Maharshtra News LIVE : चाकण एमआयडीसीमधील प्रश्न निकाली काढणार, दोन समित्यांची स्थापना
Maharshtra News LIVE : देशातील सर्व वरिष्ठ राजकीय नेत्यांनी आता त्यांचा मोर्चा जेन-झी , जेन-अल्फा वर्गाकडे वळवला आहे. राहुल गांधी यांच्यानंतर आता मुख्यमंत्री फडणवीस देखील आज तरुणांशी नागपुरात संवाद साधणार आहेत. यासह राज्यातील इतर महत्त्वाच्या घडामोडी, देश-विदेशातील, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील इतरही अपडेट्स जाणून घेण्यासाठी हा ब्लॉग फॉलो करा.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यानंतर आता नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज हजारो युवकांशी संवाद साधणार आहेत. 1 महिन्यापासून सुरू असलेल्या मंथन 4 युवा अभियानाचा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत समारोप होणार आहे. यावेळी मुख्यमंत्री जेन झी , अल्फा त्याच प्रमाणे वेगवेगळ्या क्षेत्रातील युवकांशी संवाद साधणार आहे. नागपुरातील रेशीमबाग मैदानावर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या समारोहाचे मुख्य आकर्षण म्हणजे यावेळी हजारो ढोल तासे वादक सामूहिक वादन करणार आहे. या वादानाचा जागतिक विक्रम केला जाणार आहे
LIVE NEWS & UPDATES
-
कावड यात्रा आता भव्य प्रमाणात करण्याचा निर्णय घेतला आहे – नितेश राणे
कावड यात्रा काही वर्षांपूर्वी छोट्या प्रमाणात निघत होती, मात्र आता हिंदूरक्षक सेनेने ती भव्य करण्याचा निर्णय घेतल्याचे मंत्री नितेश राणे यांनी अंधेरी येथे म्हटले आहे. हा देश हिंदू राष्ट्र आहे, मुंबई, महाराष्ट्र ही महादेवाची भूमी आहे, त्यामुळे हिंदूंचा प्रत्येक सण मोठ्या प्रमाणात साजरा झाला पाहिजे, असेही मंत्री नितेश राणे यांनी म्हटले आहे.
-
वाशिममध्ये पुन्हा भटक्या कुत्र्यांचा चिमुकल्यावर हल्ला
वाशिमच्या कारंजा शहरात पुन्हा एकदा भटक्या कुत्र्यांचा हैदोस पाहायला मिळाला आहे. सायकल खेळत असलेल्या ८ वर्षीय खिजर खान शफीक खान या चिमुकल्यावर तब्बल ३ ते ४ भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात चिमुकला जखमी झाला असून, त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
-
-
चाकण एमआयडीसीमधील प्रश्न निकाली काढणार, दोन समित्यांची स्थापना
चाकण एमआयडीसीमधील प्रश्न निकाली काढण्यासाठी जिल्हाधिकारी यांचे मार्फत दोन कमिटी तयार करण्यात आल्या असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
-
नाशिक : इगतपुरीत पर्यटकांची तुफान गर्दी
रविवार असल्याने इगतपुरीत पर्यटकांची गर्दी पहायला मिळत आहे. ऊंट दरी येथे पर्यटक निसर्गाचा आनंद घेण्यासाठी दाखल झाले आहेत. या दरीला छत्रपती शिवकालीन इतिहास आहे. सुरतेच्या स्वारीनंतर महाराज याच मार्गे गेले असल्याची आख्यायिका आहे.
-
बीड : तरुणाला जातीवाचक शिवीगाळ, दोघांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
माजलगाव तालुक्यातील सांडसचिंचोलीत तरुणाला जातीवाचक शिवीगाळ करत विटेने मारहाण करण्यात आली. याप्रकरणी दोघांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माजलगाव तालुक्यातील सांडसचिंचोली येथे किरकोळ कारणावरून संजय गायकवाड या तरुणाला दोघांनी बेदम मारहाण केली. हनुमंत कदम याने संजयचे डोके भिंतीवर आपटून विटेने डोक्यात मारल्याने ते गंभीर जखमी झाले. यावेळी सुमंत कदम याने संजयला जातीवाचक शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी माजलगाव ग्रामीण पोलिसांत पिता-पुत्राविरुद्ध ॲट्रॉसिटी व BNS कलमांनुसार गुन्हा दाखल झाला आहे.
-
जळगाव -औट्रम घाटात एसटी बसचा अपघात
चाळीसगावच्या औट्रम घाटात एसटी बसचा अपघात झाला आहे. दरीत कोसळण्यापासून ही बस थोडक्यात बचावली आहे. संबंधित बस छत्रपती संभाजीनगरहून सुरतकडे जात होती. बसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि ही बस वळणावर थेट सुरक्षा कठड्याला धडकली. हा कठडा नसता तर बस 300 ते 400 फुट दरीत कोसळली असती.
-
कल्याणमध्ये भानुज्योत हाँस्पिटलच्या डाँक्टरला मारहाण
कल्याण पूर्वेत भानुज्योत हाँस्पिटलच्या डाँक्टरला मारहाण करण्यात आली आहे. रुग्णाच्या मुलाकडून ही मारहाण झाल्याने वैद्यकीय क्षेत्रात संताप व्यक्त केला जात आहे. घटनेनंतर भानुज्योत हॉस्पिटलमध्ये काही काळ तणावाचे वातावरण होते. आता याप्रकरणी कोळसेवाडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-
आरक्षण उपवर्गीकरण-विरोधात आनंदराज आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली भव्य मोर्चा
मालेगावात अनुसूचित जातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाविरोधात आज जोरदार आंदोलन करण्यात आले. “उपवर्गीकरण रद्द करा, आरक्षण संरक्षणासाठी एकजूट कायम ठेवा”, “आरक्षण आमचा हक्क आहे” अशा घोषणा देत आरक्षण उपवर्गीकरण विरोध संघर्ष समितीच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला. आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली महात्मा गांधी पुतळ्यापासून एकात्मता चौकापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. मोर्चात नागरिकांसह महिला, युवक आणि युवती मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. अनुसूचित जातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाचा निर्णय तातडीने रद्द करावा, अनुसूचित जातींमधील ५९ जातींचे आरक्षण एकत्रित ठेवावे आणि आरक्षणाचे तुकडे पाडण्याचा प्रयत्न करू नये, अशी मागणी यावेळी करण्यात आली. निर्णय रद्द न केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
-
मानकापूर परिसरातील प्राचीन शिव मंदिरात 91 लाख मातीचे शिवलिंग
नागपुरातील मानकापूर परिसरातील प्राचीन शिव मंदिरात श्रावण महिन्याचे औचित्य साधत 91 लाख मातीचे शिवलिंग तयार केले जात आहे.आज या आयोजनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट देत पूजा अर्चना केली. श्रावण महिन्यात दरवर्षी महिनाभर या मंदिरात मातीचे शिवलिंग बनविण्याचे आयोजन करण्यात येते त्यात परिसरातील मोठ्या प्रमाणात नागरिक सहभागी होत असतात.
-
वाढत्या साखर दरावर राज्य सरकारचा केंद्राला प्रस्ताव
खाण्याची आणि व्यावसायिक वापराची साखर वेगळी करा अशी मागणी सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी केली. खाण्यासाठी साखरेचा स्वतंत्र कोटा ठेवून दर कमी ठेवण्याची मागणी केली. बिस्किट, शीतपेयांसह व्यावसायिक वापरासाठी साखरेचे दर वेगळे ठेवण्याचा प्रस्ताव आहे. वाढत्या साखर दराच्या पार्श्वभूमीवर साखर आयातीबाबत केंद्राचे नियोजन सुरू आहे. FRP आणि साखरेची MSP लिंक करण्याची राज्य सरकारने मागणी केली
-
रस्त्यामध्ये मोठा भ्रष्टाचार- रोहित पवार यांचा आरोप
आदिवासी विद्यार्थी विविध मागण्यासाठी 11 दिवस उपोषण करीत आहेत. सत्तेतील माणसांना गर्दी एवढी दिसत नाही. मात्र राज्यातील प्रत्येक तालुक्यातून आवाज उठविला तर सरकारला महाग पडेल.आमचा या आंदोलनाला पाठिंबा आहे. सरकारला फक्त दोन दिवस देतो आदिवासी विध्यार्थी यांच्या मागण्य मान्य कराव्यात. सरकारला जर मागण्या मान्य नाही केल्या तर महागात पडेल. जो जीआर काढला गेला आहे तो रद्द करून विध्यार्थी हिताचा जीआर सरकारने काढावा. सरकार मोठमोठे रस्ते बनवतंय मात्र विध्यार्थी यांच्याकडे दुर्लक्ष करतय. विध्यार्थ्यानी सरकारला जाब विचारायला लावला. रस्त्यामध्ये मोठा भ्रष्टाचार होत आहे असा आरोप रोहित पवार यांनी केला.
-
हे मैदान मुंबईकरांच्या हक्काचं… ठाकरे सेनेच्या आंदोलनापूर्वीच बॅनर
बांद्रा येथील नेव्हल डिसुझा मैदानात आज ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीने तिरंगा आंदोलन आयोजित करण्यात आलं आहे. आंदोलन सुरु व्हायला अवघे काही तास असताना मैदानाबाहेर अनेक निनामी बॅनर लावून आदित्य ठाकरे यांना सवाल करण्यात आले आहेत. आंदोलन सुरु होण्याअगोदर मैदानाबाहेर लावण्यात आलेल्या बॅनरची चर्चा जोरदार आहे. युवराजांकडून जाणून घ्यायचं आहे आहे तुम्हाला मैदान वाचवायचं आहे कि स्वतःच ध्येय पूर्ण करायच आहे आदित्य ठाकरे यांना थेट बॅनरच्या माध्यमातून सवाल करण्यात आला. हे मैदान मुंबईकरांच्या हक्काचं आहे त्यावर कोणी स्वतःचा दावा करू नये बॅनरवर उल्लेख आहे.
-
दीपक केसरकर यांची संजय राऊत यांच्यावर टीका
जेव्हा शिवसेना-भाजप युती होती, तेव्हा भाजप हा हिंदुत्ववादी पक्ष असल्याचा त्यांना अभिमान होता. आज ते भाजप सोबत नसल्यामुळे विरोधकांचे काँग्रेसवरील प्रेम उफाळून येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या विकासाला नवी गती दिली असून, शक्तिशाली भारत उभारणीसाठी भाजप पक्ष त्यांच्या खंबीरपणे पाठीशी उभा आहे, अशी टीका संजय राऊत यांच्यावर दीपक केसरकर यांनी केला आहे.
-
मराठ्यांच्या आरक्षणाला विरोध करायचा हे ओबीसींना सुद्धा मान्य नाही-मनोज जरांगे पाटील
मराठ्यांच्या आरक्षणाला विरोध करायचा हे ओबीसींना सुद्धा मान्य नाही असे मनोज जरांगे पाटील म्हणाले. कोणत्या मायक्रो ओबीसींना शिक्षण नीट आहे कोणत्या मायक्रोओबीसीसिंना जागा नीट खाऊ दिल्या नोकरीतल्या ?..50 वेळा राजकारण राजकारण म्हणतात कोणत्या ओबीसींना राजकारणातल्या जागा खाऊ दिल्या? कोणत्या मायक्रोबेसिनचा माणूस राजकारणात घुसवला.?कोणता ओबीसी राजकारणाच्या पदावर तुम्ही बसवला.? एवढ्या कळवळीने सांगत आहात कोणचा ओबीसीचा नोकरीत गेला? सगळ्या गरीब मायक्रो ओबीसींच्या जागा यांनी हडपल्या? तुम्हाला वाटतं ओबीसी अडाणी आहे,पण तो सगळ्यात हुशार आहे.ओबीसी मराठा समाजामध्ये कोणताही वाद नाही.ज्यांच्या नोंदी सापडल्या आहेत त्यांना आरक्षण दिले पाहिजे,अस ओबीसींच म्हणणं आहे.एवढी साफ नियत ओबीसींची आहे, असे जरांगे पाटील म्हणाले.
-
महेश लांडगेंसारख्या आमदारांना आवरा, फडणवीसांना विनंती- सुळे
महेश लांडगेंसारख्या आमदारांना आवरा, फडणवीसांना विनंती. महेश लांडगेंसारख्या आमदारांवर गुन्हे दाखल करुन अटक करा. सांगलीतल्या मोर्चातून भाजप आमदार महेश लांडगेंनी प्रक्षोभक भाषा वापरली…त्यावर सुप्रिया सुळेंनी टीका केलीय
-
एकनाथ शिंदे आज चाकण MIDCतील रस्त्यांची पाहणी करणार
एकनाथ शिंदे आज चाकण MIDCतील रस्त्यांची पाहणी करणार. चाकण–तळेगाव रस्त्याची दुरवस्था मात्र सध्या या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम वेगाने सुरू आहे. नुकत्याच झालेल्या उद्योगमंत्र्यांच्या बैठकीत उपमुख्यमंत्री. एकनाथ शिंदेंनी गोवा महामार्गावर वापरलेल्या प्रीकास्ट पॅनल तंत्रज्ञानाची माहिती दिली होती. याच आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रथमच चाकण–तळेगाव रस्त्यावर वापर केला जात आहे. याची पाहणी करण्यासाठी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे चाकणमध्ये येणार आहेत.
-
परभणीमध्ये गुरुवारी झालेला नर्सिंगचा पेपर फुटला
परभणीमध्ये गुरुवारी झालेला नर्सिंगचा पेपर फुटला. GNM प्रथम वर्षाचा पेपर व्हाट्सअॅपच्या माध्यमातून व्हायरल केल्याची घटना. आरोपी परीक्षा परीवेक्षीका आणि तिच्या बहिणीविरोधात गुन्हा दाखल. राणी चव्हाण,राखी चव्हाण यांच्यावर नानल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. केंद्र निरीक्षक विश्वजीत मठपती यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल
-
लातूरच्या उदगीरमधील सीएसह 16 कंपन्यांवर गुन्हा दाखल
लातूरच्या उदगीरमधील सीएसह 16 कंपन्यांवर गुन्हा दाखल. सीएसह 16 कंपन्यांवर हजारो कोटींचा घोटाळा केल्याप्रकरणी गुन्हा. 2 हजार 143 कोटींचा निधी विदेशात पाठविल्याचं अपहार प्रकरण. आयकर विभागाच्या सलग 4 दिवसांच्या झाडाझडतीनंतर अखेर गुन्हा दाखल
-
जालन्यात जरांगेंच्या उपस्थितीत मराठा आंदोलकांची बैठक
जालन्यात जरांगेंच्या उपस्थितीत मराठा आंदोलकांची बैठक. गोदापट्ट्यातील 130 गावातील मराठा आंदोलकांसोबत चर्चा. 29 ऑगस्टच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जरांगेंची महत्त्वाची बैठक. 29 ऑगस्ट दिवशी पाण्याचे टँकर, रुग्णवाहिका, वाहनांची पार्किंग, जेवण आणि निवासाची व्यवस्था या सगळ्या संदर्भात जरांगेंची चर्चा.
-
साखरेच्या दरात अचानक मोठी वाढ, गृहिणींचं आर्थिक गणित बिघडलं
साखरेच्या दरात अचानक मोठी वाढ
45 रुपयांची साखर पोहोचली 70-75 रुपयांवर
सणासुदीपूर्वी साखरेची दरवाढ
गृहिणींचे आर्थिक गणित बिघडले
महागाईचा आणखी एक मोठा फटका
ग्राहकांनी साखरेची खरेदी केली कमी
-
नाशिकच्या MET महाविद्यालयात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या बैठकीला सुरुवात
नाशिकच्या MET महाविद्यालयात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या बैठकीला सुरुवात
मंत्री छगन भुजबळ यांच्यासह समीर भुजबळ, मंगेश ससाणे आणि राज्यभरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती
ओबीसी आरक्षणाबाबत काय भूमिका घेतली जाणार ? हाके यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला जाणार का ? याकडे सर्वांचं लक्ष
-
ठाण्यातील इंदिरानगर परिसरात रामसेनाच्या वतीने भव्य कावड यात्रा
ठाण्यातील इंदिरानगर परिसरात रामसेनाच्या वतीने भव्य कावड यात्रा काढण्यात आली आहे. या यात्रेमध्ये भाजपचे आमदार संजय केळकर यांच्यासह स्थानिक नगरसेवक तसेच नागरिक मोठ्या संख्येन सहभागी झाले आहेत, सर्वत्र उत्साहाचं वातावरण दिसून येत आहे.
-
एकानाथ शिंदे करणार चाकणमधील कामांची पाहाणी
चाकण औद्योगिक परिसरातील सुरू असलेल्या पायाभूत सुविधांच्या कामांची पाहणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज चाकण दौऱ्यावर येत आहेत. पाहणीनंतर अधिकारी आणि उद्योजकांची बैठक घेऊन रस्ते, वाहतूककोंडी, कचरा आणि पाण्याच्या प्रश्नांवर पुढील उपाययोजनांचा आढावा घेतला जाणार आहे.
-
पुण्यातील हडपसर भागातील आदिवासी वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांची आज रॅली
११ नोव्हेंबर २०२१ च्या शासन निर्णयानुसार महागाई भत्ता वाढ लागू करावी आणि संबंधित GR जैसे थे ठेवावा अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. २००६ साली मंजूर झालेल्या ५०० मुलींच्या वसतिगृहासाठी तत्काळ इमारत उपलब्ध करून द्यावी अशी सुद्धा विद्यार्थ्यांची मागणी आहे. गडचिरोली जिल्ह्यात आश्रमशाळेत सर्पदंशाने मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याच्या कुटुंबाला शासनाने आर्थिक मदत करावी अशी मागणी होत आहे. शासनाने तातडीने दखल घेऊन विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर निर्णय घ्यावा, अशी आंदोलनकर्त्यांची मागणी आहे.
-
ठाण्यातील खारटन रोड परिसरात नाल्यात पडलेल्या ६४ वर्षीय व्यक्तीची सुखरूप सुटका
ठाण्यातील खारटन रोड परिसरात नाल्यात पडलेल्या ६४ वर्षीय व्यक्तीची आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरूप सुटका केली. आज सकाळी सव्वानऊच्या सुमारास सिडको बस स्टॉपसमोर ही घटना घडली. चक्रधर संभाजी मेश्राम हे मद्यधुंद अवस्थेत नाल्यात पडल्याची माहिती मिळताच ठाणे नगर पोलिसांसह आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत मेश्राम यांना नाल्यातून बाहेर काढले आणि पुढील कार्यवाहीसाठी ठाणे नगर पोलिसांच्या ताब्यात दिले.
-
मुख्यमंत्री असताना सगळंच आव्हानात्मक असतं – देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री असताना सगळंच आव्हानात्मक असतं,लोकांच्या अपेक्षा खूप असतात… आम्ही स्टार्ट अप साठी वेगळा फंड तयार केला आहे,स्टार्ट अप्स ना सर्व मदत राज्य सरकार देतेय… स्टार्टअप इकोसिस्टम तयार करतोय… मुलांचा स्क्रीन टाइम कमी करायलाच पाहिजे,मुले केवळ स्क्रीन वर नाही तर मैदानावर पण दिसायला पाहिजे मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो (अँकर रिद्धीमा पाठक यांना) बांगलादेश मध्ये आमच्या समाजसोबत अन्याय होत असताना तुम्ही तिथे जाण्यास नकार दिला?… असं दखील देवेंद्र फडणवीस म्हणाले.
-
पुण्यातील सारसबाग चौकात आदिवासी विद्यार्थ्यांचे विविध मागण्यासाठी आंदोलन
पुण्यातील सारसबाग चौकात आदिवासी विद्यार्थ्यांचे विविध मागण्यासाठी आंदोलन करण्यात आलं. सरकारने काढलेला जीआर लवकरात रद्द करावा नाहीतर आम्ही पुण्यात जंतर-मंतर करु अशा विद्यार्थ्यांच्या आक्रमक भावना आहेत. आदिवासी मंत्री नव्हे तर विनाश मंत्री आहेत विद्यार्थ्यांनी व्यक्त आक्रमक भावना केल्या… सरकारने लवकरात लवकर मागण्या मान्य नाही केल्या तर आम्ही तीव्र आंदोलन करू असा इशारा देण्यात आला.
-
मुख्यमंत्री कसं बनलो ही लोकशाहीची कमाल आणि संविधानाची ताकद – देवेंद्र फडणीस
मुख्यमंत्री कसं बनलो ही लोकशाहीची कमाल आणि संविधानाची ताकद आहे… उद्या कोणाला मुख्यमंत्री व्हावसं वाटलं तर, हिच लोकशाही आणि संविधानाची ताकद महत्त्वाची आहे… असं देखील देवेंद्र फडणवीस म्हणाले.
-
माझा राजकारण व्यवसाय नाही ते माझे मिशन आहे- देवेंद्र फडणवीस
माझी सुरवात 18 वर्षांचा असल्यापालुन झाली. आम्ही ठरवले कि लाल चौकात तिरंगा फडकवायचा. माझा राजकारण व्यवसाय नाही ते माझे मिशन आहे. बाबरी पाडली तेव्हा मी तिथे होतो. 20 वर्षांचा असतांना मी आंदोलनात गेलो असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
-
पाऊस सुरू असतानाही खासदार सुप्रिया सुळे आंदोलकांसोबत रस्त्यावर
भोर तालुक्यातील भोंगवली गावात.. होऊ घातलेला पुणे ट्रान्समिशन 3 या खाजगी कंपनीचा, हाय-व्होल्टेज सबस्टेशन आणि टॉवर लाईनचा प्रकल्प रद्द व्हावा या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन. या आंदोलनात सुप्रिया सुळे सहभागी झाल्या. भर पावसात त्या आंदोलकांसोबत उभ्या होत्या.
-
प्रीकास्ट पॅनल तंत्रज्ञानाचा रस्त्ये दुरुस्तीसाठी वापर
चाकण–तळेगाव रस्त्याची दुरवस्था गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. आता या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम वेगाने सुरू आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज चाकण midc मध्ये दौरा. प्रीकास्ट पॅनल तंत्रज्ञानाचा प्रथमच चाकण–तळेगाव रस्त्यावर वापर केला जात आहे.
-
मुख्यमंत्री साधणार 30 हजार जेन झी , अल्फा आणि युवकांशी संवाद
1 महिन्यापासून सुरू असलेल्या मंथन 4 युवा अभियानाचा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत समारोप होणार आहे. यावेळी मुख्यमंत्री जेन झी , अल्फा त्याच प्रमाणे वेगवेगळ्या क्षेत्रातील युवकांशी संवाद साधणार आहेत.
-
पाण्याचा प्रश्न पेटल्यामुळे सरपंच उपसरपंच भर सभेतून पळाले
दीड वर्ष अगोदर चामोर्शी तालुक्यातील घोट ग्रामपंचायत अंतर्गत जल मिशन योजनेचे 22 कोटी रुपये खर्च करून पाण्याची टाकी उभारण्यात आली. परंतु दीड वर्षापासून नागरिकांना शुद्ध पाणी आठवड्यातून काही दिवसच मिळत असल्यामुळे नागरिकांनी भर सभेत पाण्याच्या प्रश्न उपस्थित केला.
-
मुंबईच्या गणेशोत्सवात अदानी समूहाची एण्ट्री
परळमधील १०७ वर्षे जुन्या ‘चिंचपोकळीचा चिंतामणी’ गणेशोत्सव मंडळासोबत अदानी समूहाने टाय-अप केलं आहे. यंदा चिंचपोकळीच्या चिंतामणीचा मंडप तिरुपती बालाजी मंदिराच्या थीमवर साकारण्यात येणार आहे. त्यासाठी हैदराबादमधील स्वर्णगिरी मंदिराची प्रतिकृती उभारली जात आहे.
-
पुणे – सातारा महामार्गावरील कापूरहोळ इथं शेतकऱ्यांचं रास्ता रोको आंदोलन
पुणे – सातारा महामार्गावरील कापूरहोळ इथं शेतकऱ्यांचं रास्ता रोको आंदोलन सुरू आहे. भोर तालुक्यातील भोंगवली गावात होऊ घातलेला पुणे ट्रान्समिशन 3 या खाजगी कंपनीचा हाय-व्होल्टेज सबस्टेशन आणि टॉवर लाईनचा प्रकल्प रद्द व्हावा या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे. आंदोलनासाठी भोर आणि राजगड तालुक्यातील बाधित गावचे ग्रामस्थ ट्रॅक्टर, बैलगाडी आणि जनावरांसह या आंदोलनात सहभागी होण्यासाठी आंदोलनस्थळी दाखल होण्यास सुरुवात झाली आहे.
-
छत्रपती संभाजीनगरमध्ये वाद मिटवण्यासाठी गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यालाच तरुणांकडून मारहाण
छत्रपती संभाजीनगरमध्ये वाद मिटवण्यासाठी गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यालाच तरुणांकडून मारहाण करण्यात आली आहे. धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील अंबड तालुक्यातील भोकरवाडी टोलनाक्यावर ही धक्कादायक घटना घडली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाचोड पोलिसांना 112 क्रमांकावरून माहिती मिळाली होती. टोलनाक्यावर काही तरुण वाद घालत असल्याची माहिती मिळताच पाचोड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. वाद मिटवण्यासाठी गेलेल्या पोलिसांसोबतच तरुणांनी हुज्जत घातली आणि पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केली. मारहाणीचा संपूर्ण प्रकार टोलनाक्यावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून अंबड पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
-
वसईत हिट अँड रनची धक्कादायक घटना उघड
वसईत हिट अँड रनची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. वसई पश्चिमेतील गिरिज, डोंगरी परिसरात मध्यरात्री एका कारने दुचाकीस्वार महिलेला धडक देऊन कारसह चालक फरार झाला असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत दुचाकी चालक महिला गंभीर जखमी झाली असून, स्थानिक नागरिकांनी तिला कार्डिनल ग्रेसेस रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केलं आहे. याबाबत वसई पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, फरार कार चालकाचा पोलिस शोध घेत आहेत.
-
मुंबईच्या गणेशोत्सवात अदानी ग्रुपची ग्रँड एण्ट्री; ‘चिंचपोकळीचा चिंतामणी’सोबत टाय-अप
मुंबईच्या गणेशोत्सवात अदानी ग्रुपची एण्ट्री झाली असून ‘चिंचपोकळीचा चिंतामणी’सोबत त्यांनी टाय-अप केला आहे. चिंतामणीसोबत अदानी ग्रुपचा जाहिरातीचा करार झाला आहे. 29 ऑगस्टला चिंतामणीच्या आगमन मिरवणुकीत अदानींची एण्ट्री होणार आहे. यावर्षी तिरुपती बालाजीच्या थीमवर चिंचपोकळीचा चिंतामणी मंडप साकारण्यात येणार आहे.
-
नाशिक- भद्रकाली देवी मंदिरातून देवीच्या वाहनाची मूर्ती चोरणाऱ्यांना अटक
नाशिकची ग्रामदैवत असलेल्या प्राचीन भद्रकाली देवी मंदिरातून देवीचं वाहन म्हणून समोर ठेवण्यात आलेल्या पितळी सिंहाच्या मूर्तीची अज्ञात चोरट्यांनी चोरी केली होती. नाशिक शहर पोलिसांना या चोरट्यांना शोधण्यात यश आलं आहे. मंदिराचं काम चालू असल्याने ही मूर्ती बाजूला ठेवण्यात आली होती आणि याचाच फायदा घेत चोरट्यांनी ही मूर्ती चोरल्याचं मंदिराच्या पूजाऱ्यांकडून सांगण्यात आलं.
-
शालेय पोषण आहारात भ्रष्टाचार सुरू- संजय राऊत
शालेय पोषण आहारात भ्रष्टाचार सुरू आहे. आंबेगावच्या अंगणवाडी शिक्षिकेनं प्रश्न उपस्थित केले. अंगणवाडीच्या शिक्षिकेला निलंबित करण्यात आलं. भ्रष्टाचार करणारे नागपूरचेच लोक आहेत, असा आरोप संजय राऊतांनी केला.
-
छात्रों की गुंजला पेड इव्हेंट तर मग लाडकी बहीण काय? राऊतांचा सवाल
कॉक्रोच जनता पार्टीमुळे फडणवीसांना जेन-झींचे प्रश्न आहेत, हे समजलं. मोदी आणि फडणवीसांनी सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपकेंचे फोटो त्यांच्या कार्यालयात लावावेत. भाजप हा पक्ष नाही तर पेड इव्हेंट आहे. छात्रों की गुंजला पेड इव्हेंट तर मग लाडकी बहीण काय? काल पेड इव्हेंट म्हणत होता, मग आज तुमचा काय आहे, असा सवाल संजय राऊतांनी केला आहे.
-
श्रावणातही चाकण कृषी उत्पन्न बाजार समितीत पालेभाज्यांना भाव नाही
श्रावण महिना सुरू असतानाही पालेभाज्यांना अपेक्षित बाजारभाव मिळत नसल्याने शेतकऱ्याच्या चिंतेत वाढ झाली आहे. भाजीपाल्याची आवक वाढली असून, मागणी मात्र कमी झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठं संकट उभं राहिलं आहे. चाकण कृषी उत्पन्न बाजार समितीत तर कोथिंबिरीला अक्षरशः कवडीमोल भाव मिळत असून, एक रुपयाला जुडी विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. तर विक्री न झालेला भाजीपाला फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे.
-
गोंदिया जिल्हात मुसळधार पाऊस, वैनगंगा नदीच्या पाणी पात्रात वाढ
गोंदियातील वैनगंगा नदीवरील धापेवाडा बॅरेजचे 13 दरवाजे उघडले. 13 दरवाज्यांमधून 97 हजार 313 क्युसेकने पाण्याचा विसर्ग करणयात आला. तर पुजारीटोला धरणातूनही पाण्याचा विसर्ग सुरू आहे. गोंदिया जिल्ह्यात रात्री झालेल्या पावसामुळे वैनगंगा नदीच्या पाणी पात्रात वाढ झाली.
-
मुंबईच्या जुहू परिसरात भीषण अपघात; शाळकरी मुलीला उडवले
मुंबईच्या जुहू परिसरात भरधाव दुचाकीने 15 वर्षीय शाळकरी मुलीला उडवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही मुलगी भारतीय वंशाची अमेरिकन नागरिक असून जुहूतील एका नामांकित शाळेत इयत्ता 10 वी मध्ये शिकते. 18 ऑगस्ट रोजी सकाळी 8.15 वाजता जुहूच्या NS रोडवर ट्युशन संपवून ती शाळेत जाण्यासाठी घराकडे जात असताना भरधाव वेगात आलेल्या दुचाकीने तिला जोरदार धडक दिली. धडकेनंतर ती रस्त्यावर फेकली गेली.
-
लालबागच्या उड्डाणपुलावर ‘ग्रीन कव्हर’
लालबागच्या उड्डाणपुलावर ‘ग्रीन कव्हर’ची खबरदारी घेण्यात आली आहे. गणपती आगमनाआधी लालबागमध्ये ‘ग्रीन कव्हर’ टाकण्यात आलं आहे. मुंबई महापालिका पोलिसांनी ही उपयोजना केली आहे. गणपती आगमन विसर्जनातील अति गर्दीला आता शिस्त येणार. परळ कार्यशाळेसमोरील रस्ते दुभाजककही झाकले.
-
एक रुपयांची भाडेवाढ म्हणजे चेष्टा;दरवाढीविरोधात कल्याणमधील रिक्षाचालक आक्रमक
“एक रुपयांची भाडेवाढ म्हणजे चेष्टा असून दरवाढीविरोधात कल्याणमधील रिक्षाचालक आक्रमक झाले आहेत. २ रुपये वाढीची मागणी द्यावी. मान्य न झाल्यास उग्र आंदोलनाचा इशारा रिक्षा चालकांनी दिला आहे. परिवहन, एमएमआरटीएच्या एक रुपयांच्या भाडेवाढीला कल्याणमधील रिक्षा चालक-मालक संघटना आणि रिक्षाचालकांनी तीव्र विरोध केला आहे
-
बीडमध्ये भटक्या कुत्र्याची चिमुकलीवर जीवघेणी झडप, घटना सीसीटीव्हीत कैद
बीड शहरातील शिवतेज नगरमधील रेणू हॉस्पिटल परिसरात घराबाहेर खेळत असलेल्या शिवांशी रामेश्वर घोलप या चिमुकलीवर भटक्या कुत्र्याने हल्ला केला. कुत्र्याने तिच्या गालाचा अक्षरशः चावा घेत लचके तोडले. चिमुकलीच्या किंकाळ्या ऐकून शेजाऱ्यांनी धाव घेतली आणि कुत्र्याच्या तावडीतून तिची सुटका केली. या हल्ल्याची संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.