Maharashtra News LIVE : महागाईचा दर 6.09 टक्क्यांवर; RBIच्या निर्णयाकडे लक्ष

Maharashtra News LIVE : राज्यात सध्या गोकुळ निवडणुक ही चर्चेचा विषय ठरत आहे. या निवडणुकीत मत चोरी झाल्याचा आरोप विरोधकांनी नाही तर सत्ताधाऱ्यांनी केला आहे.

Maharashtra News LIVE : महागाईचा दर 6.09 टक्क्यांवर; RBIच्या निर्णयाकडे लक्ष
Big Breaking
Image Credit source: tv9 Marathi
| Updated on: Nov 14, 2026 | 8:33 AM

LIVE NEWS & UPDATES

  • 14 Nov 2026 08:40 AM (IST)

    KDMC शाळेतील विद्यार्थ्यांना थेट इस्रोच्या अंतराळ संशोधन केंद्राला भेट देण्याची संधी

    KDMC शाळेतील पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता चाचणी घेऊन २८ विद्यार्थ्यांची निवडण होणार आहे. डिसेंबरमध्ये केरळची तीन दिवसांची सहल आहे. विद्यार्थ्यांचा पहिलाच विमानप्रवास अन् फोर स्टार हॉटेलमध्ये मुक्काम देण्यात आला आहे. सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांचे अंतराळवीर होण्याचे स्वप्न फुलवण्यासाठी KDMC खर्च करणार २० लाख रुपये.

  • 14 Nov 2026 08:33 AM (IST)

    मुंबईत दिवाळीत आगींचा भडका, पाच दिवसांत अग्निशमन दलाला ५०० कॉल

    दिवाळीच्या पाच दिवसांत मुंबई अग्निशमन दलाला आगींचे तब्बल ५०० आपत्कालीन कॉल. ६ ते १० नोव्हेंबरदरम्यान ३३३ आगींच्या घटना फटाक्यांमुळे. ८ नोव्हेंबरला १४२, तर ९ नोव्हेंबरला सर्वाधिक १६६ कॉल. डोंगरीतील भीषण आग विझवण्यासाठी १२ अग्निशमन बंब तैनात होते. एकाच वेळी अनेक ठिकाणी आगी लागल्याने जवानांची अहोरात्र धावपळ. काही अग्निशमन बंब सलग १२ तासांहून अधिक काळ घटनास्थळी कार्यरत. पाण्याची कमतरता भासू नये म्हणून १६ हजार लिटर क्षमतेच्या टँकरचा वापर.


  • 14 Nov 2026 08:30 AM (IST)

    जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत गिरीश महाजन यांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा

    गिरीश महाजन यांचे प्रतिस्पर्धी व राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार रघुनाथ पाटील यांचा बाद झालेला उमेदवारी अर्ज वैध ठरवण्याची मागणी विभागीय सहनिबंधकांनी फेटाळली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना विकास सोसायटीचे सभासदत्व तसेच एक वर्ष संचालक पदावर काम केल्याचे अनिवार्य दाखले न जोडल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी रघुनाथ पाटील यांचा अर्ज अवैध ठरवला होता. रघुनाथ पाटील यांनी विभागीय सहनिबंधकांकडे केला होता अपील दाखल. सहनिबंधकांच्या सुनावणीत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा निर्णय कायम ठेवत अर्ज वैध ठरवण्याची रघुनाथ पाटील यांची मागणी फेटाळली.

  • 14 Nov 2026 08:30 AM (IST)

    CSMT पुनर्विकासासाठी ५६ झाडांची कत्तल

    छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) पुनर्विकास प्रकल्पासाठी ५६ झाडे तोडण्याचा प्रस्ताव. ७२ झाडांचे दुसऱ्या ठिकाणी पुनर्रोपण करण्यात येणार. रेल्वे लँड डेव्हलपमेंट अथॉरिटीने BMC वृक्ष प्राधिकरणाकडे प्रस्ताव सादर केला. प्रकल्प परिसरातील एकूण २४२ झाडांपैकी १२८ झाडांवर परिणाम होण्याची शक्यता. यापूर्वी जतन करण्यासाठी मंजुरी मिळालेली १४ झाडे प्रत्यक्ष जागेवर आढळली नाहीत. या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी पुनर्रोपणाच्या हमीवर प्रश्न उपस्थित केले.

  • 14 Nov 2026 08:29 AM (IST)

    महागाईचा दर 6.09 टक्क्यांवर; RBIच्या निर्णयाकडे लक्ष

    ऑक्टोबर 2026 मध्ये देशातील किरकोळ महागाई दर 6.09 टक्क्यांवर पोहोचला आहे. महागाईत झालेल्या वाढीचा परिणाम आगामी पतधोरणावर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे डिसेंबरमध्ये होणाऱ्या RBIच्या पतधोरण आढाव्यात व्याजदर वाढवला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, व्याजदर वाढीबाबत RBIकडून अद्याप कोणताही निर्णय जाहीर करण्यात आलेला नाही. त्यामुळे महागाईचा पुढील कल, खाद्यपदार्थांच्या किमती आणि आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन RBI काय भूमिका घेते, याकडे लक्ष लागले आहे.


  • 14 Nov 2026 08:23 AM (IST)

    नागपुरात फटाकेबंदीचे उल्लंघन केल्यानं ९३ गुन्हे दाखल

    नागपुरात फटाकेबंदीचे उल्लंघन केल्यानं ९३ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडल्याप्रकरणी ३९ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. नियमबाह्य फटाक्यांची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांविरोधात ५४ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांच्या कारवाईत १ लाख ९० हजार २३५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सार्वजनिक रस्त्यांवर फटाके फोडण्यास बंदी आणण्यात आली आहे. हिरव्या फटाक्यांशिवाय अन्य फटाक्यांच्या विक्रीवर निर्बंध लादण्यात आले आहेत. ६ ते १४ नोव्हेंबरदरम्यान नागपूर पोलिसांकडून विशेष कारवाई करण्यात आली आहे.

  • 14 Nov 2026 08:21 AM (IST)

    चाकूचा धाक दाखवून ट्रक चालकाला लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

    जालना शहरातल्या एमआयडीसी परिसरामध्ये ट्रक चालकाला लुटणाऱ्या दोन जणांच्या टोळीचा चंदनझिरा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. जेवण करण्यासाठी जात असलेल्या ट्रक चालकाला अडवून त्याच्या पोटाला चाकू लावत बेदम मारहाण करून त्याच्या जवळील रोख रक्कम आणि वाहन चालविण्याचा परवाना बळजबरीने हिसकावून प्रसार झाले होते. चंदन पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास करत आरोपींना ताब्यात घेतल असून त्यांच्याकडून यापूर्वी गुन्हा केला आहे का या संदर्भात चौकशी केली जात आहे.

सध्या देशात काँग्रेस नेते राहुल गांधी हे सतत चर्चेत आहेत. त्यांनी SIR, वोट चोरीवरून अक्षरश: रान पेटवले आहे. त्याचवेळी गोकुळ निवडणुकीतही मत चोरी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. सत्ताधाऱ्यांनी विरोधकांवर हा आरोप केला आहे. सतेज पाटील यांनी मत चोरी करून 13 संचालक निवडून आणल्याचा ठपका मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ठेवला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदेश दिला तर सतेज पाटील यांच्याविरोधात कोल्हापुरातील कोणत्याही मतदारसंघातून निवडणूक लढवून त्यांचा पराभव करण्याचे आव्हानही त्यांनी दिले.

नागपूरमध्ये होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विदर्भवादी विधान भवनावर धडकणार आहेत. विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबर पासून नागपूरला सुरू होणार आहे. या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विदर्भवादी विधिमंडळावर धडकून विदर्भ आंदोलनाची धग केंद्र सरकार आणि राज्य सरकार पर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करणार आहेत. यासाठीच्या तयारीला विदर्भवाद्यांन कडून सुरुवात झाली आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींमुळे देशभरातील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींवर मोठा परिणाम होताना दिसतो. आज राज्यातील काही ठिकाणी पेट्रोलचे दर, नाशिक – ₹112.24, धाराशिव – ₹112.45, पालघर – ₹112.04, परभणी – ₹113.16, पुणे – ₹111.90, रायगड – ₹111.46, रत्नागिरी – ₹113.17, सांगली – ₹112.44 असे आहेत. तर काही ठिकाणी डिझेलचे दर नाशिक – ₹98.89, धाराशिव – ₹99.11, पालघर – ₹98.66, परभणी – ₹99.83, पुणे – ₹98.55, रायगड – ₹98.11, रत्नागिरी – ₹99.83 हे आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us