AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष पेटणार, जरागेंच्या गावातूनच रणशिंग फुंकले, थेट मुंबईकडे कूच करणार

मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याच्या निर्णयाला विरोध दर्शवत, ओबीसी संघटनांनी जालना जिल्ह्यात साखळी उपोषण सुरू केले आहे. ओबीसी आरक्षणाचे रक्षण करण्याचा त्यांचा आग्रह आहे.

मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष पेटणार, जरागेंच्या गावातूनच रणशिंग फुंकले, थेट मुंबईकडे कूच करणार
manoj jarange patil and obc
| Updated on: Aug 30, 2025 | 7:30 PM
Share

मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्यास विरोध दर्शवण्यासाठी आता ओबीसी संघटनांनी आक्रमक पावित्रा घेतला आहे. ओबीसी समाजाने ओबीसी आरक्षण बचावचा नारा दिला आहे. याच पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणाचा केंद्रबिंदू ठरलेल्या जालना जिल्ह्यात ओबीसी बांधवांनी साखळी उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. जालन्यातील अंतरवाली सराटी गावात हे उपोषण करण्यात येणार आहे. येत्या १ ऑगस्टपासून ओबीसी बांधव साखळी उपोषणाला बसणार आहेत. यासंदर्भात त्यांनी निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.

राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा आरक्षण बचाव नारा

नागपूर येथे नुकतीच राष्ट्रीय ओबीसी महासंघाची बैठक पार पडली. या बैठकीत मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्यास जोरदार विरोध करण्यात आला. या बैठकीनंतर साखळी उपोषणाची सुरुवात झाली आहे. आता हे आंदोलन राज्यभरात पसरणार आहे. जालना जिल्ह्यातील ओबीसी बांधवांनीही यात सक्रिय सहभाग घेण्याचा निर्णय घेतला आहे. मराठा आरक्षणाचे प्रमुख नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे प्रकाशझोतात आलेल्या अंतरवाली सराटी गावातच आता ओबीसी बांधव उपोषण करणार आहेत. ही निवड राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जात आहे.

ओबीसींच्या प्रमुख मागण्या काय?

  • ओबीसींच्या आरक्षणातील घुसखोरी थांबवावी: मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण दिल्यास ओबीसी समाजाच्या हक्कांवर गदा येईल, अशी भीती ओबीसी नेत्यांनी व्यक्त केली आहे.
  • शिंदे समिती रद्द करा: मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीनंतर राज्य सरकारने स्थापन केलेल्या शिंदे समितीद्वारे मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या प्रक्रियेला ओबीसींचा जोरदार विरोध असून, ही समिती तात्काळ रद्द करावी अशी त्यांची मागणी आहे.
  • स्वतंत्र आरक्षणाची मागणी: मराठा समाजाला वेगळ्या कोट्यातून किंवा ईबीसीमधून आरक्षण द्यावे, पण ओबीसी कोट्यातून नाही, अशी भूमिका ओबीसी नेत्यांनी घेतली आहे.

नागपूरमध्ये सर्वपक्षीय पाठिंबा

नागपूरमधील उपोषणात सर्वपक्षीय नेत्यांनी हजेरी लावली. ज्यात भाजप आणि काँग्रेसच्या नेत्यांचाही समावेश होता. यातून ओबीसी समाजाच्या आंदोलनाला राजकीय पाठिंबा मिळत असल्याचे स्पष्ट झाले आहे. ओबीसी नेत्यांनी जर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर रस्त्यावर उतरण्याचा आणि मुंबईकडे कूच करण्याचा इशारा दिला आहे. आज ओबीसींच्या साखळी उपोषणाचा पहिला दिवस आहे. जालना जिल्ह्यातील ओबीसी बांधवांच्या या पावलामुळे मराठा आणि ओबीसी यात वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र.
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.