Maharashtra News LIVE : पोलिसांकडून जरांगे पाटील यांच्या डिफेंडर गाडीची तपासणी
Maharashtra News LIVE : राज्यात सर्वत्र गणेशोत्सवाची धूम आहे. आज दीड दिवसाचे विसर्जन होत आहे. दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयात आज शिवसेना कोणाची यावर सुनावणी झाली. शिवसेना शिंदे गटाकडून आज कोर्टात बाजू मांडली गेली.

LIVE NEWS & UPDATES
-
महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर 5.75 लाखांचा गुटखा जप्त
महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डरवर तलमोड चेकपोस्टवर 5.75 लाखांचा गुटखा आणि कार जप्त करण्यात आली आहे. गुटखा तस्करीविरोधात उमरगा पोलिसांनी ही धडाकेबाज कारवाई केली आहे. तलमोड चेकपोस्टवर स्विफ्ट डिझायर कारची तपासणी केली असता 2 लाख 75 हजार रुपयांचा गुटखा आढळून आला. पोलिसांनी 3 लाखांची कार आणि गुटखा असा एकूण 5 लाख 75 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. बीड जिल्ह्यातील दोन आरोपींना ताब्यात घेतले असून गुटखा कुठून आणला आणि कुठे नेला जात होता, याचा तपास उमरगा पोलीस करत आहेत.
-
जरांगे पाटील यांच्या रॅलीत तिसऱ्यांदा चोरट्यांचा धुमाकूळ
मनोज जरांगे पाटील यांच्या रॅलीत तिसऱ्यांदा चोरट्यांचा धुमाकूळ घातल्याची घटना घडली आहे. हा चोर पोलिसांच्या गाडीवरून उडी मारून पळून जाताना कॅमेऱ्यात कैद झाला आहे. पाडळशिंगी टोल नाका परिसरात एक चोरटा जरांगे पाटलाच्या रॅलीत येऊन त्याने महिलांचे दागिने चोरण्याचा प्रयत्न केला. शेवटी नागरिकांनी पकडून त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.
-
-
मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या ताफ्यातील कारला धडक
एका व्यक्तीने भरधाव वाहन चालवून मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या ताफ्यातील कारला धडक दिल्याची घटना पुण्यातील संचेती पुलाजवळ घडली आहे.या व्यक्तीचे नाव शुभम वनित असून त्याने मद्यप्राशन केल्याचे उघडकीस आले आहे. या चालकावर गुन्हा दाखल केला आहे.
-
वाघाच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू, मुरदोली जंगलातील घटना
गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पामुळे जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाघ,बिबट्या यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून अनेक हिस्त्र प्राणी हे गावालगत येत असल्याने गाव परिसराला धोका निर्माण झाला आहे…. अशातच आज एक दुर्दैवी घटना झुरकुटोला मुरदोली जंगलामध्ये घडली. वातूजी जी राऊत वय 72 वर्ष हे जंगल परिसरात असताना वाघाने त्यांच्यावर अचानक हल्ला चढवला आणि त्यात त्यांच्या जागीच मृत्यू झाला असल्याची दुर्दैवी घटना आज घडली… त्यामुळे नागरिकांनी जंगल परिसरात वावरताना काळजी घ्यावी एकटे न जाता सोबतीने जंगल परिसरात जावे असे आवाहन वनविभागाद्वारे करण्यात आले आहे.
-
मांजरसुंबा पाटोद्यानंतर सोनेगाव-दासखेड फाट्यावर जरांगे पाटलांच्या स्वागतासाठी दोन क्रेन
बीडच्या मांजरसुंबा चौकात आणि पाटोद्यात देखील जरांगे पाटलांचे क्रेनने हार घालून स्वागत केले जाणार आहेत. मांजरसुंबा आणि पाटोद्याच्या मध्ये असलेल्या सोनेगाव-दासखेड फाट्यावर देखील दोन्ही बाजूने दोन क्रेन लावण्यात आले असून जरांगे पाटलांना हार घालून स्वागत केले जाणार आहे. तर अन्नछत्र उभारले असून जेवण आणि पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
-
-
बीड – जरांगे पाटलांसोबतची गर्दी पाहता, जेवण, पाणी वाढवलं
मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने कूच करत आहेत. त्यांच्यासोबतची गर्दी पाहता बीड मध्ये अतिरिक्त बदल, सोय करण्यात आली आहे. 30 हजार महिलांसाठी देखील राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था केली. पाटोद्यातील मुक्कामाच्या ठिकाणी एकूण 25 ठिकाणी पार्किंग आणि जेवण पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली असून पाटलांना मिळत असलेला प्रतिसाद पाहता जेवण पाण्यासह राहण्याची व्यवस्था वाढवण्यात आल्याची माहिती मराठा बांधवांनी दिली.
-
जळगावातील जामनेर -पहूर मार्गावर शेंदुर्णीजवळ भीषण अपघात, दोघांचा मृत्यू
जळगावातील जामनेर -पहूर मार्गावर शेंदुर्णीजवळ भीषण अपघात. पोषण आहाराची वाहतूक करणारे मालवाहू वाहन उलटून दोन हमालांचा जागीच मृत्यू झाला. टायर फुटल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली.
-
पंढरपूर – गोमातेच्या आणि गोशाळेच्या सन्मानार्थ महाविकास आघाडी उतरली रस्त्यावर
पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्या गो शाळेला शासनाकडून यमाई तलावा नजीकची जागा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र याच जागा देण्याच्या निर्णयाला भाजपच्या नगरसेवकांकडून विरोध करण्यात येत आहे. याच विरोधात आज महाविकास आघाडीचे पदाधिकारी यांनी नगरपालिकेच्या समोर रस्त्यावर उतरून गोशाळेच्या आणि गोमातेच्या सन्मानार्थ आंदोलन करत घोषणाबाजी केली.
-
बदलापुरात चिकन सप्लायरला कुख्यात गुंडाकडून धमकी
‘आमच्या परवानगीशिवाय दुकानदारांना चिकन दिलं तर तुझी खैर नाही’ असं म्हणत बदलापुरात चिकन सप्लायरला कुख्यात गुंडाकडून धमकी. याप्रकरणी योगेश राऊत, जयेश राऊत यांच्यासह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-
वर्धा – रायपूर येथील वाघाच्या हल्ल्यामध्ये शेतकऱ्याचा मृत्यू प्रकरण, आमदार रोहित पवार आंदोलनस्थळी दाखल
वर्ध्यातील रायपूर येथील वाघाच्या हल्ल्यामध्ये शेतकऱ्याचे मृत्यू प्रकरणी ठिय्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी आमदार रोहित पवार आंदोलनस्थळी दाखल झाले आहेत. रोहित पवार यांनी खासदार अमर काळे यांच्यासह उपस्थिताशी चर्चा केली. या आंदोलनात आमदार रोहित पवार यांच्यासह खासदार अमर काळे, माजी मंत्री रणजीत कांबळे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले, काँग्रेसचे उदय मेघेसह ग्रामस्थांचा मोठ्या संख्येने सहभागी झाले.
-
काैल यांचा युक्तीवाद झाला, आजची सुनावणी संपली आहे
शिवसेना पक्ष आणि चिन्हावर सुनावणी झाली. आजची सुनावणी संपली आहे
-
पक्षात पक्षांतर्गत लोकशाही असणे आवश्यक आहे- काैल
पक्षात पक्षांतर्गत लोकशाही असणे आवश्यक आहे, काैल यांनी म्हटले.
-
काैल यांनी दिला अर्जुन सिंग यांच्या केसचा दाखला- नीरज काैल
काैल यांनी दिला अर्जुन सिंग यांच्या केसचा दाखल. पक्षात सर्व बाबींचा विचार करणे आवश्यक आहे, असा युक्तीवाद काैल यांनी केला.
-
संपूर्ण राजकीय पक्षाचा विचार केला पाहिजे- काैल
आधीच्या सर्व घटनांवरून हे दिसून येत की विधिमंडळ पक्षातील फुटीच्या पलीकडे जाऊन या सर्व बाबींचा विचार करण गरजेचं आहे. या सगळ्याचे पडसाद राजकीय पक्षापर्यंत पोहोचू शकतात. संपूर्ण राजकीय पक्षाचा विचार केला पाहिजे आणि आमचे म्हणण तेच आहे
-
एकनाश शिंदे यांच्या वकिलाचा मोठा दावा..
पक्षांतर्गत लोकशाही असणे आवश्यक असल्याचे काैल यांनी कोर्टात म्हटले आहे. पक्षात दोन गट तयार झाले, हे मान्य केले पाहिजे.
-
संपूर्ण राजकीय पक्षाचा विचार केला पाहिजे- काैल
संपूर्ण राजकीय पक्षाचा विचार केला पाहिजे, असा मोठा युक्तीवाद कोर्टात एकनाथ शिंदे यांच्या वकिलाने केला आहे.
-
निवडणूक आयोगाकडे जाण्यापूर्वी आम्ही ठराव मंजूर केले होते-काैल
निवडणूक आयोगाकडे जाण्यापूर्वी आम्ही ठराव मंजूर केले होते, असे मोठे विधान काैल यांनी कोर्टात केले.
-
पक्षाची नवीन घटना निवडणूक आयोगात दिली नसल्याचा मोठा दावा
पक्षाची नवीन घटना निवडणूक आयोगात दिली नसल्याचा मोठा दावा शिंदेंच्या वकिलांनी केला आहे. शिवसेनेचा दावा खोटा असल्याचे काैल यांनी म्हटले.
-
शिंदेंचे वकील नीरज काैल यांच्याकडून युक्तीवादाला सुरूवात
एकनाथ शिंदे यांचे वकील नीरज काैल यांनी युक्तीवादाला सुरूवात केली. पक्षप्रमुख हे पद 2018 च्या घटनेनुसार चुकीचे.
-
पक्षप्रमुखपद 2018 मध्ये आल्याचे चुकीचे आहे- काैल
2013 पासून शिवसेना प्रमुख हे पद होते. मात्र, बाळासाहेबांच्या निधनानंतर हे पद गोठण्यात आले. पक्षाची घटना फार जास्त महत्वाची असते, शिवसेनेच्या घटनेत प्रतिनिधी सभा महत्वाची असते.
-
शिंदेंचे वकील काैल यांचा अत्यंत मोठा दावा..
पक्षप्रमुख हे पद 2018 च्या घटनेनुसार, चुकीचे असल्याने काैल यांनी कोर्टात म्हटले.
-
शिवसेना काैल घटनेत काय लिहिले हे कोर्टात सांगितले गेले-काैल
शिवसेना काैल घटनेत काय लिहिले हे कोर्टात काैल यांच्याकडून सांगितले जात आहे.
-
शिवसेना पक्ष आणि चिन्हावर सुनावणी सुरू
शिवसेना पक्ष आणि चिन्हावर सुनावणीला सुरूवात झाली आहे. शिवसेनेकडून युक्तीवादाला सुरूवात झाली आहे.
-
शिवसेना शिंदे गटाकडून आज युक्तीवाद
शिवसेना शिंदे गटाकडून काही वेळातच युक्तीवादाला सुरूवात होईल. ठाकरेंचा युक्तीवाद पुर्ण झाला, आता ठाकरेंचा युक्तीवाद सुरू होईल.
-
शिवसेना पक्ष आणि चिन्हावर सुनावणी
शिवसेना पक्ष आणि चिन्हावर अगदी थोड्याचवेळा सुनावणीला सुरूवात होईल. शिवसेना शिंदे गटाकडून आज युक्तीवाद केला जाईल.
-
दिघी शिप बिल्डिंग क्लस्टर प्रकल्प निर्माण करण्यासाठी करार
दिघी शिप बिल्डिंग क्लस्टर प्रकल्प निर्माण करण्यासाठी करार. माझगाव डॉक शिप बिल्डर्सआणि महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड यांच्यात करार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थित करार संपन्न. महाराष्ट्राच्या सागरी क्षेत्राला जागतिक पातळीवर नवी ओळख मिळणार
-
पुण्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक रंगणार
पुण्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक रंगणार. विजय शिवतारे यांच्या पॅनलकडून 42 उमेदवारांनी केले अर्ज दाखल. पवार विरुद्ध पवार लढतीत आता विजय शिवतारे यांची उडी. सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक आम्ही बिनविरोध होऊ देणार नाही. शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांचा इशारा
-
वर्ध्याच्या रायपूरमधील वाघाच्या हल्ल्यातील शेतकऱ्याचं मृत्यू प्रकरण
वर्ध्याच्या रायपूरमधील वाघाच्या हल्ल्यातील शेतकऱ्याचं मृत्यू प्रकरण. घटनेला सहा दिवस उलटूनही मृतदेहावर अंत्यसंस्कार नाही. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गावकऱ्यांचं ठिय्या आंदोलन. प्रशासनाकडून आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न. ग्रामस्थाच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी आमदार रोहित पवार वर्ध्यात येणार. मृतकाच्य परिवाराला एक कोटी रुपयांची मदत देण्यासह विविध मागण्यांसाठी आंदोलन. 9 सप्टेंबर रोजी रायपूर येथील शेतकरी भगवान धुर्वे यांचा वाघाच्या हल्ल्यात झाला होता मृत्यू
-
परवानगी नाही तरी जरांगे मुंबईत उपोषणावर ठाम
सकाळी 11 वाजता मुंबईच्या दिशेनं निघणारच… आझाद मैदान पोलिसांनी दुसऱ्यांदा परवानगी नाकारल्यानंतर जरांगेंचं प्रतिआव्हान… फडणवीसांच्या डावाच्या विरोधात माझा डाव, जरांगेंचा इशारा
-
गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु
गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु. हसन मुश्रीफांचे चिरंजीव नाविद मुश्रीफांनी गोकुळसाठी अर्ज भरला
-
वाशिमच्या कारंजा येथे शेतकरी आक्रोश मोर्चाला झाली सुरुवात
वाशिमच्या कारंजा येथे शेतकरी आक्रोश मोर्चाला सुरुवात झाली.राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला. रोहित पवार बैल गाडीत बसून मोर्चात सहभागी झाले. पाटणी यांच्या कार्यालयापासून तहसील कार्यालयापर्यंत हा मोर्चा निघणार आहे. कारंजा-मानोरा तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करण्यात आली आहे. या मोर्चात मोठ्या संख्येने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी सहभाग घेतला आहे.
-
मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने मराठा बांधव उपस्थित
मनोज जरांगे पाटील हे आता वडीगोद्री गावात दाखल झाले आहेत. त्यांच्या स्वागतासाठी प्रचंड मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव जमले आहेत. मराठा बांधवांच्या जेवणासाठीची आणि पाण्यासाठीची देखील व्यवस्था करण्यात आली असून अन्नछत्र उभारण्यात आले आहे.
-
बीडच्या मांजरसुंब्यात बीड, धाराशिव, लातूर जिल्ह्यातील मराठा बांधव येणार
बीडच्या मांजरसुंब्यात बीड, धाराशिव, लातूर जिल्ह्यातील मराठा बांधव येणार आहेत. स्वागतासाठी जंगी तयारी करण्यात येत आहे. पोलिसांचा तगडा बंदोबस्त आहेत. जरांगे पाटील अंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. मांजरसुंबा चौकात बीड, धाराशिव आणि लातूर या तीन जिल्ह्यातील लोकांनी निरोप देण्यासाठी यावं कसं जरांगे पाटलांनी आवाहन केलं होतं. यानंतर मांजरसुंबा चौकात जरांगे पाटलांच्या स्वागतासाठी क्रेन, जेसीबी तैनात करण्यात आले असून स्वागतासाठीची जय्यत तयारी सुरू आहे तर पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे. मराठा बांधवांच्या जेवणासाठीची आणि पाण्यासाठीची देखील व्यवस्था करण्यात आली असून अन्नछत्र उभारण्यात आले आहे.
-
आमदार संदिप क्षीरसागर बीडमध्ये जरांगे पाटलांचे करणार स्वागत
शरद पवार गटाचे आमदार संदिप क्षीरसागर हे मनोज जरांगे पाटील मुंबईकडे निघाले असून त्यांचे बीडमध्ये राष्ट्रवादी भवन येथे जंगी स्वागत करणार आहेत. त्यासंदर्भात त्यांनी एक पोस्टर देखील पोस्ट केले आहे. स्वागतासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे तसेच ‘मी येतोय तुम्ही या’ असा आशय या पोस्टरवर आहे.
-
बंजारा समाज सुद्धा रस्त्यावर
बंजारा समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करावा या मागणीसाठी नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील चोरंबा पाटीवर बंजारा समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. परभणीच्या जिंतूर येथील वसंतराव नाईक पुतळा परिसरात बंजारा समाजाचे नेते विनोद आडे 5 सप्टेंबर पासून आमरण उपोषण करीत आहेत. त्यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून आज अर्धापूर तालुक्यातील बंजारा समाजाने चोरंबा पाटीवर रास्ता रोको आंदोलन सुरु केलेय. राष्ट्रीय महामार्ग 361 वर रास्ता रोको आंदोलन केल्याने रस्त्याच्या दुतर्फा वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
-
छावा संघटनेकडून रास्ता रोको आंदोलन
लातूर जिल्ह्यातल्या मसलगा इथं छावा संघटनेने रास्ता रोको आंदोलन केले आहे.लातूर ते निलंगा हा महामार्ग अडवत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे. लातूरसह मराठवाडा दुष्काग्रस्त म्हणून जाहीर करा, शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्या, अशा अनेक मागण्यांसाठी हा रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे.
-
मनोज जरांगे पाटील यांचा ताफा आंतरवाली सराटी गावातून बाहेर
मनोज जरांगे पाटील यांचा ताफा आंतरवाली सराटी गावातून बाहेर पडलेला आहे. थोड्याच वेळात सोलापूर धुळे हायवे राष्ट्रीय महामार्गावरून पुढील पाटोदा मुक्कामासाठी रवाना होतील. समर्थकांनी सुद्धा ताफ्यासोबत मुंबईला जाणार असल्याचा निर्धार व्यक्त केला.
-
परवानगी नाकारल्यास कोर्टात जाणार -मनोज जरांगे
पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर ही मनोज जरांगे यांचा ताफा मुंबईच्या दिशेने निघाला आहे. दरम्यान जरांगे पाटील यांनी आझाद मैदानावर उपोषण, आंदोलनासाठी तिसऱ्यांदा अर्ज केला आहे. दुपारपर्यंत जर परवानगी मिळाली नाही तर हायकोर्टात जाणार असल्याची माहिती मनोज जरांगे पाटील यांनी दिली.
-
मरण स्वीकारेल पण शरण जाणार नाही – मनोज जरांगे पाटील
मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. मुंबईच्या दिशेने जाताना जरांगे यांनी मराठा समाजाला मोठं आवाहन केलं. समाजाने शांत आणि एकजूट राहावं. मरण स्वीकारेल पण शरण जाणार नाही, असेही मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.
-
मध्य प्रदेशला जाणाऱ्या पुलावर पडले पाच-पाच फुटाचे खड्डे
मध्य प्रदेश जाणाऱ्या महामार्गावरील घोडसगाव पुलावर पाच-पाच फुटाचे खड्डे पडले आहेत. हजारो वाहन जाणाऱ्या पुलावर खड्डे पडल्याने मोठा अपघात घडण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेश व विदर्भाला जोडणारा हा एकमेव पूल धोकेदायक बनला आहे. पुलावर आणि रस्त्यावर खड्ड्यांचा साम्राज्य निर्माण झालं आहे. संबंधित विभागाचं हेतू परस्पर दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहे.
-
आता तारीख पाहून दुष्काळ जाहीर करणार का? ठाकरेंच्या आमदाराचा सरकारला टोला
मंत्रालयात तब्बल अकरा लाख रुपये खर्च करून पंचांगाचे घड्याळ बसविण्याच्या निर्णयावरून आमदार कैलास पाटील यांनी सरकारवर उपहासात्मक टीका केली आहे. घड्याळात तारीख पाहून दुष्काळ जाहीर करणार का?” असा सवाल त्यांनी केला. धाराशिव जिल्ह्यात निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती सरकारला दिसत नाही का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केलाय.
-
मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने रवाना
मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. परवानगी नाकारल्यानंतरही मनोज जरांगे आंदोलनावर ठाम आहेत. यावेळी त्यांच्या अवतीभोवती मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलक आहेत. यावेळी पोलिसांनी उपचारासाठी विनंती केली. परंतु जरांगे यांनी नकार दिला.
-
लालबागच्या राजाचं कव्हरेज करताना पोलिसांकडून मीडियाची अडवणूक
लालबागच्या राजाचं कव्हरेज करताना मीडियाची अडवणूक पोलिसांकडून करण्यात आली आहे. मंडळाने पासेस दिल्यानंतरही पोलिसांनी अडवणूक केल्याचे समोर येत आहे. यानंतर माध्यमांच्या कर्मचाऱ्यांनी थेट पोलिसांशी संवाद साधला.
-
वाशिममध्ये शेतकरी आक्रोश मोर्चा, रोहित पवार करणार नेतृत्व
वाशिमच्या कारंजा येथे आज शेतकरी आक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा होणार आहे. मोर्चापूर्वी पसरणी ,धामणी या गावात नुकसानग्रस्त शेतीची पाहणी रोहित पवार करणार आहे. ४५ दिवसांहून अधिक काळ पावसाचा खंड असून सोयाबीन, कपाशी आणि तूर पिकांना फटका बसल्याचे समोर येत आहे.
-
बंजारा समाजाकडून आज गंगाखेड बंदची हाक
ST प्रवर्गातून आरक्षण द्या मागणीसाठी आज बंजारा समाजाच्या वतीने गंगाखेड शहर बंदची हाक देण्यात आली आहे. बंजारा आरक्षणाकरिता विनोद आडे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत बंजारा समाजाकडून देण्यात बंदची हाक देण्यात आली आहे. शहरातील आपत्कालीन सुविधा वगळता सगळी दुकाने आस्थापणे ठेवण्यात बंद ठेवण्यात आली आहे.
-
रांजणगाव महागणपती मंदिरात भाविकांना धक्काबुक्की?
अष्टविनायकांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र रांजणगाव महागणपती मंदिरात मुक्तद्वार दर्शनासाठी आलेल्या भाविकांना सुरक्षारक्षकाकडून धक्काबुक्की करण्यात आल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये भाविकांशी सुरक्षारक्षकाचे वर्तन आक्रमक असल्याचे दिसून येत आहे.
-
तिरंगा असलेला केक कापल्याप्रकरणी निलम गोऱ्हे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
विधान परिषदेच्या आमदार निलम गोऱ्हे यांच्या वाढदिवसानिमित्त तिरंगा आणि संसदेची प्रतिमा असलेला केक कापल्याचा आरोप करत, त्यांच्यासह झेलम आणि पूजा रावेतकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.
-
विद्यार्थी साहाय्यक समितीमध्ये विद्यार्थिनींचा पर्यावरण पुरक झिरो बजेट गणेशोत्सव
सर्वत्र गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. पुण्यातील विद्यार्थी साहाय्य्क समितीमधील विद्यार्थ्यांनीनी पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचे आयोजन केले आहे.
-
वाशिमच्या कारंजा येथे आज शेतकरी आक्रोश मोर्चा
वाशिमच्या कारंजा येथे आज शेतकरी आक्रोश मोर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा होणार आहे. मोर्चापूर्वी पसरणी, धामणी या गावात नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करणार रोहित पवार
-
५ दिवसांपासून बेपत्ता महिलेचा जंगलात सापडला मृतदेह
जळगावातील रामेश्वर कॉलनीमधील ५ दिवसांपासून बेपत्ता महिलेचा एरंडोल तालुक्यातील जंगलात मृतदेह आढळला. कविता अरुण मिस्तरी असे खून झालेल्या ३७ वर्षीय मयत महिलेचे नाव असून दगडाने ठेचून हत्या केल्याची माहिती समोर आली आहे.
-
मुख्यमंत्र्यांकडून मनोज जरांगे पाटील यांना सल्ला
मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेने निघाले आहेत, आता यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून मनोज जरांगे पाटील यांना पुनर्विचार करण्याचे आवाहन देण्यात आले आहे.
-
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज अठरावा दिवस
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज अठरावा दिवस. सकाळी 11 वाजता माध्यमांशी संवाद साधून जरांगे पाटील होणार मुंबईच्या दिशेने रवाना. जरांगे पाटील यांच्या उपोषणाला मुंबई पोलिसांनी परवानगी दिली पाहिजे समर्थकांची मागणी. उत्सवाच्या नावाखाली परवानगी नाकारू नये, परवानगी नसले तरी आम्ही मुंबईला जाऊ. जरांगे पाटील उपोषण करतील आम्ही गणपती दर्शन करू, मराठा बांधव मुंबईला जाण्यावर ठाम.
-
संजय राऊत यांची दिशा सालियन प्रकरणावर प्रतिक्रिया
जरांगेच्या मुद्यावरुन लक्ष हटावं म्हणून पुन्हा एकदा दिशा सालियन प्रकरण चर्चेत आणलं, सालियन प्रकरणात आदित्य ठाकरे यांचा काहीच संबंध नाही असे संजय राऊत म्हणाले.
-
सालियन प्रकरणावर संजय राऊत यांची प्रतिक्रिया
सालियन प्रकरण न्यायालयात नेलं हे राजकीय षडयंत्र आहे, आमच्यावर दबावाचे राजकारण सुरु आहे, खोट्या कथा रंगावल्या जात आहे, हा अनैतिक दबाव आहे असं संजय राऊत म्हाणाले.
-
ऋषी पंचमी निमित्त गोदाघाटावर भाविकांची गर्दी
ऋषी पंचमी निमित्त गोदाघाटावर भाविकांची गर्दी. मात्र गोदाघाटावर सुरू असलेल्या सिंहस्थ कामांमुळे भाविकांची गैरसोय. प्रशासनाकडून भाविकांना स्नानासाठी पर्यायी जागेची व्यवस्था. ऋषी पंचमी निमित्त गोदा स्नानाला महत्त्व
-
आम्हाला साथ देणारे सहकारी आमच्यात नाहीत- शरद पवार
शरद पवार म्हणाले की, “आम्हाला साथ देणारे सहकारी आमच्यात नाहीत. महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी मी पुण्यात आलो, तेंव्हा माझी त्यांच्यासोबत भेट झाली, ती शेवट पर्यंत सोबत लाभली. मावळ तालुक्यात त्यांनी समाजकार्य सुरु केलं. सरपंच, सभापती ते मंत्री असा त्यांचा प्रवास होता. अतिशय कर्तृत्ववान कामगिरी त्यांनी केली. पुणे-मुंबई हा प्रवास करताना वडगाव मावळ आलं की आम्ही मदन बाफना यांना भेटायचो, हे ठरलेलं होतं. मात्र आता यात खंड पडणार आहे. आता त्यांचे पुत्र वडिलांचा वारसा सांभाळतील. मदन बाफना यांच्या पुत्राच्या पाठीशी आम्ही कायम राहू.”
-
मदन बाफना हे अल्पसंख्याक घटकातुन आले- दिलीप वळसे पाटील
दिलीप वळसे पाटील म्हणाले, “मदन बाफना हे अल्पसंख्याक घटकातुन आले…सर्वच समाजाबरोबर त्यांचा संपर्क राहिला… शेवटच्या क्षणापर्यंत हे सामाजिक कामासाठी कार्यरत राहिले…कुटुंब वसल्य ते होते त्यांच्यासोबत कौटुंबिक संबंध राहिले आहेत…बाफना कुटुंबीयांना दुःख हलकं करण्याची ईश्वर ताकद देवो…
-
१२ ज्योतिर्लिंगांची धावती यात्रा करणाऱ्या मोनूचे त्र्यंबकेश्वरमध्ये उत्स्फूर्त स्वागत
आईच्या आरोग्यासाठी नवस; १२ ज्योतिर्लिंगांची धावती यात्रा करणाऱ्या मोनूचे त्र्यंबकेश्वरमध्ये उत्स्फूर्त स्वागत. आईच्या उत्तम आरोग्यासाठी नवस करत १२ ज्योतिर्लिंगांची यात्रा धावत पूर्ण करण्याचा मोनूचा संकल्प. बिहारमधील धावपटू मोनूची देशभर पायांनी धावत अनोखी यात्रा. आतापर्यंत ८ हजार किलोमीटरहून अधिक प्रवास. मोनूने आतापर्यंत ५ ज्योतिर्लिंगांचे दर्शन पूर्ण केले. आज श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वरमध्ये मोनूचे उत्स्फूर्त स्वागत. त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त पुरुषोत्तम कडलग, कैलास मोरे आणि योगेश महाले यांनी केले स्वागत. मोनूने Sapkal Knowledge Hub मधील विद्यार्थ्यांशी साधला संवाद. स्पर्धा परीक्षांमधील अनियमितता, MPSC विद्यार्थ्यांच्या समस्या आणि विविध प्रश्नांवर मोनूने व्यक्त केले मत. मेहनत, सातत्य आणि ध्येयावर विश्वास ठेवण्याचा विद्यार्थ्यांना संदेश. आईच्या आरोग्यासाठी सुरू केलेला मोनूचा प्रवास ठरतोय श्रद्धा, जिद्द आणि तरुणांसाठी प्रेरणेचा संदेश
-
मनोज जरांगे पाटील आज एकटेच मुंबईला रवाना होणार
मनोज जरांगे पाटील आज एकटेच मुंबईला रवाना होणार… साधारणता अकरा वाजता जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेने रवाना होणार…जरांगे पाटील यांच्या मुंबई आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जरांगे पाटील सोबत राहणार शेकडोंच्या संख्येने पोलीस बंदोबस्त…. 3 उपविभागीय पोलीस अधिकरी, 10 पोलीस निरीक्षक,30 पोलीस उपनिरीक्षक..200 सहायक पोलिस उपनिरीक्षक,490 पोलीस कर्मचारी,होमगार्ड-265
SRPF -3 तुकडी.. एवढ्या मोठ्या प्रमाणावर राहणार जरांगे यांच्यासोबत बंदोबस्त… मुंबई जात असताना कुठलही आंदोलन होऊ नये,रास्ता रोको होऊ नये अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून खबरदारी -
सानपाडामध्ये एका दुकानात सिलेंडर ब्लास्ट झालाय
सानपाडामध्ये एका दुकानात सिलेंडर ब्लास्ट झालाय. पाच दुकानाचे मोठे नुकसान. दोन जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
-
पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरासमोर महिलांचं सामूहिक अथर्वशीर्ष पठण
पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरासमोर महिलांचं सामूहिक अथर्वशीर्ष पठण होणार आहे. अथर्वशीर्ष पठणासाठी महिलांची मोठी गर्दी जमली आहे. दरवर्षी ऋषीपंचमीच्या निमित्ताने गणेशोत्सवात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर समोर अथर्वशीर्ष पठण केलं जातं. जवळपास 35 हजार पेक्षा जास्त अथर्वशीर्ष पठण करण्यासाठी महिलांची संख्या आहे.
-
ऊन-सावलीच्या खेळामुळे रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ
या महिन्यात पावसाने उघडीप दिली असली तरी दिवसा कडकडीत ऊन पडतं आणि रात्रीच्या वेळी थंडी वाजते. या परस्पर विरोधी हवामानामुळे सध्या विषाणूजन्य आजारांच्या रुग्णांची संख्या अचानक वाढली आहे. त्याबरोबर आता गणेश उत्सव सुरुवात झाल्याने खरेदी आणि उत्सव साजरा करण्यासाठी गर्दी झाल्याने त्या माध्यमातून श्वसन विषयक आजार असल्याच्या रुग्णांच्या संख्येतही वाढ होण्याची शक्यता वैद्यकीय तज्ञांनी व्यक्त केली आहे.
-
कल्याण- डोंबिवलीत शिवसेना-भाजप संघर्षाला नवं वळण
कल्याण- डोंबिवलीत शिवसेना-भाजप संघर्षाला नवं वळण मिळालं आहे. गणपत गायकवाड समर्थक माजी नगरसेवकानं शिवसेनेत प्रवेश केला आहे. भाजपच्या पक्षप्रवेशानंतर शिवसेनेनं पलटवार केला. कल्याण पूर्वेत भाजपला मोठा धक्का बसला आहे. माजी आमदार गणपत गायकवाड यांचे समर्थक आणि भाजपचे माजी नगरसेवक अनंता पावशे शिवसेनेत दाखल झाले आहेत. शिवसेना संपर्कप्रमुख महेश गायकवाड यांच्या पुढाकाराने धर्मवीर आनंद दिघे यांच्या आश्रमात पक्षप्रवेश झाला.
-
मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा उपचार घेण्यास दिला नकार
मनोज जरांगे पाटील यांच्या वैद्यकीय तपासणीसाठी डॉक्टरांचं पथक दाखल झालं होतं. मात्र आज पुन्हा एकदा जरांगे पाटलांनी उपचार घेण्यास नकार दिलेला आहे. डॉक्टरांकडून उपचार घेण्याची विनंती करण्यात आली.
-
मनोज जरांगे पाटील यांच्या निर्णायक आमरण उपोषणाचा आजचा 18 वा दिवस
जालना- मनोज जरांगे पाटील यांच्या निर्णायक आमरण उपोषणाचा आजचा 18 वा दिवस आहे. ते आज मुंबईच्या दिशेने अंतरवाली सराटीतून एकटेच कूच करणार आहेत. जरांगे यांच्या आवाहनानंतरही आम्ही मुंबईला जाऊच, यावर मराठा बांधव ठाम आहेत. मराठा आरक्षणाच्या लढ्यासाठी मनोज जरांगे पाटील आता तिसऱ्यांदा मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला परवानगी नाकारल्याने मी एकटाच जाणार, असं आवाहन जरांगे पाटील यांनी केलं केलं होतं.
शिवसेना पक्ष आणि चिन्हावर सुनावणी सुरू आहे. कपिल सिब्बल यांनी ठाकरे गटाची बाजू मांडली. धनुष्यबाण चिन्ह देणे शक्य नसेल तर ते गोठवा, अशी मागणी थेट शिवसेना ठाकरे गटाने केली. शिवसेना शिंदे गटाकडून आज कोर्टात बाजू मांडली जाणार आहे. गणेशोत्सव काळात ध्वनी प्रदूषणाच्या पातळीचे निरीक्षण करण्यासाठी राज्यातील 27 शहरांमध्ये एकूण 132 निरीक्षण केंद्रांवर ध्वनी पातळीचं निरीक्षण करण्यात येणार आहे. या निरीक्षणाचा कालावधी सायंकाळी सहा ते मध्यरात्री बारा वाजेपर्यंत सहा तास राहणार आहे. 15 , 19, 20 आणि 25 सप्टेंबर 2026 या दिवशी करण्यात येईल. दुसरीकडे गणेशोत्सवात निर्माण होणाऱ्या निर्माल्यावर प्रक्रिया करून त्यापासून खत तयार करत पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी महापालिकेने पुढाकार घेतला आहे. गेल्या वर्षी सुमारे 900 टन निर्माल्यापासून 90 टन खत तयार केलं होतं.