Omicron Task Force Meeting | टास्क फोर्सची बैठक संपली, कठोर निर्बंध, बुस्टर डोसवर चर्चा; अहवाल मुख्यमंत्र्यांना देणार

बैठकीत टास्क फोर्समधील तज्ज्ञांनी दक्षिण आफ्रिकेतील वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टरांकडून ओमिक्रोन विषाणूच्या स्थितीचा आढावा घेतला. ही बैठक रात्री उशिरापर्यंत चालली. ऑनलाईन पद्धतीने झालेल्या बैठकीत ओमिक्रॉन विषाणू किती घातक आहे आणि त्याचे दुष्परिणाम काय आहेत ? या विषयावर करण्यात आला.

Omicron Task Force Meeting | टास्क फोर्सची बैठक संपली, कठोर निर्बंध, बुस्टर डोसवर चर्चा; अहवाल मुख्यमंत्र्यांना देणार
ओमिक्रॉन

मुंबई : राज्यात ओमिक्रॉनचा संसर्ग वाढला आहे. रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे राज्य सरकार सतर्क झाले आहे. या विषाणूला थोपवण्यासाठी कोणत्या उपायोजना कराव्यात ? काय खबरदारी घ्यावी यावर राज्य सरकारचा अभ्यास सुरु आहे. ओमिक्रॉन विषाणूबद्दल अधिका माहिती घेऊन प्रतिंबधक उपाय लागू करण्यासाठी आज (6 डिसेंबर) राज्यातील टास्क फोर्सच्या तज्ज्ञांची दक्षिण आफ्रिकेतील वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांसोबत बैठक झाली. या बैठकीत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.

बैठकीत अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा

बैठकीत टास्क फोर्समधील तज्ज्ञांनी दक्षिण आफ्रिकेतील वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टरांकडून ओमिक्रोन विषाणूच्या स्थितीचा आढावा घेतला. ही बैठक रात्री उशिरापर्यंत चालली. ऑनलाईन पद्धतीने झालेल्या बैठकीत ओमिक्रॉन विषाणू किती घातक आहे आणि त्याचे दुष्परिणाम काय आहेत ? या विषयावर करण्यात आला.

बुस्टर डोस घेण्यावर चर्चा 

तसेच या बैठकीत झिम्बाब्वेमध्ये वाढलेला विषाणू तसेच रुग्णांबद्दलदेखील चर्चा झाली. दोन डोस घेतलेल्या नागरिकांनाही ओमिक्रॉनची लागण होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे बुस्टर डोस घेण्याविषयीदेखील काही डॉक्टरांनी या बैठकीत सूर आळवल्याची माहिती आहे. ओमिक्रॉनच्या भयामुळे टाळेबंदीऐवजी कोरोना प्रतिबंधक नियमांचं कठोर पालन करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचं मत या बैठकीत तज्ज्ञांनी मांडलं.

बैठकीचा तपशील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे देण्यात येणार  

ही बैठक 6 डिसेंबर रोजी रात्री उशिरापर्यंत चालली. या बैठकीत अनेक महत्त्वाच्या विषयावर चर्चा झाल्यानंतर आता बैठकीचा एकूण आढावा तसेच चर्चेचा तपशील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लवकरच सादर केला जाणार आहे. त्यानंतर कोरोनाला थोपवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

96 तासात देशातल्या 5 राज्यांत ओमिक्रॉन पसरला

दरम्या, फक्त 96 तासात देशातल्या 5 राज्यांत ओमिक्रॉन पसरलाय. 2 डिसेंबरला कर्नाटकात 2 ओमिक्रॉन बाधित निघाले. नंतर 4 तारखेला गुजरातच्या जामनगरमध्ये एक रुग्ण, 4 तारखेच्या संध्याकाळी कल्याण-डोंबिवलीत एक रुग्ण, आणि यानंतर दिल्लीत एक व्यक्ती ओमिक्रॉन बाधित आलाय. यापैकी कल्याण-डोंबिवलीतला जो 33 वर्षीय तरुण बाधित झालाय, त्याला फक्त हलका ताप आहे. इतर कोणतीही लक्षणं नाहीत. तो काही दिवसांपूर्वी दक्षिण आफ्रिकेतून मुंबईत आला होता. सध्या त्याला कल्याणच्या कोव्हिड सेंटरमध्ये भर्ती करण्यात आलंय.

इतर बातम्या :

RBI ची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील आता ‘या’ बँकेवर बंदी, ग्राहकांना फक्त 10 हजार काढता येणार

राजकीय पक्ष आणि नेत्यांच्या सोयीचं राजकारण; विद्वान जे बोलू शकत नाही, ते पहेलवान शड्डू ठोकून बोलू शकतो!

Omicron Update | ओमिक्रॉन व्हेरियंट ‘सुपर माईल्ड,’ तूर्तास महाराष्ट्रात निर्बंध नाही, सरकारचं स्पष्टीकरण


Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI