Maharashtra News LIVE : महाध्वजारोहणासाठी नाशिक सज्ज! सिंहस्थ कुंभमेळ्याला होणार आज सुरुवात
Maharashtra News LIVE : आज नाशिक येथे सिंहस्थ कुंभमेळ्याला सुरुवात होणार आहे. त्यासाठी 12 वाजून 2 मिनिटांच्या मुहूर्तावर नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये ध्वजारोहण सोहळा पार पडणार आहे.

LIVE NEWS & UPDATES
-
भूमी अभिलेख विभागात बंपर प्रमोशन!
१०६ अधिकाऱ्यांना पदोन्नती. फडणवीस सरकारची दिवाळी भेट. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे विदर्भ, मराठवाडा, कोकणातील रिक्त जागा भरण्याला प्राधान्य. दोन उप संचालक, १७ जिल्हा अधीक्षक, ८७ उप अधीक्षक अधिकाऱ्यांचा समावेश. जमीन मोजणी आणि हद्द निश्चिती, डिजिटल सातबारा आणि फेरफार,नकाशा मंजुरी आणि सनद वितरण होणार गतिमान
-
धाराशिवच्या परांडा येथे ऊस मजुरांना डांबून ठेवल्या प्रकरणी दोन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल
धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील कौडगाव येथे ऊसतोडणीसाठी आलेल्या परप्रांतीय मजुरांना डांबून ठेवून त्यांच्याकडून ऊसतोडणी करून घेतली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. घटनेची माहिती मिळताच परंडा पोलिसांनी धडक कारवाई करत डांबून ठेवलेल्या तब्बल ४२ कामगारांची सुरक्षित सुटका केली. या प्रकरणी शिवाजी सोमनाथ देवकर आणि समाधान अशोक पाडुळे (दोघे रा. कौडगाव, ता. परंडा, जि. धाराशिव) या दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-
-
भारताच्या अस्तित्वासाठी एक व्यक्तीचे योगदान आहे- अमित साटम
भारताच्या अस्तित्वासाठी एक व्यक्तीचे योदादान आहे सरदार पटेल यांचं. पाच जुलै १९४७ मध्ये एक भाषणात सांगितलं की सगळे एकत्र आलं पाहिजे. आपण जर एकत्र नाही आलो तर आपण अराजकतेच्या जवळ जाऊ ते होऊ नये यासाठी एक होण्याची गरज असल्याचे ते म्हणाले म्हणून त्यांनी प्रयत्न केले.
-
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्र्यंबकेश्वरकडे रवाना..
नाशिक शहरातून रवाना…
काल मध्यरात्री केली होती रामकुंड परिसराची पाहणी..
नाशिक मध्ये दाखल होताच पोहचले होते रामकुंड परिसरात..
शासकीय विश्रामगृहावरून फडणवीस झाले आता त्र्यंबकेश्वरकडे रवाना… -
नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्यासाठी भाविकांची मांदियाळी
जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्र महाराजांचे भक्तगण मोठ्या संख्येने नाशिकमध्ये दाखल…
– रत्नागिरीच्या नाणीज येथून हजारो भक्तांची ऐतिहासिक सोहळ्यासाठी उपस्थिती…
– भक्तांच्या वस्त्रांवरून ‘झाडे लावा, झाडे जगवा’चा पर्यावरण संवर्धनाचा संदेश…
– राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ध्वजारोहण होत असल्याचा महिला भाविकांना अभिमान…
– महिला राष्ट्रपतींच्या हस्ते सिंहस्थ कुंभमेळ्याचे ध्वजारोहण…. महिलांसाठी अभिमानाचा ऐतिहासिक क्षण… -
-
माझ्या लेव्हलला आलो तर मी नवनाथ बन यांना पुणेसह महाराष्ट्रात फिरू देणार नाही- रवींद्र धंगेकर
नवनाथ बन हे पत्रकार आहेत कोणाचेही फोटो काढतात बसतात आणि फोटो काढून दाखवतात. माझ्या लेव्हलला आलो तर मी नवनाथ बन यांना पुणेसह महाराष्ट्रात फिरू देणार नाही नवनाथ बन हा पगारापेक्षा जास्त बोलतोय. नवनाथ बन हा पगारी आहे त्याला दाखवावे कुणासाठी काहीतरी करतोय तो तुकड्यावर जगत आहे आम्ही कुणाच्या तुकड्यावर जगत नाही, अशी घणाघाती टीका रवींद्र धंगेकर यांनी केली. भारतीय जनता पार्टीतल्या लोकांना माहिती झारीतले शुक्राचार्य कोण आहेत , असा सवालही शिंदे सेना नेते धंगेकर यांनी विचारला.
-
5 स्टार मसाले कंपनीवर अन्न व औषध प्रशासनाचा छापा
सेफ फूड सेफ महाराष्ट्र या मोहिमेअंतर्गत छत्रपती संभाजीनगरमध्ये अन्न व औषध प्रशासनाने मसाला उत्पादन कंपनीवर कारवाई केली आहे. गाढे जळगाव येथील मेसर्स 5 स्टार मसाले या कंपनीवर छापा टाकून तब्बल 2 टन 8 क्विंटल 2 किलो मसाल्यांचा साठा जप्त करण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेल्या मालाची एकूण किंमत 16 लाख 40 हजार 900 रुपये आहे. या कारवाईनंतर संबंधित उत्पादन युनिटचा अन्न परवाना तात्काळ निलंबित करण्यात आला आहे. अन्न सुरक्षा अधिकारी पी. एस. कुचेकर यांच्या पथकाने गट क्रमांक 299/पी, गाढे जळगाव, तालुका आणि जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथील या कारखान्यावर ही कारवाई केली. यामध्ये 488 किलो हळद पावडर, 798 किलो मटण मसाला, 918 किलो मिरची पावडर आणि 598 किलो धणे पावडर जप्त करण्यात आली आहे.
-
कापूस वेचणीला स्थानिक मजूर मिळेना, मध्य प्रदेशातून मजूर आणून कापूस वेचणी
शेतकऱ्यांच्या शेतात पांढरं सोनं अर्थात कापूस तयार झालाय. मात्र हा कापूस वेचण्यासाठी मजूर मिळत नसल्याने शेतकऱ्यांसमोर नवं संकट उभं राहिल आहे. अकोला जिल्ह्यातील रामगाव परिसरात कापूस वेचणीसाठी मध्य प्रदेशातून मजूर आणावे लागत आहेत. तर यंदा पावसाने दडी मारल्याने कापसाच्या उत्पादनात मोठी घट झाली असून दरवर्षी एकरी 12 ते 13 क्विंटल कापूस उत्पादन होणाऱ्या शेतात यंदा केवळ 3 ते 4 क्विंटल उत्पादन होत आहे. आणि त्यातच कापूस वेचणीसाठी किलोमागे 14 रुपये मोजावे लागत असल्याने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघणं कठीण झाल असून एकीकडे उत्पादनात घट, दुसरीकडे वाढता खर्च. अशा दुहेरी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसमोर आता दिवाळी कशी साजरी करायची,असा प्रश्न निर्माण झाला आहे.
-
बीड ऐन दुष्काळाच्या काळात ग्रामपंचायत पातळीवरचे कामे खोळंबली
बीड जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता वाढत आहे. ग्रामपंचायत पातळीवर उपाययोजना करण्याची गरज आहे यासाठी जिल्ह्यातील अनेक ग्रामपातळीवरचे अधिकारी आणि लोकप्रतिनिधी कामाच्या पाठपुराव्यासाठी कार्यालयांमध्ये चकरा मारत आहेत. बीड जिल्ह्याचा पंचायतचा कारभार सांभाळणारे उपमुख्य कार्यकारी अधिकारी किशोर काळे वारंवार गैरहजर राहतात, कार्यालयात त्यांची भेटच होत नसल्याच्या तक्रारी लोकांकडून होत आहेत. दुष्काळाच्या काळात उपाययोजना करणारा आणि प्रभावीपणे काम करणारा अधिकारी नियुक्त करावा अशी मागणी होत आहे. यासंदर्भात त्यांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता.. माझ्या मागे बैठक आहे असे सांगून किशोर काळे यांनी कार्यालयातून पळ काढला.
-
हिना गावित यांचा ‘एकला चलो’चा नारा
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचे सांगत माजी खासदार डॉ. हिना गावित यांचा ‘एकला चलो’चा नारा दिला. नंदुरबार भाजप आणि शिवसेनेतील अंतर्गत वाद पुन्हा एकदा समोर आला. स्वबळावर निवडणूक लढविण्याची तयारी आम्ही करत आहोत. मात्र, निवडणुका जाहीर झाल्यानंतर या विषयावर अधिक चर्चा करू. मागील काळात जिल्हा परिषदेवर भाजपची सत्ता असताना सर्वाधिक कामे केली आहेत. सर्वाधिक कामे केली असल्यामुळे मागील काळाच्या तुलनेत आता सर्वाधिक उमेदवार आमचे निवडून येतील.
-
७० ते ८० जणांचे प्राण वाचवणाऱ्या आर्याच्या शौर्याची मुख्यमंत्र्यांकडून दखल
पिंपरी-चिंचवडमधील भीषण सोसायटी आग प्रकरणात ७० ते ८० रहिवाशांचे प्राण वाचवणाऱ्या २० वर्षीय आर्या कांबळेच्या धाडसाची थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतली आहे.मुख्यमंत्र्यांनी पत्र पाठवून आर्याचे विशेष कौतुक करत अभिनंदन केलंय.मध्यरात्री लागलेल्या आगीच्या संकटात आर्याने गॅलरीतून उडी मारली. यात तिच्या पायाला गंभीर दुखापत झाली, मात्र स्वतःच्या वेदना बाजूला ठेवत तिने सोसायटीतील रहिवाशांना जागं करून सुरक्षित स्थळी जाण्यास मदत केली. या आगीत १७ दुचाकी आणि ४ चारचाकी जळून खाक झाल्या; मात्र आर्याच्या प्रसंगावधानामुळे मोठी जीवितहानी टळली. तिच्या शौर्याचा महाराष्ट्राला अभिमान असल्याची भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे.
-
AI डेटा सेंटरसह चार प्रकल्पाविरोधात आज रास्तारोको आंदोलन
सोलापूरच्या उजनी धरणावरील AIडेटा सेंटरसह एकूण 4 प्रकल्पावरून राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमक झाला आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून उजनी धरणावरील AI डेटा सेंटरसह चार प्रकल्पाविरोधात आज रास्तारोको आंदोलन करण्यात येणार आहे. राष्ट्रवादी SP गटाचे आमदार रोहित पवार हे आंदोलनात सहभागी असणार आहेत. तर दुसरीकडे भाजपकडून उजनीवरील 4 प्रकल्पाच्या समर्थनार्थ आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार देवेंद्र कोठेंच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात येणार आहे. उजनी धरणावर 1 लाख 65 हजार कोटींचे एकूण 4 प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. यामध्ये Ai डेटा सेंटर, फ्लोटिंग सोलर पॅनल, लघु अणुऊर्जा प्रकल्प आणि ग्रीन हायड्रोजन प्रकल्प उभारण्यात येणार आहेत.
-
हत्तीला पिटाळन्यासाठी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी अंगावर फेकले बॉम्ब
टस्कर हत्तीला पिटाळन्यासाठी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी हत्तीच्या अंगावर सुतळी बॉम्ब फेकल्याचे समोर आले आहे. चंदगड तालुक्यातील मोटणवाडी येथे हा प्रकार घडला. गेल्या दोन दिवसापासून अण्णा नावाच्या सर्वात मोठ्या टस्कर हत्तीचा वावर होता. हत्तीला परत जंगलात पाठवण्यासाठी विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून चुकीच्या पद्धतीचा वापर करण्यात आला.
-
लोणावळा रेल्वे स्थानकात राडा, तिकीट तपासणीसाला प्रवाशाकडून बेदम मारहाण
लोणावळा रेल्वे स्थानकात तिकीट तपासणीदरम्यान टीसी आणि प्रवाशामध्ये जोरदार वाद झाला. या वादाचे रूपांतर काही क्षणांतच हाणामारीत झालं. संतप्त प्रवाशाने टीसीला बेदम मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. घटनेमुळे रेल्वे स्थानकात काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. दरम्यान, रेल्वे सुरक्षा दल आणि लोहमार्ग पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
-
बहुप्रतीक्षित रुग्णालयाचे शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने उद्घाटन
नांदेडमधील बहुप्रतीक्षित रुग्णालयाचे शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने उद्घाटन करण्यात आले आहे. पावडेवाडी येथील ज्येष्ठ शिवसैनिकांच्या हस्ते कापली रिबीन. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार होते रुग्णालयाचे उदघाटन. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतांना झालं होतं रुग्णालय मंजूर.
-
चंद्रपूर जिल्ह्यात एकाच दिवशी वाघाचे तीन हल्ले
चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या एका आठवड्यात तीन जणांचा वाघांच्या हल्ल्यात मृत्यू झाला असतानाच आज वाघाच्या हल्ल्यांच्या घटनांनी पुन्हा एकदा खळबळ उडवली आहे. एकाच दिवशी चंद्रपूर जिल्ह्यात तीन वेगवेगळ्या ठिकाणी वाघाने हल्ले केले असून या मधे दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.
-
उत्तर मुंबईत केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या नेतृत्वाखाली पदयात्रेचे आयोजन
भारतीय जनता पार्टी उत्तर मुंबईच्या वतीने या पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या पदयात्रेत केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्यासह उत्तर मुंबईतील सर्व आमदार आणि मंत्री आशिष शेलार, मंगल प्रभात लोढा, मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम सहभागी होणार आहेत.
-
ठाकरेंच्या अडचणीत वाढ, पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल
वाशिम जिल्ह्यातील वनोजा इथं रस्ता रोको केल्या प्रकरणी ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आंदोलनाला पोलिसांची परवानगी नसतानाही मोठ्या संख्येने एकत्र येऊन मंगरूळपीर -अकोला महामार्ग रोखून धरल्याप्रकरणी गुन्हे दाखल.
-
वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराडवर गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल
वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराडवर गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल झाला आहे. महिलेच्या घरात घुसून बंदुकीने जीवे मारण्याची धमकी देणे, पोक्सो कलम तसेच महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
आज सिंहस्थ कुंभमेळ्याचा औपचारिक प्रारंभ होणार आहे. शनिवारी 31 डिसेंबर रोजी नाशिकमधील रामकुंड येथे ध्वजारोहण होणार आहे. त्यासाठीची जय्यत तयारी करण्यात आली आहे. आज सिंहस्थ कुंभमेळ्याचा 12 वाजून 2 मिनिटांच्या मुहूर्तावर नाशिक आणि त्र्यंबकेश्वर मध्ये ध्वजारोहण सोहळा होणार आहे. त्यासाठी नाशिकमध्ये राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू, राज्यपाल जिष्णु देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार यांच्यासह अर्दे राज्य मंत्रिमंडळ, व्हीआयपी आणि विविध आखाड्याच्या साधु-संतांची मांदियाळी होणार आहे.
महाराष्ट्रातील अनेक भागांत काल पासून पावसाने जोरदार हजेरी लावली. नाशिक, ठाणे, पिंपरी-चिंचवड आणि मुंबईसह विविध ठिकाणी अचानक पाऊस सुरू झाल्याने नागरिकांची धावपळ उडाली. काही भागांत मुसळधार पावसामुळे जनजीवनावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तर दुष्काळसदृश परिस्थितीचा सामना करणाऱ्या काही भागांतील नागरिक आणि शेतकऱ्यांना पावसामुळे दिलासा मिळाला आहे.
कॉकरोच जनता पार्टी जूनमध्ये नीट पेपर लीक प्रकरणी दिल्लीत आंदोलन करत होती. त्या वेळी पंजाबी गायक दिलजीत दोसांज यांना सीजेपीच्या प्रोटेस्टबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा दिलजीत म्हणाला होता की, मला या सगळ्यापासून दूरच ठेवा, मी एक कलाकार आहे, राजकारणी नाही. दिलजीतच्या या कमेंटवर अभिजीत दीपके यांनी नाराजी व्यक्त केली होती. आता दिल्लीत झालेल्या कॉन्सर्टमध्ये दिलजीतने आपल्या ‘मी कलाकार आहे’ या कमेंटवर प्रतिक्रिया दिली. त्यानंतर आता अभिजीत दीपके यांनी सोशल मीडियावर दिलजीतसाठी एक पोस्ट शेअर केली आहे.