Maharashtra News LIVE : दोन मुलांनी वाऱ्यावर सोडलेल्या आईला यशोधन संस्थेने दिला आधार

Maharashtra News LIVE : जालना जिल्ह्यात पोलिसांनी मोठी कारवाई करत 95 लाख रुपयाचा गुटखा जप्त केला. जालना भोकरदन रोडवरील राजुर गणपती येथे एका गोडाऊन वर हा गुटख्याचा ट्रक खाली होत असल्याची गोपनीय माहिती पोलीसांना मिळाली होती.

Maharashtra News LIVE : दोन मुलांनी वाऱ्यावर सोडलेल्या आईला यशोधन संस्थेने दिला आधार
Breaking
| Updated on: Sep 10, 2026 | 10:48 AM

LIVE NEWS & UPDATES

  • 10 Sep 2026 10:48 AM (IST)

    भंडाऱ्यात पावसाने फिरवली पाठ, शेतकऱ्यांची दयनीय अवस्था

    भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यात पावसाने पाठ फिरवल्याने धानपिके धोक्यात आली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची दयनीय अवस्था झाली आहे. जवळच गोसेखुर्द प्रकल्प असून पाइपलाईन लिकेज आणि योग्य व्हॉल्व्ह न बसवल्यामुळे शेतकरी पाण्यापासून वंचित आहेत. या दुष्काळी परिस्थितीची दखल घेऊन सरकारने संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर कारवाई करावी आणि शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहीर करावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

  • 10 Sep 2026 10:28 AM (IST)

    अभिजीत दीपके घेणार प्रथमेश देशमुख यांच्या घरी भेट

    अभिजीत दिपके हे प्रथमेश देशमुख यांच्या घरी भेट देणार आहेत.  एमपीएससीचा अभ्यास करणाऱ्या प्रथमेश देशमुखने पुण्यामध्ये आत्महत्या केली.  प्रथमेश देशमुख हा धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्याच्या खासापुरी येथील रहिवासी आहे.


  • 10 Sep 2026 10:18 AM (IST)

    संजय राऊतांकडून मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून कौतुक

    संजय राऊत यांनी मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून कौतुक केलं. रिक्षा चालकांना मराठी सक्ती प्रकरणात मार्ग काढण्याचा प्रयत्न केला, तो कौतुकास्पद आहे. त्याच्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो, अशा शब्दात संजय राऊत यांनी मंत्री सरनाईक यांचं कौतुक केलं. तसेच त्यांना भेटणार असल्याचेही म्हटलं.

  • 10 Sep 2026 10:16 AM (IST)

    अमरावती अग्निकांड प्रकरण, पाच अधिकारी निलंबित

    अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालय अग्निकांड प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. आरोग्य उपसंचालक, सिव्हिल सर्जनसह पाच अधिकारी निलंबित करण्यात आलं आहे. मात्र दोषी अधिकाऱ्यावर फौजदारी कारवाई मात्र केव्हा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. चौकशी समितीच्या अहवालावर अनेक मोठे प्रश्न असून सार्वजनिक बांधकाम विभागाचे विद्युत अभियंता रडारवर आहे. उद्या सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले अमरावती दौऱ्यावर आहेत, यादरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दोषी अधिकाऱ्यावर कारवाईची टांगती तलवार कायम आहे.

  • 10 Sep 2026 10:06 AM (IST)

    पावसाअभावी बैलपोळ्यावरही दुष्काळाचे सावट

    धुळे जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.  पिकांचा खर्चही निघणार नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. वर्षभर शेतकऱ्याला साथ देणाऱ्या बैलजोडीचा सण साजरा करतानाही शेतकऱ्यांची आर्थिक कसरत सुरू आहे.अशीच परिस्थिती राहिली तर पुढच्या वर्षी बैलपोळा साजरा करण्याचीही परिस्थिती राहणार नाही, अशी व्यथा शेतकरी मांडत आहेत.


  • 10 Sep 2026 09:50 AM (IST)

    ठाण्यात पाणीटंचाईविरोधात एमआयएमचा आज महापालिकेवर धडक मोर्चा…

    आज दुपारी ११ वाजता ठाणे महानगरपालिकेवर मोर्चा….प्रभाग ३० मधील काही महिन्यांपासून मुंब्रा भागातील नागरिक पाणीटंचाईने त्रस्त….अधिकारी यांना वारंवार तक्रारी करूनही महापालिका पाणीपुरवठा विभागाकडून दुर्लक्ष…वाढती लोकसंख्या लक्षात घेता शिळफाटा, ठाणे एमआयडीसी जलवाहिनीतून तातडीने पाणीपुरवठा वाढवून द्यावा..

  • 10 Sep 2026 09:40 AM (IST)

    जळगावातील चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीत बैलगाडी व गाय, वासराच्या पुतळ्याचे लोकार्पण

    सभापती नरेंद्र पाटील व संचालकांच्या हस्ते पुतळा लोकार्पणाचा सोहळा पार पडला. बैल पोळा सण आणि खानबैलीचे औचित्य साधून शेतकऱ्यांचे प्रतीक असलेल्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व सर्व संचालक यांनी स्वखर्चातून पुतळे उभारले आहेत. या कार्यक्रमाला कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक कर्मचारी विविध संस्थेतील राजकीय व सामाजिक पदाधिकारी उपस्थित होते.

  • 10 Sep 2026 09:30 AM (IST)

    सीताफळ बागेत बिबट्याचा वावर; शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

    शिरूर तालुक्यातील पिंपरी दुमाला येथे सीताफळ बागेत बिबट्याचा वावर आढळून आल्याने परिसरातील शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या सीताफळ तोडणीचा हंगाम सुरू असून बागेत शेतकरी, महिला व मजूर मोठ्या प्रमाणावर कामासाठी येत आहेत. अशा परिस्थितीत बिबट्याचा वावर आढळल्याने कामगारांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

  • 10 Sep 2026 09:20 AM (IST)

    राज्यात डीजेबंदीची चर्चा; महाळुंगे पडवळमध्ये दोन वर्षांपासून डीजेमुक्त बैलपोळा

    राज्यात सध्या सण-उत्सवांमध्ये डीजेच्या वापरावर बंदी घालण्याबाबत चर्चा सुरू आहे. मात्र, पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील महाळुंगे पडवळ गावाने यापूर्वीच डीजेमुक्त उत्सवाची वाट धरली आहे. पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठ्या श्रावणी बैलपोळ्यासाठी प्रसिद्ध असलेल्या या गावात गेल्या दोन वर्षांपासून बैलपोळ्याच्या मिरवणुकीत डीजेला बंदी आहे. हुतात्मा बाबू गेनू यांच्या जन्मभूमी असलेल्या या गावाने पारंपरिक पद्धतीने सण साजरा करण्याचा घेतलेला हा निर्णय सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

  • 10 Sep 2026 09:15 AM (IST)

    दोन मुलांनी वाऱ्यावर सोडलेल्या आईला यशोधन संस्थेने दिला आधार

    साताऱ्यात दोन मुलांनी वाऱ्यावर सोडलेल्या आईला दिला वेळे येथील यशोधन संस्थेने आधार. रुक्मिणी भस्मे या मागील पाच दिवसापासून साताऱ्यातील एका मंदिरात राहत आहेत. दोन्ही मुले सोडून गेली तरी आईला अजूनही मुलांची आस.TV9 मराठी वर बातमी प्रसिद्ध झाल्यावर यशोधन अनाथ आश्रम संस्थेचे संस्थापक रवींद्र बोडके यांनी रुक्मिणी भस्मे यांना सांभाळण्याची घेतली जबाबदारी. जिल्हा प्रशासनाकडून संबंधित दोन्ही मुलांचा शोध सुरू.

  • 10 Sep 2026 09:14 AM (IST)

    ५२ लाखांचा मुद्देमाल तक्रारदारांना परत केला

    समर्थ पोलिसांची मोठी कारवाई. ५२ लाखांचा सोन्याचा मुद्देमाल मूळ तक्रारदारांना परत. घरफोडीच्या गुन्ह्यांतील सराईत आरोपींकडून चोरीस गेलेला मौल्यवान मुद्देमाल केला हस्तगत. तांत्रिक माहिती, सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय बातमीदारांच्या मदतीने आरोपींचा शोध. आरोपींना अटक करून कसून चौकशी. विविध गुन्ह्यांतील चोरीचा सोन्याचा मुद्देमाल जप्त. सोने,चांदी आणि मोत्यांच्या दागिन्यांचा मुद्देमाल जप्त. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून न्यायालयाच्या आदेशाने ५२ लाखांचा मुद्देमाल तक्रारदारांना परत केला.

  • 10 Sep 2026 09:12 AM (IST)

    येरवडा मध्यवर्ती कारागृहातील सर्व आर्थिक व्यवहार कॅशलेस

    राज्यातील सर्वात मोठ्या येरवडा मध्यवर्ती कारागृहातील सर्व आर्थिक व्यवहार कॅशलेस. सर्व व्यवहार ऑनलाइन करणारे येरावडा कारागृह ठरले राज्यातील पहिले कारागृह. राज्याच्या कारागृह विभागाने डिजिटल व्यवहारांच्या दिशेने उचलले मोठे पाऊल. येरवडा कारागृहातील शोरूम वाशिंग सेंटर उपहारगृह आणि पार्किंग मधील रोखीचे व्यवहार पूर्णपणे बंद करून करण्यात आले कॅशलेस. कैद्यांनी बनवलेल्या वस्तू विक्रीसाठी ठेवून त्याची रक्कम कॅशलेस स्वरूपात घेण्यात येणार.

  • 10 Sep 2026 09:11 AM (IST)

    विद्यानंद बापट यांना कायदेशीर नोटीस

    गेल्या काही दिवसांपासून देवी-देवता आणि धार्मिक श्रद्धेविषयी कथित आक्षेपार्ह व अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी विद्यानंद बापट यांना मुंबई उच्च न्यायालयातील वकील प्रदीप नाईक यांनी कायदेशीर नोटीस बजावली आहे.

अमरावती जिल्ह्यात पावसाने दांडी मारल्याने सोयाबीचे पीक करपले. अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यात दुष्काळाची परिस्थिती. एकरी ३० ते ४० हजारांचा खर्च पाण्यात. तात्काळ अमरावती जिल्हा कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची शेतकऱ्यांची मागणी. अमरावती जिल्ह्यात गेल्या तब्बल ४० दिवसांपासून पावसाने पाठ फिरवल्याने तिवसा तालुक्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी अक्षरशः संकटात सापडले आहेत.पावसाअभावी शेतातील सोयाबीनची पिके सुकून करपली असून,शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत वर्षभराच्या मेहनतीची माती होत आहे. सोलापूर-मुंबई विमानसेवा बंद झाल्यामुळे सोलापुरात युवक काँग्रेस आक्रमक. सोलापूर विमानतळासमोर कागदाची आणि फुग्यांची विमाने उडवून करण्यात आला विमानसेवा बंद झाल्याचा निषेध. इंधन दरवाढीचे कारण पुढे करत स्टार एअरलाईन्स कंपनीने सोलापूर-मुंबई विमानसेवा बंद केलीय. यामुळे सोलापूरच्या विमानतळावरून सुरु असलेली प्रवासी वाहतूक सेवा पुन्हा एकदा बंद झालीय.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us