Maharashtra News LIVE: जादूटोणा आणि अजितदादांचा अपघाताचा याचा काहीही संबंध नाही – अंकुश काकडे

Maharashtra News LIVE Updates: नाशिक विमानतळ विस्तरीकरण कामाचे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे... तर गजानन महाराज यांचा प्रकट दिन असल्यामुळे मंदिरांमध्ये भक्तांची गर्दी पाहायला मिळत आहे... अशात राज्यातील इतर प्रमुख घडामोडींची अपडेट इथं पाहा...

Maharashtra News LIVE: जादूटोणा आणि अजितदादांचा अपघाताचा याचा काहीही संबंध नाही - अंकुश काकडे
| Edited By: | Updated on: Feb 09, 2026 | 11:22 AM

नाशिक विमानतळाचा चेहरा मोहरा बदलणार आहे. विमानतळ विस्तरीकरण कामाचे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर हा विकास प्रकल्प होणार आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधांसह विमानतळाची क्षमता वाढवली जाणार असल्याची देखील माहिती समोर येत आहे. नाशिकसह उत्तर महाराष्ट्राला शेतीमाला आयात निर्यातीसह प्रवासी वाहतुकीस विमानतळ उपयुक्त ठरणारा आहे. आज गजानन महाराज यांचा प्रकट दिन आहे. त्यामुळे नागपुरातील गजानन महाराज मंदिरात भक्तांची गर्दी जमली आहे. वर्धा रोड वरील गजानन महाराज मंदिरात दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भक्त पोहचत आहेत. तर बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिरात यंदाची महाशिवरात्री शिवभक्तांविना साजरी होणार आहे. भिमाशंकर मंदिर तीन महिन्यांसाठी बंद रहाणार असून महाशिवरात्रीच्या कालावधीत मंदिर सुरु ठेवण्यात येणार होते मात्र भाविकांच्या सुरक्षेसाठी महाशिवरात्री काळात म्हणजेच 12 ते 18 फेब्रुवारी दरम्यान मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी बंद राहणार आहे… राज्यातील इतर प्रमुख घडामोडींची अपडेट इथं पाहा…

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 08 Feb 2026 05:56 PM (IST)

    खासदार भागवत कराड यांनी घेतली उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट

    भाजपचे राज्यसभेचे खासदार भागवत कराड यांनी बारामतीमधील सहयोग सोसायटीमध्ये घेतली उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची सांत्वनपर भेट घेतली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या सांत्वनपर भेटीसाठी राजकीय मंडळी आणि कार्यकर्ते सहयोग सोसायटीमध्ये जाऊन भेटत आहेत.

  • 08 Feb 2026 05:35 PM (IST)

    जादूटोणा आणि अजितदादांचा अपघाताचा याचा काहीही संबंध नाही – अंकुश काकडे

    जादूटोण्याच्या प्रकाराचा आणि अजितदादांच्या झालेल्या अपघाताचा अर्थाअर्थी काहीही संबंध नाही आणि तसा संबंध लावणे हे देखील चुकीचे आहे असे राष्ट्रवादीचे पुण्यातील नेते अंकुश काकडे यांनी म्हटले आहे. ग्रामीण भागातील प्रथेप्रमाणे त्या ठिकाणी पूजा झाली होती असा खुलासा त्यावेळी झाला होता. संपूर्ण पवार कुटुंबाने देव, देवऋषी, गंडा, दोरा, पूजेचे अवडंबर आजपर्यंत कधीही केलेले नाही.दादांना मी अनेक वर्ष पाहत होतो, त्यांच्या हातात कुठलेही अंगठी नसायची की गंडा दोरा नसायचा असेही काकडे यावेळी म्हणाले.

  • 08 Feb 2026 05:18 PM (IST)

    कर्नाटकात प्रायव्हेट जेट विमान कोसळून दोन जखमी

    कर्नाटक येथील विजयपुरा जिल्ह्यातील बाबलेश्वर तालुक्यातील मंगलोर गावाजवळ एक जेट विमान कोसळल्याची घटना घडली आहे. जेट विमान कलबुर्गीहून बेळगावला जात होते. विमानातील इंधन संपल्याने हे जेट विमान शेतात कोसळले. यातील दोन जखमी पायलटला रुग्णालयात दाखल केले आहे. सेस्ना १७२ टँगो चार्ली ( Cessna 172 Tango Charlie ) जातीचे हे हलके विमान आहे.

     

  • 08 Feb 2026 04:58 PM (IST)

    येवल्यात मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमस्थळावर ‘ड्रोन’च्या घिरट्या

    येवल्यात मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमस्थळावर ‘ड्रोन’च्या घिरट्या

    पोलीस यंत्रणेची उडाली चांगलीच धावपळ

    तातडीने यंत्रणेकडून’ ड्रोन ‘ चा शोध

    मात्र परवानगी घेऊनच ड्रोन उडविल्याचे आयोजकांची माहिती

    कापसे फाऊंडेशनकडून घेण्यात आली होती ड्रोन ची परवानगी

  • 08 Feb 2026 04:45 PM (IST)

    नागपुरात ओबीसी प्रश्नांवर महत्त्वाची बैठक

    नागपुरात ओबीसी प्रश्नांवर महत्त्वाची बैठक

    ‘सकल ओबीसी महामोर्चा’च्या वतीने बैठकीचे आयोजन

    काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात आंदोलनाची तयारी

    यूजीसीचे माजी अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरातही करणार मार्गदर्शन

    सिव्हिल लाईन्स येथील एमटीडीसी हॉटेलमध्ये बैठकीचं आयोजन

  • 08 Feb 2026 04:24 PM (IST)

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे येवल्यात आगमन

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे येवल्यात आगमन

    मुख्यमंत्री फडणवीस हे ‘ अनुलोम ‘ या संस्थेच्या संवाद कार्यक्रमाला राहणार उपस्थित

    अनुलोम संस्थेच्या सदस्यांना करणार मार्गदर्शन

    वडगाव बल्हे येथील कापसे फाऊंडेशनच्या आवारात, अनुलोम संवाद कार्यक्रमाचं आयोजन

  • 08 Feb 2026 04:14 PM (IST)

    मंचरमध्ये सलून व्यवसायिकाला अमानुष मारहाण

    पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील मंचर येथे सलून व्यवसायिकाला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे, ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून,  या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. फिरोज फत्तेमहिंद शेख असं मारहाण झालेल्या तरुणाचं नाव आहे.

  • 08 Feb 2026 03:55 PM (IST)

    पुण्यात सलून व्यवसायिकाला अमानुष मारहाण, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

    पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील मंचर येथे सलून व्यवसायिकाला झालेली अमानुष मारहाण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. २५ वर्षीय सलून व्यवसायिक फिरोज फत्तेमहिंद शेख याला त्याच्या दुकानात घुसून आरोपींनी बेदम मारहाण केली. आरोपी मोहम्मद मीर आणि त्याचे साथीदार मोहम्मद युसुफ अन्सारी व शकीबज अत्तार यांनी पैशांच्या वादातून शिवीगाळ करत लाकडी काठी, हात आणि लाथाबुक्क्यांनी हल्ला केला. या मारहाणीत फिरोज शेख यांच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

  • 08 Feb 2026 03:30 PM (IST)

    चंद्रपुरात भाजपाकडून ठाकरे गटाला ऑफर, पण महापौरपदामुळे चर्चा अडली!

    चंद्रपूर : सव्वा-सव्वा वर्षांच्या महापौर पदासह भाजपकडून शिवसेना उबाठा ला 5 पैकी 2 वर्ष स्थायी समिती अध्यक्षपद आणि उपमहापौर पदाची ऑफर देण्यात आली आहे.  मात्र महापौर भाजपचा की शिवसेना उबाठाचा या मुद्द्यावर चर्चा अडली आहे.  कुठल्याही परिस्थितीत पहिले सव्वा वर्ष महापौर भाजपचाच करायचा, अशी भाजपाची भूमिका आहे. जर शिवसेनेला हा फॉर्मुला मान्य नसेल तर भाजप विरोधी पक्षात बसेल, असे सांगण्यात येत आहे.

    भाजपमधील विश्वासनीय सूत्रांची माहिती

  • 08 Feb 2026 03:15 PM (IST)

    संत गजानन महाराज यांच्या प्रकट दिनानिमित्त कावनई येथील बिटूर्ली परिसरात गर्दी

    शेगावचे संत गजानन महाराज यांच्या प्रकट दिनानिमित्त दर्शनासाठी भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. इगतपुरी तालुक्यातील रामायण कालीन इतिहास असलेल्या व कुंभ मेळ्याचे उगमस्थान असलेल्या कावनई येथील बिटूर्ली परिसरात गर्दी झाली आहे. बिटूर्ली येथील पंपा सरोवर येथे बारा वर्ष गजानन महाराजांनी तपश्चर्या केल्याचे अनेक ग्रंथात नमूद आहे. ज्या भक्तांना दर्शनासाठी शेगावला जाता येत नाही ते भक्त येथे जाऊन दर्शन घेतात.

  • 08 Feb 2026 03:02 PM (IST)

    विश्वचषक जिंकल्यानंतर आयुष म्हात्रे आज मुंबईत येणार

    १९ वर्षांखालील क्रिकेट संघाचा कर्णधार आयुष म्हात्रे विश्वचषक जिंकल्यानंतर आज मुंबईत येत आहे. त्याच्या पालकांव्यतिरिक्त, संपूर्ण कुटुंब हातात तिरंगा घेऊन आयुषचे स्वागत करण्यासाठी उभे आहे.

  • 08 Feb 2026 02:55 PM (IST)

    गजानन महाराजांच्या प्रगट दिनानिमित्त वाशिममध्ये प्रचंड गर्दी

    शेगाव येथील संत गजानन महाराज यांची पश्चिम विदर्भातील पंढरी म्हणून ओळख आहे. गजानन महाराजांच्या प्रगट दिनानिमित्त वाशिम जिल्ह्यातील गावखेड्यांमध्ये भक्तीमय वातावरण पाहायला मिळत आहे. जिल्ह्यातील गावागावांत सकाळपासून दिंड्या, पालख्या, भजन-कीर्तन तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. टाळ-मृदंगाच्या गजरात महाराजांचा जयघोष होत असून महिला, युवक आणि भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. श्रद्धा, भक्ती आणि उत्साहाचे वातावरण जिल्ह्यातील गावखेड्यांत सर्वत्र दिसून येत आहे…

  • 08 Feb 2026 02:50 PM (IST)

    बारामतीमध्ये होणारी पोटनिवडणूक एकतर्फी राहील- मंत्री संजय शिरसाट

    बारामतीमध्ये होणारी पोटनिवडणूक एकतर्फी राहील. इतर पक्षाचे नेते बारामतीत उमेदवार देणार नाही, अशी चर्चा असल्याचं शिरसाट म्हणालेत. सुनेत्रा पवारांच्या विरोधात कुणी निवडणूक लढणार नाही मंत्री संजय शिरसाटांची प्रतिक्रिया.

  • 08 Feb 2026 02:35 PM (IST)

    जेजुरी गडावर बैल उधळल्याने भाविकांची तारांबळ

    जेजुरी गडावर बैल उधळल्याची घटना सीसीटीव्हीत कैद… शर्यतीचे बैल हे पूजेसाठी गडावर आणले असताना एक बैल उधळल्याने भाविकांची तारांबळ.. यामुळे अनेक जण पायऱ्यावरून घसरून पडलेल्याचं सीसीटीव्ही समोर…

  • 08 Feb 2026 02:22 PM (IST)

    परीक्षा केंद्रावर मंगळसूत्र काढून ठेवायलं लावल्याने गोंधळ

    संभाजीनगरमध्ये CTET परीक्षा केंद्रावर मंगळसूत्र काढून ठेवायलं लावल्याने गोंधळ. मंगळसूत्र फक्त शोचा दागिना नाहीतर सौभाग्याचं प्रतीक आहे. तर मंगळसूत्र काढून ठेवावं लागल्यामुळे महिला विद्यार्थी आक्रमक झाले आहेत.  सरकारने लवकर निर्णय घेऊन ही नियमावली बदलावी अशी मागणी अंबादास दानवेंनी केली आहे.

  • 08 Feb 2026 02:10 PM (IST)

    देशसेवा, महानगर पालिका सुरक्षा रक्षक ते नगरसेवक प्रवास, कोण आहे तो नगरसेवक?

    पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत अनेक नवे चेहरे नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. त्यामध्ये एक चेहरा सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. दिघी परिसरातील माजी सैनिक कृष्णा सुरकुळे हे पहिल्यांदाच नगरसेवक झाले आहेत. १७ वर्षे देशसेवा केल्यानंतर त्यांनी याच महानगरपालिकेत सुरक्षा रक्षक म्हणूनही काम पाहिले आहे. कालपर्यंत नगरसेवकांना आणि महापालिका आयुक्तांना सॅल्यूट ठोकणारे कृष्णा सुरकुळे, आज सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न थेट सभागृहात मांडणारे लोकप्रतिनिधी बनले आहेत.

  • 08 Feb 2026 02:02 PM (IST)

    दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यावं हे दादांचं पहिलं स्वप्न होतं- सयाजी शिंदे

    दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यावं हे दादांचं पहिलं स्वप्न होतं. ते अपूर्ण राहील. ते आधी पूर्ण व्हावं, तरचं महाराष्ट्राला ताकद मिळेल. महाराष्ट्र राज्याची ताकद वाढवायची असेल तर दोन्ही पवार कुटुंबांनी एकत्र येणं गरजेचं आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबतचं बोलणं आमच्यासमोर झालं होतं, असं अभिनेते सयाजी शिंदे म्हणाले.

  • 08 Feb 2026 01:50 PM (IST)

    मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पी ४ वर पाण्याची गळती

    मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पी ४ वर पाण्याची गळती होत असल्याची माहिती समोर येत आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पी४ पार्किंगमध्ये पाण्याची गळती झाल्याची घटना घडली आहे. पी४ गेट क्रमांक जी३ जवळ पाण्याची गळती होत आहे.

  • 08 Feb 2026 01:40 PM (IST)

    मोहोळमध्ये ढाब्यावर ईव्हीएम आढळल्याच्या प्रकाराबाबत महसूल उपजिल्हाधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण

    मोहोळमध्ये ढाब्यावर ईव्हीएम आढळल्याच्या प्रकाराबाबत महसूल उपजिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. मशीन्स ढाब्यावर आढळलेला प्रकार दुर्दैवी आणि गंभीर असून संबंधितांवर कारवाई होणार. आपल्या मुलाला मतदान यंत्राचं बटण दाबायला लावणं चुकीचं असून संबंधित मतदार आणि अधिकाऱ्यांवर कारवाई होणार आहे. खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचे चुलत भाऊ अर्जुनसिंह मोहिते पाटील यांच्यावर कारवाई होणार आहे.

  • 08 Feb 2026 01:30 PM (IST)

    जेजुरी गडावर बैल उधळल्याने भाविकांची पळापळ, काहीजण पायऱ्यांवरून घसरून पडले

    शर्यतीची बैलं हे पूजेसाठी जेजुरी गडावर आणले होते. यावेळी अचानक बैल उधळल्याने भाविकांची पळापळ झाली. शर्यतीची बैलं दर्शनासाठी तिथे आणली होती. अचानक बैल उधळल्याने भाविकांची पळापळ झाली आणि या पळापळीत काहीजण पायऱ्यांवरून घसरून पडले. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली.

  • 08 Feb 2026 01:20 PM (IST)

    टीका करणाऱ्यांना आम्ही कृतीतून उत्तर देतो- फडणवीस

    भारताच्या वाटचालीसह महाराष्ट्रही दमदार पाऊल टाकत आहे. देशाची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर जाणार आहे. टीका करणाऱ्यांना आम्ही कृतीतून उत्तर देतोय. आयात करण्यावर सरकारचा भर आहे. महाराष्ट्र गुंतवणुकीसाठी महत्त्वाचं स्थान ठरतंय. उत्तर महाराष्ट्रातील पाचही जिल्ह्यात गुंतवणूक आणण्यात आम्ही यशस्वी ठरलो. उत्पादन निर्मितीवर आपला अधिक भर आहे, असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.

  • 08 Feb 2026 01:10 PM (IST)

    धाराशिव जिल्हा परिषदेसाठी पार पडलेल्या मतदानाच्या मतमोजणीसाठी तयारी

    धाराशिव जिल्हा परिषदेसाठी पार पडलेल्या मतदानाच्या मतमोजणीची उद्या सकाळी दहा वाजता सुरुवात होणार आहे. धाराशिव शहरातील शासकीय आयटीआयमध्ये ही मतमोजणी पार पडणार आहे. सकाळी दहा वाजता मतमोजणीला सुरुवात होणार असून 15 टेबलवर एकूण 24 फेऱ्यांच्या माध्यमातून ही मतमोजणी पार पडणार आहे. यासाठी 150 अधिकारी काम करणार आहेत, त्याची प्रशासनाकडून तयारी करण्यात आली आहे.

  • 08 Feb 2026 12:57 PM (IST)

    टेनिस क्रिकेटला मिळणार नवा राष्ट्रीय चेहरा;खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची थोड्याच वेळात होणार अधिकृत घोषणा

    Tennis Cricket Sports Federation of India (ITCSF) तर्फे वार्षिक सर्वसाधारण सभा (AGM) व पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांची ITCSF च्या नॅशनल प्रेसिडेंट म्हणून अधिकृत घोषणा होणार आहे. ठाणे पश्चिमेतील जे.के. ग्राम येथील हॉटेल सत्कार रेसिडेन्सी येथे थोड्याच वेळात कार्यक्रम होईल.देशभरातील ITCSF चे पदाधिकारी, क्रीडा प्रतिनिधी व प्रमुख सदस्य यावेळी उपस्थित असतील.

  • 08 Feb 2026 12:50 PM (IST)

    पुण्यात मतपेट्या ठेवण्यासाठी 13 ठिकाणी स्ट्राँग रूम

    पुणे जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील 13 पंचायत समित्यांसाठी शनिवारी 68.89 टक्के मतदान झाले. या निवडणुकीसाठी जि. प.च्या 73 गटांसाठी 299 उमेदवार, तर पं. स.च्या 146 गणांसाठी 528 उमेदवार रिंगणात होते.या सर्व उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले आहे. सर्वाधिक मतदान राजगड (वेल्हा) तालुक्यात 79.30 टक्के, तर सर्वात कमी बारामती तालुक्यात 54.90 टक्के झाले. या मतपेट्या ठेवण्यासाठी 13 ठिकाणी स्ट्राँग रूम करण्यात आल्या आहेत

  • 08 Feb 2026 12:40 PM (IST)

    दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणे हे बोलणं आमच्यासमोर झालं होतं-सयाजी शिंदे

    दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यावे हे दादांचं पहिलं स्वप्न होतं ते अपूर्ण राहील ते आधी पूर्ण व्हावे तरचं महाराष्ट्राला ताकद मिळेल. महाराष्ट्र राज्याची ताकद वाढवायची असेल तर दोन्ही पवार एकत्र येणे गरजेचे आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणे हे बोलणं आमच्यासमोर झालं होतं असा दावा अभिनेते सयाजी शिंदे यांनी केला.अजितदादा यांच्या जाण्याने महाराष्ट्र निशब्द आहे असं घडेल वाटलं नव्हतं. अजित दादा यांचा विकासाचा रथ उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार पुढे घेऊन जातील अभिनेते सयाजी शिंदे यावेळेस भावनिक झाल्याचं पहावयास मिळाले.

  • 08 Feb 2026 12:30 PM (IST)

    मुंबई-पुणे एक्सप्रेसवेच्या १०-लेन विस्ताराची मागणी

    मुंबई-पुणे एक्सप्रेसवेच्या १०-लेन विस्ताराची मागणी करण्यात येत आहे. टँकर अपघातामुळे ३२ तास ट्रॅफिक जाम झाल्याची घटना घडली होती. MSRDCने डिसेंबर २०२५ मध्ये १६,००० कोटींचा प्रस्ताव राज्य सरकारकडे सादर केलाय जो ९४.५ किमीच्या एक्सप्रेसवेला ६ ते १० लेनमध्ये अपग्रेड करेल.प्रस्ताव चार महिन्यांपासून प्रलंबित,मार्च २०२६ च्या बजेट सत्रात मंजुरीची अपेक्षा आहे. हे काम २०२६ मध्ये सुरू झाल्यास २०२९-३० पर्यंत पूर्ण होईल, जमीन संपादनासाठी २०० कोटी लागतील.दररोज १ लाख वाहनांचा वाढता वाहतूक दबाव कमी करण्यासाठी ही योजना लवकर मंजूर करावी, अशी मागणी प्रवशी आणि नागरिक करत आहेत.

  • 08 Feb 2026 12:20 PM (IST)

    दोन माजी खासदार, एक माजी मंत्री आणि सात आमदारांसह सुमारे ३५०० जणांची निर्दोष मुक्तता

    चाकण येथील बैलगाडा शर्यत बंदी उठविण्यासाठी बैलगाडा चालक-मालक संघटनेच्या वतीने करण्यात आलेल्या रास्तारोको आंदोलनात सहभागी झालेल्या सर्व आंदोलकांना खेड न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. बैलगाडा शर्यत बंदीविरोधात झालेल्या या आंदोलनात दोन माजी खासदार, एक माजी मंत्री आणि सात आमदारांसह सुमारे ३५०० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या आंदोलकांमध्ये माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील, आमदार महेश लांडगे, दिवंगत माजी आमदार सुरेश गोरे, आमदार शरद सोनवणे, माजी मंत्री बाळा भेगडे, खासदार श्रीरंग बारणे, माजी आमदार दिलीप मोहिते, माजी आमदार दिगंबर भेगडे आणि देवराम लांडे यांचा समावेश होता.चाकण येथे सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत हे रास्तारोको आंदोलन पार पडले होते. आंदोलनादरम्यान चिथावणीखोर भाषण आणि तब्बल तीन तास रास्ता अडवल्याचा आरोप पोलिसांनी केला होता. मात्र, आठ साक्षीदारांची साक्ष नोंदवल्यानंतर न्यायालयाने सबळ पुरावे आढळले नाहीत, असा निष्कर्ष काढत सर्व आरोपींना निर्दोष मुक्तता दिली आहे. या निर्णयामुळे बैलगाडा शर्यत समर्थकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

  • 08 Feb 2026 12:10 PM (IST)

    अहिल्यानगर शहरात मोठा अपघात

    अहिल्यानगर शहरातल्या बालिकाश्रम रोडवरील ढोरवस्ती जवळ भीषण अपघात झाला. भरधाव इनोव्हाकारने 4 पॅगो रिक्षा, एक मोटर सायकल आणि एका घराचे नुकसान केले. मध्यरात्री 2.30 वाजता अपघात घडला. या अपघातात वाहनांचं झालं मोठ्या प्रमाणावर नुकसान तर घराची भिंतही पडली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. इनोव्हाकार चालक शुभम पेवाल याच्याविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

  • 08 Feb 2026 12:00 PM (IST)

    पोलिसांचा भत्ता थांबला

    धाराशिवमध्ये स्ट्रॉंग रूम भोवती पहारा देणाऱ्या पोलिसांना भत्ता मिळेना. नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीतील कर्तव्य बजवलेला भत्ता मिळात नसल्याने पोलीस हतबल झाले आहेत. निवडणूक विभागाला निवेदन देऊनही भत्ता न मिळाल्याने पोलिसांची नाराजी दिसून आली. जिल्ह्यातील 20 पोलीस आणि पोलीस अधिकाऱ्यांचा भत्ता मिळावा अशी स्थानिक पोलिसांनी मागणी केली आहे.

  • 08 Feb 2026 11:55 AM (IST)

    संघाला पैसा येतो कुठून? मोहन भागवत यांचे स्पष्ट उत्तर

    संघाला पैसा येतो कुठून हा त्यांचा प्रश्न. मी सांगतो स्वयंसेवक संघ चालवण्यासाठी गुरु दक्षिणा देतात. सेवा चालवण्यासाठी आम्ही समाजाकडून मदत घेतो. पण विश्वास वाटत नाही. आम्हाला पैसा कमी येतो. जेवढा पैसा वाचवायचा तेवढा वाचवतो. आम्ही प्रवास करतो. त्यावेळी जेवणासाठी बाहेर खर्च करत नाही असे मोहन भागवत म्हणाले.

  • 08 Feb 2026 11:45 AM (IST)

    टेनिस क्रिकेटला मिळणार नवा राष्ट्रीय चेहरा

    टेनिस क्रिकेटला मिळणार नवा राष्ट्रीय चेहरा; ITCSF च्या नॅशनल प्रेसिडेंटपदी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची थोड्याच वेळात होणार अधिकृत घोषणा. Tennis Cricket Sports Federation of India (ITCSF) तर्फे वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित केली आहे.

  • 08 Feb 2026 11:34 AM (IST)

    परिस्थितीचा अधिक विचार करण्याचा फायदा नाही- मोहन भागवत

    परिस्थितीचा अधिक विचार करण्याचा फायदा नाही. आहे त्या परिस्थिती काय उपाय केले पाहिजे याचा विचार केला पाहिजे. स्वयंसेवक असा विचार करतो. संपूर्ण आयुष्यात आपत्ती याचा विचार करू नका. परिस्थिती असते. परिस्थिती येते आणि जाते. आज अशी आहे, उद्या वेगळी असेल. आपण तर तेच असतो असे मोहन भागवत म्हणाले.

  • 08 Feb 2026 11:15 AM (IST)

    पीएमपीएलमधील आर्थिक अनियमिततेचा आरोपांची चौकशी करा- उज्वल केसकर

    पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या आर्थिक कारभारात गंभीर अनियमितला असून, बेकायदेशीररित्या करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांच्या बढत्यांना तातडीने स्थगिती द्यावी. तसेच निवृत्त उच्च न्यायालयाने न्यायाधीशांमार्फत चौकशी करण्याची मागणी माजी विरोधी पक्षनेते उज्वल केसकर यांनी केलीय.

  • 08 Feb 2026 10:55 AM (IST)

    मुंबई-पुणे एक्सप्रेसवेच्या 10-लेन विस्ताराची मागणी

    टँकर अपघातामुळे ३२ तास ट्रॅफिक जाम झाल्याची घटना घडली होती. MSRDCने डिसेंबर २०२५ मध्ये १६,००० कोटींचा प्रस्ताव राज्य सरकारकडे सादर केलाय. जो ९४.५ किमीच्या एक्सप्रेसवेला ६ ते १० लेनमध्ये अपग्रेड करेल. प्रस्ताव चार महिन्यांपासून प्रलंबित,मार्च २०२६ च्या बजेट सत्रात मंजुरीची अपेक्षा.

     

  • 08 Feb 2026 10:50 AM (IST)

    दोन माजी खासदार, एक माजी मंत्री आणि सात आमदारांसह सुमारे 3500 जणांची निर्दोष मुक्तता

    चाकण येथील बैलगाडा शर्यत बंदी उठविण्यासाठी बैलगाडा चालक-मालक संघटनेच्या वतीने करण्यात आलेल्या रास्तारोको आंदोलनात सहभागी झालेल्या सर्व आंदोलकांना खेड न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे.

  • 08 Feb 2026 10:40 AM (IST)

    अहिल्यानगर शहरातल्या बालिकाश्रम रोडवरील ढोरवस्ती जवळ भीषण अपघात

    भरधाव इनोव्हाकारने 4 पॅगो रिक्षा, एक मोटर सायकल आणि एका घराचे केले नुकसान.. मध्यरात्री 2.30 वाजता घडली घटना. या अपघातात वाहनांचं झालं मोठ्या प्रमाणावर नुकसान तर घराची भिंतही पडली..सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.. इनोव्हाकार चालक शुभम पेवाल याच्याविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

  • 08 Feb 2026 10:30 AM (IST)

    धाराशिवमध्ये स्ट्रॉंग रूम भोवती पहारा देणाऱ्या पोलिसांचा भत्ता मिळेना

    नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीतील कर्तव्य बजवलेला भत्ता मिळात नसल्याने पोलीस हतबल. निवडणूक विभागाला निवेदन देऊनही भत्ता न मिळाल्याने पोलिसांची नाराजीय जिल्ह्यातील 20 पोलीस आणि पोलीस अधिकाऱ्यांचा भत्ता मिळावा अशी स्थानिक पोलिसांची मागणी. यासंदर्भात पहारा देणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांशी संवाद साधलाय आमची प्रतिनिधी श्रीराम क्षीरसागर यांनी पाहुयात

  • 08 Feb 2026 10:20 AM (IST)

    NIFT प्रवेश परीक्षेचा गोंधळ; कल्याण एपीएमसी मार्केटमध्ये विद्यार्थ्यांचा संताप

    कल्याणच्या एपीएमसी मार्केटमधील परीक्षा केंद्रावर NIFT प्रवेश परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांचा मोठा गोंधळ. आठ नंबर इमारतीतील Late Shri B.R. Wankhede Education Hub / Sornet ITI / Genus Pvt. Ltd. येथे परीक्षा केंद्र. जवळपास 600 विद्यार्थ्यांची एका दिवसात सकाळी 9 ते सायंकाळी 6 या वेळेत दोन पेपरची परीक्षा

     

  • 08 Feb 2026 10:05 AM (IST)

    नागपूर महानगरपालिकेची तिजोरी रिकामी

    नागपूर महानगरपालिकेची रिकामी तिजोरी आणि वाढती जबाबदारी, नव्या पदाधिकाऱ्यांची कसोटी लागणार. मनपाच्या मालमत्ता आणि नगररचना विभागात ४०० कोटींची तूट. ५,४३८ कोटींचा अर्थसंकल्प असतांना अपेक्षित उत्पन्न नाही…मालमत्ता करातून ४०० कोटींचे लक्ष्य, जानेवारी अखेर फक्त १७३ कोटी वसुल. मार्चपर्यंत वसुली २०० ते २२५ कोटींवरच थांबण्याची शक्यता…नगररचना विभागाचे ५०० कोटी लक्ष्य, जानेवारीअखेर २५० कोटी वसुल

  • 08 Feb 2026 09:55 AM (IST)

    पुण्यातील महापौर बंगल्याच्या डागडुजीचे काम अंतिम टप्यात…

    महापौर निवड उद्या होणार आहे… पुण्यातील महापौर बंगल्याच्या डागडुजीचे काम अंतिम टप्यात आहे.  महापौर बंगल्याचे रंग काम, फर्निचर, इलेक्ट्रिक कामे सुरु आहेत. त्याच बरोबर खराब झालेल्या वस्तूंच्या जागी नवीन वस्तूंची खरेदी करण्यात आली आहे.

  • 08 Feb 2026 09:40 AM (IST)

    पुणे शहरात सलग दुसऱ्या दिवशी किमान तापमानात घट

    शहरासह उपनगरातील किमान तापमानात अर्धा ते एक अंशाने घट झाल्याने पहाटे आणि रात्रीच्या थंडीचा जोर काहीसा वाढला आहे. मागील चार ते पाच दिवसांपासून कमाल व किमान तापमानात चढउतार होत असल्यामुळे थंडीचा जोर ही अधिक होत आहे. दर दुपारी उन्हाचा चटका जाणवत असून दुपारनंतर ढगाळ वातावरणामुळे उखळा जाणवत आहे त्यामुळे पहाटे आणि रात्री थंडी तर दुपारी उन्हाचा चटका असा विचित्र हवामानामुळे आरोग्याच्या समस्या वाढू लागल्या आहेत.

  • 08 Feb 2026 09:30 AM (IST)

    सोलापुरातील मोहोळ मध्ये ईव्हीएम मशीन धाब्यावर सापडल्याचे प्रकरण

    एका धाब्यावर ईव्हीएम मशीन सापडल्याने राष्ट्रवादीचे उमेश पाटील आक्रमक पवित्रा घेतला होता. या घटनेनंतर घटनास्थळी निवडणूक अधिकारी सीमा होळकर तसेच पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्यांनी दोन्ही ईव्हीएम मशिन्स ताब्यात घेतल्या. त्या दोन ईव्हीएम मशीन अतिरिक्त असून त्यावर कोणतेही मतदान झाले नसल्याची प्रशासनाची माहिती. दरम्यान उमेश पाटलांच्या आक्षेपानंतर दोन्ही मशीन अधिकाऱ्यांनी ताब्यात घेत रीतसर पंचनामा करुन स्ट्रॉंगरूम मध्ये ठेवण्यात आल्या. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांच्या समोर पंचनामा करत या मशिन्स ठेवण्यात आल्यात.

  • 08 Feb 2026 09:20 AM (IST)

    पुणे : विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू..

    मित्रमंडळ चौकातील घटना आहे.  घटनेचे CCTV  फुटेज समोर आले आहेत. महावितरणच्या डीपी बॉक्समध्ये कुलूप तोडून वाहिनीला हात लावल्याने एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.  या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या तरुणाची ओळख पटलेली नाही तरुणाने कुलूप का तोडले यामागे कारण समजू शकले नाही… मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे वय 30 ते 35 वर्ष असल्याची माहिती समोर येत आहे.

  • 08 Feb 2026 09:15 AM (IST)

    खेळता-खेळता काळाचा घाला; शिळफाटा परिसरात ६ वर्षीय चिमुकलीचा डबक्यात बुडून मृत्यू

    दिवा येथील शिळफाटा परिसरात मित्र-मैत्रिणींना सोबत खेळताना ६ वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.  बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी असलेल्या पाण्याच्या डबक्यात तोल जाऊन पडल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.  कशफ नबीला खान, आशना हाईट्स, शिळफाटा असे मृत मुलीचे नाव आहे.  सायंकाळपासून शोध सुरू झाल्यानंतर शनिवारी डबक्यात मृतदेह आढळल्यानंतर घटनेचा उलगडा झाला आहे.  डायघर पोलीस ठाण्यात नोंद करत अग्निशमन दल व पोलिसांकडून पुढील तपास सुरू झाला आहे.

  • 08 Feb 2026 09:08 AM (IST)

    नाशिक : मामा राजवाडे यांचा जमीन अर्ज फेटाळला

    मामा राजवाडे यांचा जमीन अर्ज फेटाळण्यात आला आहे.  ठाकरे गटातून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या मामा राजवाडे गोळीबार प्रकरणात  कारागृहात आहेत. गोळीबारा सह खंडणी आणि बार तोड फोड प्रकरणी दाखल गुन्ह्यात अटकेत आहेत.  जामीन अर्ज भेटल्याने कारागृहातला मुक्काम वाढला आहे.

  • 08 Feb 2026 09:07 AM (IST)

    संत गजानन महाराजांच्या प्रगट दिन उत्सवानिमित्त शेगावात लाखो भाविकांची मांदियाळी..

    संत श्री गजानन महाराज आज 148 वा प्रगट दिन उत्सव सोहळा शेगावातील संत गजानन महाराज समाधी मंदिरात साजरा करण्यात येत आहे.. यानिमित्त राज्यासह परराज्यातून 700 च्या वर दिंड्या दाखल झाल्या आहे .. आज दिवसभर लाखो भाविक शेगावात येणार असून संतनगरीत भाविकांची मांदियाळी पहायला मिळणार आहे ..

  • 08 Feb 2026 09:04 AM (IST)

    यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांकडून अंमली पदार्थ तस्करीचा मोठा पर्दाफाश

    एकता कॉलनी ग्राउंड परिसरात पेट्रोलिंगदरम्यान संशयास्पद ऑटो रिक्षाची तपासणी केली असता, त्यामध्ये ५ किलो ५० ग्रॅम गांजा आढळून आला. या गांजाची बाजारभावानुसार किंमत १ लाख २६ हजार २५० रुपये आहे. कारवाईदरम्यान एक आरोपी पसार झाला असून, शेख इरसाद शेख मोहम्मद आणि अरमान अली या दोघांना अटक करण्यात आली आहे. ऑटो रिक्षा, दुचाकी व मोबाईलसह एकूण ३ लाख ८७ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, पसार आरोपीचा शोध व पुढील तपास यशोधरानगर पोलीस करत आहेत.

Follow Us