Maharashtra News LIVE : मुंबईकरांनो पाणी जपून वापरा, गतवर्षीच्या तुलनेत साठ्यात १३ टक्के घट!

Maharashtra News LIVE : राज्यात अनेक ठिकाणी दुष्काळ घोषित केला असून पाण्याची टंचाई राज्यात सर्वत्र भासत आहे. तर मुंबईकरांना पाणी जपून वापण्यासाठी आवाहन करण्यात आलं आहे... ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत धाराशिव जिल्ह्यातील येडशी टोलनाका येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. यासहित जगासहित देशातील विविध घडामोडी जाणून घ्या.

Maharashtra News LIVE : मुंबईकरांनो पाणी जपून वापरा, गतवर्षीच्या तुलनेत साठ्यात १३ टक्के घट!
| Updated on: Nov 16, 2026 | 8:34 AM

LIVE NEWS & UPDATES

  • 16 Nov 2026 08:40 AM (IST)

    मुंबईतील जुहू बीचवर छठ उत्सवादरम्यान प्रौढ आणि अल्पवयीन मुलांसह १४५ व्यक्ती बेपत्ता

    मुंबईतील जुहू बीचवर छठ उत्सवादरम्यान प्रौढ आणि अल्पवयीन मुलांसह १४५ व्यक्ती बेपत्ता झाल्याची माहिती समोर येत आहे. मुंबई पोलिसांना सदर माहिती मिळाली असून त्या सर्वांची त्यांच्या कुटुंबीयांशी भेट घडवून आणण्यात आली आहे. सध्या आणखी कोणीही बेपत्ता असल्याची माहिती नाही…

  • 16 Nov 2026 08:31 AM (IST)

    छठ पूजेच्या निमित्ताने पंडित सुनील शुक्ला यांचा राज ठाकरे यांच्यावर हल्लाबोल

    सुनील शुक्ला म्हणाले की, एक वर्षापूर्वी राज ठाकरे बोलले होते की, ज्याला मराठी बोलता येत नाही त्याच्या कानाखाली मारा. त्यानंतर मी सुप्रीम कोर्टात जाऊन त्यांच्याविरोधात केस केली. कारण माझा समाज मार खाण्यासाठी इथे नाही. इथे कोणताही माईचा लाल उत्तर भारतीयांवर भारी पडेल, तर मी सुनील शुक्लामध्ये उभा दिसेन. हा समाज झुकणार नाही. जे लोक इथे कायमस्वरूपी राहणारे आहेत, त्यांना सांगू इच्छितो की, पुढे संघर्ष खूप जास्त होणार आहे, एकत्र या जेणेकरून आपण ताकद दाखवून देऊ की महाराष्ट्रात काय करू शकतो.


  • 16 Nov 2026 08:30 AM (IST)

    निफाड तालुक्यात थंडीचा कडाका वाढला

    निफाड तालुक्यात थंडीचा कडाका वाढला आहे, उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे किमान तापमानात घसरण झाली आहे.  कुंदेवाडी गहू संशोधन केंद्रात ११ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे, तर ओझरमध्ये किमान तापमान १०.५ अंश सेल्सिअसवर पोहोचलं आहे, पहाटे आणि रात्री गारठा वाढल्याने नागरिकांना हुडहुडी भरली आहे. थंडीपासून बचावासाठी ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्या असून  गरम चहा, कॉफी आणि खाद्यपदार्थांना नागरिकांनी पसंती दिली आहे.

  • 16 Nov 2026 08:28 AM (IST)

    भोकरदन तालुक्यात कापसाचा भाव 9200 रुपये प्रति क्विंटल वर, मात्र आवक मंदावली

    जालना जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे यंदा कापसाच्या उत्पादनात मोठी घट झाली, मात्र जालना जिल्ह्यातल्या भोकरदन तालुक्यात दिवाळीपूर्वी 9000 रुपयांच्या खाली असलेला भाव आता9 हजार 200 रुपया पर्यंत पोहोचलाय, मात्र यंदा उत्पादनच घटल्यामुळे शेतकरी बांधव आपला कापूस विक्रीसाठी आणण्याऐवजी घरात आणि गोदामातच साठवून ठेवत आहे त्यामुळे यापेक्षाही भाव वाढेल अशी अपेक्षा शेतकरी बां मागील वर्षीएकरी 15 ते 20 क्विंटल होणारा कापूस आता केवळ 5 क्विंटल वर आल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसतोय.

  • 16 Nov 2026 08:28 AM (IST)

    पंढरपूर तालुक्यातील आंबे येथील विहीर दुर्घटनेतील बावीस तासानंतरही शोध कार्य सुरूच

    पंढरपूर तालुक्यातील आंबे येथील विहीर दुर्घटनेतील बावीस तासानंतरही शोध कार्य सुरूच आहे. दरम्यान रात्री दोन वाजता दोन मृतदेह सापडले आहेत तर आणखी दोघांचा शोध सुरू आहे काल सकाळी दहा वाजता आंबे येथील एका विहिरीचा कटडा कोसळून चार मजूर गाडले गेले होते काल दिवसभर शोध मोहीम सुरू होती काल सायंकाळी एनडीआरएफ ची टीम दाखल झाल्यानंतर शोध कार्य जोमाने सुरू झाले यादरम्यान रात्री दोन वाजेपर्यंत मंगेश मोरे आणि सिद्धेश्वर घाडगे या दोन मजुरांचे मृतदेह सापडले आहेत या घटनेनंतर रात्री सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी घटनास्थळी भेट देऊन मृतांच्या नातेवाईकांशी चर्चा करून त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. सोलापूरचे जिल्हाधिकारी एस कार्तिकेन देखील कालपासून घटनास्थळी ठाण मांडून आहेत.


  • 16 Nov 2026 08:27 AM (IST)

    आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकरांचा AI चा ऊपक्रम , कोल्हापुरात राज्यातील पहिला ‘महा-पल्स AI’ आरोग्य प्रकल्प सुरू!

    आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकरांचा AI चा ऊपक्रम , कोल्हापुरात राज्यातील पहिला ‘महा-पल्स AI’ आरोग्य प्रकल्प सुरू… कोल्हापूर जिल्ह्यातील १०४ शासकीय आरोग्य संस्था डिजिटल होणार.  डॉक्टरांची उपस्थिती, रुग्णांची गर्दी आणि स्वच्छतेवर AI द्वारे रिअल टाइम मॉनिटरिंग होणार आहे. आरोग्य व्यवस्थेत पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि कार्यक्षमता वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

महामुंबईत मोठ्या प्रमाणात घरबांधणीचे नियोजन केले जात आहे. सातही धरणांतील पाणीसाठ्यात गतवर्षीच्या तुलनेत 13 टक्क्यांनी घट झाली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमधील साठ्यात घट होत असून सद्यःस्थितीत धरणांमध्ये 79 टक्के पाणीसाठा आहे. गतवर्षी याच कालावधीत धरणांमध्ये 92 टक्के पाणीसाठा होता. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत सुमारे १३ टक्क्यांनी पाणीसाठा कमी आहे. नोव्हेंबरमध्येच धरणांमधील पाणीसाठ्या घट झाल्याने मुंबईकरांनी पाण्याचा वापर जपून करावा असं आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत धाराशिव जिल्ह्यातील येडशी टोलनाका येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. धाराशिवमध्ये सोलापूर-धुळे महामार्गावरील येडशी टोलनाका येथे आज राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. मात्र, या आंदोलनापूर्वीच पोलीस प्रशासनाने खबरदारी घेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना नोटिसा बजावल्या आहेत.आंदोलनामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास संबंधित कार्यकर्त्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी नोटिसांद्वारे दिला आहे. तर एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात भंडाऱ्यात 11 महिन्यात 11 जणांचा बळी गेला आहे. भविष्यातील मानव – वन्यप्राणी संघर्ष टाळण्यासाठी वन विभागानं उपाययोजना करण्याची गरज असल्याचं सांगण्यात येत आहे. यासहित जगासहित देशातील विविध घडामोडी जाणून घ्या.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us