Maharashtra News LIVE : खासदार संजय दिना पाटील यांच्या निषेधार्त पत्रकारांचे आंदोलन
Maharashtra News LIVE : भूकंप झाल्यानंतर तीन तासांच्या आत देशाला संबोधित न करणं तसच किती जिवीत व वित्तहानी झालीय याची माहिती न देणं यावर राजकीय नेते आणि वेनेजुएलाच्या लोकांनी रोड्रिग्ज यांच्यावर टीका केली आहे.

LIVE NEWS & UPDATES
-
खासदार संजय दिना पाटील यांच्या निषेधार्त पत्रकारांचे आंदोलन
खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना बद्दल केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ संयुक्त महाराष्ट्र पत्रकार संघटनेने तीव्र शब्दात निषेध केला आहे. पत्रकारांनी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात एकत्र येत लेखणी बंद आंदोलन करीत घोषणाबाजी केली. संजय दिना पाटल यांनी वक्तव्याबद्दल जाहीर माफी मागावी तसेच एकनाथ शिंदे यांनी त्यांचा राजीनामा घ्यावा अन्यथा शिवसेनेच्या बातम्यांवर बहिष्कार घालू असा संताप यावेळी पत्रकारांनी व्यक्त केला आहे.
-
संजय राऊत यांची अश्लिल भाषा त्यांचे मानसिक संतुलन गेल्याचे द्योतक – शायना एनसी
संजय राऊत यांनी ‘शिवसेना ( UBT )’ संपवण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी ते केलेही आहे. मात्र, जर ते शिवसैनिक आणि आमच्या महिलांबद्दल अश्लील भाषेचा वापर करत असतील, तर आम्ही गप्प बसणार नाही. आम्ही पोलीस आयुक्तांकडे मागणी केली आहे की त्यांनी राऊत यांच्या सोशल मीडिया खात्यांची तपासणी करावी; कारण त्यात ते हातात बंदूक घेऊन उभे असल्याचे दिसत आहे. त्या बंदुकीचा त्यांच्याकडे परवाना आहे का? तसेच, ते ज्या भाषेचा वापर करत आहेत, त्यावरून त्यांचे मानसिक समतोल ढळल्याने गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याची टीका शिवसेना नेत्या शायना एनसी यांनी केली आहे.
-
-
गोंदियात पावसाची जोरदार बॅटींग…
गोंदिया जिल्ह्यातील ग्रामीण भागात अखेर जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. अनेक दिवसांपासून दमदार पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना यामुळे मोठा दिलासा मिळाला असून खरीप हंगामातील पेरणीच्या कामांना आता वेग येण्याची शक्यता आहे. काही दिवसांपासून वाढलेल्या उकाड्यामुळे नागरिक त्रस्त झाले होते. मात्र, झालेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे
-
बांगलादेश: 28 जूनपासून 5 भारतीय व्हिसा केंद्रे पुन्हा सुरू होणार
बांगलादेशातील भारताचे नवनियुक्त उच्चायुक्त दिनेश त्रिवेदी यांनी आज जाहीर केले की, बांगलादेशची राजधानी ढाका येथील केंद्रासह पाच व्हिसा केंद्रांवर 28 जूनपासून पर्यटक व्हिसासाठी अर्ज प्रक्रिया पुन्हा सुरू होईल.
-
अयोध्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, चंपत राय राजीनामा देणार?
अयोध्या राम मंदिर देणगी आणि आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राम मंदिर ट्रस्टच्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल केला आहे. चंपत राय राजीनामा देण्याची शक्यता आहे.
-
-
धर्मेंद्र प्रधान यांनी त्यांच्या अपयशाबद्दल राजीनामा द्यावा: राहुल गांधी
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी नीट पेपरफुटी प्रकरणात ‘X’ वर पोस्ट करून सरकारवर हल्ला चढवला आहे.
सत्ता के अहंकार में डूबी मोदी सरकार अब इस मुकाम पर पहुँच गई है कि अपने अधिकारों, निष्पक्ष परीक्षाओं और सुरक्षित भविष्य की मांग करने वाले छात्रों को ही शिक्षा मंत्री “आतंकवादी” कह रहे हैं।
ज़रा सोचिए – जिसकी नाकामी से इतने पेपर लीक हुए, जिसके राज में 20 बच्चों ने जान दे दी, जिसने…
— Rahul Gandhi (@RahulGandhi) June 25, 2026
-
केतन अग्रवाल यांच्या खून प्रकरणात विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्याच्या सूचना
महाराष्ट्र विधानसभेच्या पीठासीन अधिकाऱ्यांनी पुण्यातील रिअल इस्टेट व्यावसायिक केतन अग्रवाल यांच्या हत्या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्याचे निर्देश सरकारला दिले आहेत.
-
पंतप्रधान मोदी 11 वर्षांनंतर सेशेल्सला भेट देणार, 27 ते 29 जून दरम्यान दौरा
पंतप्रधान नरेंद्र मोदी 27 ते 29 जून 2026 दरम्यान सेशेल्सचा दौरा करणार आहेत. सेशेल्सचे राष्ट्रपती डॉ. पॅट्रिक हर्मिनी यांच्या निमंत्रणावरून, पंतप्रधान मोदी राष्ट्रीय दिनाच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याचे प्रमुख पाहुणे असतील.
-
मुंबई : अंधेरीतील 18 इंची जलवाहिनीला मोठी गळती
अंधेरी पश्चिम येथील लिंक रोडवर आज दुपारी 18 इंची जलवाहिनीला मोठी गळती लागल्याची घटना घडली आहे. यामुळे हजारो लिटर पाणी वाया गेले आहे. दुपारच्या सुमारास लिंक रोडवरील मुख्य 18 इंची पाण्याच्या पाईपलाईनमधून अचानक पाणी बाहेर येऊ लागले. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहतुकीवरही परिणाम झाला.
-
हिंगोली : संजय दिना पाटील यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन
हिंगोलीत पत्रकारांबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध करत संजय दिना पाटील यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने शहरातील बाळासाहेब ठाकरे चौकात हे आंदोलन करण्यात आले. पत्रकारांच्या केसाला ही धक्का लागू देणार नाही, पत्रकारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असं जिल्हा प्रमुख संदेश देशमुख यांनी म्हटले आहे.
-
संजय दिना पाटलांच्या विधानावर एकनाथ शिंदे यांचे भाष्य
खासदार संजय दिना पाटील यांच्या विधानावर बोलताना एकनाथ शिंदे यांनी म्हटलं की, ‘मी या प्रकरणाची सविस्तर माहिती घेतो. पत्रकारांशी अशा प्रकारे बोलणे योग्य नाही. मी संजय दिना पाटील यांच्याशी चर्चा केली असून, त्यांनी आपली बाजू मांडली आहे. पाटील यांनी सांगितले की, पत्रकारांचा अपमान करण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता. मात्र, दररोज माझ्या विरोधात आणि माझ्या कुटुंबाबद्दल ज्या खालच्या पातळीवर टीका केली जात आहे, त्याचा राग मनात होता.’
-
भंडारा : 33 केव्ही विद्युत ताराखाली निर्माणधीन अनधिकृत बांधकामावर नगरपरिषदेचा हातोडा
भंडारा शहरात बांधकाम नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात नगर परिषदेने आता कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. भंडारा येथील एका निवासी भूखंडावर मंजूर नकाशाव्यतिरिक्त आणि थेट उच्च दाबाच्या 33 केव्ही विद्युत वाहिनीखाली बेकायदेशीररीत्या बांधकाम करण्यात आले होते. नियमानुसार उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीपासून 3 मीटरचे अंतर राखणे बंधनकारक असताना, हे बांधकाम थेट विजेच्या तारांखालीच केले जात असल्याचे समोर आले असल्याने हे बांधकाम 24 तासात पाडण्याचे आदेश नगर परिषदेने दिले होते, मात्र बांधकाम धारकाने दिलेल्या मुदतीत बांधकाम न हटवल्याने आज भंडारा नगरपरिषदेकडून हे अनधिकृत बांधकाम पाडण्यात आले.
-
बंडखोर खासदारांविरोधात शिवसेना ठाकरे गटाचे आंदोलन
शिवसेना उद्धव ठाकरे पक्षातून शिंदे गटामध्ये प्रवेश केलेल्या सहा खासदारांच्या विरोधात पुण्यात शिवसेना ठाकरे गटाकडून जोरदा आंदोलन करण्यात आलं आहे. प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून ठाकरे गटाच्या वतीने या बंडखोर खासदारांचा निषेध करण्यात आला. शिंदे गटात प्रवेश केलेल्या खासदारांच्या विरोधात पुण्यात ठाकरे गट आक्रमक झाला असून, यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आल्याचं पहायला मिळालं.
-
बदलापुरात पत्नीची नाक-तोंड दाबून हत्या अन् नंतर केला हार्ट अटॅकचा बनाव
बदलापुरात पत्नीची नाक-तोंड दाबून हत्या अन् हार्ट अटॅकचा बनाव
पोस्टमॉर्टम रिपोर्टच्या आधारे पती आणि सासूला बेड्या
पतीचे गावातल्याच दुसऱ्या महिलेसोबत संबंध असल्याचा आरोप
पत्नीने घटस्फोटाला नकार दिल्याने काढला काटा
-
आमदार विजय शिवतारे पुरंदर दौऱ्यावर
आमदार विजय शिवतारे पुरंदर दौऱ्यावर आहेत, यशस्वी किडनी प्रत्यारोपण झाल्यानंतर आमदार विजय शिवतारे हे पहिल्यांदाच पुरंदर दौऱ्यावर आहेत. वीर धरणातून पिण्याच्या पाण्यासाठी सासवड येथे होत असलेल्या योजनेची विजय शिवतारे यांनी यावेळी पहाणी केली आहे.
-
सोलापुरातील पत्रकारांकडून खासदार संजय दिना पाटलांच्याविरोधात निदर्शने
सोलापुरातील पत्रकारांकडून खासदार संजय दिना पाटलांच्याविरोधात निदर्शने
श्रमिक पत्रकार आणि महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे संजय दिना पाटलांवर कारवाई करण्याची मागणी
‘संजय दिना पाटलांनी लोकशाहीचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केलाय, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई व्हावी’
‘खासदार असलेल्या व्यक्तींना अशा पद्धतीची भाषा वापरणे हे निंदनीय’
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी त्यांच्यावर कारवाई करावी अशी पत्रकारांची मागणी
-
कोट्यवधीच्या ठेवी असलेली BMC ट्रोलर्सच्या निशाण्यावर
कोट्यवधीच्या ठेवी असलेली BMC ट्रोलर्सच्या निशाण्यावर. पाण्याच्या निचऱ्यासाठी सफाई कर्मचाऱ्याकडून झाडूचा वापरल्यानं ट्रोलिंग. BMCकडे कोट्यवधी असताना पाणी काढण्यासाठी झाडूचा वापर करत असल्याचा मुंबई महानगर पालिकेकडून विडिओ पोस्ट करण्यात आला होता.
-
आमचा एकही आमदार कुठेही जाणार नाही-शरद पवार
आमचा एकही आमदार कुठेही जाणार नाही. फुटीच्या चर्चांवर पवारांचं एका वाक्यात उत्तर.
-
नसरापूर प्रकरणी कोर्ट 29 जूनला निकाल देणार
नसरापूर प्रकरणी कोर्ट 29 जूनला निकाल देणार. नसरापूर प्रकरणातील आरोपी दोषी, 29 जूनला निकाल. 29 जूनला नराधम भीमराव कांबळेला शिक्षा सुनावणार. कोर्टाने निकाल 29 जूनपर्यंत राखून ठेवला
-
खासदार संजय दिना पाटलांची पत्रकारांवर अरेरावी आणि शिवीगाळ
खासदार संजय दिना पाटलांची पत्रकारांवर अरेरावी आणि शिवीगाळ. पत्रकाराच्या प्रश्नावर उत्तर देताना संजय पाटलांची अर्वाच्च भाषा. संजय दिना पाटलांची पत्रकारांना मारण्याची भाषा आणि धमकी
-
विलास घुले हत्या प्रकरणातील आरोपींवर हत्येचा प्रयत्न आणि ॲट्रॉसिटी अंतर्गत दुसरा गुन्हा दाखल
बीडच्या केज तालुक्यातील टाकळी येथील तरूण विलास घुले हत्या प्रकरणातील आरोपींवर उमेश माने या व्यक्तीच्या फिर्यादीवरून हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी आणि ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उमेश माने याचे आरोपींच्या नातेवाईकातील एका महिलेसोबतच्या अनैतिक संबंधातून हा वाद सुरू झाला होता. उमेश माने याच्यासोबत सुरू असलेल्या वादात विलास घुले पडल्याने त्याची हत्या झाली. यानंतर आता उमेश माने याने फिर्याद दिली असून अटकेत असलेल्या सर्व नऊ आरोपींच्या विरोधात हत्येचा प्रयत्न आणि ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खासदार बजरंग सोनवणे आमचे नातेवाईक आहेत तुला जीवे मारल्यानंतर माझे कोणीच काही करू शकत नाही असे म्हणून आरोपी मारत होता असा फिर्यादीत उल्लेख करण्यात आला आहे.
-
जळगावच्या सराफा बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात विक्रमी घसरण
जळगावच्या सराफा बाजारात सोन्याच्या दरात तब्बल 4 हजार 500 रुपयांची तर चांदीच्या दरात 10 हजार रुपयांची घसरण झाली. सोन्याचे दर जीएसटीसह 1 लाख 44 हजार 200 रुपये तर चांदीचे दर जीएसटीसह 2 लाख 26 हजार 600 रुपये असे आहेत.
-
पवनराजे निंबाळकर हत्याकांडाची केस री ओपन करून न्यायालयीन चौकशी करा- रोहित पवार यांची मागणी
पवनराजे हत्याकांडा प्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी एक खळबळ जनक मागणी केली. या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करून ही संपूर्ण प्रकरण पुन्हा ओपन करावं अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे. पवन राजे हत्याकांडावर पवार कुटुंबीयांनी बोलणं टाळलं होतं मात्र आज रोहित पवारांनी यावर आपलं मत व्यक्त केलं. काही खासदारांनी न्याय मिळण्यासाठी देखील पक्षांतर केलं मात्र दुसऱ्या दिवशी निकाल वेगळाच लागला .पक्षांतर करण्यासाठी न्यायव्यवस्थेचा वापर होत असेल तर ही गोष्ट लोकशाहीसाठी अत्यंत घातक असल्याचं मत व्यक्त करत रोहित पवार यांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर निशाणा साधला.
-
विलास घुले यांच्या कुटुंबीयांच्या भेटीसाठी माजी खासदार प्रीतम मुंडे दाखल
बीडच्या केज तालुक्यातील टाकळी येथील तरूण विलास घुले यांची 20 जुन रोजी चाकुने भोसकून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाने बीड जिल्ह्यातील राजकारण तापलेले आहे. खासदार बजरंग सोनवणे यांचे पुत्र सौरव सोनवणे यांच्यावर या प्रकरणात आरोप केले जात आहे. दरम्यान माजी खासदार प्रीतम मुंडे या टाकळी येथे कुटुंबीयांच्या भेटीसाठी दाखल झाल्या आहेत.
-
वादळी पावसाच्या तडाखा शेतकऱ्याच्या घराचे मोठे नुकसान
लासलगाव जवळील ब्राह्मणगाव (विंचूर) येथे वादळी पावसाच्या तडाखा शेतकऱ्याच्या घराचे मोठे नुकसान झाले. जोरदार वाऱ्याने घरावरील पत्रे उडाली. 20 ते 25 गोण्यांतील गहू भिजला. संसारोपयोगी वस्तूंचेही नुकसान झाले. विहिरीजवळील झाड कोसळल्याने विहिरीचा काही भाग खचला. पंचनामा करून नुकसानभरपाई देण्याची शेतकरी जयवंत शेजवळ यांनी मागणी केली आहे.
-
निफाड तालुक्यात बिबट्यांचा वावर; शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
निफाड तालुक्यात बिबट्यांचा वावर दिसून आला. शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.वाहेगाव भरवस-देशमाने सरहद्दीवरील वाबळे वस्तीत बिबट्याची दहशत दिसून आली. वन विभागाकडून दोन पिंजरे लावले. आठ दिवसांनंतरही बिबट्या जेरबंद नाही. शेती कामे व दूध व्यवसायावर परिणाम दिसून आला. वाबळे कुटुंबाचे आर्थिक नुकसान झाले आहे. मादी बिबट्या व बछड्यांना जेरबंद करून परिसर बिबटमुक्त करण्याची मागणी करण्यात येत आहे.
-
आमदार रोहित पवार यांचा खासदार ओमराजे निंबाळकर यांना अप्रत्यक्ष टोला
आमदार रोहित पवार यांचा खासदार ओमराजे निंबाळकर यांना अप्रत्यक्ष टोला लगावला असून या भागातील काही लोक खोट शपथ खातात पण मी तसा खोट्या शपथा खाणारा नाही ते आधी हिरो होते पण आता सत्ता पक्षात गेल्याने झिरो झालेत असे वक्तव्य करत ओमराजे यांना अप्रत्यक्ष टोला लगावला आहे मला ही भविष्य आहे पण आम्ही सत्ता पक्ष मध्ये नाही गेलो असतो पण शाहू फुले आंबेडकर यांचे विचार नुसता वाचण्या पुरता नसतो तर तो जगायचा असतो म्हणून च रस्त्यावर उतरून लढत आहे शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करा या मागणीसाठी रोहित पवार छत्रपती संभाजी नगर ला मोर्चा काढणार आहेत त्याच मोर्च्या च्या पूर्वतयारी साठी रोहित पवार आज मराठवाडा दौरा करत असून धाराशिव लातूर बीड चा आज दौरा करणार आहेत कार्यकर्त्याना मार्गदर्शन करताना रोहित पवार यांनी उध्दव ठाकरे यांना सोडून शिवसेना पक्षात जाणाऱ्या ओमराजे निंबाळकर याना टोला लगावत सत्ताधारी पक्षता जाण्यावर भाष्य केले आहे
-
शिर्डीत FDA ची पुन्हा मोठी कारवाई; 650 किलोहून अधिक निकृष्ट दर्जाचा पेढा जप्त
शिर्डीत एफडीएकडून पुन्हा मोठी कारवाई करण्यात आली आहे. तब्बल 650 किलोहून अधिक निकृष्ट दर्जाचा पेढा जप्त करण्यात आला आहे. साई मंदिर परिसरातील दुकांनामधून जप्त केलेला पेढा तात्काळ नष्ट करण्यात आला. जेसीबीच्या साहाय्याने खड्डा खोदून सर्व जप्त केलेला पेढा नष्ट करण्यात आला. तक्रारी प्राप्त झाल्यानंतर अहिल्यानगर पथकाने ही कारवाई केली.
-
आमदार रोहित पवार यांचा खासदार ओमराजे निंबाळकर यांना अप्रत्यक्ष टोला
आमदार रोहित पवार यांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांना अप्रत्यक्ष टोला लगावला आहे. “या भागातील काही लोकं खोटी शपथ खातात, पण मी तसा खोट्या शपथा खाणारा नाही. ते आधी हिरो होते, पण आता सत्ताधारी पक्षात गेल्याने झिरो झाले आहे,” असं वक्तव्य करत ओमराजे यांना त्यांनी अप्रत्यक्ष टोला लगावला आहे. “शाहू, फुले, आंबेडकर यांचे विचार नुसते वाचण्यापुरते नसतात. तर ते जगायचे असतात. म्हणूनच रस्त्यावर उतरून लढत आहोत,” असंही रोहित पवार म्हणाले.
-
ऑपरेशन टायगरसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या केंद्रीय नेतृत्वासोबत बैठका- सूत्र
ऑपरेशन टायगरसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या केंद्रीय नेतृत्वासोबत बैठका झाल्याची सूत्रांची माहिती आहे. संख्याबळ पूर्ण करण्यास फडणवीसांची शिष्टाई मोलाची ठरली. खासदार फोडण्यासाठी शिंदेंकडून पाच वेळा भाजपश्रेष्ठींची भेट घेण्यात आल्याचं कळतंय. फडणवीसांच्या बैठकांनंतर शिंदेंना दिल्लीतून ग्रीन सिग्नल मिळाला. सहाव्या खासदाराला फोडण्यात फडणवीसांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
-
आरोपीला फाशी द्या, नसरापूर प्रकरणातील पीडितेच्या वडिलांची कोर्टात मागणी
नसरापूर प्रकरणातील निकाल कोर्टाने 29 जूनपर्यंत राखून ठेवला आहे. तर आरोपीला फाशी द्या, अशी मागणी पीडितेच्या वडिलांनी कोर्टात केली आहे. अशा घटना टाळण्यासाठी फाशीची शिक्षा द्या, अशी विनंती त्यांनी केली आहे. याप्रकरणी आरोपीला गुन्ह्याचा पश्चात्ताप नसल्याचं न्यायाधीशांनी म्हटलं आहे.
-
नसरापूर प्रकरणी कोर्ट 29 जूनला निकाल देणार
नसरापूरमधील चिमुकलीवरील अत्याचारप्रकरणी आरोपी भीमराव कांबळे दोषी ठरला असून याप्रकरणी कोर्ट येत्या 29 जूनला निकाल देणार आहे. 29 जूनला भीमराव कांबळेला शिक्षा सुनावली जाणार आहे. पुण्यातील भोर तालुक्यातील नसरापूर इथं साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली होती.
-
आरोपी भीमराव कांबळेला गुन्ह्याचा कोणताही पश्चात्ताप नाही- कोर्ट
नसरापूरमध्ये चिमुकलीवरील अत्याचार प्रकरणी आरोपी भीमराव कांबळे दोषी ठरला आहे. आरोपीने कृत्य करताना चिमुकलीच्या शरीरावर जखमा केल्या. ही घटना म्हणजे क्रूरतेचा कळस आहे. आरोपीला गुन्ह्याचा कोणताही पश्चात्ताप नाही, असं कोर्टाने म्हटलंय. तर आरोपी भीमराव कांबळेला मृत्यूदंडाची शिक्षा द्या, अशी मागणी वकिलांनी केली आहे.
-
सह्याद्रीच्या पर्वतरांगा भीमाशंकरच्या पट्ट्यात मान्सूनपूर्व पाऊसाने पेरणी केलेल्या भात पिकांना जीवदान
सह्याद्रीच्या पर्वतरांगा आणि भीमाशंकरच्या पट्ट्यात मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली आहे. या पावसामुळे पेरणी केलेल्या भात पिकांना मोठे जीवदान मिळाले असून आदिवासी शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना या सरींमुळे दिलासा मिळाला आहे. भात रोपांच्या वाढीसाठी हा पाऊस पोषक ठरणार आहे
-
जालन्यातील रामनगर महसूल मंडळात सर्वाधिक 109 मिलीमीटर पावसाची नोंद
जालना जिल्ह्यात मागील 24 तासात सरासरी 21 मिलिमीटर पाऊस झालाय. जिल्ह्यातील चार महसूल मंडळात अतिवृष्टी झाली असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे तर जिल्ह्यात वीज पडल्याने शेतकऱ्यांची चार पशुधन दगावले आहे. शिवाय अनेक भागात घराची पडझड देखील झाली आहे. जालन्यातील रामनगर महसूल मंडळात सर्वाधिक 109 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान जालना जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.
-
जालना जिल्ह्यात अनेक भागांत मागच्या 2 दिवसात पावसाची हजेरी
जालना जिल्ह्यात अनेक भागात मागच्या 2 दिवसात पावसाने हजेरी लावल्यामुळे बळीराजा कपाशी लागवडीत व्यस्त झाला आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अनेक दिवसांपासून मोठ्या आणि दमदार पावसाची प्रतीक्षा होती. मात्र मागील दोन दिवसात जिल्ह्यात अनेक भागांमध्ये समाधानकारक पाऊस झाल्याने कपाशी लागवडीला वेग आला आहे. जालना जिल्ह्यातील सोमनाथ, उटवद, जळगाव या परिसरामध्ये शेतकरी बांधव आज सकाळ पासूनच कपाशी लागवड करताना दिसत आहे.
-
खासदार संजय दिना पाटील यांनी संजय राऊतांबाबत केलेल्या वक्तव्यावर एकनाथ शिंदे नाराज
खासदार संजय दिना पाटील यांनी संजय राऊतांबाबत केलेल्या वक्तव्यावर एकनाथ शिंदे नाराज आहेत. वेढ्यासारखी वक्तव्य खासदारांनी करू नये अशा सर्व खासदारांना एकनाथ शिंदे यांनी सूचना दिल्या आहेत. वादग्रस्त वक्तव्ये टाळावीत , पक्षाची बदनामी होईल अशी वक्तव्य आमदार खासदार यांना करू नयेत अशी सर्व नेत्यांना सुचना देण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
-
नसरापूर प्रकरणात आरोपी भीमराव कांबळे दोषी
नसरापूर प्रकरणात आरोपी भीमराव कांबळे याला न्यायालयाने दोषी ठरवलं आहे. चिमुकलीवर अत्याचार प्रकरणी भीमराव कांबळे याला पोलिसांनी दोषी ठरवलं आहे. तूच सांग काय शिक्षा देऊ… अशी न्यायाधीशांनी आरोपीला विचारणा केली आहे. आरोपीवरील सर्व आरोप सिद्ध झाले आहेत.. असं कोर्टाने सांगितलं आहे.
-
धाराशिव मध्ये शरद पवार राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याकडून रोहित पवारांना दिली तलवार भेट
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आणि महिलांच्या संरक्षणासाठी रोहित पवारांना धाराशिवच्या कार्यकर्त्यांनी तलवार भेट दिली. शेतकऱ्याच्या सरसकट कर्जमाफीसाठी आमदार रोहित पवार आज धाराशिव जिल्हा दौऱ्यावर आहेत. धाराशिव येथे रोहित पवारांच्या मार्गदर्शनाखाली शरद पवार राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची बैठक सुरू आहेत.
-
रविंद्र चव्हाण यांची आणीबाणीवरून काँग्रेसवर टीका
भाजपचे नेते रविंद्र चव्हाण यांनी आणीबाणीवरून काँग्रेसवर टीका केली आहे.
२५ जून १९७५ हा दिवस भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील एक काळा अध्याय म्हणून सर्वांच्या स्मरणात. काँग्रेसच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशावर आणीबाणी लादत संविधानिक मूल्ये, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि नागरिकांचे मूलभूत हक्क यांची गळचेपी केली.
अशा कठीण काळात लोकशाही आणि संविधानाचे रक्षण करण्यासाठी निडरपणे आणीबाणी विरूद्ध लढा दिलेल्या योद्ध्यांना सलाम! आपले योगदान भारत कधीही विसरणार नाही – असं ट्विट त्यांनी केलं.
२५ जून १९७५ हा दिवस भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील एक काळा अध्याय म्हणून सर्वांच्या स्मरणात आहे. काँग्रेसच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशावर आणीबाणी लादत संविधानिक मूल्ये, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि नागरिकांचे मूलभूत हक्क यांची गळचेपी केली.
अशा कठीण काळात लोकशाही… pic.twitter.com/N1bgaBIh2e
— Ravindra Chavan (@RaviDadaChavan) June 25, 2026
-
विलास घुले हत्या प्रकरणात, घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज SIT ने घेतलं ताब्यात
बीड ब्रेक – बीडच्या केज तालुक्यातील टाकळी येथील तरूण विलास घुले यांच्या हत्या प्रकरणात घटनास्थळावरील दोन ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज एसआयटी ने ताब्यात घेतलं आहे. यामध्ये दगड आणि काचाच्या बाटल्यांनी एकमेकांना मारहाण सुरू असल्याचे दिसत आहे. या दरम्यान मुख्य आरोपी आणि विलास घुले यांच्यात झटापट झाली, आरोपीने थेट विलास घुले यांच्या पोटात चाकू खुपसला आणि तिथून पळ काढल्याचं दिसलं.
-
आमचा एकही आमदार जाणार नाही – शरद पवार
आमचा एकसुद्धा आमदार जाणार नाही, खासदार -आमदार फुटीच्या प्रश्नावरून शरद पवार यांनी ही प्रतिक्रिया दिली.
-
देशात लोकशाही राहिली नाही का ? सुप्रिया सुळे यांचा सवाल
सहकार क्षेत्रात राजकारण आणू नये. देशात लोकशाही राहिली नाही का ? आपली विचारधारा पुढल्या पिढीवर लादली जात्ये – सुप्रिया सुळे यांचा आरोप
-
सोलापूर महापालिका निवडणुकीच्या खर्चातील बिलात 4 पट वाढ
स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते यांनी त्यावर आक्षेप घेत हे बील थांबवले. प्रशासनाने निवडणूक खर्चासाठी 1 कोटी 71 लाख रुपये मंजूर केले होते. मात्र ठेकेदाराकडून प्रत्यक्षात 6 कोटी 70 लाख 78 हजार बील महापालिकेला देण्यात आलेय. त्यामुळे नियोजित खर्चाच्या 4 पट अधिक बील ठेकेदाराने पाठवल्याने त्याला स्थगिती देण्यात आलीय. हे बील पाहिल्यानंतर नगर अभियंता विभागाने याची फेर पडताळणी केली असता ती रक्कम 4 कोटी 34 लाख 62 हजार इतकी झाली
-
बाजारपेठ आणि 25 वस्त्यात शिरले मान्सूनच्या पहिल्याच पावसाचे पाणी..
अमरावती महानगरपालिकेच ढिसाळ नियोजन.. पहिल्याच पावसाने नालीसफाईची पोल खोल. अमरावती जिल्ह्यात काल दहा मंडळात अतिवृष्टी..आजही अमरावती जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा…अमरावती जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील कॅम्प रोड परिसरातील दुकानात अजूनही पाणीच पाणी.. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील एका कॉम्प्लेक्स मधील दुकानात अद्यापही पावसाचे पाणी…
-
24 तासांत 189.6 मिलिमीटर पावसाची नोंद
हतनूर धरणाच्या एकूण 9 केंद्रातील पाणलोट क्षेत्रात 24 तासांत 189.6 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही पाण्याची आवक यामुळे वाढली. एक महिन्यापासून पाणलोट क्षेत्रात पाण्याची आवक नव्हती…..
-
खासदार संजय जाधव यांना धक्का, उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय
उद्धव ठाकरे यांचा परभणी दाैरा आहे. खासदार संजय जाधव यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यानंतरहा हा पहिला उद्धव ठाकरे यांचा दाैरा आहे. शिवसेनेचे नेते पक्ष प्रमुख त्यांचं प्रभावती नगरीत स्वागत करणार, असल्याचे मोठे विधान संजय जाधव यांनी केले.
-
मिरा-भाईंदरमधील आदिवासी जमिनी बळकावल्याचा धक्कादायक प्रकार उघड
भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्या कंपनीवर गंभीर ठपका; चौकशी अहवाल महसूल मंत्र्यांकडे सादर. नियम पायदळी तुडवून जमिनींचे बेकायदा हस्तांतरण; मिरा-भाईंदर तहसीलदारांच्या भूमिकेवरही संशयाची सुई. मिरा-भाईंदरमधून एक अत्यंत मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे. येथील वरसावे भागातील आदिवासी बांधवांच्या जमिनी बेकायदेशीरपणे लाटल्याचा गंभीर ठपका ठाणे जिल्हाधिकाऱ्यांच्या चौकशी अहवालात ठेवण्यात आला आहे.
-
सोलापूर महापालिका निवडणुकीच्या खर्चातील बिलात 4 पट वाढ
सोलापूर महापालिका निवडणुकीच्या खर्चातील बिलात 4 पट वाढ झाली आहे. स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते यांनी त्यावर आक्षेप घेत हे बील थांबवले. प्रशासनाने निवडणूक खर्चासाठी 1 कोटी 71 लाख रुपये मंजूर केले होते. मात्र ठेकेदाराकडून प्रत्यक्षात 6 कोटी 70 लाख 78 हजार बील महापालिकेला देण्यात आले. त्यामुळे नियोजित खर्चाच्या 4 पट अधिक बील ठेकेदाराने पाठवल्याने त्याला स्थगिती देण्यात आलीय.
-
वृद्धाची साडेतीन लाखांची फसवणूक
जळगावात मुलाला नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून वृद्धाची साडेतीन लाखांची फसवणूक. फसवणूक करणाऱ्या बुलढाणा जिल्ह्यातील पितापुत्राविरुद्ध रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल. भारत एकनाथ गायकवाड व त्यांचा मुलगा साहिल भारत गायकवाड या दोघाविरुद्ध गुन्हा दाखल. मुलाला कृषी विभागात नोकरी लावून देतो असे सांगून 66 वर्षीय नामदेव देवराम मोरे यांची फसवणूक झाली आहे.
-
अमरावती जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयासह बाजारपेठ आणि 25 वस्त्यात मान्सूनच्या पहिल्याच पावसाचे पाणी शिरलं आहे. अमरावती महानगरपालिकेचं ढिसाळ नियोजन समोर आलं आहे. पहिल्याच पावसाने नालीसफाईची पोल-खोल केली आहे. अमरावती जिल्ह्यात काल दहा मंडळात अतिवृष्टी झाली. आजही अमरावती जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा. अमरावती जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील कॅम्प रोड परिसरातील दुकानात अजूनही पाणीच पाणी. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील एका कॉम्प्लेक्स मधील दुकानात अद्यापही पावसाचे पाणी.अद्यापही पाण्याचा निचरा झालेला नाही, व्यवसायिकांचे प्रचंड नुकसान.
-
उद्धव ठाकरे यांच्या परभणी जिल्हा दौऱ्यावर खासदार संजय जाधव यांची प्रतिक्रिया
उद्धव ठाकरे शिवसेनेचे नेते पक्ष प्रमुख आहेत. त्यांचं प्रभावती नगरीत स्वागत करणार. त्यांच्या पक्षाची विचारधारा वेगळी, त्यांच्या लोकांना पाठबळ देण्यासाठी त्यांचं येणं सहाजिक आहे. ठाकरे परिवाराविषयी माझी नाराजी नाही असं संजय जाधव म्हणाले. राजीकीय समीकरण बदलली.त्यामुळे इच्छा नसताना मला बदल करून घ्यावा लागला. उद्धव ठाकरे मला समजून घेतील,अशी भावना असल्याचं खासदार संजय जाधव म्हणाले. ठाकरे परिवारावर बोलण्या इतका उंचीचा मी नाही, ज्यांनी मला इथपर्यंत आणण्यासाठी योगदान दिलं, त्यांच्या प्रती आम्ही कृतज्ञ असल्याचं जाधव म्हणाले.
-
किती रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप होता?
7.2 आणि 7.5 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्याने सगळ्या वेनेजुएलाला हादरवून सोडलं. राजधानी काराकसमध्ये भूकंपाच्या जोरदार धक्क्यांनी अनेक इमारती कोसळल्या. भूकंपाचे तीव्र धक्के जाणवताच हजारो लोक लगेच घर आणि कार्यालयाबाहेर पळाले.
-
वेनेजुएलात शक्तीशाली भूकंप
वेनेजुएलाला लागोपाठ दोन शक्तीशाली भूकंपांनी हादरवून सोडलय. अनेक इमारती कोसळल्या आहेत. USGS म्हणजे यूनायटेड स्टेट्स जियोलॉजिकल सर्वेने या भूकंपात 10 हजार पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवला आहे.
वेनेजुएलामध्ये शक्तीशाली भूकंप झाला आहे. भूकंपाच्या लागोपाठ दोन धक्क्यांमुळे मोठ्या प्रमाणात जिवीतहानी व वित्तहानी झाली आहे.वेनेजुएलाची राजधानी कराकाससह अनेक भागात इमारती कोसळल्या आहेत. भूकंपाचे तीव्र धक्के जाणवताच हजारो लोक लगेच घर आणि कार्यालयाबाहेर पळाले. USGS म्हणजे यूनायटेड स्टेट्स जियोलॉजिकल सर्वेने या भूकंपात 10 हजार पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवला आहे. वेनेजुएलातील पहिला भूकंपाचा धक्का 7.1 रिश्टर स्केल तीव्रतेचा होता. कॅरेबियाई किनाऱ्यावरील मोरोना भागतील पश्चिमेला या भूकंपाचा केंद्रबिंदू होता. त्यानंतर पुन्हा भूकंपाचा जोरदार धक्का जाणवला. 7.2 आणि 7.5 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्याने सगळ्या भागाला हलवून सोडलं. 1700 किलोमीटर लांब असलेल्या ब्राझीलच्या अमेजन सारख्या शहरातही इमारती रिकाम्या कराव्या लागल्या.