Maharashtra News LIVE : महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स सिनेमाविरोधात हायकोर्टात याचिका

Maharashtra News LIVE : विश्रांतीनंतर शरद पवार उद्या पुण्यातील कार्यक्रमाला हजेरी लावणार आहे. छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील हे एकत्र येणार आहे. राज्यातील दुष्काळी तालुक्यांच्या संख्येत अजून वाढ झाली आहे. तर महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स सिनेमाच्या नावाविरोधात औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे.

Maharashtra News LIVE : महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स सिनेमाविरोधात हायकोर्टात याचिका
टीव्ही 9 मराठी
| Updated on: Nov 20, 2026 | 8:09 AM

LIVE NEWS & UPDATES

  • 20 Nov 2026 08:10 AM (IST)

    नाशिकमध्ये दहा स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्त्यांवर आज शिक्कामोर्तब

    नाशिकमध्ये दहा स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्त्यांवर आज शिक्कामोर्तब होणार आहे. महापालिकेच्या महासभेत नियुक्त्यांचा निर्णय होणार आहे. दहा जागांसाठी अकरावे नाव दिल्याने पेच वाढला आहे. भाजपच्या सहा, शिंदेसेना-मनसेला दोन जागा देण्यात आल्या आहेत. ठाकरे शिवसेना-काँग्रेस आघाडीला दोन जागा असतील. काँग्रेस गटनेते सुफी जीन यांच्याकडून वादाला तोंड फुटले. भाजपचे सुनील आडके यांचे नाव दिल्याने राजकीय पेच वाढला आहे. ठाकरे शिवसेनेचे केशव पोरजे यांचे उच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल करण्यात आले. महासभेतील निर्णयानंतरही न्यायालयीन आव्हानाची शक्यता आहे.

  • 20 Nov 2026 08:05 AM (IST)

    ठाणे महापालिकेच्या स्थायी समिती स्थापनेचा मार्ग अखेर मोकळा

    मागील दहा महिन्यांपासून रखडलेल्या ठाणे महापालिकेच्या स्थायी समिती स्थापनेचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. आज होणाऱ्या महासभेत स्थायी समितीच्या १६ सदस्यांची निवड केली जाणार असून, त्यानंतर काही दिवसांतच सभापतीपदाची निवडणूक पार पडेल.पालिकेच्या तिजोरीच्या चाव्या असलेल्या या महत्त्वाच्या समितीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा वरचष्मा असल्याने, सभापतीपदावर त्यांचाच नगरसेवक विराजमान होण्याची दाट शक्यता आहे.


  • 20 Nov 2026 08:01 AM (IST)

    मंचरच्या विकास आराखड्याविरोधात नागरिकांचे उपोषण; शेतजमिनींवरील आरक्षणे रद्द करण्याची मागणी

    पुणे जिल्ह्यातील मंचर नगरपंचायतीच्या विकास आराखड्यावरून आता राजकीय आणि प्रशासकीय वातावरण तापू लागलं आहे. शेती आणि स्थानिक परिस्थितीचा कोणताही विचार न करता विकास आराखड्यात अनेक ठिकाणी अनावश्यक आरक्षणे टाकण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. मंचर नगरपंचायतीवर शिंदे गटाच्या शिवसेनेची सत्ता असून, विकासाच्या मुद्द्याऐवजी जिरवाजिरवीचे राजकारण सुरू असल्याचा आरोपही आंदोलकांनी केला आहे. या आरक्षणांमुळे शेतकऱ्यांच्या जमिनी बाधित होण्याची शक्यता असून, अनेक शेतकऱ्यांवर भूमिहीन होण्याची वेळ येऊ शकते, अशी भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.

उपचारानंतर शरद पवार राज्याच्या राजकारणात उद्या पासून पुन्हा सक्रिय होणार आहे. उद्या पुणे जिल्ह्यात ओतुरमध्ये राज्यव्यापी सत्यशोधक समाजाच अधिवेशनाला शरद पवार हजेरी लावणार आहेत. उद्या शरद पवार , छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील कार्यक्रमात एकत्र येणार आहेत. कार्यक्रमाचे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते होणार तर अध्यक्ष स्थानी शाहू महाराज असणार आहेत. महात्मा जोतिबा फुले यांचा सत्यशोधक विचारांचा वारसा पुढे घेवून जाण्यासाठी याच आयोजन करण्यात आलं आहे.

महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स या मराठी चित्रपटाच्या नावावरून आता मोठा वाद निर्माण झाला आहे. चित्रपटाच्या नावाला आक्षेप घेत छत्रपती संभाजीनगर येथील मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे. या चित्रपटाचे नाव महाराष्ट्राच्या प्रतिमेला आणि 12 कोटी जनतेच्या सन्मानाला धक्का पोहोचवणारे असल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे. चित्रपटाचे नाव बदलेपर्यंत त्याच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.

तर राज्य शासनाने 310 तालुक्यांच्या यादीत 6 नवीन तालुक्यांचा समावेश केला आहे. यामध्ये विक्रमगड, वाडा, दिंडोरी, चिपळूण, हातकणंगले, गडहिंग्लज या तालुक्यांचा समावेश आहे. पाणी टंचाई आणि पीक नुकसानीच्या आढाव्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. दुष्काळग्रस्त तालुक्यांतील शेतकऱ्यांना मदत योजना , पीक नुकसानीची भरपाई, परीक्षा शुल्क माफी आणि इतर योजनांचा लाभ देण्यात येणार आहे. तर मागील दहा महिन्यांपासून रखडलेल्या ठाणे महापालिकेच्या स्थायी समिती स्थापनेचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. आज होणाऱ्या महासभेत स्थायी समितीच्या १६ सदस्यांची निवड केली जाणार आहे. दुसरीकडे शायना एनसी यांच्याविरुद्ध आजही ठाकरे सेना आंदोलन करणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us