AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एसटी बसला भीषण आग, चालकाचे प्रसंगावधान, ४३ प्रवाशांचे प्राण असे वाचले…

यवतमाळ जिल्ह्यातील पुसद बस स्थानकातून अकोल्याकडे निघालेल्या एसटी महामंडळाच्या बसला खंडाळा घाटात अचानक भीषण आग लागल्याची घटना मंगळवारी सायंकाळी सुमारे सवा सात वाजण्याच्या सुमारास घडली.

एसटी बसला भीषण आग, चालकाचे प्रसंगावधान, ४३ प्रवाशांचे प्राण असे वाचले...
st bus pusad fire akola
| Updated on: Jul 14, 2026 | 10:48 PM
Share

यवतमाळ जिल्ह्यातील पुसद बस स्थानकातून अकोला येथे निघालेल्या एसटी महामंडळाच्या बसला खंडाळा घाटात अचानक भीषण आग लागल्याची घटना मंगळवारी सायंकाळी सवा सातच्या सुमारास घडली. या घटनेत पुसद – अकोला एसटी बसमधील प्रवासी थोडक्यात बचावले. चालकाने प्रसंगावधान राखल्याने सर्व प्रवाशांना तातडीने बसमधून सुरक्षित बाहेर काढल्याने मोठी दुर्घटना टळल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

यवतमाळ जिल्ह्यातील पुसद बसस्थानकातून अकोला येथे ही एसटी बस निघाली होती. पुसद येथील खंडाळा घाटात एसटी बससच्यास मोरील केबिनला अचानक आग लागली. त्यानंतर एसटी चालकाने प्रसंगावधान राखून एसटी बस थांबवली. यावेळी बसेसमध्ये ४३ प्रवासी प्रवास करत होते.या घटनेमुळे बसच्या प्रवाशांमध्ये घबराट पसरली. त्यामुळे बसमध्ये एकच गोंधळ उडाला. मात्र, चालकाने सर्व प्रवाशांना तातडीने सुरक्षितपणे बाहेर काढल्याने मोठी दुर्घटना टळली आहे.

एसटी बसचा ड्रायव्हर केबिन जळून खाक

बसमध्ये 43 प्रवासी प्रवास करत होते. मात्र चालकाने बस वेळीच थांबवली आणि प्रसंगावधान राखून सर्व प्रवाशांना तातडीने बसमधून सुरक्षित बाहेर काढले. त्यामुळे प्रवाशांचे प्राण थोडक्यात बचावले. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पथकाने तात्काळ घेत जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, आगीत एसटी बसचा समोरील केबिन पूर्णपणे जळून खाक झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी अचानक लागलेल्या आगीमुळे प्रवाशांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून संबंधित यंत्रणांकडून पुढील तपास सुरू आहे.

चालकाचे प्रसंगावधान

वाशिम डेपोची एमएच-१४ बीटी-४५५८ क्रमांकाची बस वाशिमहून पुसदकडे निघाली होती. खंडाळा घाट परिसरात बस पोहोचताच चालकाला केबिनच्या वायरिंगमधून धूर येत असल्याचे दिसले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून चालकाने प्रसंगावधान दाखवत ही बस रस्त्याच्या कडेला उभी केली. त्यानंतर चालक आणि  वाहकांनी क्षणाचाही विलंब न करता सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे खाली उतरविले.

प्रवासी बाहेर पडताच काही क्षणांत या बसने पेट घेतला. बसला क्षणात आगीने भक्ष्यस्थानी घेतले. काही मिनिटांतच संपूर्ण बस पेटली. घटनास्थळी उपस्थित नागरिक आणि रस्त्याने ये-जा करणाऱ्या वाहनचालकांनी हा थरार उघड्या डोळ्यांनी पाहिला.

Follow Us
रक्तदान महादान! 1200 शिवसैनिकांचा समावेश; दिल्लीत शिवसेनेकडून 'सिंदुर'
रक्तदान महादान! 1200 शिवसैनिकांचा समावेश; दिल्लीत शिवसेनेकडून 'सिंदुर' महारक्तदान शिबीराचे आयोजन
पंढरपूरात मनोज जरांगे पाटलांचं जंगी स्वागत! पहा Video
Manoj Jarange Patil | पंढरपूरात मनोज जरांगे पाटलांचं जंगी स्वागत! फुलांचा वर्षाव अन्... पहा व्हिडीओ
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी
Raj Thackeray | मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी
मुख्यमंत्री फडणवीस आणि शरद पवार गटातील नेत्याचा एकाच विमानाने प्रवास
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीस आणि शरद पवार गटातील बड्या नेत्याचा एकाच विमानाने प्रवास, फोटो आले समोर
मी समाजासाठी जीवघेणं उपोषणही करु शकतो तर कोणाचा जीवही घेऊ शकतो- जरांगे
मी समाजासाठी जीवघेणं उपोषणही करु शकतो तर कोणाचा जीवही... भर मंचावरून मनोज जरांगे कडाडले; आता...
Big Breaking| बारामती विमान दुर्घटनेबाबत मोठी अपडेट समोर
Big Breaking | बारामती विमान दुर्घटनेबाबत मोठी अपडेट समोर; नेमकं काय घडलं? पहा व्हिडीओ
मी नितीन गडकरी यांना फोन केला अन् म्हणालो... तिसऱ्या मुंबईवरून राज ठाक
मी नितीन गडकरी यांना फोन केला अन् म्हणालो... तिसऱ्या मुंबईवरून राज ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
NCP शरद पवार गटातील 8 खासदारांची मोदींसोबत बैठक; रोहित पवार म्हणाले...
NCP शरद पवार गटातील 8 खासदारांची मोदींसोबत बैठक; रोहित पवार म्हणाले, 17 तारखेला...
ठाण्याच्या टिकोजीरावांना निवडणूक आयोगाने परस्परच... संजय राऊतांची टीका
ठाण्याच्या टिकोजीरावांना निवडणूक आयोगाने परस्परच... बोलता बोलता संजय राऊत असं काही म्हणाले की.. विधानाची तुफान चर्चा
समृद्धी महामार्गावर चक्काजाम आंदोलन, सत्यजित तांबे आणि पोलिसात झटापट,
समृद्धी महामार्गावर चक्काजाम आंदोलन, सत्यजित तांबे आणि पोलिसात झटापट, आंदोलक आक्रमक