AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra News LIVE : बीड : तहसीलदाराला 6 लाखांची लाच घेताना अटक

| Edited By: | Updated on: Jun 06, 2026 | 10:48 PM
Share

Maharashtra News LIVE : आज नवी दिल्लीतील जंतरमंतर मैदानावर कॉकरोच जनता पार्टीने आंदोलनाची हाक दिली आहे. संस्थापक अभिजीत दीपके हे दिल्लीत दाखल झाले असून थोड्याच वेलात आंदोलनाला सुरूवात होईल. महत्वाच्या घडामोडींचे लेटेस्ट अपडेट्स वाचण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.

Maharashtra News LIVE : बीड : तहसीलदाराला 6 लाखांची लाच घेताना अटक

कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दीपके यांनी आज दिल्लीतील जंतर मंतर इथे आंदोलनाची हाक दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दिपके हे जंतरमंतर येथे मोठे आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. मात्र शांततेने या आंदोलनात सहभागी व्हा असं आवाहन त्यांनी तरूणांना केलं आहे. NEET, CUET इत्यादी राष्ट्रीय परीक्षांमधील कथित गैरव्यवहारांमुळे ते केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. नीट परीक्षांमधील पारदर्शकतेची मागणी त्यांनी केली आहे. संस्थापक अभिजीत दीपके हे दिल्लीत दाखल झाले असून थोड्याच वेलात आंदोलनाला सुरूवात होईल. छत्रपती शिवाजी महाराजांचा आज 353 वा शिवराज्याभिषेक सोहळा रायगडावर पार पडणार आहे. यासाठी गडावर जय्यत तयारी करण्यात आली आहे. गडावर आज विविध लोककला देखील सादर केल्या जाणार आहेत. यासह देश, क्रीडा, मनोरंजन तसेच राज्यातील इतर महत्त्वाच्या घडामोडी आणि अपडेट इथं वाचा.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 06 Jun 2026 08:54 PM (IST)

    नवी मुंबई : इंधन दरवाढ आणि महागाईच्या विरोधात ठाकरे सेना रस्त्यावर

    नवी मुंबईत ठाकरे सेनेच्या वतीने वाढलेले पेट्रोल डिझेलचे भाव आणि महागाई विरोधामध्ये आंदोलन करण्यात आले. यावेळी राज्य आणि केंद्र सरकारच्या नियोजनाचा अभाव आणि विस्कळीत अर्थ व्यवस्था याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली तर पेट्रोल पंपावर मेलोडी चॉकलेट वाटून निषेध करण्यात आला. जिल्हा प्रमुख, महिला पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते.

  • 06 Jun 2026 08:40 PM (IST)

    चिपळूणमध्ये अचानक जोरदार पावसाला सुरुवात

    चिपळूणमध्ये अचानक जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. विजांच्या कडकडाटासह आणि गडगडाटासह मुसळधार सरी कोसळत आहे. दिवसभराच्या उकाड्यानंतर वातावरणात अचानक बदल झाला आहे, त्यामुळे शहरासह परिसरात गारवा निर्माण झाला आहे.

  • 06 Jun 2026 08:24 PM (IST)

    शरद पवार उद्या बारामतीत नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करण्याची शक्यता

    ज्येष्ठ नेते शरद पवार कोल्हापूरचा दौरा संपल्यानंतर उद्या बारामती मध्ये मुक्कामी असणार आहेत. ते दुपारी 3 नंतर बारामती मधील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करण्याची शक्यता आहे. शुक्रवारी बारामती मध्ये अवकाळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान झाले होते, या बाबतीत ते शेतकऱ्यांशी चर्चा करण्याची शक्यता आहे.

  • 06 Jun 2026 08:08 PM (IST)

    मिरा-भाईंदरमध्ये काँग्रेसचे NEET पेपर लीक प्रकरणावर आंदोलन

    मिरा-भाईंदर शहरात आज काँग्रेस पक्षाच्या वतीने NEET पेपर लीक प्रकरणाच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले. पेपरफुटीमुळे विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ होत असल्याचा आरोप करत काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. यावेळी पेपर लीक प्रकरणामुळे आत्महत्या केल्याचा दावा करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांनाही श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

  • 06 Jun 2026 07:28 PM (IST)

    बीड : तहसीलदाराला 6 लाखांची लाच घेताना अटक

    बीडच्या ACB पथकाने जालना जिल्ह्यातील अंबड तहसीलदार विजय चव्हाण याला 6 लाख 40 हजारांची लाच घेताना अटक केली आहे. एका कंत्राटदाराकडे दरमहा सात लाख रुपयांची मागणी तहसीलदार विजय चव्हाण याने केली होती. तडजोडीअंती सहा लाख 40 हजार रुपये ठरले. हे पैसे स्वीकारताना लाचलुचपत विभागाच्या बीड येथील उपविभागीय अधिकारी चिट्टमपल्ले यांच्या पथकाने  चव्हाण याला  रंगेहाथ पकडले.

  • 06 Jun 2026 07:14 PM (IST)

    कांदिवली पूर्व येथील १२० फूट रस्त्याचे उद्घाटन केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते

    कांदिवली पूर्व येथील १२० फूट रस्त्याचे उद्घाटन केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते होत आहे. या प्रसंगी  मंत्री भरत सेठ गोगावले, प्रवीण दरेकर, योगेश सागर, शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे आणि भाजप आमदार अतुल भातखळकर उपस्थित आहेत. यावेळी भाजप आणि शिवसेना कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी सुरु आहे. हा रस्ता मार्गी लावण्यासाठी शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे आणि भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी सातत्याने प्रयत्न केले होते. सुरुवातीच्या काळात या रस्त्याच्या श्रेयवादावरून दोन्ही आमदारांमध्ये बॅनरवरून वादही पाहायला मिळाला होता.

  • 06 Jun 2026 06:58 PM (IST)

    जळगावात वादळी वाऱ्यामुळे नशिराबाद येथील टोल नाक्याच्या छताचे पत्रे उडाले

    जळगावात वादळी वाऱ्यामुळे नशिराबाद येथील टोल नाक्याच्या छताचे पत्रे उडाले

    जोरदार वादळी वाऱ्यामुळे टोलनाक्याच्या छतावरील पत्र उडाल्याने टोल नाक्याच्या दोन लेन बंद

    टोलनाक्याच्या लेन बंद असल्यामुळे टोलनाक्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या

    जोरदार वादळी वारा आणि पावसाने नशिराबाद टोल नाक्यावर मोठे नुकसान

  • 06 Jun 2026 06:45 PM (IST)

    येवला शहरासह तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी

    येवला शहरासह तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी

    पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्यानं नागरिंना उष्णतेपासून दिलासा

    मात्र अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांचे हाल

    मान्सूनपूर्व पावसामुळे शेती मशागतीच्या कामाला वेग येणार

  • 06 Jun 2026 06:30 PM (IST)

    परभणीच्या पूर्णा तालुक्यातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह पाऊस

    परभणीच्या पूर्णा तालुक्यातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पाऊस

    अचानक आलेल्या वादळी वारा आणि पावसामुळे नागरिकांचे हाल

    वादळी वाऱ्यामुळे परभणी – पूर्णा  महामार्गावर झाड कोसळलं

    परभणी – पूर्णा  महामार्गावर झाड कोसळल्यानं वाहतुक ठप्प

    कातनेश्वर येथील ग्रामस्थांकडून रस्त्यावर पडलेली झाडे हटवण्याचे प्रयत्न सुरू

  • 06 Jun 2026 06:15 PM (IST)

    परभणी जिंतूर महामार्गावर एसटी बस व दुचाकीचा भीषण अपघात, तीन ठार

    परभणी जिंतूर महामार्गावर एसटी बस व दुचाकीचा भीषण अपघात

    अपघातात एकच परिवारातील तिघांचा जागीच मृत्यू

    कोकपाटी जवळ एसटी बसने दुचाकीला धडक दिल्याने झाला भीषण अपघात

    धोंडे जेवणावरून येत असताना झाला अपघात, अपघातात नातू आजोबा आजीचा जागीच मृत्यू

    अपघात स्थळी बोरी पोलीस दाखल

  • 06 Jun 2026 06:05 PM (IST)

    विधान परिषद निवडणुकीत घोडेबाजार : सु्प्रिया सुळे

    विधान परिषद निवडणुकीत घोडेबाजार असल्याचं खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. निवडणूक प्रक्रिया बदलण्यासाठी संसदेत बिल माडणार असल्याचंही सुप्रिया सुळे यांनी सांगितलं. तसेच निवडणूक प्रक्रिया बदलण्यासाठी संसेदत बिल मांडणार असल्याचंही सुळे यांनी नमूद केलं.

  • 06 Jun 2026 05:58 PM (IST)

    जळगावमध्ये पोलिसांचं अवैध धंद्याविरोधात ऑपरेशन ऑलआऊट

    जळगाव पोलिसांनी अवैध धंद्याविरोधात ऑपरेशन ऑलआऊट राबवलं आहे. जिल्ह्यात गावठी दारुसह 21 लाख 65 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जुगार अड्ड्यांवर कारवाई करत जळगावात एकूण 76 गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.

  • 06 Jun 2026 05:53 PM (IST)

    मुंबईत राजेंद्र दर्डा यांच्या पुस्तकाचं प्रकाशन, मुख्यमंत्र्यांसह राजकीय नेत्यांची उपस्थिती

    मुंबईत राजेंद्र दर्डा यांच्या पुस्तकाचं प्रकाशन सोहळा सुरु आहे. प्रकाशन सोहळ्याला मुख्यमंत्र्यांसह राजकीय नेत्यांची उपस्थिती पाहायला मिळत आहे.

  • 06 Jun 2026 05:18 PM (IST)

    रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत शक्तिपीठ महामार्गाला विरोध करणार : राजू शेट्टी

    रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत शक्तिपीठ महामार्गाला ताकदीने विरोध करणार असा निर्धार माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला आहे. शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात सांगलीच्या विटा येथे पार पडलेल्या शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.

  • 06 Jun 2026 03:50 PM (IST)

    बारामतीत केळी पिकांच्या झालेल्या नुकसानाची पाहणी सुनेत्रा पवार यांनी केली

    बारामती तालुक्यातील काऱ्हाटी गावातील नुकसान झालेल्या केळी पिकाची पाहणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दाखल. केळी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

  • 06 Jun 2026 03:40 PM (IST)

    चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर नवनाथ वाघमारे यांची टीका

    चंद्रशेखर बावनकुळे यांनी ओबीसी उप समितीतून बाहेर पडाव,राजीनामा द्यावा आणि तुमची मलाई महसूल खात्यातून गोळा करा आम्हाला तुमची गरज नाही अशी टीका नवनाथ वाघमारे यांनी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर केली. जरांगे हा अक्कल शून्य असणारा प्राणी असून ओबीसींवर बोलण्यासाठी सोडलेला श्वान आहे,ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांचा जरांगे पाटील यांच्यावर हल्लाबोल.

  • 06 Jun 2026 03:30 PM (IST)

    मनोज जरांगे हा अक्कल शून्य असणारा प्राणी- नवनाथ वाघमारे

    मनोज जरांगे हा अक्कल शून्य असणारा प्राणी असून ओबीसींवर बोलण्यासाठी सोडलेला श्वान आहे. ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांची जरांगे पाटील यांच्यावर खालच्या पातळीवर टीका तर चंद्रशेखर बावनकुळे यांनी ओबीसी उपसमितीतून बाहेर पडाव,राजीनामा द्यावा आणि तुमची मलाई महसूल खात्यातून गोळा करावी नवनाथ वाघमारे यांच्याकडून मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावरही टीका

  • 06 Jun 2026 03:20 PM (IST)

    पीयूष गोयल यांचे अत्यंत मोठे विधान..

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या प्रकारे देशात भारताचे नाव रोशन केलं. पर्यावरणाच्या लढाईत पर्यावरणाची चिंता करत एक पेड मा के नाम कार्यक्रम देशाला समर्पित केला. काल आंतरराष्ट्रीय पर्यावरण दिवस होत मला सौभाग्य भेटलंय तिरुपती बालाजी चे दर्शन घेऊन तिरूमते हेल्स मध्ये आईच्या नावावर झाड लावलं. आज आपली मातृभूमी संजय गांधी नॅशनल पार्क मध्ये झाड लावायचा सौभाग्य भेटलं. प्रधानमंत्री यांची जी कल्पना आहे पूर्ण विश्वामध्ये अरब करोडो झाड वर्षाला लावून त्याला सांभाळायचं आहेय ज्यांनी पर्यावरणाच्या समस्याला तो वाचवेल. छोट्या मुलांपासून हा कार्यक्रम सुरू झाला पाहिजे

  • 06 Jun 2026 03:05 PM (IST)

    गोंदिया जिल्ह्याचे तापमान पुन्हा 41 पार…

    गोंदिया जिल्ह्याच्या तापमानात पुन्हा एकदा वाढ होत असल्याचे दिसून येत आहे… गोंदिया जिल्ह्याचे तापमान गेल्या दोन दिवसापासून 41 पार झाल्याचे दिसून आलाय त्यामुळे उकाडापासून नागरिक हैराण झाले आहेत…. दुपारच्या वेळी नागरिकांच्या रस्त्यावर सुखसुकाट पाहायला मिळत आहे. आरोग्य विभागाने सुद्धा आव्हान केला की आवश्यक काम असल्याचे घराच्या बाहेर पडावे आणि आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे….

  • 06 Jun 2026 01:55 PM (IST)

    पुणे विभागीय आयुक्त शितल उगले-तेलींचा पंढरपूर दौरा

    पुणे विभागीय आयुक्त शितल उगले-तेलींचा पंढरपूर दौरा….आयुक्तांकडून विठ्ठल-रुक्मिणी मंदिर दर्शन रांग, ६५ एकर परिसर, चंद्रभागा वाळवंट आणि वारकरी पालखी तळाची पाहणी…आगामी आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर आयुक्तांचा पंढरपूर पाहणी दौरा….

  • 06 Jun 2026 01:45 PM (IST)

    पुणेकरांवार पाणी कपातीचे संकट?

    पुणेकरांवार पाणी कपातीचे संकट.. एक दिवस आड पाणी पुरवठा करण्याच्या निर्णयावर विचार सुरू.. मान्सूनला झालेला विलंब आणि धरण क्षेत्रातील घटलेला पाणीसाठा यामुळे निर्णय होण्याची शक्यता.. धरणांमध्ये २० टक्के पाणीसाठा शिल्लक..

  • 06 Jun 2026 01:30 PM (IST)

    अर्ज माघारीसाठी 150 कोटींचा घोडेबाजार- राऊत

    पुरेसं संख्याबळ असताना भाजपकडून घोडेबाजार कशासाठी?.. अर्ज माघारीसाठी 150 कोटी दिले… संजय राऊतांचा आरोप… तर राऊत पैसे मोजायला होते का? उपमुख्यमंत्री शिंदेंचा सवाल…

  • 06 Jun 2026 01:12 PM (IST)

    निवडणूक प्रक्रियेत बदल झाले पाहिजेत- फडणवीस

    निवडणूक प्रक्रियेत सुधारणांचं बिल कुणी आणल्यास स्वागत… निवडणूक प्रक्रियेत बदल झाले पाहिजेत… मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य…

  • 06 Jun 2026 01:00 PM (IST)

    बोरीवलीतील झाडांचे AI व LiDAR तंत्रज्ञानाद्वारे स्मार्ट मूल्यांकन

    बोरीवली परिसर आता स्मार्ट तंत्रज्ञानाच्या माध्यमातून हिरवागार होणार आहे. येथील सुमारे 10 हजार झाडांचे AI आणि LiDAR तंत्रज्ञानाद्वारे स्मार्ट मूल्यांकन सुरू करण्यात आले आहे. झाडांचे वय, आरोग्य, उंची आणि धोका याची अचूक माहिती आता डिजिटल पद्धतीने मिळणार आहे. AI आणि LiDAR तंत्रज्ञानामुळे कोणते झाड धोकादायक आहे, कोणते रोगट आहे आणि कोणत्या झाडाला तातडीने उपचारांची गरज आहे हे काही मिनिटांत समजणार आहे. पावसाळ्यात झाडे पडून होणारे अपघात रोखण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार आहे.

  • 06 Jun 2026 12:50 PM (IST)

    नाफेड आणि NCCF मार्फत कांद्याची खरेदी करण्यावर चर्चा

    कांदा उत्पादकांना रास्त भाव मिळावा यासाठी मागच्या आठवड्यात बैठक झाली. नाफेड आणि NCCF मार्फत कांद्याची खरेदी करण्यावर चर्चा झाली. नाफेड आणि NCCF मार्फत होणारी खरेदी मार्केट मध्ये व्हावी अशी आमची मागणी होती. आज बैठकीत महत्वपूर्ण निर्णय झाला आहे. NCCF आणि नाफेड मार्फत कांदा खरेदी कृषी उत्पन्न बाजार समितीच होणार आहे, अशी प्रतिक्रिया आमदार राहुल आहेर यांनी दिली.

  • 06 Jun 2026 12:40 PM (IST)

    धुळे जिल्ह्यातील टंचाईग्रस्त ग्रामांसाठी तब्बल 48 खाजगी विहिरी अधिग्रहित

    धुळे जिल्ह्यातील टंचाईग्रस्त ग्रामांसाठी तब्बल 48 खाजगी विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. सध्या जिल्ह्यातील दोन गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. साक्री शिंदखेडा तालुक्यात सर्वाधिक टंचाई आहे. साखरी तालुक्यातील 25 गावांसाठी 25 विहिरी तर शिंदखेडा तालुक्यातील 23 गावांसाठी 21 विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. धुळे तालुक्यातील जुन्नर आणि शिंदखेडा तालुक्यातील धांगरणे गावासाठी टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला आहे.

  • 06 Jun 2026 12:32 PM (IST)

    जिल्हा प्रशासन, नाफेड आणि बाजार समित्यांच्या प्रतिनिधींची बैठक

    नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा प्रशासन, नाफेड आणि बाजार समित्यांच्या प्रतिनिधींची बैठक होत आहे. कांद्याच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठकीला सुरुवात झाली आहे. नाफेडच्या कांदा खरेदीतील अडचणी सोडवण्यासाठी बैठकीत चर्चा होईल.नाफेडने थेट बाजारसमितीतून कांदा खरेदी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून पुढाकार घेण्यात आला.

  • 06 Jun 2026 12:18 PM (IST)

    भाजपकडून रवींद्र फाटक यांचा सत्कार

    ठाणे पालघर जिल्ह्यातील माहितीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले. विधान परिषदेचे आमदार रवींद्र फाटक ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील भाजप गटनेते मुकेश मोकाशी ठाणे जिल्हा अध्यक्ष संदीप लेले आणि इतर नगरसेवकांच्या गाठीभेटी घेत आहे. यावेळी भाजपकडून रवींद्र फाटक यांचा सत्कार करताना दिसून येत आहे. महायुतीचे उमेदवार म्हणून रवींद्र फाटक ठाणे पालघर जिल्ह्यातून विधान परिषद निवडणुकीमध्ये बिनविरोध झाले होते.

  • 06 Jun 2026 12:10 PM (IST)

    नवी मुंबई विमानतळावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण

    नवी मुंबई विमानतळावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण झाले. या विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचे ठरलेले आहे. केंद्र सरकारकडे त्यासाठीचा पाठपुरावा करण्यात आला आहे. लवकरच हे नामकरण होईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

  • 06 Jun 2026 12:00 PM (IST)

    संजय शिरसाट यांची विजय वडेट्टीवार यांना सणसणीत उत्तर

    विजय वडट्टीवार यांनी केलेले विधान हे नैराश्यातून केलेले विधान आहे. खरंतर वेशाचा हा अपमान आहे. आपल्या कार्यकर्त्याला रेषा म्हणन कोण विकलं जात आहे तुमचे कार्यकर्ते? ते वेश्या आहेत? बोलताना भान ठेवलं पाहिजे. राजकारणात एखाद्याने माघार घेतली म्हणजे वेश्या झाला? एवढ्या वर्षापासून सोबत काम करणाऱ्या कार्यकर्त्याला असं बोललं म्हणजे हे गैर आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांना नैराश्य आलेले आहे, अशी सणसणीत टीका मंत्री संजय शिरसाट यांनी केली.

  • 06 Jun 2026 11:47 AM (IST)

    रोहित पवारांवी अन्नत्याग करु नये – सुप्रिया सुळे

    रोहित पवारांवी अन्नत्याग करु नये, रोहित पवारांनी अशी विनंती आहे… असं देखील वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केलं आहे.

  • 06 Jun 2026 11:45 AM (IST)

    निवडणुकीत घोडेबाजार झालाय हे सर्वांना माहिती आहे – सुप्रिया सुळे

    निवडणुकीत घोडेबाजार झालाय हे सर्वांना माहिती आहे. घोडेबाजार एवढा होईल असं वाटलं नव्हतं. निवडणुकीत घोडेबाजार बंद झाला पाहिजे. पैशांच्या जीवावर कुणीही उड्या मारू नये. मविआच्या 8 उमेदवारांनी माघार घेतली आहे. मी इंडिया आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहणार आहे… असं देखील सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

  • 06 Jun 2026 11:41 AM (IST)

    साकीनाका खैराणी रोडवर मनसेचा अनोखा आंदोलनाचा इशारा

    साकीनाका खैराणी रोडवर मनसेने अनोखा आंदोलनाचा इशारा दिला आहे. नाल्यात उतरून प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला आहे. मनसे पदाधिकाऱ्यांनी नाल्यात बसून आंदोलन केले आहे, पावसापूर्वीच नालेसफाईचा प्रश्न ऐरणीवर असल्याचे याठिकाणी दिसून येत आहे.

  • 06 Jun 2026 11:30 AM (IST)

    जून महिन्याच्या पहिल्या सप्ताहामध्ये उन्हाची तीव्रता अधिक

    जून महिन्याच्या पहिल्या सप्ताहामध्ये उन्हाची तीव्रता अधिक आहे. ज्यामुळे  फळबागेवर तेल्या रोगाचा प्रादुर्भावात वाढत आहे.  येवला तालुक्यातील जळगाव नेऊर येथे सहा एकर डाळींब बागेवर ट्रॅक्टर फिरवला. चार वर्ष डाळींब बाग वाढवण्यासाठी केलेला खर्च वाया गेलाय.

  • 06 Jun 2026 11:23 AM (IST)

    रयत संस्थेच्या माध्यमातून 30 हजार विद्यार्थ्यांचं शिक्षण – शरद पवार

    रयत संस्थेच्या माध्यमातून 30 हजार विद्यार्थ्यांचं शिक्षण पूर्ण झालं आहे. शिकणाऱ्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. बारामतीत देशभरातील शेतकरी शिकण्यासाठी येत असतात… असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं.

  • 06 Jun 2026 11:20 AM (IST)

    जळगाव विधान परिषद निवडणुकीतील शिवसेना शिंदे गटाच्या बंडखोर रेश्मा काळे आपल्या उमेदवारीवर ठाम….

    शिवसेनेचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे जळगावमध्ये असताना देखील रेश्मा काळे यांनी त्यांची भेट घेतली नसल्याच पाहायला मिळालं. पक्षाच्या नेत्यांचे जे काही निर्णय असतील ते मला मान्य राहतील मात्र मी माझ्या भूमिकेवर ठाम असला तर रेश्मा काळे यांनी म्हटलं आहे. माघार घेण्याचा तसेच महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचा कुठलाच विषय नाही अशी भूमिका रेश्मा काळे यांनी स्पष्ट केली आहे. जर नाशिकमध्ये माघार घेण्याची वेळ संपली असं सांगितलं जात असेल तर जळगावमध्ये देखील ती वेळ संपल्याचा रेश्मा काळे यांनी स्पष्ट शब्दात सांगितले. रेश्मा काळे यांनी श्रीकांत शिंदे जळगावमध्ये असताना देखील त्यांच्या भेटीकडे पाठ फिरवल्याचं बोललं जात असून ते आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे पाहायला मिळत आहे.

  • 06 Jun 2026 11:03 AM (IST)

    बोरीवलीतील झाडांचे AI व LiDAR तंत्रज्ञानाद्वारे स्मार्ट मूल्यांकन

    बोरीवली परिसर आता स्मार्ट तंत्रज्ञानाच्या माध्यमातून हिरवागार होणार आहे. येथील सुमारे 10 हजार झाडांचे AI आणि LiDAR तंत्रज्ञानाद्वारे स्मार्ट मूल्यांकन सुरू करण्यात आले आहे. झाडांचे वय, आरोग्य, उंची आणि धोका याची अचूक माहिती आता डिजिटल पद्धतीने मिळणार आहे. AI आणि LiDAR तंत्रज्ञानामुळे कोणते झाड धोकादायक आहे, कोणते रोगट आहे आणि कोणत्या झाडाला तातडीने उपचारांची गरज आहे हे काही मिनिटांत समजणार आहे. पावसाळ्यात झाडे पडून होणारे अपघात रोखण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार आहे.

  • 06 Jun 2026 10:57 AM (IST)

    देशात आता हाय-इथेनॉल फ्यूलची अधिकृत विक्री सुरु

    देशात आता हाय-इथेनॉल फ्यूलची अधिकृत विक्री सुरु झाली आहे. हे एक मोठं पाऊल आहे. E85 ला पारंपारिक पेट्रोल-डिझेलला पर्यायी इंधन मानलं जात आहे.

  • 06 Jun 2026 10:46 AM (IST)

    श्रीकांत शिंदे यांचे चौरंगावर बसवून विधिवत पूजन

    जळगावात लाडक्या बहिणीच्या वतीने अधिक मासानिमित्ताने शिवसेना शिंदे गटाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचं अनोख्या पद्धतीने स्वागत. खानदेशात अधिक मासानिमित्ताने जावई तसेच भाचा यांचे पूजन करण्याची परंपरा आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाऊ असल्याने भाचा या नात्याने श्रीकांत शिंदे यांचे पूजन करण्यात आले. शिवसेना महिला जिल्हा आघाडीसह लाडक्या बहिणींच्या वतीने खासदार श्रीकांत शिंदे यांचे चौरंगावर बसवून विधिवत पूजन करण्यात आले.

  • 06 Jun 2026 10:27 AM (IST)

    टेक्नॉलॉजी ऑन व्हील्सच्या उद्घाटन कार्यक्रमाला येणार शरद पवार

    विद्या प्रतिष्ठानचा अभिनव उपक्रम टेक्नॉलॉजी ऑन व्हील्सच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार,खासदार सुप्रिया सुळे उपस्थित राहणार. पुण्यातील विद्या प्रतिष्ठानच्या शारदा निकेतन गर्ल हॉस्टेल येथे हा कार्यक्रम होणार आहे.

  • 06 Jun 2026 10:13 AM (IST)

    नाशिकमध्ये बंडखोरीवर तोडगा नाहीच निघाला

    गिरीश महाजन आणि उदय सामंत रिकाम्या हाताने परतले.गोकुळ गीते अद्यापही निवडणूक लढण्यावर ठाम. काल दिवसभर गिरीश महाजन आणि उदय सामंत यांच्याकडून गोकुळ गीते यांच्या मन धरणीचा प्रयत्न सुरु होते. मात्र गोकुळ गीते यांनी दोन्ही नेत्यांची भेट टाळली.

  • 06 Jun 2026 10:11 AM (IST)

    किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा

    किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा सुरु आहे. शिवभक्तांच्या सुरक्षेसाठी किल्ल्यावर कडेकोट पोलीस बंदोबस्त आहे. लाखो शिवभक्त रायगडाच्या पायथ्याशी दाखल झाले आहेत. संभाजीराजे छत्रपतींच्या उपस्थितीत किल्ले रायगडावर सोहळा सुरु आहे. संपूर्ण परिसर महाराजांच्या जयघोषाने दुमदुमला.

  • 06 Jun 2026 10:01 AM (IST)

    अभिजीत दीपके जंतर-मंतरवर पोहोचले

    कॉकरोच जनता पक्षाचं दिल्लीतील जंतरमंतरवर आंदोलन करण्यात येणार असून शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे.  अभिजीत दीपके जंतर-मंतरवर पोहोचले असून थोड्याच वेळात आंदोलन सुरू होईल.

  • 06 Jun 2026 09:54 AM (IST)

    सलून व्यवसाय मध्ये 20 टक्के वाढ होणार

    सलून व्यवसाय मध्ये 20 टक्के वाढ होणार असल्याची माहिती सलून व्यवसायिकांनी दिली आहे. दुकानाचे भाडं ,इलेक्ट्रिसिटी बिल, नोकरदारांचा पगार तसेच कॉस्मेटिक वस्तू आणि इंधनाच्या दरामुळे हे दरवाढ होणार असल्याची माहिती सलून व्यावसायिकांनी दिली.

  • 06 Jun 2026 09:36 AM (IST)

    नवी दिल्ली – कॉकरोच जनता पार्टीचे कार्यकर्ते संसद मार्ग पोलिस पोलिस ठाण्याबाहेर जमायला सुरूवात

    दिल्ली -कॉकरोच जनता पार्टीचे कार्यकर्ते संसद मार्ग पोलिस पोलिस ठाण्याबाहेर जमायला सुरूवात झाली आहे.  दिल्ली पोलिसांकडून सर्व आंदोलकांना जंतर मंतर इथे जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत.  कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांकडून ऊद्घोषणा सुरू.

  • 06 Jun 2026 09:24 AM (IST)

    पिंपरी-चिंचवडमध्ये फाटलेल्या होर्डिंग्जमुळे अपघाताचा धोका; मान्सूनपूर्व वाऱ्यांमुळे नागरिकांमध्ये चिंता

    पिंपरी-चिंचवड शहरातील विविध भागांमध्ये उभारण्यात आलेल्या अनेक जाहिरात होर्डिंग्जवरील फ्लेक्स फाटलेल्या अवस्थेत आहेत.सध्या मान्सूनपूर्व जोरदार वारे वाहत असल्याने हे फाटलेले फ्लेक्स आणखी सैल होऊन रस्त्यावर पडण्याची किंवा होर्डिंगच्या रचनेला धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिक चिंतेत आहेत.

  • 06 Jun 2026 09:14 AM (IST)

    तुळजाभवानी मंदिरात मराठा क्रांती ठोक मोर्चा कडून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा

    तुळजाभवानी मंदिरात मराठा क्रांती ठोक मोर्चा कडून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. मराठा क्रांती मोर्चा कडून आयोजित शिवराज्याभिषेक सोहळ्याला भाजप आमदार मंदा मात्रे या उपस्थित होत्या.   छत्रपती शिवाजी महाराजांचे कुलदैवत असलेल्या आई तुळजाभवानीच्या मंदिरात मंदिर प्रशासनानेही शिवराज्याभिषेक साजरा करावा अशी मागणी करण्यात आली. मात्र मराठा क्रांती मोर्चाच्या मागणीला मंदिर प्रशासनाकडून कोणताही प्रतिसाद नाही, मंदिर प्रशासनाच्या भूमिकेमुळे शिवभक्त नाराज झालेत.

  • 06 Jun 2026 09:09 AM (IST)

    अभिजीत दिपके यांच्या काकांचे अश्रू अनावर

    हिंगोली- हे भाजप सरकार काही करू शकते म्हणत अभिजित दिपके यांचे काका विलास दिपके यांनाअश्रू अनावर झाले.  अभिजीत दिपके हे आज जंतरमंतरवर आंदोलन करणार आहेत.

  • 06 Jun 2026 09:05 AM (IST)

    घाटकोपर मधील भटवाडी परिसरात दररोज रात्री वीज खंडित होत असल्याने नागरिक हैराण

    घाटकोपर पूर्वेकडील भटवाडी परिसरात दररोज रात्री वीज खंडित होत असल्याने नागरिक हैराण झालेत. गेल्या 5 दिवसापासू रात्री ११ ते सकाळी पहाटे ५ पर्यंत वीजपुरवठा खंडित होत असल्याचा प्रकार घडत आहे. ऐन उन्हाळ्यात असा प्रकार होत असल्याने लहान मुलांना आणि आजारी नागरिकांना त्रास होत असून वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

  • 06 Jun 2026 08:58 AM (IST)

    टीसीएस प्रकरणातील 9 खटल्यांची सुनावणी मंगळवारपासून होणार सुरू

    नाशिक – टीसीएस प्रकरणातील 9 खटल्यांची सुनावणी आता मंगळवारपासून सुरू होणार आहे. धर्मांतर, बलात्कार, विनयभंग आणि धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यांवर सुरू होणार सुनावणी. नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयात खटल्यांचे कामकाज सुरू होणार आहे. – मुंबई नाका आणि देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यातील गुन्ह्यांचा समावेश आहे. आरोपींमध्ये दानिश शेख, तौसीफ अत्तार, निदा खान, रझा मेमन यांच्यासह अन्य संशयितांचा समावेश आहे.

  • 06 Jun 2026 08:57 AM (IST)

    भारतात पोहोचल्यानंतर अभिजीत दिपके यांनी आई-वडिलांसोबत साधला संवाद

    छत्रपती संभाजीनगर – भारतात पोहोचल्यानंतर अभिजीत दिपके यांनी आई-वडिलांशी संवाद साधला.  – मी विमानतळावर पोहोचलो आहे सुखरूप आहे तुम्ही कसे आहात अशी विचारणा अभिजीतने आई वडिलांकडे केली.  छत्रपती संभाजीनगर येथील घरासंदर्भातही केली विचारपूस.

    माझी काळजी करू नका, तुम्ही काळजी घ्या मी लोकशाही मार्गाने आंदोलन करतोय, असंही अभिजीत यांनी आई-वडिलांना सांगितलं.

  • 06 Jun 2026 08:52 AM (IST)

    कॉकरोच जनता पार्टीचं दिल्लीत जंतरमंतरवर आंदोलन

    छत्रपती संभाजीनगर –  कॉकरोच जनता पार्टीचं आज दिल्लीत जंतरमंतरवर आंदोलन असून अभिजीत दीपके भारतात  जाखल झाले आहेत.  नीट पेपर फुटी प्रकरणी दिल्लीत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे.

    दरम्यान दीपके यांच्या छत्रपती संभाजीनगर येथील घराजवळ पोलीस बंदोबस्त कायम आहे.  अभिजीत दिपके यांच्या व्हॉट्सअपवर धमकीचा मेसेज आल्यापासून आई वडीलांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे.

Published On - Jun 06,2026 8:49 AM

Follow Us
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
Jitendra Singh | राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय, गृहमंत्र्यांसोबत...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून अरविंद केजरीवाल यांचं खळबळजनक वक्तव्य
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेच्या आंदोलनात शर्मिला ठाकरे...
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेचं दादरमध्ये आंदोलन, थेट शर्मिला ठाकरे सहभागी
प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
Prakash Ambedkar | विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल,
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल, दिल्लीत नेमकं काय घडतंय?
शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
Abhijeet Dipke | शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या...
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या भेटीला
दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?
मारो... मारो! दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?
उद्धव ठाकरे जंतरमंतरवर दाखल, अभिजित दीपके यांची घेतली भेट, लढण्याचा दिला मंत्र….

उद्धव ठाकरे जंतरमंतरवर दाखल, अभिजित दीपके यांची घेतली भेट, लढण्याचा दिला मंत्र…

देश पहले, गाना बादमे..दिल्ली CJP लाठीमाराने व्यथित Yo Yo Honey Singh ने  गाण्याचा टीझर पुढे ढकलला….

देश पहले, गाना बादमे..दिल्ली CJP लाठीमाराने व्यथित Yo Yo Honey Singh ने गाण्याचा टीझर पुढे ढकलला…

सोनिया गांधी थेट मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात; तीन तासांनंतर राहुल गांधी, प्रियंका गांधींची सुटका, काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक.

सोनिया गांधी थेट मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात; तीन तासांनंतर राहुल गांधी, प्रियंका गांधींची सुटका, काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक

CJP Vijeta Dahiya : विजेता दहिया बर्गर खाताना दिसले, कॉकरोच जनता पार्टीने प्रवक्तेपदावरून हटवलं, व्हिडीओची चर्चा!.

CJP Vijeta Dahiya : विजेता दहिया बर्गर खाताना दिसले, कॉकरोच जनता पार्टीने प्रवक्तेपदावरून हटवलं, व्हिडीओची चर्चा!

राहुल गांधी खाली पडले, पोलिसांची उचलण्यासाठी धडपड, अन् झपकन उचलले; पाहा व्हिडीओ.

राहुल गांधी खाली पडले, पोलिसांची उचलण्यासाठी धडपड, अन् झपकन उचलले; पाहा व्हिडीओ

बॉलिवूडने टॉलिवूडकडून काय शिकावं? प्रसिद्ध अभिनेत्रीने सलमानचं नाव घेऊन सगळं सांगितलं!.

बॉलिवूडने टॉलिवूडकडून काय शिकावं? प्रसिद्ध अभिनेत्रीने सलमानचं नाव घेऊन सगळं सांगितलं!