Maharashtra News LIVE : महिनाभरात पेट्रोल 170 तर डिझेल 150 रुपयांवर जाणार; विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
Maharashtra News LIVE : मालेगाव तालुका हद्दीतील महामार्गावरील व्हायरल व्हिडिओ प्रकरणी दोघा पोलिसांचे निलंबन. काही वाहन चालकांकडून पैसे वसूल केले जात असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यावरुन झाले निलंबन.

LIVE NEWS & UPDATES
-
जळगावात धक्कादायक प्रकार, चांगल्या दुधात तेलाची भेसळ, गुन्हा दाखल
जळगाव जिल्ह्यातील धरणगाव येथे चांगल्या दुधात रिफाइंड पोमोलीन तेलापासून तयार केलेले कृत्रिम (नकली) दूध मिसळून भेसळ करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दुधाचे फॅट वाढवून नागरिकांच्या आरोग्याशी आणि जिवाशी खेळ खेळणाऱ्या सोमनाथ आनंद माळी (वय ३२) या तरुणाविरुद्ध धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अन्न व औषध प्रशासनाने (FDA) या ठिकाणी छापा टाकून दूध भेसळीचे साहित्य आणि तयार दुधाचे कॅन असा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईदरम्यान अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी आरोपीकडून कृत्रिम दूध नेमके कसे तयार केले जाते, याचे प्रात्यक्षिकही करून घेतले. याप्रकरणी अन्न व औषध अधिकारी आकाश बोराडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
-
इंधनाचा भडका, पेट्रोल-डिझेलपाठोपाठ CNG दोन रुपयांनी महागला
छत्रपती संभाजीनगर शहरातील वाहनधारकांना महागाईचा मोठा फटका बसला असून पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीपाठोपाठ आता सीएनजी (CNG) च्या दरातही किलोमागे २ रुपयांची वाढ झाली आहे. चिकलठाणा परिसरातील BPCL पंपावर सीएनजीचे दर वाढले असून, कालपर्यंत १०१ रुपयांवर असलेला सीएनजी आता १०३.०३ रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे. गेल्या अवघ्या पंधरा दिवसांत सीएनजीच्या दरात तब्बल १२ रुपयांची वाढ झाल्याने वाहनधारकांमध्ये तीव्र असंतोष आहे. दरम्यान, आज शहरात पेट्रोलचे दर ११२ रुपये ८८ पैसे तर डिझेलचे दर ९९ रुपये ५० पैसे प्रति लीटर इतके नोंदवले गेले आहेत.
-
-
वसई-विरार, नालासोपाऱ्यात कडेकोट पोलीस बंदोबस्त; मुस्लिम बांधवांकडून शांततेत बकरी ईद साजरी
मीरारोड येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर, वसई-विरार आणि नालासोपारा परिसरात पोलीस प्रशासन आणि मुस्लिम बांधवांनी कमालीची सतर्कता बाळगत बकरी ईद अत्यंत शांततेत साजरी केली. नालासोपारा, आचोला, स्टेशन परिसर, सोपारा गाव आणि प्रमुख मशिदींसमोर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला होता. कोणताही अनुचित प्रकार न घडता, सर्व नागरिकांनी परस्परांमध्ये एकोपा आणि भाईचाऱ्याचे दर्शन घडवत हा सण उत्साहात साजरा केला.
-
जिल्हा परिषदेतील चुका सुधारण्यासाठी महायुतीचे प्रयत्न; विधान परिषद निवडणुकीपूर्वी आमदारांना सूचना
आगामी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये समन्वय साधण्याचा प्रयत्न सुरू असला, तरी जिल्हा परिषद निवडणुकीत झालेल्या अंतर्गत वादामुळे काही ठिकाणी शिवसेना-भाजप तर कुठे भाजप-राष्ट्रवादी असा सुप्त संघर्ष अद्याप कायम आहे. विशेषतः सातारा जिल्ह्यात मित्रपक्षांमध्ये टोकाचा विरोध पाहायला मिळाला होता, ज्यामुळे आगामी निवडणुकीत कोणताही फटका बसू नये म्हणून महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी धावपळ सुरू केली आहे. स्थानिक पातळीवरील हा संघर्ष रोखण्यासाठी सर्व पक्षांच्या नेत्यांनी पालकमंत्री आणि आमदारांना परस्परांशी सौजन्याने वागण्याच्या कडक सूचना दिल्या असून, लवकरच तिन्ही पक्षांच्या आमदारांची स्वतंत्र बैठक घेऊन या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
-
पांडवकालीन बारव आणि दर्गा परिसरावरून पुन्हा वाद उफाळण्याची चिन्हे
पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील मंचर येथे पांडवकालीन बारव आणि दर्गा परिसरावरून पुन्हा वाद उफाळण्याची चिन्हे दिसत आहेत. ईद निमित्ताने वक्फ बोर्डाकडून नमाज पठणास परवानगी दिल्याच्या निषेधार्थ आज हिंदू जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आमदार संग्राम जगताप आणि संग्रामबापू भंडारे महाराज यांनी दिली आहे.
-
-
जनता महागाईने त्रस्त अन् सरकार दोन धर्मांत तेढ निर्माण करतंय; विजय वडेट्टीवारांचा घणाघात
राज्यात सध्या जनता महागाईने होरपळत असताना सरकार मात्र जाणीवपूर्वक समाजात तणाव आणि दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याचे काम करत असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. सरकार एकीकडे इंधनाचा कोणताही तुटवडा नसल्याचा दावा करत असले, तरी प्रत्यक्षात आरसी (RC) बुक पाहून डिझेल दिले जात आहे. जर आरसी बुक तपासून डिझेल द्यावे लागत असेल, तर सरकारने राज्यात इंधनाचा तुटवडा असल्याचे आधी प्रामाणिकपणे मान्य करावे, असे आव्हान वडेट्टीवार यांनी दिले. तसेच येत्या महिनाभरात पेट्रोल १७० रुपये तर डिझेल १५० रुपयांवर जाईल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.
-
जळगाव जिल्ह्यात 791 ग्रामपंचायतींसाठी सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी
जळगाव जिल्ह्यात मुदत संपलेल्या 791 ग्रामपंचायतींसाठी ‘जुलै’मध्ये सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी. 791 ग्रामपंचायतीसाठी 12 जून रोजी विशेष ग्रामसभेत काढली जाणार आरक्षण सोडत. 17 जुलै रोजी या निवडणुकीसाठी अंतिम प्रभाग रचना जाहीर होणार आहे. जुलै महिन्यात ‘गावकी’च्या राजकारणाचा ‘माहोल’ तापणार. इच्छुकांनी आतापासूनच सोयीच्या प्रभागांकडे नजरा वळविल्या आहेत.
-
देवनार बकरा मंडीत 70 हजार बकरे अजूनही विक्रीसाठी उपलब्ध
बकरी ईदनिमित्त देवनार बकरा मंडीत खरेदी-विक्रीला प्रचंड वेग. 17 मे पासून सुरू झालेल्या या विशेष बाजारात अंतिम टप्प्यात गर्दी वाढली आहे. अधिकृत लाईव्ह काउंटिंग बोर्डनुसार 1 लाख 45 हजारांहून अधिक बकरे इथे दाखल झालेत. आतापर्यंत ७५ हजार ५०० पेक्षा अधिक बकऱ्यांची विक्री पूर्ण. सुमारे 70 हजार बकरे अजूनही विक्रीसाठी उपलब्ध.
-
टायर फुटून कार कंटेनरला धडकली, मिरा-भाईंदर काशिमिरा ब्रीजवर भीषण अपघात
मिरा-भाईंदर काशिमिरा ब्रीजवर भीषण अपघात. ब्रिझा कारचा टायर फुटला आणि कार कंटेनरला धडकली. त्यात 19 वर्षीय मुलगा जागीच ठार तर चार जण जखमी. फाउंटन वरून ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या कारचा टायर फुटला आणि मुंबईहून गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनरला कार धडकली. या भीषण अपघातात कारमधील 19 वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाला असून,चार जण जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, तर मुलाचा मृतदेह सरकारी रुग्णालयात पोस्टमार्टम साठी पाठवण्यात आला आहे.
-
सिंहस्थ कुंभमेळ्याचा ध्वजस्तंभ शिलान्यास सोहळा 11 जूनला
सिंहस्थ कुंभमेळ्याचा ध्वजस्तंभ शिलान्यास सोहळा 11 जूनला. जगद्गुरू श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज, राज्याचे कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांची प्रमुख उपस्थिती असणार. गंगा गोदावरी पंचकोठी पुरोहित संघ यांच्या वतीने कुंभमेळा ध्वजस्तंभ शिलान्यास पूजन सोहळ्याचे आयोजन. 11 जून रोजी रामकुंडावर ध्वजस्तंभ शिलान्यास पूजन.
-
दुर्गाडी मंदिर प्रवेशबंदीवरून कल्याणमध्ये वातावरण तापलं
दुर्गाडी परिसरात शिवसेना-भाजप-ठाकरे गटाचं आंदोलन. दुर्गाडी मंदिर प्रवेशबंदीवरून कल्याणमध्ये वातावरण तापलं. बकरी ईद निमित्त दुर्गाडी किल्ल्यावर हिंदूंना प्रवेश बंद?. हनुमान चालीसा लावून आंदोलन करण्याचा इशारा. आंदोलनावर ड्रोनद्वारे ठेवली जाणार करडी नजर. दुर्गाडी परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त. आंदोलनामुळे कल्याण शहरात सुरक्षा व्यवस्था वाढवली.
धाराशिव जिल्ह्यात पीक विम्याचा तिढा कायम आहे. त्रुटी असल्याने पुन्हा शेतकऱ्याचे अर्ज फेर तपासणीसाठी दिले आहेत. धाराशिव जिल्ह्यात प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगामा तर्गत तब्बल 4 हजार 102 शेतकऱ्यांचे अर्ज त्रुटींमुळे परत पाठवले. या प्रकरणाची गंभीर दखल घेत जिल्हास्तरीय समन्वय समितीने विमा कंपनीला अपात्र अर्जांची पुनर्तपासणी करून पात्र शेतकऱ्यांना लाभ देण्याचे दिले आदेश. अर्जांमध्ये आधार क्रमांकातील तफावत, बँक खात्याची अपूर्ण माहिती, सातबारा उताऱ्यातील विसंगती, पेरणी तपशीलातील चुका तसेच आवश्यक कागदपत्रांची अपूर्णता आढळून आल्याने विमा रखडला. प्रशासनाकडून संबंधित शेतकऱ्यांना तातडीने त्रुटींची पूर्तता करण्याचे आवाहन. गोंदिया जिल्ह्याला दोन दिवस रेड अलर्ट घोषित करण्यात आला आहे. गोंदिया जिल्ह्यात दोन दिवस उष्णतेच्या तीव्र लाटा. नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन. शक्य असल्यास 11 ते 4 घराबाहेर पडू नये प्रशासनाचे आव्हान.