ?

माजी खासदार राहुल शेवाळे यांच्या बदनामी प्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे. शिवसेना ( उबाठा गटाचे नेते) उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांना न्यायालयाने दंड ठोठावला आहे. मुंबई सत्र न्यायलयाने उद्धव ठाकरे आणि संजय राऊत या दोघांनाही प्रत्येकी दोन हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे,

उद्धव ठाकरे आणि  संजय राऊत यांना कोर्टाने ठोठावला दंड, काय आहे प्रकरण ?
uddhav thackrey and sanjay raut
| Updated on: Jun 14, 2024 | 9:20 AM
Share

माजी खासदार राहुल शेवाळे यांच्या बदनामी प्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे. शिवसेना ( उबाठा गटाचे नेते) उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांना न्यायालयाने दंड ठोठावला आहे. मुंबई सत्र न्यायालयाने उद्धव ठाकरे आणि संजय राऊत या दोघांनाही प्रत्येकी दोन हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. येत्या दहा दिवसांत ही रक्कम राहुल शेवाळे यांना देण्यात यावी असा आदेशही न्यायालयाने दिला. राहुल शेवाळे यांच्या बदनामीच्या प्रकरणात न्यायदंडाधिकाऱ्यांनी बजावलेले समन्स रद्द करण्याच्या मागणीसाठी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांनी बुधवारी विशेष न्यायालयात धाव घेतली होती. ठाकरे आणि राऊत यांचा दोषमुक्तीचा अर्ज फेटाळून लावला होता. तसेच, त्यांना समन्स बजावून न्यायालयात उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते.

खासदार आणि आमदारांच्या विशेष न्यायालयाने विलंब माफीसाठी दोघांनी दाखल केलेला अर्ज स्वीकारल्यानंतर हा दंड ठोठावण्यात आला. न्यायदंडाधिकाऱ्यांनी बजावलेले समन्स रद्द करण्याच्या मागणीसाठी ठाकरे आणि संजय राऊत यांनी विशेष न्यायालयात अर्ज केला होता. विशेष न्यायालयाचे न्यायाधीश रोकडे यांनी ठाकरे आणि राऊत यांचा विलंब माफीचा अर्ज मान्य केला. मात्र त्याचवेळी न्यायालयाने ठाकरे व राऊत या दोघांनाही प्रत्येकी २ हजार रुपयांचा दंड ठोठावला.

हा अर्ज स्वीकारताना विशेष न्यायालयाचे न्यायाधीश रोकडे म्हणाले, विलंबाच्या स्पष्टीकरणावरून दोन्ही नेत्यांनी तो जाणूनबुजून केलेला नाही हे स्पष्ट होते. याचिकाकर्त्यांशी स्पर्धा करणारा कोणताही बचाव मुद्दाम केलेला नाही, असे निरीक्षण नोंदवले. त्यामुळे, त्यांचा विलंब माफीचा अर्ज मान्य केला जात असल्याचे न्यायालयाने नमूद केले.

काय आहे प्रकरण ?

आपल्या विरोधात लेख प्रसिद्ध केल्याबद्दल शेवाळे यांनी बदनामीची तक्रार दाखल केली होती. या तक्रारीसंदर्भात माझगाव दंडाधिकारी न्यायालयात कार्यवाही सुरू आहे. कार्यवाही दरम्यान, दंडाधिकारी न्यायालयाने या दोघांना खटल्यातून मुक्त करण्यास नकार दिला होता. नियमानुसार दोघांनीही दंडाधिकारी न्यायालयाच्या आदेशाला तातडीने आव्हान द्यायला हवे होते, ते त्यांनी केले नाही. नियमांनुसार विहित केलेल्या बाह्य मुदतीपासून 84 दिवसांचा विलंब झाला. त्यामुळे दोघांनीही विलंब माफ करण्यासाठी त्यांचे वकील मनोज पिंगळे यांच्यामार्फत अर्ज दाखल केला होता. याप्रकरणी न्यायालयाने ठाकरे व राऊत या दोघांनाही हा दंड ठोठावला असून दहा दिवसांच्या आत हे पैसे शेवाळे यांना देण्याचे आदेश दिले.

Follow Us
अभिजीत दीपके भेटीवरून भाजपच्या बड्या नेत्यांची नाराजी; थेट...
अभिजीत दीपके भेटीवरून भाजपच्या बड्या नेत्यांची नाराजी; थेट म्हणाले, शिंदेंनी त्यांच्या नेत्यांना...
विकास कामांसाठी... देवेंद्र फडणवीस खरंच दिल्लीला जाणार? भाजपच्या बड्या
विकास कामांसाठी... देवेंद्र फडणवीस खरंच दिल्लीला जाणार? भाजपच्या बड्या पुढाऱ्याने अखेर सांगितलंच
नाना पटोले यांचे धुतले दुधाने पाय, विरोधकांकडून टीका होताच कार्यकर्ता
नाना पटोले यांचे धुतले दुधाने पाय, विरोधकांकडून टीका होताच कार्यकर्ता म्हणाला..
अखेर तेच घडलं! राष्ट्रवादी गटाला मोठा धक्का? बीडमधील...
अखेर तेच घडलं! राष्ट्रवादी गटाला मोठा धक्का? बीडमधील पवारांच्या नेत्याचा भाजपला पाठिंबा?
संकष्ट चतुर्थीनिमित्त दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी
Pune | संकष्ट चतुर्थीनिमित्त दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी
CJP च्या मोठ्या हालचाली, संभाजीनगरात 15 ते 20 प्रमुख सदस्य... पुन्हा
CJP च्या मोठ्या हालचाली, संभाजीनगरात 15 ते 20 प्रमुख सदस्य... पुन्हा देशभराचं लक्ष वेधणार?
थेट एकनाथ शिंदेंशी पंगा! पुन्हा भाजप नेत्याचं सुचक विधान, महायुतीत...
Eknath Shinde | थेट एकनाथ शिंदेंशी पंगा! पुन्हा भाजप नेत्याचं सुचक विधान, महायुतीत खडाजंगी
बाळासाहेबांसह, आनंद दिघे सुद्धा गायब! शिंदेंच्या बॅनरवर अमित शहांचा...
बाळासाहेबांसह, आनंद दिघे सुद्धा गायब! शिंदेंच्या बॅनरवर अमित शहांचा भलामोठा फोटो पाहून राऊत संतापले
अंगावर भागलपुरी शाल, कानांवर रुमाल अन्... एका मतासाठी BMC तील नगरसेवक
अंगावर भागलपुरी शाल, कानांवर रुमाल अन्... एका मतासाठी भाजपनं BMC तील नगरसेवकाला रुग्णालयातून आणलं, Video व्हायरल
देवेंद्र फडणवीस दिल्लीत गेल्यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण?
देवेंद्र फडणवीस दिल्लीत गेल्यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण? बड्या नेत्याचं भाकित ऐकून चकित व्हाल