Maharashtra News LIVE : मुंबईला मुसळधार पावसाचा तडाखा, सकल भागात साचले पाणी..

Maharashtra News LIVE Updates : मुंबईसह राज्याच्या वेगवेगळ्या भागात पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. सर्व यंत्रणा हाय अलर्टवर आहेत. कल्याण-डोंबिवलीत पावसाची संततधार कायम आहे. मध्यरात्रीनंतर पाऊस कमी झाला. पण तरीही रिमझिम सुरूच आहे.

Maharashtra News LIVE : मुंबईला मुसळधार पावसाचा तडाखा, सकल भागात साचले पाणी..
Breaking news
| Edited By: | Updated on: Jul 02, 2026 | 9:21 AM

LIVE NEWS & UPDATES

  • 02 Jul 2026 09:50 AM (IST)

    शाळा सुरू… पण इमारती जीर्ण; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात! दुरुस्ती कधी होणार?

    धाराशिव जिल्ह्यामध्ये 1086 जिल्हा परिषद शाळेपैकी 690 शाळा 40 वर्षांपूर्वी बांधलेल्या. जिल्ह्यात पावसाळ्यात जिल्हा परिषदेच्या जीर्ण शाळांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर. सुमारे 400 शाळा मोडकळीस आल्याची बाब समोर, तसेच, अतिवृष्टीमुळे 137 शाळांच्या इमारतींचे नुकसान झाले असून अनेक ठिकाणी छत गळती, भिंतींना तडे, वर्गखोल्यांची पडझड. मोडकळीस आलेल्या इमारतींमध्ये विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन घ्यावे लागत आहे शिक्षण पुनर्बांधणीसाठी विशेष निधी मंजूर करावा, अशी मागणी शिक्षक, पालक आणि विविध संघटनांकडून करण्यात येत आहे.

  • 02 Jul 2026 09:40 AM (IST)

    मुंबईसह उपनगरांना पावसाचा तडाखा

    गेल्या दोन दिवसांपासन मुसळधार पाऊस सुर आहे. त्यामध्येच काल रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसान अनेक सखल भागात पाणी साचले. पाण्यातून वाट काढत नागरिकांना जावे लागतंय.

  • 02 Jul 2026 09:30 AM (IST)

    अमरावती शहरानजीकचा रहाटगाव-शेगाव रस्ता बनला जीवघेणा

    रस्त्याचे काम अपूर्ण असल्याने पावसामुळे पडले रस्त्यावर जीवघेणे खड्डे. रस्त्यावरील खड्ड्यात असलेल्या पाण्याचा अंदाज येत नसल्याने दुचाकीस्वारांचे मोठे अपघात. रस्त्याचे बांधकाम पूर्ण करण्याची नागरिकांची मागणी….

  • 02 Jul 2026 09:20 AM (IST)

    रस्त्याचे काँक्रिटीकरण पूर्ण होत नाही, तोच रस्त्याला तडे

    मनपा आयुक्तांच्या पाहणीत निकृष्ट दर्जाचे काम आढळल्याने रस्ता फोडून पुन्हा बनविण्याचे आदेश. नाशिक त्रंबकेश्वर मार्गावरील बॉश सर्कल परिसरातील रस्त्याच्या काही भागाला तडे गेल्याने पुन्हा फोडून बनविण्याचे आदेश. संबंधित ठेकेदाराला प्रतिदिन एक लाख 84 हजार रुपयांचा ही दंड. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू आहे नाशिक शहरात रस्त्यांचे कामे

  • 02 Jul 2026 09:05 AM (IST)

    दमदार पावसाने खरीपाला दिलासा

    गोंदियात भात पेरणीला वेग. पावसाच्या आगमनाने शेतात लगबग. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध होती, त्यांनी यापूर्वीच पेरणी पूर्ण केली होती. ज्या शेतकऱ्याकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध असे शेतकऱ्यांनी रोहिणीची कामे सुरू. गोंदियात पावसाचा दिलासा. शेतकरी पेरणीच्या कामात व्यस्त. जिल्हाभरात भात पेरणी आणि रोहिणी सुरू…..

  • 02 Jul 2026 08:58 AM (IST)

    शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेविका माला साळवे-गवळे यांना मोठा धक्का

    नाशिक जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने जात प्रमाणपत्र अवैध ठरवले. जात प्रमाणपत्र जप्त करून शासनाकडे जमा करण्याचे आदेश. सुरेखा दिनकर चंद्रमोरे यांच्या तक्रारीनंतर प्रकरणाची चौकशी. समितीच्या चौकशीत दोन्ही बाजूंची सुनावणी पूर्ण. कुटुंबाचा १० ऑगस्ट १९५० पूर्वीचा मूळ रहिवास छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात असल्याचा निष्कर्ष.

  • 02 Jul 2026 08:47 AM (IST)

    Maharashtra Rain : गोंदियात भात पेरणीला वेग

    गोंदियात दमदार पावसाने खरीप हंगामाला दिलासा मिळाला आहे. गोंदियात भात पेरणीला वेग आला आहे. पावसाच्या आगमनाने शेतात लगबग वाढली आहे. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध होती, त्यांनी यापूर्वीच पेरणी पूर्ण केली होती. गोंदियात पावसामुळे दिलासा मिळाला आहे. शेतकरी पेरणीच्या कामात व्यस्त आहेत.

  • 02 Jul 2026 08:42 AM (IST)

    कल्याणमध्ये चार अल्पवयीन विद्यार्थिनी एकाच वेळी बेपत्ता

    एकाच शाळेतील चार अल्पवयीन विद्यार्थिनी एकाच वेळी बेपत्ता. अपहरणाचा संशय, पोलिसांची राज्यभर शोधमोहीम. कल्याण बाजारपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अत्यंत धक्कादायक आणि चिंताजनक घटना. एका नामांकित उर्दू हायस्कूलमध्ये शिक्षण घेणाऱ्या चार अल्पवयीन विद्यार्थिनी एकाच वेळेला बेपत्ता झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. 29 जून रोजी चारही मुली शाळेसाठी घरातून बाहेर पडल्या. मात्र घरी परतल्याच नाहीत.

  • 02 Jul 2026 08:35 AM (IST)

    Mumbai Rain Update : मुंबई महापालिकेने नागरिकांना काय आवाहन केलय?

    हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केल्यानंतर मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस सुरु आहे. पुढचे काही दिवस असाच मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबईत अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचल्याच्या घटना घडल्या आहेत. नागरिकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडा असे आवाहन मुंबई महानगरपालिकेने केले आहे.

  • 02 Jul 2026 08:28 AM (IST)

    Nalasopara Rain Update : नाशिक शहरासह जिल्ह्यासाठी ‘यलो अलर्ट’

    नाशिक शहरासह जिल्ह्यासाठी हवामान खात्याकडून ‘यलो अलर्ट’ कायम. हवामान खात्याने दिला 2 जुलैपासून शहरासह जिल्ह्याला ‘यलो अलर्ट’. घाटमाथा व आजूबाजूच्या परिसराकरिता ऑरेंज अलर्ट’ जारी. पश्चिम भागातील ईगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ तालुक्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज. 4 जुलैपासून जिल्ह्यात दमदार पावसाची शक्यता आहे.

  • 02 Jul 2026 08:26 AM (IST)

    Nalasopara Rain Update : नालासोपारा धानिवबाग परिसरातील रस्ता पाण्याखाली

    नालासोपारा धानिवबाग परिसरातील रस्ता पाण्याखाली गेला आहे. नालासोपारा स्टेशन ते पेल्हार फाटा महामार्गाकडे जाणारा हा मुख्य रस्ता आहे. रस्त्यात खड्डे आणि त्यात पाणी साचले असल्याने वाहनधारकांना मार्ग काढताना मोठी कसरत करावी लागत आहे. मुख्य रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतूक कोंडी होत आहे.

  • 02 Jul 2026 08:18 AM (IST)

    Maharashtra Rain Update : मुंबई-गोवा महामार्गाची दयनीय अवस्था

    पहिल्याच पावसामध्ये मुंबई-गोवा महामार्गाची दयनीय अवस्था झाली आहे. मुंबई गोवा महामार्गावर कोलेटी नजीक मोठमोठे खड्डे पडले आहेत. मुसळधार पाऊस त्यात खड्ड्यांमुळे वाहन चालक त्रस्त झाले आहेत.

  • 02 Jul 2026 08:16 AM (IST)

    Thane Rain Update : ठाणे जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट; केडीएमसीची यंत्रणा हायअलर्टवर

    ठाणे जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून केडीएमसीची यंत्रणा हायअलर्टवर आहे. महापौर व आयुक्तांकडून कमांड कंट्रोल सेंटरमधून परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे. सखल व पूरप्रवण भागांवर विशेष नजर आहे. आपत्ती व्यवस्थापन कक्ष 24 तास कार्यरत आहे. नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये असं महापालिकेचे आवाहन केलं आहे. आपत्कालीन मदतीसाठी 0251-2211866 आणि 1800-233-0045 या टोल-फ्री हेल्पलाईनवर संपर्क साधण्याचे आवाहन केलं आहे.

  • 02 Jul 2026 08:15 AM (IST)

    Kalyan Dombivali Rain Updates : कल्याण-डोंबिवलीत पावसाची संततधार कायम

    गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने कल्याण-डोंबिवलीत जनजीवन विस्कळीत केले. काल झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक सखल भाग आणि रस्त्यांवर पाणी साचले होते.मध्यरात्रीनंतर पावसाचा जोर काहीसा ओसरल्याने साचलेल्या पाण्याचा निचरा झाला. मात्र आजही शहरात ढगाळ वातावरण असून रिमझिम पाऊस सुरूच आहे. अधूनमधून पावसाचा जोर वाढत असून पावसाचा जोर दिवसभर कायम राहिला तर आज पुन्हा सखल भागात पाणी साचण्याची शक्यता वर्तवली जात आहे

जून महिना सुरु झाल्यानंतर सर्वचजण पावसाच्या प्रतिक्षेत होते. पहिले तीन आठवडे दडी मारणाऱ्या पावसाने अखेरच्या आठवड्यापासून जोर धोरला आहे. जुलै महिन्याच्या पहिल्या दोन दिवसातच पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे. मुंबईसह महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात दमदार पाऊस सुरु आहे. मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस सुरु आहे. पुढचे काही दिवस असाच मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. ठाणे जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट असून केडीएमसीची यंत्रणा हाय अलर्टवर आहे. महापौर व आयुक्तांकडून कमांड कंट्रोल सेंटरमधून परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे. या पावसामुळे शेतकरी मात्र सुखावला आहे. यंदा एल निनोचं संकट असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे सरासरीपेक्षा कमी पाऊस बरसणार असा अंदाज आहे. पण आता जसा पाऊस कोसळतोय, तीच स्थिती सप्टेंबरपर्यंत कायम राहिल्यास बळीराजावर संकट राहणार नाही. त्याशिवाय पाणी पुरवठा करणारे सर्व तलाव भरतील. पिण्याच्या पाण्याची चिंता राहणार नाही.

Follow Us