AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता एसटी पासचे नो टेन्शन, विद्यार्थ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय

आतापासून, शाळा-महाविद्यालयांना एसटी पास त्यांच्या शाळेतच वितरित केले जातील. १६ जूनपासून सुरू होणाऱ्या या मोहिमेमुळे विद्यार्थ्यांना पाससाठी रांगेत उभे राहण्याची गरज राहणार नाही. यामुळे त्यांचा बहुमोल शैक्षणिक वेळ वाचेल.

आता एसटी पासचे नो टेन्शन, विद्यार्थ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय
Electric ST Bus
| Updated on: Jun 15, 2025 | 1:03 PM
Share

शाळा आणि कॉलेजमधील विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता लाखो विद्यार्थी-विद्यार्थिनींना एसटी बसचा पास घेण्यासाठी एसटी आगारात रांगेत उभे राहावे लागणार नाही. कारण परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी महत्त्वपूर्ण सूचना दिल्या आहेत. आता विद्यार्थ्यांना त्यांचा एसटी पास थेट शाळा आणि महाविद्यालयांमध्येच दिला जाणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांचा वेळ वाचणार असून त्यांना पास मिळवणे अधिक सोपे होणार आहे.

पास केंद्रांवर लांबच लांब रांगा

येत्या नवीन शैक्षणिक वर्षाचे पहिले सत्र १६ जूनपासून सुरू होत आहे. विद्यार्थ्यांना घरापासून शाळेपर्यंत ये-जा करण्यासाठी शासनाने एसटी प्रवासात ६६.६६ टक्के इतकी सवलत दिली आहे. विद्यार्थ्यांना मासिक पास काढण्यासाठी केवळ ३३.३३% रक्कम भरावी लागते. शासनाच्या “पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर” योजनेअंतर्गत बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थिनींना मोफत एसटी पासचे वितरण केले जाते. पण आतापर्यंत विद्यार्थ्यांना या पाससाठी एसटीच्या पास केंद्रांवर लांबच लांब रांगा लावाव्या लागत होत्या किंवा शाळांनी गट करून आगारात जाऊन पास घ्यावे लागत होते. मात्र आता त्रासातून विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.

शाळा-महाविद्यालयांनी पुरवलेल्या यादीनुसार, एसटीचे कर्मचारी थेट शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थिनींना त्यांचे पास देतील. यामुळे विद्यार्थ्यांचा महत्त्वाचा शैक्षणिक वेळ वाया जाणार नाही, असे मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट केले.

एसटी पास थेट तुमच्या शाळेत

या संदर्भात १६ जूनपासून एसटी प्रशासनातर्फे “एसटी पास थेट तुमच्या शाळेत” ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेसाठी एसटीच्या आगार व्यवस्थापकांनी सर्व शाळा-महाविद्यालयांच्या मुख्याध्यापक आणि प्राचार्यांना पत्र पाठवून नवीन वर्षातील विद्यार्थ्यांची यादी तयार ठेवण्यास सांगितले आहे. या अभिनव योजनेचा लाभ राज्यभरातील शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थी-विद्यार्थिनींना होणार आहे, असे मंत्री सरनाईक यांनी सांगितले.

तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा
तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा.
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का.
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया.
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया.
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा.
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार.
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा.
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का.
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा...
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा....
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी.