Maharashtra News LIVE : ट्रॅफिक पोलीसाची दुचाकीस्वाराला शिवीगाळ, व्हिडीओ व्हायरल

Maharashtra News LIVE : शिवसेना पक्षाच्या चिन्हाबद्दल आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. शिवसेना पक्ष आणि चिन्ह शिंदेंच्या शिवसेनेला देण्याच्या निर्णयावरील आव्हान याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. मागच्या सुनावणीत कपिल सिब्बल यांनी न्यायालयात उद्धव ठाकरेंची बाजू मांडली होती.

Maharashtra News LIVE : ट्रॅफिक पोलीसाची दुचाकीस्वाराला शिवीगाळ, व्हिडीओ व्हायरल
Maharashtra news live updates
Image Credit source: Tv9
| Edited By: | Updated on: Aug 04, 2026 | 7:13 PM

LIVE NEWS & UPDATES

  • 04 Aug 2026 07:24 PM (IST)

    सातारा : कास धरण ओव्हरफ्लो, तरीही साताऱ्यात पाणीटंचाई

    कास धरण पूर्ण भरलेले असतानाही सातारा शहरातील यादोगोपाळ पेठेत कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाल्याने संतप्त नागरिकांनी रस्त्यावर उतरून ‘रास्ता रोको’ आंदोलन केले. पालिका प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत रहिवाशांनी पाणीपुरवठा नियमित करण्याची मागणी केली. घटनेची माहिती मिळताच आरोग्य सभापती धनंजय जांभळे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आणि पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले.

  • 04 Aug 2026 07:09 PM (IST)

    भंडारा : चार दिवसाच्या विश्रांतीनंतर पावसाची हजेरी

    हवामान विभागाने आज भंडारा जिल्ह्याला येलो अलर्ट दिलेला असताना भंडाऱ्याच्या तुमसर तालुक्यातील ग्रामीण भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. चार दिवसांपासून उसंत घेतलेल्या पावसामुळे वातावरणात प्रचंड उकाडा निर्माण झालेला होता. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची व्यवस्था नाही, असेही शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत असताना हा पाऊस त्यांच्यासाठी समाधानकारक ठरला आहे.


  • 04 Aug 2026 06:23 PM (IST)

    ट्रॅफिक पोलीसाची दुचाकीस्वाराला शिवीगाळ, व्हिडीओ व्हायरल

    सोलापुरात शहरात ट्रॅफिक पोलीसाने एका दुचाकीस्वाराला धक्काबुक्की करत अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.  शहरातील अक्कलकोट रोड पाणीटाकीच्या चौकात हा प्रकार घडल्याचे व्हिडीओत दिसत आहे.  राजेंद्र खाडे असे या मुजोर पोलिसाचे नाव असून तो शहर उत्तर वाहतूक शाखेत कार्यरत आहे.  दुचाकीवरून आलेल्या तरुणाचा मोबाईल काढून घेत दमदाटी करीत गुन्हा दाखल करण्याचीही धमकी या पोलीसाने दिल्याचे या व्हिडिओत दिसत आहे.

  • 04 Aug 2026 06:09 PM (IST)

    जायकवाडी धरणाचा पाणीसाठा 94 टक्क्यांवर, गोदावरी किनारी सतर्कतेचा इशारा

    छत्रपती संभाजीनगरातील जायकवाडी धरणातील पाणीसाठा 94 टक्क्यांवर गेला आहे. थोड्याच वेळात धरणातून गोदावरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू होणार आहे. सुरुवातीला 10 हजार क्युसेकने गोदावरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग होणार आहे. गोदावरी नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. नदीकाठी असलेली गुरे-ढोरे सुरक्षित ठिकाणी हलविण्याचेही आवाहन केले आहे.

     

  • 04 Aug 2026 04:50 PM (IST)

    बाबा नमकीन या चिवड्याच्या कंपनीला आग

    जळगाव एमआयडीसीतील बाबा नमकीन या चिवड्याच्या कंपनीला आग लागली आहे. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांच्या शर्थीच्या प्रयत्नांनी आगीवर नियंत्रण मिळवले आहे.


  • 04 Aug 2026 04:40 PM (IST)

    कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात स्वाईन फ्लूचा शिरकाव

    कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात स्वाईन फ्लूचा शिरकाव झाला आहे. कल्याणच्या खाजगी रुग्णालयामध्ये दोन स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळले. दोन्ही रुग्णांनवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला खाजगी रुग्णालयातून कोणतीही माहिती पुरवली जात नसल्याचा केडीएमसी आरोग्य अधिकाऱ्यांचा आरोप.

  • 04 Aug 2026 04:30 PM (IST)

    ही काँग्रेसची पहिल्यापासून संस्कृती; रावसाहेब दानवेंची सडकून टीका

    या प्रकारची टीका एखाद्या राजकीय पक्षांना किंवा नेत्यांनी करणं हे योग्य नाही, सुनेत्रा पवार राजकारणामध्ये नवीन आहे. अजित दादा गेल्यानंतर पोकळी भरून काढण्याचं काम पक्षाने त्यांच्याकडे दिलं. त्यामुळे त्यांच्या कामाचे मूल्यमापन असं करता येणार नाही. सुनेत्रा पवार यांचं अशा प्रकारचं वर्णन करणं ही काँग्रेसची पहिल्यापासून संस्कृती आहे, ते कधीच कुणाला चांगलं म्हणत नाही

  • 04 Aug 2026 04:20 PM (IST)

    राऊतांवर मंत्रालयात गेलेला एक दिवसाचा मुख्यमंत्री सिनेमा काढावा- रावसाहेब दानवे

    संजय राऊत यांनी अडीच वर्षाच्या काळात मंत्रालयात गेलेला एक दिवसाचा मुख्यमंत्री हा चित्रपट काढावा आणि त्याच डायरेक्टर शरद पवारांना करावा. संजय राऊत यांनी केलेल्या विधानावर भाजप नेते रावसाहेब दानवे यांचा खोचक टोला.

  • 04 Aug 2026 04:10 PM (IST)

    शहापूर TDRF जवान मृत्यूप्रकरणी 30 तासांनंतर प्रशासनाची बैठक

    नाशिक-मुंबई महामार्गावरील खड्ड्यामुळे झालेल्या अपघातात TDRF जवान विकास गोरे यांच्या मृत्यूनंतर तब्बल 30 तासांनी प्रशासनाची हालचाल. शहापूर पोलीस ठाण्यात MSRDC आणि विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक पार पडत आहे.

  • 04 Aug 2026 03:59 PM (IST)

    CCMP-BHMS नोंदणीच्या निषेधार्थ डॉक्टरांचा एक दिवसाचा संप

    CCMP-BHMS नोंदणीच्या निषेधार्थ डॉक्टरांचा एक दिवसाचा संप. CCMP-BHMS नोंदणीला IMAकडून विरोध. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अनिश्चित काळासाठी सुरु राहणार – IMAचा इशारा

  • 04 Aug 2026 03:50 PM (IST)

    पंतप्रधानांना शिवीगाळ करणाऱ्या मुलीविरोघात FIR दाखल करणार नाही

    पंतप्रधानांना शिवीगाळ करणाऱ्या मुलीविरोघात FIR दाखल करणार नाही. पंतप्रधानांनी तिला माफ केल्यानं कारवाई करणार नाही- दिल्ली पोलीस. तर हा खटला मागे घेण्यात आलाय, असं वकील स्मृती सिंह चंडेल यांनी सांगितलं

  • 04 Aug 2026 03:40 PM (IST)

    डॉ. डी.वाय पाटलांच्या निधनाचं वृत्त अत्यंत दुःखद-फडणवीस

    डॉ. डी.वाय पाटलांच्या निधनाचं वृत्त अत्यंत दुःखद. डी.वाय पाटलांच्या निधनाने एक दूरदर्शी व्यक्तिमत्व हरपले. पाटील कुटुंबाच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत- मुख्यमंत्री फडणवीस

  • 04 Aug 2026 03:30 PM (IST)

    मुंबई पालिका एफ नॉर्थ वार्ड ऑफिससमोर दोन कंत्राटदारांमध्ये हाणामारी

    मुंबई पालिका एफ नॉर्थ वार्ड ऑफिससमोर दोन कंत्राटदारांमध्ये हाणामारी. दोघानीही एकमेकांवर चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना. दोघेही यामध्ये गंभीर जखमी झाले असून दोघांवरही रुग्णालयात उपचार सुरू. एका टेंडरवरून दोघांमध्ये हाणामारी झाली असावी असा पोलिसांना संशय. माटुंगा पोलिसानी दोघांच्याही विरोधात हत्येचा प्रयत्न केलाचा गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केलाय.

  • 04 Aug 2026 03:19 PM (IST)

    E20 इंधनाच्या मुद्द्यावरून अरविंद केजरीवाल आक्रमक

    E20 इंधनाच्या मुद्द्यावरून अरविंद केजरीवाल आक्रमक. पंतप्रधानांच्या निवासस्थानाकडे निघालेला ‘आप’चा मोर्चा पोलिसांनी अडवला. E20 साठी डोनाल्ड ट्रम्प यांच्या दबावाखाली येऊ नका- केजरीवाल.

  • 04 Aug 2026 03:00 PM (IST)

    रायगडच्या पालकमंत्री बाबत आजच तिढा सुटण्याची शक्यता ?

    रायगडच्या पालकमंत्री बाबत आजच तिढा सुटण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याविषयी पुढाकार घेतला आहे. तटकरे कुटुंबीयांकडून रायगडचं पालकमंत्री पद शिवसेनेला देण्यासाठी ग्रीन सिग्नल दिल्याचे समजते. अखेरीस अनेक वेळेचा प्रत्यक्ष नंतर भरत भूगावले यांचा पालकमंत्री होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

     

  • 04 Aug 2026 02:50 PM (IST)

    काँग्रेसनं आत्मपरिक्षण करावं-सदाभाऊ खोत

    काँग्रेसची महाराष्ट्रातील अवस्था बघा, काँग्रेसनं आत्मपरिक्षण करावं अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली. अजित पवारांच्या पाठिंब्यांवर काँग्रेस सत्तेत होती, काँग्रेसनं अजित पवारांचाही अपमान केलाय. हा महिलांचा तर अपमान आहेच, काँग्रेस दिशाहीन झालेली आहे, असे खोत म्हणाले.

  • 04 Aug 2026 02:40 PM (IST)

    तरुण दुचाकीसह पुराच्या पाण्यात वाहून गेला

    कोरेगाव आणि बिवरी गावांना जोडणाऱ्या मुळा-मुठा बंधाऱ्यावरील पुलावरून पुराचे पाणी वाहत असतानाही एका तरुणाने दुचाकी घालण्याचा प्रयत्न केला. या धाडसामुळे तो दुचाकीसह पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे.गंगाधर गोते (रा. बिवरी) यांनी पुराचे पाणी पुलावरून वाहत असताना दुचाकीसह पुल ओलांडण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाण्याच्या तीव्र प्रवाहामुळे त्यांचा तोल जाऊन ते दुचाकीसह पुराच्या पाण्यात वाहून गेले. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांनी तातडीने प्रशासनाला माहिती दिली. घटनास्थळी बचाव पथक आणि स्थानिक नागरिकांकडून शोधकार्य सुरू करण्यात आले आहे.

  • 04 Aug 2026 02:30 PM (IST)

    शेतकऱ्यांच्या कांद्याला कठोर निकष, गोदामात मात्र निकृष्ट कांदा?; संतप्त शेतकऱ्यांचा सवाल

    केंद्र सरकारच्या बाजारभाव स्थिरीकरण योजनेअंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफमार्फत शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी होत असल्याचा दावा केला जात आहे. मात्र, प्रत्यक्षात ही खरेदी शेतकऱ्यांकडून न होता दुसऱ्या राज्यातून तसेच व्यापाऱ्यांकडून केली जात असल्याचा गंभीर आरोप प्रहार जनशक्ती पक्षाने केला आहे. विशेष म्हणजे, शेतकऱ्यांच्या कांद्याला कडक नियम व अटी लावल्या जात असताना गोदामात साठवलेला कांदा निकृष्ट व सडका असल्याचा दावा करण्यात आला आहे. चांदवड येथील नाफेडच्या गोदामाची पाहणी प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह शेतकऱ्यांनी केली असून, या पाहणीनंतर शेतकऱ्यांनीही संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

  • 04 Aug 2026 02:18 PM (IST)

    सुनेत्रा पवार यांनी दुर्गा व्हावं – हर्षवर्धन सपकाळ

    इंदिरा गांधी यांना गुंगी गुडिया म्हटलं होतं. पण त्यांनी त्यांच्या कामातून दाखवून दिलं, वाजपेयी यांनी त्यांना दुर्गा म्हटलं. त्यामुळे या मुद्दाचं राजकारण करू नये. टीकेकडे सकारात्मक पाहावं. सुनेत्रा पवार यांनी दुर्गा व्हावं. त्यांनी बोलावं, सुनेत्रा पवारांचा मुकेपणा हा त्यांच्या पदाला शोभत नाही अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

  • 04 Aug 2026 02:10 PM (IST)

    गिरीश महाजन यांनी विद्यार्थ्यांना खडसावले

    जळगावात पोलीस भरतीचा सराव करणाऱ्या तरुणांनी मंत्री गिरीश महाजनांना घेराव घातला. भाजप जिल्हा कार्यालयासमोर विद्यार्थ्यांनी रास्ता रोको करत मंत्री गिरीश महाजन यांना घेराव घातल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. जिल्हा क्रीडा संकुलात प्रवेश शुल्क दीडशे वरून थेट सहाशे रुपये केल्याने तरुण आक्रमक, शुल्क कमी करून ३०० रुपये करावे, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी मंत्री गिरीश महाजनांनी तरुणांना आंदोलनाची पद्धत चुकीची असल्याचे खडसावून सांगत नाराजी व्यक्त केली. गुन्हा दाखल झाल्यास पोलिस विभागात भरती होता येणार नाही या शब्दात मंत्री गिरीश महाजन यांनी आंदोलन करणाऱ्या तरुणांना चांगलेच खडसावले. मंत्री गिरीश महाजन यांनी तरुणांशी मागण्यांसंदर्भात चर्चा केली आणि योग्य तो निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्यावर तरुणांनी आंदोलन मागे घेतले.

  • 04 Aug 2026 02:01 PM (IST)

    जळगावात भाजप जिल्हा कार्यालयासमोर विद्यार्थ्यांचा रास्ता रोको, विद्यार्थ्यांनी गिरीश महाजनांना घातला घेराव

    जळगावात भाजप जिल्हा कार्यालयासमोर विद्यार्थ्यांनी रास्ता रोको केला. पोलीस भरतीसाठी सराव करणाऱ्या विद्यार्थ्यांनी गिरीश महाजनांना  घेराव घातला. गुन्हा दाखल झाला तर पोलिसांत भरती होता येणार नाही, अशी धमकी या दरम्यान महजानांनी दिल्याची माहिती समोर आली आहे.

  • 04 Aug 2026 02:00 PM (IST)

    मालेगावात खड्ड्यांच्या विरोधात उबाठा, काँग्रेस आणि मालेगाव संघर्ष विधायक समिती आक्रमक

    मालेगावात खड्ड्यांच्या विरोधात उबाठा, काँग्रेस आणि मालेगाव संघर्ष विधायक समिती आक्रमक झाली आहे. शहरात मोठ्या खड्डे पडले असून त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. शहरातील खड्ड्यांचे पूजन आणि खड्ड्यात वृक्ष रोपण करून प्रशासनाचा निषेध केला.मालेगाव मनपाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत आंदोलन केले. मनपा प्रशासनाचा निषेध करीत मालेगावचा विकास गेला खोक्यात अशा घोषणा दिल्यात. शहरातील खड्डे लवकरात लवकर बुजवा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी दिला..

  • 04 Aug 2026 01:54 PM (IST)

    एअर टर्ब्युलनसमुळे एअर इंडियाच्या विमानातील प्रवासी जखमी

    एअर टर्ब्युलनसमुळे एअर इंडियाच्या विमानातील प्रवासी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. फुकेतहून दिल्लीला येणाऱ्या विमानाला टर्ब्युलन्समुळे फटका बसला, छतालाही त्याचा फटका बसला. या टर्ब्युलन्समुळे काही प्रवासी जखमी झाले. मात्र अखेर दिल्ली विमानतळावर सुरक्षितपणे विमानेच लँडिंग झाले असून, सर्व प्रवासी सुखरूप असल्याची माहिती मिळत आहे.

  • 04 Aug 2026 01:47 PM (IST)

    काँग्रेसने यापुढे टीका करताना स्वत:कडेही लक्ष द्यावं – धनंजय मुंडे

    काँग्रेसच्या मनात किती द्वेष आहे, ते त्यांच्या वक्तव्यातून कळतं.  मी फक्त आमदार आहे तरी मला हुकूमशाह म्हणताहेत, आधीही माझ्याविरोधात मीडिया ट्रायल आणि आताही तेच सुरू आहे. काँग्रेसने यापुढे टीका करताना स्वत:कडेही लक्ष द्यावं,सुनेत्रा पवार यांच्यावरील टीकेनंतर धनंजय मुंडे यांनी सुनावलं.

  • 04 Aug 2026 01:38 PM (IST)

    “जवानाचा जीव गेला, गुन्हा मात्र नाही”; आरपीआय आठवले गट आक्रमक, शहापूरमध्ये जनआंदोलनाचा इशारा

    मुंबई-नाशिक महामार्गावरील खड्ड्यामुळे टीडीआरएफ जवान विकास गोरे यांचा मृत्यू होऊन २५ तास उलटले, तरीही गुन्हा दाखल नसल्याने संताप व्यक्त होत आहे.  आरपीआय (आठवले गट) आक्रमक झाला असून संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे.  कारवाई न झाल्यास जनआंदोलन छेडण्याचा पोलिस प्रशासनाला इशारा देण्यात आला आहे.  “जवानासाठी न्याय नसेल तर सर्वसामान्य नागरिकांचे काय?” असा सवाल व्यापारी मंडळ शहापूर अध्यक्ष उपस्थित केला.

  • 04 Aug 2026 01:17 PM (IST)

    उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावरील वक्तव्यावरून कांदिवलीत राष्ट्रवादीचं काँग्रेसविरोधात आंदोलन_

    उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावरील वक्तव्यावरून कांदिवलीत राष्ट्रवादीने काँग्रेसविरोधात आंदोलन केलं.  उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना काँग्रेसकडून “गुंगी गुडिया” असे टीका आल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. या वक्तव्याच्या निषेधार्थ कांदिवलीत राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार आंदोलन सुरू केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष इंद्रपाल सिंग यांच्या नेतृत्वाखाली हे निषेध आंदोलन सुरू आहे.

  • 04 Aug 2026 01:16 PM (IST)

    TDRF जवानाच्या मृत्यूप्रकरणी शहापूर पोलिसांवर होणार कारवाई ?

    TDRF जवानाच्या मृत्यूप्रकरणी शहापूर पोलिसांवर कारवाई करणार, अशी माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी ही माहिती दिली  होती. 25 तासांनंतरही अपघात प्रकरणी गुन्हा दाखल झालेला नाही, अशी माहिती समोर आली आहे.

  • 04 Aug 2026 01:09 PM (IST)

    माणिकराव कोकाटे यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा

    माणिकराव कोकाटे यांना दिलेलं अंतरिम संरक्षण कायम ठेवण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला असून त्यामुळे कोकाटे यांना मोठा दिलासा मिळाला आहे.  फेरविचार याचिकेवर 6 महिन्यांतं निर्णय देण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.

  • 04 Aug 2026 01:04 PM (IST)

    शिवसेना पक्ष आणि चिन्ह कोणाचं, यावर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी

    शिवसेना पक्ष आणि चिन्ह कोणाचं, यावर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी होणार आहे.  या पार्श्वभूमी वरती उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व मंत्र्यांची बैठक बोलवली .  राज्य मंत्रिमंडळ बैठकीआधी शिवसेनेचे  सर्व मंत्री बैठकीला हजर असून गेल्या तासाभरापासून बैठक सुरू आहे.

    बैठकीत प्रामुख्याने सुप्रीम कोर्टात होणाऱ्या सुनावणीवर आणि येणाऱ्या निकालावर खलबतं होत आहेत.

  • 04 Aug 2026 12:50 PM (IST)

    राष्ट्रवादीच्या काही पदाधिकाऱ्यांनी शहरभर बॅनर लावले

    राष्ट्रवादीच्या काही पदाधिकाऱ्यांनी शहरभर बॅनर लावले पण खड्ड्यातून कोणाला बाहेर काढावे यात काही तथ्य नाहीये. जितके जबाबदार इतर नेते आहेत तितकेच जबाबदार ते देखील आहे त्यांनी पण काम करावं कारण सत्तेत ते पण आहेत पण बॅनर लावणे हे संयुक्तिक नाही. पालकमंत्री जरी नसेल तरी कुंभमंत्री गिरीश महाजन काम करत आहेत. महत्वाचं म्हणजे थेट मुख्यमंत्री नाशिकच्या कामांवर बारीक लक्ष ठेवून आहेत. भाजपवर खापर फुटत आहे हे मान्य आहे. पण mngl, स्मार्टसिटी,मनपाने रस्ते खोदले आहेत. कुंभसाठी सर्व कामे सुरू आहेत. आता आम्ही मनपाला सांगितले आहे की सर्व काळजी घेत ठेकेदारांची माहिती द्यावी. भाजपच्या कुठल्याही नगरसेवकाने जर कामे थांबविली असतील तर माहिती घेऊन कारवाई करू

  • 04 Aug 2026 12:45 PM (IST)

    गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यातील सोमनपल्ली पासून बंद

    गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यातील सोमनपल्ली पासून बंद_ राष्ट्रीय महामार्गावर ट्रक फसल्याने वाहतूक बंद पडलेली आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक राष्ट्रीय महामार्ग मोठ मोठे खड्डे पडले असून वाहतुकीसाठी मोठी अडचण गडचिरोली जिल्ह्यात निर्माण होत आहे. काल सायंकाळच्या सुमाराचे छत्तीसगड जाणारा एक मालवाहतूक वाहना राष्ट्रीय महामार्गामध्ये_फसल्यामुळे दोन्ही बाजूंनी वाहतूक ठप्प झाली. आज या मालवाहतूक वाहनाला रिकामे करण्यात आल्या असून_ सध्या सोमनपल्ली पासून राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक ठप्प आहे. राष्ट्रीय महामार्गाची दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी मालवाहतूक वाहक व चालकांची होत आहे

  • 04 Aug 2026 12:40 PM (IST)

    पोलिसांनी अडवल्यानंतर अरविंद केजरीवाल आता रस्त्यावर बसले

    नवी दिल्लीच्या फिरोज शहा रोडवर आपचा मोर्चा पोलिसांनी अडवला आहे. आता हा मोर्चा पोलिसांनी अडवल्यानंतर अरविंद केजरीवाल आता रस्त्यावर बसले आहेत. केजरीवाल यांच्यासोबत त्यांचे नेतेही रस्त्यावर बसले आहेत.

  • 04 Aug 2026 12:35 PM (IST)

    गडकरींचा निर्णय नसून तो मोंदी यांचा निर्णय आहे- E20 वर अरविंद केजरीवाल यांची प्रतिक्रिया

    अरविंद केजरीवाल म्हणाले की, “33 हजार लोकांनी पेटिशनवर सही केली आहे. तेच पेटिशन घेऊन आम्ही मोदी यांच्याकडे जात आहोत, आणि त्यांना विनंती करणार आहोत, पूर्ण देशात जर E20 लादले जात आहे तर तो फक्त एकट्या गडकरी यांचा निर्णय नसून तो कॅबिनटचा निर्णय आहे. हा पूर्णपणे मोंदी यांचा निर्णय आहे.”

  • 04 Aug 2026 12:30 PM (IST)

    अरविंद केजरीवाल यांचा E20 विरोधातील मोर्चा पोलिसांनी अडवला

    दिल्लीत अरविंद केजरीवाल यांचे E20 विरोधात आंदोलन सुरु आहे. अरविंद केजरीवाल यांच्यासोबत मनिष सिसोदिया आणि संजय सिंह या मोर्चात सहभागी झाले आहेत. आता हा मोर्चा पोलिसांनी अडवला आहे.

  • 04 Aug 2026 12:25 PM (IST)

    E20 च्या मुद्यावर अरविंद केजरीवाल आक्रमक

    E20 च्या मुद्यावर अरविंद केजरीवाल आक्रमक झाले आहेत. केजरीवाल आज जनतेच्या तक्रारींचे पत्र मोदी यांना देणार आहे. E20 मुळे वाहनांचे मोठे नुकसान झाल्याचा दावा केजरीवाल यांनी केला आहे. केजरीवाल यांच्या आंदोलनलाचा दिल्ली पोलिसांची परवानगी नव्हती तरीही केजरीवाल यांनी हा मोर्चा काढला आहे.

  • 04 Aug 2026 12:20 PM (IST)

    मनसे नेते राज ठाकरे 9 ऑगस्टला माणगाव दौऱ्यावर

    मनसे नेते राज ठाकरे 9 ऑगस्टला माणगाव दौऱ्यावर जाणार आहे. अनेक वर्ष रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी करणार आहे. माणगाव बायपासच्या रखडलेल्या कामाची अधिकाऱ्यांसह पाहणी करणार आहे.

  • 04 Aug 2026 12:15 PM (IST)

    राज्यसभेत राम मंदिर चोरीच्या प्रकरणावरुन विरोधकांचा गदारोळ

    राज्यसभेचे कामकाज पुन्हा सुरु झाले आहे. काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी राज्यसभेत राम मंदिर चोरीचा मुद्दा उपस्थित केला आहे. राम मंदिर चोरीच्या प्रकरणावरुन विरोधकांचा गदारोळ पाहायला मिळाला.

  • 04 Aug 2026 12:10 PM (IST)

    सुनेत्रा पवार यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्यावर नवनीत राणांची ट्विट करत प्रतिक्रिया

    काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्यावर नवनीत राणांची ट्विट करत प्रतिक्रिया. “काँग्रेसचे मानसिक संतुलन बिघडलेले नेते पृथ्वीराज चव्हाण यांची उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या बाबतचे वक्तव्य अत्यंत नीच लाजिरवाने आणि स्त्री जातीचा अपमान करणारे आहे. स्वतःला सुसंस्कृत म्हनवणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांची भाषा इतक्या खालच्या पातळीवर घसरली आहे का? एका कर्तुत्वान महिलेचा असा अपमान करून काँग्रेसने आपली विकृत मानसिकता पुन्हा दाखवून दिली आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी सुनेत्राताई ची व महाराष्ट्रातील सर्व महिलांची तात्काळ माफी मागावी.”

  • 04 Aug 2026 12:03 PM (IST)

    नवी मुबंई पालिकेतील सत्तासूत्रे पुन्हा माजी आमदार संदीप नाईकांकडे

    नवी मुबंई पालिकेतील सत्तासूत्रे पुन्हा माजी आमदार संदीप नाईकांकडे. नवी मुंबई महापालिका निवडणुकांची धामधूम संपताच शहरातील राजकीय प्रवाहातून पुन्हा काही काळ अलिप्त झालेले माजी आमदार संदीप नाईक यांच्याकडे पुन्हा एकदा नवी मुंबई महापालिकेतील सत्ताधारी पक्षाची सुत्र सोपवली जाण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. महापालिकेत एकहाती सत्ता मिळूनही गेल्या पाच महिन्यांपासून प्रभागातील कामे खोळंबली असल्याच्या तक्रारी सत्ताधारी भाजपचे नगरसेवक करु लागले असून वन मंत्री गणेश नाईक यांनी नुकत्याच घेतलेल्या एका बैठकीत काही नगरसेवकांनी आपत गाऱ्हाणे मांडल्याचे समजते. या बैठकीतच नाईक यांचे संदीप यांनी याकडे लक्ष द्यावे असे स्पष्ट संकेत दिल्याचे विश्वसनिय सूत्रांची माहिती आहे.

  • 04 Aug 2026 11:52 AM (IST)

    इगतपुरीत अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई

    इगतपुरीत अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई करण्यात आली आहे.  79.27 लाखांचा प्रतिबंधित पानमसाला व सुगंधित तंबाखू जप्त करण्यात आली आहे.  बोरटेंभे फाट्याजवळ आयशर ट्रकवर छापा टाकण्यात आला असून  भिवंडीत विक्रीसाठी नेत असलेला बेकायदेशीर साठा रंगेहात पकडलाय. पानमसाला, जाफरानी जर्दा आणि ट्रकसह मोठा मुद्देमाल जप्त करत चालकासह चार जणांविरुद्ध इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.  अन्न सुरक्षा व मानके कायदा आणि भारतीय न्याय संहितेअंतर्गत कारवाई कारवाई करण्यात आली.

  • 04 Aug 2026 11:40 AM (IST)

    बीएचएमएस डॉक्टरांना सीसीएमपी अभ्यासक्रमानंतर महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये नोंदणी देण्याच्या प्रस्तावाला विरोध

    बीएचएमएस डॉक्टरांना सीसीएमपी अभ्यासक्रमानंतर महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये नोंदणी देण्याच्या प्रस्तावाला विरोध करण्यात आलाय. या प्रस्तावाच्या विरोधात नाशिक मधील सुमारे अडीच हजार डॉक्टर आज एक दिवसाच्या संपावर आहेत.  संपामुळे खासगी आणि शासकीय आरोग्यसेवेवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पूर्वनियोजित शस्त्रक्रिया, कर्करोग उपचार, डायलिसिस आणि प्रसूती सेवा प्रभावित होण्याची भीती आहे. एमएआरडी, एएसएमआय आणि विविध वैद्यकीय संघटनांचा आंदोलनाला पाठिंबा दिलाय.  सरकारने निर्णय मागे न घेतल्यास आंदोलन बेमुदत करण्याचा इशारा दिलाय.

  • 04 Aug 2026 11:37 AM (IST)

    पद्मश्री डॉ. डी.वाय पाटील यांचं निधन

    पद्मश्री डॉ. डी.वाय पाटील यांचं निधन झालं आहे. कोल्हापूर येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. डॉ. डी.वाय पाटील यांनी वयाच्या 90 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

  • 04 Aug 2026 11:30 AM (IST)

    उमेद अभियानातील कोट्यवधींच्या गैरव्यवहार प्रकरणी दोषींवर प्रशासनाचा बडगा

    महिला बचत गट व सीआरपी सदस्यांना मिळणाऱ्या मानधनात गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर जिल्हास्तरीय चौकशी समितीची स्थापना करण्यात आली होती. सखोल तपासाअंती अधिकाऱ्यांनी शासकीय निधीचा अपहार केल्याचे आणि पदाचा गैरवापर करून गैरव्यवहार केल्याचे निष्पन्न झाले. संबंधित कर्मचाऱ्यांना नोटीस बजावून उत्तर सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र, त्यांनी दिलेले खुलासे असमाधानकारक आढळले. खुलासे अमान्य करत बीड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आठही तालुका व्यवस्थापक आणि प्रभाग समन्वयकांची बीड जिल्ह्यातील सेवा तात्काळ समाप्त केली व त्यांना नवी मुंबई येथे वर्ग केले.

  • 04 Aug 2026 11:21 AM (IST)

    तामिळनाडूचे माजी उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन यांना अटक

    तामिळनाडूचे माजी उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन यांना अटक करण्यात आली आहे… अभिनेत्री तृषा संदर्भात आक्षेपार्ह घोषणाबाजी केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

  • 04 Aug 2026 11:20 AM (IST)

    ऊपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा गंगू गुडिया असा ऊल्लेख करणं हे साफ चुकीचं – अंजला दमानिया

    कांग्रेसच्या पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून ऊपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा गंगू गुडिया असा ऊल्लेख करणं हे साफ चुकीचं आहे.. एका मोठ्या पदावरील व्यक्तीने अशी भाषा वापरणं चुकीचं आहे. चव्हाणांशी याबाबत चर्चा केली त्यांनाही हे ऐकून धक्का बसलाय… असं वक्तव्य अंजला दमानिया यांनी केलं आहे.

  • 04 Aug 2026 11:06 AM (IST)

    परभणीच्या पाथरीत एका डॉक्टरची ऑनलाइन फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर

    परभणीच्या पाथरीत एका डॉक्टरची ऑनलाइन फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. डॉ.फयाजोद्दीन शफीयोद्दीन अंसारी असं फसवणूक झालेल्या डॉक्टरचं नाव आहे. अज्ञात सायबर चोरट्याने मोबाईल हॅक करून बँक खात्यातून 1 लाख 46 हजार बँक खात्यातून लंपास केले. अकाउंटमधून मोठी रक्कम कपात झाल्याने प्रकार उघडकीस आला . डॉ.फयाजोद्दीन यांच्या फिर्यादीवरून पाथरी पोलीस ठाण्यात अज्ञात सायबर चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

  • 04 Aug 2026 10:53 AM (IST)

    पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये रिक्षा प्रवास महागला

    पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात ऑटो रिक्षा प्रवासी दरवाढ करण्यात आल्याची माहिती हाती आली आहे. पहिल्या दीड किलोमीटरसाठी आता पाच रुपये आकारले जाणार आहेत. त्यानंतर प्रत्येक किलोमीटर साठी तीन रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे ऑटो रिक्षा चे दर आता पहिल्या दीड किलोमीटर साठी 30 रुपये मोजावे लागतील. त्यानंतर प्रत्येक किलोमीटर साठी 20 रुपये इतके असणार आहेत.

  • 04 Aug 2026 10:35 AM (IST)

    हतनूर धरणाचे दरवाडे उघडल्याने पाण्याचा प्रवाह गाळयुक्त

    जळगावच्या हतनूर धरणाचे दरवाजे उघडल्याने गाळयुक्त पाण्याचा प्रवाह झाला आहे. या गाळामुळे फिल्टर मशीन जाम झाली आहे. तांत्रिक अडचणीमुळे पाणीपुरवठा काही काळ बंद झालाय. त्यामुळे
    शहराला दहा दिवसांनी होणारा पाणीपुरवठा विस्कळीत होणार आहे.

  • 04 Aug 2026 10:21 AM (IST)

    Pune News : पुण्याचा बाबा भिडे पूल वाहतुकीसाठी आजही बंद

    पुण्यातील बाबा भिडे पूल वाहतुकीसाठी बंदच आहे. खडकवासला धरणातून पाणी सोडल्याने बाबा भिडे पुलावर अजूनही पाणी आहे. त्यामुळे भिडू पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे पुणेकरांना पर्यायी रस्त्याचा वापर करावा लागणार आहे .

  • 04 Aug 2026 10:07 AM (IST)

    Dharashiv water stock : धाराशिवकरांची चिंता वाढली; 83 प्रकल्पात केवळ 8 टक्केच पाणीसाठा

    धाराशिवकरांसाठी महत्वाची बातमी हाती आली आहे. आता जिल्ह्यातील 83 प्रकल्पात केवळ आठ टक्केच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. अर्धा पावसाळा सरला तरी नवीन पाण्याची आवक शून्य असल्याचे समोर येत आहे. त्यात जिल्ह्यातील 142 प्रकल्प तळालाच आहे.

  • 04 Aug 2026 09:50 AM (IST)

    मोदी आणि भाजपाची लोकप्रियता घसरली- संजय राऊत

    संजय राऊत यांनी गंभीर आरोप केली आहेत. नुकताच संजय राऊत यांनी म्हटले की, मोदी आणि भाजपाची लोकप्रियता घसरली आहे.

  • 04 Aug 2026 09:50 AM (IST)

    जुना आरटीओ चौकात घसरून अपघातांची मालिका

    पुण्यातील जुना आरटीओ चौक ते नायडू हॉस्पिटल या रस्त्यावर चिखल आणि वाहनांचे सांडलेले ऑईल यामुळे घसरून तब्बल १० ते १५ वाहनांचे अपघात झाले आहेत. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून रस्त्यावरील चिखल आणि ऑईल साफ करण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनी वेगावर नियंत्रण ठेवून अत्यंत सावधगिरीने वाहन चालवावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे

  • 04 Aug 2026 09:40 AM (IST)

    चाळीसगावात अन्न व औषध विभागाची धडक कारवाईमुळे उडाली खळबळ

    चाळीसगावात अन्न व औषध विभागाची धडक कारवाईमुळे उडाली खळबळ, दुधाचे नमुने जप्त. चाळीसगावातील दूध संकलन केंद्रातून अन्न व औषध विभागाने दुधाचे नमुने घेतले. जळगाव येथील अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाची कारवाई. कारवाईमुळे दूध व्यावसायिकांमध्ये खळबळ

  • 04 Aug 2026 09:30 AM (IST)

    आठवडाभराच्या मुसळधार पावसाने धुळे जिल्ह्यातील शेतीचे मोठे नुकसान

    अनेक शेतांमध्ये अजूनही पाणी साचल्याने कपाशी, सोयाबीन, ज्वारी, बाजरीसह विविध पिके सडू लागली. पाण्याचा निचरा न झाल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट. उशिरा पेरणी केलेल्या पिकांनाही अतिवृष्टीचा फटका. काही भागांत अद्याप पंचनामे न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप. तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी…

  • 04 Aug 2026 09:20 AM (IST)

    धाराशिवमध्ये शाळांबाहेरील जंक फूडवर बंदी; शिक्षण विभागाचे तात्काळ अंमलबजावणीचे आदेश!

    जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉक्टर रवींद्र खंदारे यांनी जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांना दिल्या कडक सूचना, FDA चे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या सूचनेनुसार जिल्हा प्राथमिक शिक्षण अधिकारी डॉ. रवींद्र खंदारे यांनी केंद्रप्रमुख आणि विस्तार अधिकारी यांची कार्यशाळा घेऊन दिले अंमलबजावणीचे आदेश. विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने अन्न व औषध प्रशासन (FDA) ने घेतलेल्या निर्णयाची जिल्ह्यात तातडीने अंमलबजावणी सुरू शाळांच्या परिसरात जास्त चरबी, मीठ व साखर असलेल्या जंक फूडच्या विक्रीवर बंदी

  • 04 Aug 2026 09:05 AM (IST)

    चिमुकल्या विद्यार्थ्यांना चिखलातून वाट काढत गाठावी लागते शाळा

    जालना जिल्ह्यात अनेक ठिकाणी कमी अधिक प्रमाणात पाऊस हजेरी लावत आहे मात्र याचाच परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होत असल्याचं पाहायला मिळत आहे.घनसावंगी तालुक्यातील राजूरकर कोठा येथील अंतर्गत रस्त्यांची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे.गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे रस्ते पूर्णपणे चिखलमय झाले तर काही ठिकाणी पाणी तुंबल्याने नागरिकांसह शालेय विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.चिखलामुळे विद्यार्थ्यांना या रस्त्यातून पायी चालणेही कठीण झाले आहे.त्यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत शिक्षण घेण्याची वेळ या चिमुकल्या विद्यार्थ्यांवर आलीय.

  • 04 Aug 2026 08:57 AM (IST)

    नांदूर मधमेश्वर धरणातून सलग पंधराव्या दिवशी विसर्ग सुरू

    नांदूर मधमेश्वर धरणातून सलग पंधराव्या दिवशी विसर्ग सुरु आहे. 22 हजार 770 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. दारणा, गंगापूर, पालखेड धरण क्षेत्रात पाऊस सुरु असल्याने विसर्ग कायम आहे. या पावसाच्या हंगामात एकूण आज सकाळी सहा वाजेपर्यंत 45.19 टीएमसी पाणी जायकवाडीकडे सोडलं आहे. 22 हजार 770 इतका मोठा विसर्ग सुरु असल्याने गोदावरी नदीकाठच्या गावातील नागरिकांनी प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

  • 04 Aug 2026 08:48 AM (IST)

    जळगावात गणपती नगरात कारमधून व्यापाऱ्याची साडेबारा लाखांची रोकड असलेली बॅग लंपास

    जळगावात गणपती नगरात कारमधून व्यापाऱ्याची साडेबारा लाखांची रोकड असलेली बॅग लंपास झाली. कारमधून ऑईल लिकची बतावणी करत चोरट्यांनी ही रोकड लंपास केल्याची माहिती आहे. व्यापारी कारमधून खरंच ऑईल लीक होतं आहे का, हे पाहण्यासाठी गेला असता मागच्या सीटवर ठेवलेली बॅग लंपास केली. कृषी उत्पन्न बाजार समितीतील फळ व्यापारी अनिल ओमप्रकाश मंधान यांच्यासोबत ही घटना घडली आहे.

  • 04 Aug 2026 08:40 AM (IST)

    धाराशिवमध्ये शाळांबाहेरील जंक फूडवर बंदी; शिक्षण विभागाचे तात्काळ अंमलबजावणीचे आदेश

    धाराशिवमध्ये शाळांबाहेरील जंक फूडवर बंदी घालण्यात आली आहे. शिक्षण विभागाने तात्काळ अंमलबजावणीचे आदेश दिले आहेत. जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉक्टर रवींद्र खंदारे यांनी जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांना कडक सूचना दिल्या आहेत. FDA चे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या सूचनेनुसार जिल्हा प्राथमिक शिक्षण अधिकारी डॉ. रवींद्र खंदारे यांनी केंद्रप्रमुख आणि विस्तार अधिकारी यांची कार्यशाळा घेऊन अंमलबजावणीचे आदेश दिले आहेत. विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने अन्न व औषध प्रशासनने (FDA) घेतलेल्या निर्णयाची जिल्ह्यात तातडीने अंमलबजावणी सुरू आहे.

  • 04 Aug 2026 08:30 AM (IST)

    नाशिकमध्ये गेल्या चार दिवसांत शहरातील २,५६८ ठिकाणचे खड्डे बुजवल्याचा दावा

    नाशिकमध्ये गेल्या चार दिवसांत शहरातील २,५६८ ठिकाणचे खड्डे बुजवल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे. ३० जुलै ते २ ऑगस्टदरम्यान युद्धपातळीवर खड्डे दुरुस्ती मोहीम सुरू आहे. जीएसबी, मुरूम, मिलिंग मटेरियल आणि कोल्डमिक्सच्या साहाय्याने दुरुस्ती करण्यात आल्याचा दावा पालिकेनं केला आहे. सातपूर विभागात सर्वाधिक खड्डे बुजवण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. तर १ जून ते २९ जुलै या कालावधीत ११,६०९ खड्डे बुजवल्याचा महापालिकेचा दावा आहे.

  • 04 Aug 2026 08:20 AM (IST)

    नाशिकमधील सुमारे अडीच हजार डॉक्टर आज एक दिवसाच्या संपावर

    नाशिकमधील बीएचएमएस डॉक्टरांना सीसीएमपी अभ्यासक्रमानंतर महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये नोंदणी देण्याच्या प्रस्तावाला विरोध करण्यात आला आहे. या प्रस्तावाच्या विरोधात नाशिकमधील सुमारे अडीच हजार डॉक्टर आज एक दिवसाच्या संपावर आहेत. संपामुळे खासगी आणि शासकीय आरोग्यसेवेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. पूर्वनियोजित शस्त्रक्रिया, कर्करोग उपचार, डायलिसिस आणि प्रसूती सेवा प्रभावित होण्याची भीती आहे. एमएआरडी, एएसएमआय आणि विविध वैद्यकीय संघटनांचा आंदोलनाला पाठिंबा आहे.

  • 04 Aug 2026 08:10 AM (IST)

    नाशिक रोड इथं अमली पदार्थविरोधी पथकाची मोठी कारवाई 

    नाशिक रोड इथं अमली पदार्थविरोधी पथकाने मोठी कारवाई केली आहे. सिन्नरफाटा परिसरातून ६२ ग्रॅम एमडी (मेफेड्रोन) ड्रग्ज जप्त केलं. सुमारे सव्वा लाख रुपये किमतीचे ड्रग्ज पोलिसांच्या ताब्यात आहेत. अभिषेक कुटे आणि करण पठाडे या दोघा संशयितांना अटक करण्यात आली आहे. मध्यरात्री सापळा रचून अमली पदार्थविरोधी पथकाने धडक कारवाई केली.

  • 04 Aug 2026 08:07 AM (IST)

    राज्यभरातील शासकीय परिचारिकांचं आज दोन तास कामबंद आंदोलन

    छत्रपती संभाजीनगरमध्ये महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशन यांच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे. राज्यभरातील शासकीय परिचारिकांचं आज दोन तास कामबंद आंदोलन आहे. सकाळी 7.30 ते 9.30 या वेळेत महाराष्ट्रभर नर्सेसचा कामबंद निर्णय आहे. सेवा प्रवेश नियम अंतिम करणे, आकृतीबंध, पदोन्नती आणि रिक्त पदे भरणे या त्यांच्या प्रमुख मागण्या आहेत. घाटी रुग्णालयातील शासकीय परिचारिकाही आंदोलनात सहभागी झाल्या आहेत. शासनाने मागण्या मान्य न केल्यास बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

  • 04 Aug 2026 08:06 AM (IST)

    शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

    शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. शिवसेना पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला देण्याच्या निर्णयावरील आव्हान याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे.

राज्यात सुरू असलेल्या मतदार याद्यांची विशेष सखोल फेरतपासणी (SIR) मोहिमेत तात्पुरत्या स्थलांतरित मतदारांना आता त्यांच्या मूळ ठिकाणीच एसआयआरची प्रक्रिया पूर्ण करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर अशा मोठ्या शहरांतील पुनर्विकास प्रकल्पांमुळे स्थलांतरित झालेल्या लाखो मतदारांना दिलासा मिळाला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून राज्यातील मतदार याद्यांची विशेष सखोल फेरतपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. तर दुसरीकडे बिहारमधील बांकीपूर मतदारसंघातील पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव झाला आहे. यामुळे पक्षाचे नवनियुक्त राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांना जबरदस्त धक्का बसला आहे. याठिकाणी जनसुराज पक्षाचे संस्थापक प्रशांत किशोर यांनी पक्षाचा आणि स्वत:चा पहिला विजय मिळवला आहे. यासह राज्यातील, देश- विदेशातील, क्रीडा, मनोरंजन आणि इतर क्षेत्रातील विविध घडामोडी जाणून घेण्यासाठी हा ब्लॉग फॉलो करा.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us