AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG : विराट कोहलीचा 6 चेंडूतच खेळ संपला, शुबमन गिलने DRS घेण्यासही दिली नकार

इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेत रोहित शर्मा आणि विराट कोहलीकडून फार अपेक्षा आहेत. मात्र या सामन्यात विराट कोहली एकेरी धावसंख्येवर बाद झाला. जोफ्रा आर्चरने त्याला पायचीत केलं.

IND vs ENG : विराट कोहलीचा 6 चेंडूतच खेळ संपला, शुबमन गिलने DRS घेण्यासही दिली नकार
IND vs ENG : विराट कोहलीचा 6 चेंडूतच खेळ संपला, शुबमन गिलने DRS घेण्यासही दिली नकारImage Credit source: Getty Images
| Updated on: Jul 14, 2026 | 9:58 PM
Share

इंग्लंडने पहिल्या वनडे सामन्यात भारतासमोवर विजयासाठी 259 धावांचं आव्हान ठेवलं. या धावांचा पाठलाग करताना भारताची सुरूवात काही खास झाली नाही. भारताचा स्टार सलामीवर रोहित शर्मा स्वस्तात बाद झाला. अवघ्या 11 धावांवर तंबूत परतला. त्यामुळे तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरलेल्या विराट कोहलीकडून फार अपेक्षा होत्या. मात्र त्यालाही काही खास करता आलं नाही. वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरने विराट कोहलीचा खेळ 6 चेंडूतच संपवला. या सामन्यात विराट कोहली फक्त 5 धावा करून बाद झाला. जोफ्रा आर्चरने त्याला पायचीत करत तंबूचा रस्ता दाखवा, विराट कोहलीला पहिल्यांदा आखुड टप्प्याचा चेंडू टाकला त्यावर त्याने चौकार मारला. पण दुसरा चेंडू थेट पॅडवर आदळला आणि पायचीत झाला. या चेंडूवर फ्लिक करण्याचा प्रयत्न फसला आणि थेट पायावर लागला. पंचांनी त्याला पायचीत दिलं.

विराट कोहलीला रिव्ह्यू घेता आला नाही

विराट कोहली एलबीडब्ल्यू झाला तेव्हा त्याला स्टम्प मिस करत असावी असं वाटलं. त्यामुळे रिव्ह्यू घेण्यासाठी कर्णधार शुबमन गिलकडे गेला. पण कर्णधार शुबमन गिलने नकार दिला. गिलच्या मते, चेंडू थेट स्टम्प लागत होता. त्यामुळे त्याचं म्हणणं विराट कोहलीने ऐकलं आणि रिव्ह्यू न घेता तंबूच्या दिशेने गेला. विराट कोहली तंबूच्या दिशेने जात असताना त्याच्या चेहऱ्यावरील हावभाव बरंच काही सांगून जात होते. विराट कोहलीने पहिल्याच वनडे सामन्यात क्रीडाप्रेमींना निराश केलं. दुसरीकडे विराट कोहली लयीत नसल्याचं सराव शिबिरात दिसून आलं होतं.

विराट कोहली या सामन्यापूर्वी सराव शिबिरात फलंदाजी करत होता. त्यावेळी चेंडूचा सामना करताना अडचण येत होती. काही चेंडूवर फटका मारताना चुकला देखील होता. अगदी तसंच सामन्यात पाहायला मिळालं. ज्या चेंडूवर विराट कोहली आरामात चौकार मारायचा, त्या चेंडूवर बाद होऊन तंबूत परतला. त्यामुळे विराट कोहली लयीत नसल्याचं क्रीडाप्रेमींचं म्हणणं आहे. इतकंच काय तर विराट कोहलीचा इंग्लंडमधील रेकॉर्ड काही खास नाही. वनडेत 60 च्या सरासरीने धावा करणाऱ्या विराट कोहलीची या फॉर्मेटमध्ये सरासरी 40पेक्षा कमी आहे.

Follow Us
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिर...
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिरांबाबतही नवे नियम
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी,
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी, नेमकं टार्गेट किती?
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून...
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून तातडीचे आदेश
दुष्काळात मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे प्रत्युतर
महाराष्ट्र दुष्काळ मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे पुराव्यांसोबत प्रत्युत्तर; कर्नाटकमधील आकडेवारीसह...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्ष...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्षांची मोठी मागणी, नेमकं कारणही सांगितलं
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना...
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना... नवे नियम काय?
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद,
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद, सरकारला घेरलं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं कारण आलं समोर?
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस, राहुल गांधींच्या वर्तनावरही नाराजी!
शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक
Jayant Patil on Shaktipeeth Highway : शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक