Marathi News Live Update : सर्वोच्च न्यायालयातील पाच हजारांपेक्षा जास्त प्रकरण निकाली

महादेव कांबळे, Tv9 मराठी

महादेव कांबळे, Tv9 मराठी | Edited By: अजय देशपांडे

Updated on: Sep 15, 2022 | 7:17 AM

राज ठाकरे यांची टीम आज नागपूरात दाखल होणार त्यामुळे राज ठाकरे यांच्या मनसेकडेही राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. तर वेदांता फॉक्सकॉन प्रकरणामुळे महाराष्ट्रातील राजकारण तापणार असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे वेदांता प्रकरणाबरोबरच  जनावरांमध्ये पसरत असलेला लंपी आजार, पावासाचे संकट, आणि राजकीय घडामोडी, पूरस्थिती आणि इतर घटनांचीही माहिती जाणून घेणार आहोत.

Marathi News Live Update : सर्वोच्च न्यायालयातील पाच हजारांपेक्षा जास्त प्रकरण निकाली
Image Credit source: tv9 marathi

राज्यातील अनेक जिल्ह्यांमधून पावसाची संततधार सुरुच असून शेतकऱ्यांच्या नुकसानीसह अनेक ग्रामीण भागातील अनेक रस्ते आजही पाण्याखाली आहेत. एकीकडे शेतकऱ्यांवर पावसाचे संकट ओढावल्याने असून दुसरीकडे जनावरं लंपी आजाराच्या साथीत अडकले आहेत. लंपी आजाराची लागण अनेक जनावरांना लागली असून यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यामुळे लंपी आजारावर मोफत लसीकरणाचा निर्णय शासनाने घेतला आहे. तर पुण्यात होऊ घातलेला वेदांता फॉक्सकॉनचा 1.57 लाख कोटींचा प्रकल्प गुजरातला स्थलांतरित करण्यात येत असल्याने त्याच्यावरुनही सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहेत. त्यातच मिशन विदर्भच्या तयारीसाठी राज ठाकरे यांची टीम आज नागपूरात दाखल होणार त्यामुळे राज ठाकरे यांच्या मनसेकडेही राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. तर वेदांता फॉक्सकॉन प्रकरणामुळे महाराष्ट्रातील राजकारण तापणार असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे वेदांता प्रकरणाबरोबरच  जनावरांमध्ये पसरत असलेला लंपी आजार, पावासाचे संकट, आणि राजकीय घडामोडी, पूरस्थिती आणि इतर घटनांचीही माहिती जाणून घेणार आहोत.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI