Maharashtra News LIVE : इंधन दरवाढ थांबेना, पेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा वाढ,सर्वसामान्यांना मोठा फटका

Maharashtra News LIVE : द्विपक्षीय संबंध सुधारण्याच्या उद्देशाने अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो चार दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. ते परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि पंतप्रधान मोदी यांची भेट घेतील. दुसरीकडे महागाईचा कहर कायम असून 10 दिवसांत तिसऱ्यांचा पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली आहे, त्यामुळे सामान्य नागरिक त्रस झाले आहेत. यासह महाराष्ट्र , देश-विदेश, मनोरंजन, बिझनेस, क्रीडा क्षेत्रातील महत्वाचे अपडेट्स वाचण्यासाठी हा ब्लॉग फॉलो करा.

Maharashtra News LIVE : इंधन दरवाढ थांबेना, पेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा वाढ,सर्वसामान्यांना मोठा फटका
| Updated on: May 23, 2026 | 9:13 AM

LIVE NEWS & UPDATES

  • 23 May 2026 09:10 AM (IST)

    पेट्रोल डिझेलचे दर वाढले, छत्रपती संभाजीनगर इथे नवे दर काय ?

    देशभरात पेट्रोल डिझेलचे दर वाढले असून छत्रपती संभाजीनगर येथील दरही समोर आलेत.

    पेट्रोल 90 पैसे प्रति लिटर दराने वाढले, शहरात  पेट्रोल नवे दर 110.44 रुपये इतके आहे. तर डिझेल 94 पैसे प्रति लिटर दराने वाढले, 97.01 रुपये डिझेलचे नवीन दर आहेत.

  • 23 May 2026 09:02 AM (IST)

    मुंबई – पेट्रोल डिझेल दरवाढीचा फटका सर्वसामान्यांच्या खिशाला बसायला सुरूवात

    मुंबई पेट्रोल डिझेल दरवाढीचा फटका सर्वसामान्यांच्या खिशाला बसायला सुरुवात झाली आहे.  मुंबईतील प्राचीन मुंबादेवी जलेबीवाला यांनी खाद्य पदार्थांच्या दरात वाढ केली आहे.  फापडा , जलेबीच्या दरात प्रती किलो 40 ते 50 रुपयांची वाढ झाली असून इतर खाद्य पदार्थांच्या किंमतीतही ५० रुपयांची वाढ झाली आहे. ट्रान्सपोर्ट वाढू नये यासाठी सरकारने तोडगा काढावा अशी ग्राहकांची मागणी आहे.

    मात्र दरवाढीचा फटका बसतोय, त्यामुळे पदार्थांच्या दरात वाढ केल्याशिवाय पर्याय नाही अशी प्रतिक्रिया दुकानदारांनी दिली आहे.

  • 23 May 2026 09:00 AM (IST)

    पेट्रोलच्या दरात तिसऱ्यांदा वाढ, सर्वसामान्यांना मोठा दणका

    गेल्या 10 दिवसांत पेट्रोल डिझेलच्या दरांत तिसऱ्यांदा वाढ झाली असून आज पेट्रोल 87 पैशांनी तर डिझेल 91 पैशांनी महागलंय. देशभरातसह महाराष्ट्रातही इंधन दरवाढीमुळे नागरिकांच्या खिशावर मोठा भार पडणार आहे.

पेट्रोल आणि डिझेलच्या (Diesel price) दरात आज तिसऱ्यांदा वाढ करण्यात आली आहे. आधी 15 मे रोजी पेट्रोलच्या दरात 3 रुपये वाढ झाली तर डिझेल 3.11 रुपयांनी महागलं. त्यानंतर चार दिवसांनी दोन्ही इंधन पुन्हा 86 पैसे आणि 83 पैशांनी महागली. आता दहा दिवसात तिसरी वाढ जाहीर करण्यात आली असून पेट्रोलचा प्रतिलीटर दर 87 पैसे तर डिझेलची किंमत 91 पैशांनी वाढली आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा फटका बसला आहे. दुसरीकडे पुण्यात काल झालेल्या पावसामुळे मेट्रोमध्ये पावसाच्या पाण्याची गळती झाली यामुळे मेट्रो प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागला. महागाईचे सत्र सुरूच असून पुण्यात पालेभाज्यांमध्येही दरवाढ झाली आहे. कडाक्याचे ऊन, अवकाळी पाऊस आणि घटलेली आवक यामुळे किरकोळ बाजारात भाजीपाल्याचे दर 25 ते 50 टक्क्यांनी वाढले. टोमॅटो, हिरवी मिरची आणि कोथिंबीरच्या भावात मोठी वाढ झाली आहे. यासह महाराष्ट्र , देश-विदेश, मनोरंजन, बिझनेस, क्रीडा क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींचे अपडेट तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचता येतील. दिवसभार फॉलो करा TV9 मराठीचा हा ब्लॉग..

Follow Us