AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बीडमध्ये रक्षकच बनले भक्षक, महिला दिनानिमित्त सत्कार करायचे सांगत पोलिसाकडून महिलेवर बलात्कार

बीड जिल्ह्यातील पाटोदा येथे एका पोलीस अधिकाऱ्याने महिला दिनानिमित्त एका महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरोपी उद्धव गडकर याला अटक करण्यात आली आहे.

बीडमध्ये रक्षकच बनले भक्षक, महिला दिनानिमित्त सत्कार करायचे सांगत पोलिसाकडून महिलेवर बलात्कार
Beed police Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 08, 2025 | 11:25 PM
Share

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यातच काही आठवड्यांपूर्वी पुण्यात एका महिलेवर एसटी बसमध्ये बलात्कार करण्यात आला. ही घटना ताजी असतानाच आता बीडमध्ये रक्षकच भक्षक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महिला दिनानिमित्त सत्कार करायचे सांगत पोलीस अमलदारांनी महिलेवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी बीड जिल्ह्यातील पाटोदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाटोदा पोलिसांनी आरोपी पोलीस कर्मचारी उद्धव गडकर याला याप्रकरणी ताब्यात घेतलं आहे.

नेमंक काय घडलं?

पाटोदा पोलीस ठाण्याचे बीट अमलदार उद्धव गडकर यांनी महिला दिनानिमित्त कार्यक्रमासाठी एका महिलेला बोलवले होते. त्यांनी पाटोदा येथील बँकेच्या बाजूला असलेल्या घरात घेऊन त्या महिलेवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. यामुळे पाटोद्यात खळबळ उडाली आहे. पाटोदा शहरात या घटनेची जोरदार चर्चा होत आहे. जर पोलीसच अशा घटना करायला लागले तर सर्वसामान्यांनी कोणावर विश्वास ठेवायचा, असा सवाल केला जात आहे. रक्षकच भक्षक झाल्याचे चर्चा सध्या पाटोद्यात सुरू आहे. या घडलेल्या घटनेमुळे पाटोद्यात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे.

याबद्दल पाटोदा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेवराई तालुक्यातील एक महिला काही प्रकरणासाठी पाटोदा पोलीस ठाण्यात ये-जा करीत होती. त्यामुळे पाटोदा पोलीस ठाण्यातील बीट अमलदार उद्धव गडकर या कर्मचाऱ्याच्या संपर्कात आली होती. यानिमित्ताने मोबाईल क्रमांकांची देवाणघेवाण झाली. यातून त्यांच्यात संभाषण व मॅसेज झाले. ही संधी साधत त्या कर्मचाऱ्याने महिला दिनाचे निमित्त सांगून त्या महिलेला पाटोदा येथे बोलावून घेतले. ती महिला पाटोद्यात आली असता स्टेट बँकच्या बाजूला घेऊन जात महिलेवर बलात्कार केला.

पोलीस अधिकारी ताब्यात

यावेळी त्या महिलेने आरडाओरड करण्याचा प्रयत्न केला. मात्र तिला चोरीचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत बलात्कार करण्यात आला. दुपारी १ वाजण्याच्या सुमारास ती महिला तक्रार दाखल करण्यासाठी पाटोदा पोलीस ठाण्यात आली. दुपारी १ वाजल्यापासून ती महिला पोलीस ठाण्यातच बसून होती. या घटनेची गांभीर्य पाहून पोलीस उपअधीक्षक बाळकृष्ण हुनगुडे पाटील यांनी पाटोदा पोलीस ठाण्यात भेट दिली. त्यांनी याबद्दल तपास करण्याच्या सूचना दिल्या. यानंतर संध्याकाळी ६.३० सुमारास त्या महिलेला वैद्यकीय तपासणीसाठी बीड येथे पाठविण्यात आले.

तसेच अमलदार उद्धव गडकर या पोलीस कर्मचाऱ्याच्या विरोधात गुन्हा क्र 77/25 भा.द.वी 64/2 -A(1) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पाटोदा पोलिसांनी आरोपी पोलीस कर्मचारी उद्धव गडकर याला ताब्यात घेतलं आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.