Maharashtra News LIVE : केंद्र सरकारचा आदेश, थेट सोन्याच्या आयात शुल्कात मोठी वाढ..

Maharashtra News LIVE : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पेट्रोल डिझेलच्या आवाहनानंतर राज्यातील अधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांच्या परवानगीशिवाय विमान प्रवास करता येणार नाही. यासोबतच सोन्याच्या आयात शुल्कात मोठी वाढ करण्यात आली.

Maharashtra News LIVE :  केंद्र सरकारचा आदेश, थेट सोन्याच्या आयात शुल्कात मोठी वाढ..
Maharashtra News
| Updated on: May 13, 2026 | 8:17 AM

LIVE NEWS & UPDATES

  • 13 May 2026 08:20 AM (IST)

    कसारा-आसनगाव लोकल दोन तास बंद

    कसारा विभागात ‘ओव्हरहेड इक्विपमेंट’ संबंधी अडथळे दूर ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घोषित करण्याच्या पूर्वतयारीसाठी विशेष करण्यात आला आहे. आज, १३ मे रोजी दुपारी आणि १४ ते १६ मे दरम्यान रात्रकालीन ब्लॉक असणार आहे. ब्लॉकवेळेत कसारा ते आसनगाव या दरम्यान लोकल बंद राहणार आहेत.

  • 13 May 2026 08:14 AM (IST)

    मालेगावचे तापमान 43.8 अंश सेल्सिअस वर.

    मार्च, एप्रिल आता मे महिना ही मालेगावकरांसाठी सर्वाधिक हॉट ठरला आहे. पारा सातत्याने 40 अंशाचा पार आहे. मागील सहा दिवसापासून पारा पुन्हा 43 अंशावर आला आहे. वाढत्या उन्हाने मालेगावकर हैराण झाले असून रस्तेही शुकशुकाट झाले आहेत.

  • 13 May 2026 08:13 AM (IST)

    केंद्र सरकारचा सोन्याच्या आयात शुल्काबाबत मोठा आदेश…

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला सोने खरेदी न करण्याचे आवाहन केले. त्यांच्या या आवाहनानंतर त्यांनी थेट आता सोन्याच्या आयातीवरील शुल्कात मोठी वाढ केली. 6 टक्क्याहून 15 टक्के हे शुल्क वाढण्यात आले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला सोने 1 वर्षांकरिता खरेदी न करण्याचे आवाहन केले. या आवाहनानंतर आता सोन्याच्या आयात शुल्कात मोठी वाढ केली. सोन्याचे आयात शुल्क तब्बल 15 टक्के करण्यात आले. इराण आणि अमेरिका युद्धाचा परिणाम भारतातही बघायला मिळत आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून उष्णता वाढत आहे. पारा 45 अंश सेल्सिअसच्या आसपास जात आहे. शेअर मार्केटवर गंभीर परिणाम झाला. गेल्या दोन दिवसांपासून शेअर मार्केट कोसळताना दिसत आहे. आयटी कंपन्यांचे शेअर पडत आहेत. छत्रपती संभाजीनगर शहरातील ज्या घरात निदा खानचे होते वास्तव्य त्या घरावर बुलडोजर चालवण्यात आला. नारेगाव परिसरातील कौसर पार्क भागात निदा खान नातेवाईकासह राहत होती. नरेंद्र मोदी यांच्या सोने खरेदी न करण्याच्या आवाहनानंतर विरोधक आक्रमक झाले आहेत. यासह देश-विदेशातील, मनोरंजन, क्रीडा आणि इतर क्षेत्रातील अपडेट्स एका क्लिकवर जाणून घेण्यासाठी हा ब्लॉग फॉलो करा.

Follow Us